हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कॉलेज के टायमा अंग्रेजा पिच्चर देखकु ऐसेच बाता करते हम लोगा Lol

.. निखळ करमणूक....

तो तर उद्देश आहेच, इधरकु दो घडी हंसी मजाक की बातां करते तो दिलकू सुकून मिलता, कलेजे में ठंड पडती.

... आपल्याकडे अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.... हा माझा दुसरा उद्देश होता तो मात्र थोडा बाजूला राहिलाय Happy

नको = नक्को Happy

आठवा बुलंदी सिनेमातले आशा भोसलेंचे गाणे - तेरा दिल ओ रे बाबू अपने खिसे में रखो..ना बाबा ना रे बाबा मेरेको नक्को नको नक्को ssssss !!!!

कुवारा बाप

+ १

हिंदी चित्रपटात-गाण्यात हैदराबादी बोलीच्या वापराची अनेक उदाहरणे आहेत, which is so good !

मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग हे निझामी राज्यात बराच काळ होते, त्यामुळे हैद्राबादी बोलीचा प्रभाव अजून आहे. बोलचालीत दक्कनी शब्द आहेत.

उदा :

- ज्या शब्दावरून हा धागा सुरु झाला तो 'सौदा'
- चुंगी / चुंगीनाका
- चक्की (दळण- जात्यासाठी)
- कमजोर
- पैदास (पैदाईश मूळ शब्द पण सगळीकडे वापरात पैदास)
- जिम्मा / जिम्मेदारी
- तंगी (टंचाईसाठी )

असे अनेक कॉमन शब्द आहेत. अजूनही असतील, हे आता आठवले.

पूर्नालु-

IMG_4132.jpeg

नुकत्याच पार पडलेल्या छोटेखानी हैदराबाद प्रवासात ही खास मिठाई खाण्याचा सुयोग आला. फक्त ५ घटक वापरुन केलेली जुन्या हैदराबादची फेस्टिव रेसेपी !

पुरणाचे तळलेले वडे म्हणता येतील. आवरण तांदळाच्या पिठीचे, कुरकुरीत, आत हरभरा डाळीचे पुरण. बेताचे गोड. झक्कास !

याला काहीजण बूरेलु म्हणतात.

(फोटो जालावरुन साभार)

बूरेलु >>>
वा ! मस्तच आहेत....

@ मृणाली,

तुम्हाला रेसिपी माहित असेल / मिळवता आली तर जरूर लिहा इथे.

पूर्नालू = पुरण + आलू असे लक्षात ठेवायला सोपे Happy

>>>>इधरकू सन्नाटा होरा.>>>>
क्या बोलरा जी.... इत्तां बाता चलता इधरकू....
झूट् कायकू बोलरा....
Happy
First attempt.

@ प्रिती विराज

झकास ! Happy

@ पुंबा

आलू कचालू हे फार जुने हिंदी बडबडगीत आहे - आमच्यासाठी लहानपणी म्हटले जात असे, पण त्यात काही 'हैद्राबादी' आहे असे वाटत नाही Happy

@ मानव,

वास घेतोय म्हणजे 'बू लेरुं' होईल ना ? '

'बु रेलु' Spoonar म्हणून खपेल - बरवाजा दंद करलो सारखे Happy

वास या अर्थी 'बू' दक्कनी बोलीत जास्त वापरतात.

'खूश-बू'. 'बद-बू' असे उत्तरेत - हिंदीत जास्त स्पेसिफिक असते Happy

हैदराबादी प्रभाव असलेले आणखी काही मराठी शब्द :

इबलीस / इब्लिस - अर्थ मराठीत आहे तोच.

धनुर्धर ऐवजी “तिरंदाज” (हे मी आडनाव सुद्धा ऐकलेय)

दिलेर / दिलदार - दोनही शब्द आयातीत

धडधाकट ऐवजी “तंदुरुस्त”

मात ऐवजी “शिकस्त”

द्राक्षांना “अंगूर”
वर्गणीला “चंदा”
जकातनाक्याला “चुंगी नाका”
चिंतितला “परेशान”
व्यवसाय ला “पेशा”
धडगत नाही ला “खैर नाही”
धडक दिली ला “टक्कर दिली”

सीमाभाग, मराठवाडा आणि विदर्भात भरपूर लोकं वरील शब्द बोलचालीत वापरतात.

चलो लतीफ़ा सुनो :-

हैदराबादी शौहर ने दूसरी शादी का इरादा कर लिया.

बेगमकू मालूम चल गया आते जुम्मे कू चुपके से निकाह कर रा बोल के.

जुमेरात कू सोया, सुबह जाग कू शानदार कपडे पहनने लगा. बेगम पूछे किधर कू जाते? तो नमाज़ ए जुम्मा कू जातौं बोलरा.

बेगम बोले आज तो इतवार है खबीस की औलाद, जुम्मा नै. तुम कू नींद की गोलियॉं दी थी मैं. आज तीन बिन बाद जागे तुम. आगे ऐसा हौलेपना किये तो डायरेक्ट जहन्नुम में जागेंगे तुम, समझे क्या ? Proud

Pages