(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
घरगुती वापराच्या विजेची चोरी
घरगुती वापराच्या विजेची चोरी हे हैदराबादचेच नाही तर पूर्ण देशातले वास्तव आहे.
"लैटमीटर में सेटिंग' असे त्याचे हैदराबादी नाव. त्याबद्दलच्या फुशारक्या :-
हैदराबादी १ :- हमारे घरमे लैटमीटर ऐसा सेट किये की लैटबील आधा होगया देखो.
हैदराबादी २ :- ये तो कुच्च नै. हमारे अब्बा लैटमीटर में ऐसा सेटिंग किये बिल तो नै आरा, उलटा लैटवाले हर महिने पैसे देको जारे देखो
(No subject)
(No subject)
https://twitter.com/Artoo
https://twitter.com/Artoo_Detwo/status/1588488133385269248
झकास, ऐसे नक्को देखो
झकास, ऐसे नक्को देखो
तब्बूचे एक्सप्रेशन्स
मागच्या महिन्यात हैदराबादच्या
मागच्या महिन्यात हैदराबादच्या जुन्या भागात जाणे झाले. छोट्या दुकानांमध्ये पाय ठेवला की मालकाचे - 'क्या होना?' एकदम फिस्सकन हसायला आले. हे असेच 'क्या होना' विदर्भात आणि औरंगाबाद शहरात हमखास ऐकायला मिळते.
कुठलाही पत्ता सांगतांना 'सिधा जाको एक्कीच रोड है' नाही तर 'दो लेफ्टां आते, फिर दो राईटां आते' असे सांगण्याची पद्धत ! प्रचंड करमणूक झाली
सुप्रसिद्ध बिरीयानी-नल्ली
सुप्रसिद्ध बिरीयानी-नल्ली-पाया-हलीम व्यतिरिक्त जुन्या हैद्राबादच्या काही खासमखास खाद्यपरंपरा आहेत. दर भेटीत काही खास खायला मिळेल असे बघतो
एका मित्राकडच्या लग्नानिमित्त नुकतीच हैद्राबादची वारी घडली आणि मेजवानीत 'बदाम बोबट्लु' खाण्याचा योग आला. थोडक्यात बदामाचे पुरण भरलेली पुरणपोळी स्वर्गीय चव.
नंतर बघितले, एका प्रसिद्ध मिठाई दुकानात पण विकायला होती, पण इथली चव अगदीच यथातथा
आपल्याकडे साटोर्या असतात
आपल्याकडे साटोर्या असतात तसाच प्रकार फक्त साटोर्या खव्याच्या असतात बहुतेक. बोबाटलु छानच असणार ते वर्णनावरुनच कळतय.
आपल्या पुरणपोळीचे हुलीगे,
आपल्या पुरणपोळीचे हुलीगे, पुरण पुरी, ओबट्टू, बक्शामुलू आणि बोबट्टलु असे अनेक भाऊबंद दक्षिणेत आहेत.
ऋतू / सण / प्रसंगाप्रमाणे सारण बदलते. हरभरा डाळीचे पुरण, सुके-ओले खोबरे, केळी, रताळी, बदाम, काजू, चारोळ्या असे वेगवेगळे पुरण असते.
ओह वाउव!!! किती मस्त.
ओह वाउव!!! किती मस्त.
मी खाल्लेले बोबटलु बहुत करून
मी खाल्लेले बोबटलु बहुत करून कोरडे होते खुप. त्यावर दूध तूप घेणे गरजेचे होते.
एका लग्नात पंगत सुरू झाली लाडु होते, आम्हाला वाटले एवढेच गोड. आणि शेवटला भात, घेतला ताक घालून खायला तेव्हा बदाम बोबटलु आले. खायचे म्हटले तर भात टाकावा लागला असता, मग बोबटलुला नाही म्हणावे लागले नाईलाजाने.
सही! बदामाचं खवा आणि साखर
सही! बदामाचं खवा आणि साखर वगैरे घालुन सारण बनवतात का? भारी लागत असतील.
ऋतू / सण / प्रसंगाप्रमाणे
ऋतू / सण / प्रसंगाप्रमाणे सारण बदलते. हरभरा डाळीचे पुरण, सुके-ओले खोबरे, केळी, रताळी, बदाम, काजू, चारोळ्या असे वेगवेगळे पुरण असते. >>>>>> बेंगलोर (सेक्टर 4) मधे एक पुरणपोळी स्पेशल दुकान आहे, तिथे ही सगळी व्हरायटी मिळते. याचीच ठाणे आणि आता पुणे मध्येही दुकाने चालु झाली आहेत ' पुरणपोळी घर ,' नाव आहे. इथेही भरपूर व्हरायटी आहे.
... बोबटलुला नाही म्हणावे
... बोबटलुला नाही म्हणावे लागले नाईलाजाने...
अरेरे. ऐसा कायकु किये ? निवाला दो निवाला खा लेते ना, रोज मौका किधर मिलता यारों ?
... खाल्लेले बोबटलु बहुत करून कोरडे होते ...
