हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मराठीत जो 'कसंतरीच होतंय' नावाचा आजार आहे त्याचा हैदराबादी जुळा भाऊ म्हणजे 'हैबत' !

'मेरेकू हैबत होरी / कैसा-कैसाच होरा' = हैदराबाद रिपब्लिकचा राष्ट्रीय आजार Happy Happy

'हैबत'रावांबद्दल कुणी नाही लिहिले पुढे, मीच लिहितो मग :-

बाहेरून हैदराबादेत जाऊन डॉक्टरकी करणे फार कठीण ! कारण आजार आणि लक्षणे वेगळीच आहेत, उदा.: -

हातां पैरा खिचरै
बोटी बोटी दर्द होरी
हल्लक सूखा जारा
दिमाग में ठन्न बोलरा
हौल हौल होरी, घर छोडकू भाग जाना दिल बोलरा
हल्लक में सुईयाँ चुभरै
आंग कसकसारा
पतले पैखाने होरे
दातां सल्ल सल्ल बोलरे

अशी लक्षणं पेशंट सांगत असेल तर योग्य रोग ओळखून अचूक उपाय फक्त हैदराबादी डॉक्टरच करू शकतात Happy

हैदराबादी आजारांच्या लक्षणांत हे जोडायचे राहिले वर :-

सर में हेडेक होरा Happy

जी घबर रा

सर फटरा

बार बार जबान पक जारी

गर्दनां दुखरे

आखां खर खर होके पानी बहारीच बहरा
Happy

चलो सिलसिला आगे को बढाते ...

हे चित्र पहा, कुठे आहे हैदराबादमध्ये सांगू शकाल ?

CC859CF4-896A-4780-B598-50E921C432A6.jpeg

नुसती ही जागा गेस न करता लोकल भाषेत लिहा एक दोन 'लाईना' Happy

... जाहीरातीचे विराट रुप ...

वो तो हैच, लेकिन और कुच खास है ये जगा - हैदराबादी लोगां बतायेंगे शायद

Masab tank ma sahiba tank. Opposite this is paradise I think.

वरील चित्राबद्दल सांगतो - अमीरपेट भाग आहे, अन्नपूर्णा.

संगणक क्षेत्रात आज जगभर काम करणाऱ्या हैदराबादी पब्लिकची ज्ञान-गंगोत्री आहे हा भाग. काँक्रीटच्या खुराड्यात अनेक छोट्या-छोट्या संस्था आणि ट्रेनिंग सेंटर्स !

यहाँ से शुरुवात किये ऐसे हैदराबाद के बहुत लोगां आजको अमरिका तलक पहुंचे Happy

अहो अनिंद्य तुमच्या साठी नाही ते लिहिलेले. जनरल वैताग आला म्हणून लिहिले आहे. कृपया वाइट वाटून घेउ नका व बाफ राहु द्या.
हैद्राबादी त हिंदी मराठी तेलुगु व इंग्रजी मिक्स सर्व शब्द अस्तात त्याचे उदाहरण आहे हे वरील वाक्य. सेल्फ डब्बा ह्या तेलुगु फ्रेज चा अर्थ

स्वतंचीच टिमकी वाजवणे सारखे कौतूक करुन घेणे ह्याचा वैताग येतु म्हणून लिहिले आहे.

@ मौसी,

... तुमच्या साठी नाही ते लिहिलेले.....

Good to know क्यू के मेरे को तो मेरे दुश्मन भी 'सेल्फ डब्बा' नै बोल सकते, मुफतखोर तो बिलकुल भी नै

Hope you have a relaxed weekend.

Hope you have a relaxed weekend.>> हाउ तुमारेकु बिरीयानी- सालन होना तो बोलो, बनाके बच्ची के हाथ भेज देती. खोर्बा नी का मीठा भी बनायेसो है. बेगम साब कु पुच्छा बोलो.

How sweet of you Happy

‘सौदा’ लाने को भेजे बेगम अभीच कल्लू को

विकेंड पे दावतां कर रै सब

एका फ्लॅट मध्ये आम्ही काही बॅचलर रहात होतो. तीन वर्षात छान तेलुगु शिकलो. आता तर न्यू जर्सीत असल्याने तेलुगु अजूनच सुधारले !
फ्लॅट च्या तळ मजल्यावर एक वृद्ध महिला रहात असे, अंगणात खुर्ची टाकून बसणे व येणार्‍या जाणार्‍याशी गप्पा मारणे. तू काय करतो हा ठरलेला प्रश्न. एक मुलगा ऑरॅकल शिकत होता आणी "मी सध्या ऑरॅकल शिकतोय" असे उत्तर दिले. आठेक महिन्याने तो प्रश्न ! म्हातारीला काय समजतेय अशा अविर्भावात त्याने पुन्हा तेच उत्तर दिले. ती टिपिकल तेलेगूत म्हणाली की "इतके दिवस फक्त ