Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तो अय्या चित्रपट अति लाऊड आहे
तो अय्या चित्रपट अति लाऊड आहे. विशेष करून ती आजी ओव्हर आहे.
मराठीत जरा सटल घेतलय सर्व. हिरो देखणा घ्यायला हवा होता गंध मधे.
अय्या सिनेमातील गाणी बरी आहेत
अय्या सिनेमातील गाणी बरी आहेत बाकी सिनेमा मला तरी आवडला नाही.
अँट मॅन अॅन्ड वास्प-
अँट मॅन अॅन्ड वास्प- क्वांटमेनिआ बघितला. मला मध्ये बराच काळ गा.ढ. झोप लागली. मला अजिबात अपिल झाला नाही. काही स्मार्ट डायलॉग्ज्स आहेत, पण एकुण टोटली अंडरव्हेल्मिंग वाटला.
पोराला आवडला म्हणाला पण त्याच्याही बोलण्यात तितकासा जोश न्हवता. एक - दोन सीन मस्त होते इतपतच स्तुती होती.
पोराला आवडला म्हणाला पण
पोराला आवडला म्हणाला पण त्याच्याही बोलण्यात तितकासा जोश न्हवता.
>>>
>>>>>>>पोराला आवडला म्हणाला
>>>>>>>पोराला आवडला म्हणाला पण त्याच्याही बोलण्यात तितकासा जोश न्हवता.
हाहाहा
मी पण काल बघून आले.. ॲंटमॅनचा
मी पण काल बघून आले.. ॲंटमॅनचा हा सगळ्यात बोअरींग पार्ट वाटला. बनवायचा म्हणून बनवला आहे टाईप्स.. त्याचे मित्र मिसिंग होते, ते असते तर जरा इंटरेस्टिंग वाटला असता.. असो, पिच्चरच्या सुरूवातीला गार्डिअन्स ॲाफ गॅलक्सिचं पण ट्रेलर बघितलं.. ते तर महा बोअरींग वाटलं.. तरीही बघायला जाईनच
वीरा सिम्हां रेड्डी.
वीरा सिम्हां रेड्डी.
अजून 5-8 मिनिट झालेत.
Honey rose नावाची actress नंदमुरी बालकृष्ण ची आई आहे. कृपया दोघांचे फोटो बघा
मागच्या आठवड्यात प्राईमवर आणि
मागच्या आठवड्यात प्राईमवर आणि हॉटस्टार वर-(लेकीबरोबर पाहिलेले)
फ्रोजन-१
फ्रोजन-२
हॉटेल ट्रान्सीव्लीनीया-२
हॉटेल ट्रान्सीव्लीनीया-४
Monster.inc
Monster university
द गुड डायनोसोर
इमोजी मुव्ही
वीरा सिम्हां रेड्डी.
वीरा सिम्हां रेड्डी.
अजून 5-8 मिनिट झालेत.
Honey rose नावाची actress नंदमुरी बालकृष्ण ची आई आहे. कृपया दोघांचे फोटो बघा>>>>>> बघितला दहा मिनिटं.. सुपर कॉमेडी सीन्स काय डायलॉग काय डायलॉग...नॉट ओन्ली फेमस ऑल्सो डेन्जरस.... गॉड ऑफ मास..
पूर्ण बघितल्यावर रिव्ह्यू लिहायला येते.
आपणास ओटीटीरत्न पुरस्कार
आपणास ओटीटीरत्न पुरस्कार देण्यात येत आहे.
(No subject)
"वाळवी" मस्त आहे. त्या बाफवर
"वाळवी" मस्त आहे. त्या बाफवर लिहीले आहे अजून.
अजून एक मराठी "पुनश्च हरि ओम" पाहिला झी५ वरच. स्पृहा जोशीचा मुख्य रोल आहे. ओव्हरऑल बरा आहे. जरा संथ आहे. असे पिक्चर्स इतर काही करता करता पाहिले जातात. समोर बसून फुल फोकस ठेवण्याइतके एंगेज करत नाहीत. वाळवी मात्र फोकस ठेवून पाहण्यासारखा आहे.
M3GEAN (MEGAN) पाहिला (पीकॉक चॅनेल अमेरिकेत). इंटरेस्टिंग आहे. खिळवून ठेवतो.
दोबारा संपला आता विजय
दोबारा संपला आता विजय सेतुपथीचा डीएसपी आपोआप चालू झाला. हिंदी डबिंग मधे देहूरोड कि लडकी हूं वगैरे डायलॉग्ज आहेत.
मुझे देहूरोड से नफरत हो गयी है. सगळीकडे कोंगाडी पाट्या कशा काय ? राज ठाकरे खवळले तर काही खरं नाही.
पठाण पाहिला.
पठाण पाहिला.
एक आणि एकच आठवण: जॉन अब्राहम.