होय मानव, वरून तूप घेतात भरपूर. आपल्या पुरणपोळीपेक्षा कडक असते, थोडे साटोरी सारखे टेक्श्चर.
थोडक्यात बदामाचे पुरण भरलेली
थोडक्यात बदामाचे पुरण भरलेली पुरणपोळी Happy स्वर्गीय चव...... अहाहा!
मानव, काय हो हे?
बदामाचं खवा आणि साखर घालुन
बदामाचं खवा आणि साखर घालुन सारण ...
होय, बदाम भिजवून त्याचे पुरण. झकास लागते. असेच मी चारोळ्या भिजवून केलेल्या पुरणाच्या पोळ्याही बघितल्या - खाल्ल्या आहेत.
....बंगळुरु, पुणे, ठाणे इथे पुरणपोळी घर ?
रील्स बघितल्यात त्यांच्या. अजून पायधूळ नाही झाडली तिकडे, त्यांचे पुण्य कमी पडतेय हैद्राबादला काही मिठाईच्या दुकानातून मिळतात, त्या ट्रायल्या, नाही आवडल्या. Was an apology of बोबटलु.
खुप उशिरा बघितला बाफं. तुफान
खुप उशिरा बघितला बाफं. तुफान करमणूक झाली अनिंद्य तुमच्या पोस्टी वाचून! पुर्वी पण हैद्राबादी फार गमतीशिर वाटायची आणि नंतर द अंग्रेज बघितला. अक्षरशः तोंडपाठ होता अख्खा पिकचर! टॅगमंड, अॅबिड्सके फुटपाथ, बंजारा हिल्स. लो बजेट असून सलिम फेकू, इस्माईल भाई आणि जहांगिरनी टोटली उचलून धरला पिकचर. कुंटा निखिल पण दाद दिली पाहिजे.
नै बोले तो सुनते नै एकून पण फूल ह ह पु झाली!
बोबटलु नाही माहित पण तिची
बोबटलु नाही माहित पण तिची बहीण पोतरेकुलु खूपच भारी लागते.
नावं तरी अॅपटायझिंग द्या रे!
नावं तरी अॅपटायझिंग द्या रे!
नावं तरी अॅपटायझिंग द्या रे
नावं तरी अॅपटायझिंग द्या रे
पोतरेकुलु / पोथरेकुलु रुखवतात
पोतरेकुलु / पोथरेकुलु रुखवतात ठेवतात तिकडे, जितके शुभ्र आणि पापुद्रे जास्त तितके जास्त भारी.
वैद्यबुवा , वेलकम. द अंग्रेज
वैद्यबुवा , वेलकम. द अंग्रेज धमाल आहे
"नावं तरी अॅपटायझिंग द्या रे
"नावं तरी अॅपटायझिंग द्या रे" -
नावं तरी अॅपटायझिंग द्या रे
नावं तरी अॅपटायझिंग द्या रे >>>
अरे अमित, मराठीत पण फदफदं
अरे अमित, मराठीत पण फदफदं आहेच की.
अमितव
अमितव
पण बदाम पुरणपोळी नक्कीच अफलातुन असेल.
बेंगलोर (सेक्टर 4) मधे एक
बेंगलोर (सेक्टर 4) मधे एक पुरणपोळी स्पेशल दुकान आहे >> होळ्ळिगे मने? त्यांची चेन आहे. तिथे बर्याच प्रकारच्या गोड पोळ्या मिळतात. पुरण पोळी त्यातली एक. मला तिथल्या नारळ पोळ्या (कायी होळ्ळिगे) जास्त आवडल्या. चॉकलेट होळ्ळिगे पण मिळते म्हणे तिथे. माझी हिंमत नाही झाली, पण पुतण्या आवडीने खातो.
होळ्ळिगे असा उच्चार आहे होय ?
होळ्ळिगे असा उच्चार आहे होय ?
मी वर हुलीगे लिहिलेय
कानडीत 'ळ' आणि 'ळ्ळ' भरपूर, तेलुगूत 'ड' आणि 'ड्ड' भरपूर
अच्छा! मला आधी तो शब्द वाचून
अच्छा! मला आधी तो शब्द वाचून वाटलं की तेलगूत त्याला हुलिगे म्हणतात की काय. दोन्ही भाषांमध्ये खूप साम्य आहे. लिपीत तर फारच. अगदी देवनागरी - गुजराती इतका फरक, किंबहुना कमीच, कन्नड - तेलगू लिपीत आहे.
हो होळिगे (ळ्ळि पण असेल)
हो होळिगे (ळ्ळि पण असेल) म्हणतात पुपोला. होळिगे मने सुप्रसिद्ध आहे. मी कधी आणली नाहीये अजून, पण एकदा खाल्ली आहे दुसरीकडे. ही पुरणपोळी तूरडाळ वापरून करतात त्यामुळे ती हलकी असते आपल्या पुपोच्या मानाने. पोटाला जड होत नाही. पण मला आपली मराठी पुरणपोळीच जास्त आवडते
आमच्या पोळ्यांच्या बाई उत्तर कर्नाटकातील होत्या. त्या होळिगे न म्हणता उब्बीटु की ओब्बिटु म्हणायच्या.
Pages