बाकी शाहरुख चे फनी पंच, दीपिका ची बॉडी सगळं झकास.शेवटी शाहरुख सलमान ने बऱ्याच मुलांना टोमणे मारले.
इतकी विमानं, हेलिकॉप्टर, घरं,बाईक उडवल्या की नेहमीप्रमाणे काय ही उधळपट्टी वाटून गेलंच.
>>>>एक आणि एकच आठवण: जॉन
>>>>एक आणि एकच आठवण: जॉन अब्राहम.
सौ टका सही बात. कसला आय कँडी दिसतो ओह माय गॉड!!!! हार्ट थ्रॉब!
देहूरोड कि लडकी हूं >>> आणि
देहूरोड कि लडकी हूं >>> आणि यांना देहूरोड हेच गावाचे नाव आहे असे वाटलेले दिसते. मूळ गाव देहू आणि देहूरोड हे फक्त स्टेशन आहे याचा पत्ता नाही
एकूण पठाण हा "मार्केटिंग हिट" केलेला दिसतो. लागला तेव्हा एक दोन दिवसांत हा हिंदीमधला सर्वोच्च सुपरहिट पिक्चर आहे असे उठवून दिले गेले. एकदोन आठवड्यांनंतर कोठे नावही ऐकू येत नाही.
बघितला वाळवी...कन्सेप्ट नाही
बघितला वाळवी...कन्सेप्ट नाही आवडली..
..............स्पॉईलर....................
मला पूर्ण सिनेमा भर वाटत होते कि अनिता दाते मेलीच नाहीये..मर्डर एक गंभीर बाब आहे पण आता असे दिवस आले इतक्या गंभीर विषयावर इतकं जास्त विनोदी केलंय..बैकग्राऊंड म्युझिक पण प्रेक्षकांना गंभीर होऊं देत नाही.. आणि जे चाललंय ते चुकीचे नाही असा संदेश पसरतोय..
बायकोला मारणे चूक..त्या बाईला मारणे चूक..पोलीसाला मारतं चूक..सगळ्यात भयानक अपघातात जीवंत असलेल्या माणसाला मारणं...
शेवटच्या दहा सेकंदात लोकांना मारून डायरेक्ट ने स्वतः ला वाचवलंय... पण प्रेक्षकांच्या लक्षात शेवट राहत नाही जितकं पूर्ण सिनेमात पाहिलेल राहितं....
#लहान मुलांसमोर अजिबात बघण्यासारखा नाहीये.#
जॉन बाबत सहमत. भारी दिसतोय
जॉन बाबत सहमत. भारी दिसतोय पठाण मध्ये.
जॉन चाच नो स्मोकिंग पाहिला आज. स्टीफन कींगच्या Quitters.Inc चे रूपांतर आहे. मस्त जमलाय सिनेमा, परेश रावल, जॉन दोघांनी काम मस्त केले आहे. रणवीर शोरी पण छोट्या भूमिकेत लक्षात राहील असा आहे.
आणि यांना देहूरोड हेच गावाचे
आणि यांना देहूरोड हेच गावाचे नाव आहे असे वाटलेले दिसते >>>
धर्मेंद्राच्या हुकूमतला टफ फाईट देईल डीएसपी. पुष्पा पण असाच होता. कसा काय हिट झाला !!
माय लिस्ट मधे टाकलेले चित्रपट
माय लिस्ट मधे टाकलेले चित्रपट सुद्धा पाहून होत नाही. त्यामुळं नेटफ्लिक्स बंद केलं. प्राईम बंद करता येत नाही.
हॉटस्टारची वार्षिक वर्गणी संपली कि कंटिन्यू नाही करणार. माझा सिनेमे पहायचा वेग आधीही खूप कमी होता. इथे आल्यावरच इथले वाचून बघितले. पण आवड वेगळी असल्याने फरक पडतो. ज्या वेळी एखादा सिनेमा बघावासा वाटेल तेव्हां महिन्याचं सबस्क्रीप्शन किंवा रेंटवर बघणे सोयीचे वाटते.
२००६ चा नितळ पाहीला. मला फार
२००६ चा नितळ पाहीला. मला फार लांबवल्यासारखा व स्लो वाटला. किशोर कदम यांनी इवल्याश्या भूमिकेतून अलगद फुलासारखा तो सिनेमा उचलून आपल्या शिरपेचात खोवला आहे. काय मस्त अॅक्टीग केलय. बाकी वि. गोखले, रवींद्र मंकणी, उत्तरा बावकर, नीना कुलकर्णी, रिमा लागू, देविका दफ्तरदार, ज्योती व अमृता सुभाष आणि स्वतः विजय तेंडुलकर असे एकाहून एक उत्तम तारे तारका आहेत.
विषय 'कोड' हा आहे. पण याह विषयावरचा ;इमेगो' मला जास्त आवडला होता.
#लहान मुलांसमोर अजिबात
#लहान मुलांसमोर अजिबात बघण्यासारखा नाहीये.#
अगदी अगदी.
मी माझ्या एका मैत्रिणील सोबत गेले होते तिच्या घरावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता.
आणि चित्रपट भर नुसताच मृत्यू ,प्रेत ,मर्डर ,psycho लोकांचा प्लॅनिंग etc.
एका अशा स्त्रीचा murder जिच्या जीवनात नुकतंच काहीतरी आनंदाचा क्षणसाध्य झालेला आहे.नाही आवडला वाळवी.
पण लोकांना कदाचित हेच आवडत असेल . राक्षसीपणा.
'नितळ' मधील, किशोर कदम अर्थात
'नितळ' मधील, किशोर कदम अर्थात सौमित्र यांचा अभिनय पाहून , पहील्यांदा 'गारवा' आल्बम ऐकला. काय संवादफेक आहे आहाहा. अफाट.
मुकुंदन उन्नी अँड असोशिएट्स
मुकुंदन उन्नी अँड असोशिएट्स (हॉटस्टार / हुलू)
2022 मध्ये रिलीज झालेला हा मल्याळम ब्लॅक कॉमेडी सिनेमा पहिला आणि आवडला.
मुकुंदन (म्हणजे आपला नायक) हा एक सामान्य वकुबाचा वकील आहे पण यशस्वी होण्यासाठी त्याची कुठल्याही थराला जायची तयारी आहे.
जर वाळवी त्यातील व्यक्तिरेखांच्या मोरालिटी मुळे आवडला नसेल तर अजिबात पाहू नका.
पण जेक गिलनहल चा नाईट क्रौलर आवडला असेल तर नक्की पहा.
कोकेन बेअर परवाच लागलाय.
‘कोकेन बेअर’ परवाच लागलाय. टाईमपास कॉमेडी-हॉरर आहे.
Love today तमिळ नेटफ्लिक्स वर
Love today तमिळ नेटफ्लिक्स वर.
एक कपल डिपली एकमेकांच्या प्रेमात असतं..एके दिवशी मुलीच्या पप्पाला कटप्पाला प्रेमप्रकरण समजतं मग ते दोघांना एकमेकांचा मोबाईल swap करायला सांगतात मग येते मजा.. सिक्रेट्स, समज,गैरसमज..सेकंड हाफमधे सिनेमा थोडा गंभीर होतो..छान विषय, छान मांडणी, आवडला.
Rorschach मल्याळम हॉटस्टार वर हिंदीत.
बायको हरवल्याची तक्रार घेऊन एका गावात मामुट्टी येतो आणि तिथल्या लोकल माणसाच्या बालनच्या फैमिली बरोबर गुंतत जातो..सायकॉलॉजीकल थ्रीलर.. एकामागून एक ट्वीस्ट येत राहतात सिनेमात.. चांगला आहे.
Schneider's list प्राईमवर.
विषय:1939-पोलंडमधे ज्युंवर झालेले अनन्वित अत्याचार
Beast तमिळ नेटफ्लिक्स वर हिंदीत.
टाईमपास सिनेमा, स्टायलिश वायोलंस, कॉमेडी.
वध बघितला नेटफ्लिक्स वर
नीना गुप्ता आणि संजय मिश्रावाला
कर्जबाजारी टिचर आणि कर्जवसुली वाल्याचा टॉर्चर..त्यातून घडते हत्या,मग हत्येची सगळी नामोनिशाणी मिटवणं..पोलिसांचा संशय.. खिळवून ठेवतो सिनेमा.. चांगला आहे.
मला पूर्ण सिनेमा भर वाटत होते
मला पूर्ण सिनेमा भर वाटत होते कि अनिता दाते मेलीच नाहीये..मर्डर एक गंभीर बाब आहे पण आता असे दिवस आले इतक्या गंभीर विषयावर इतकं जास्त विनोदी केलंय.. >> ब्लॅक कॉमेडी म्हणून एक प्रकार असतो. परेश मोकाशी त्याचा वापर एकदम सहजपणे सिनेमाभर करतोय . विनोद म्हणून बघण्यापेक्षा कदाचित उपहास म्हणून बघितले तर जाणवेल.
मला ते ब्लॅक कॉमेडी नाही
डॉक्टर जी बघितला नेटफ्लिक्स वर
ठिक आहे..
दोन भावांनी चालवलेल्या
दोन भावांनी चालवलेल्या मॅकडोनाल्डस रेस्टॉरंटचे हक्क विकत घेऊन त्याची जगातली सर्वात मोठी चेन बनवणाऱ्या रे क्रॉक वरचा द फाऊंडर पाहिला. एंगेजिंग आहे(नेटफ्लिक्स)
वध बघायला सुरू केला. पण फार
वध बघायला सुरू केला. पण फार संथ वाटला. तरीही थोडा ढकलत बघितला. काही काही सिन्स फार किळसवाणे वाटले. नाहीच बघितला मग पुढे.
Pages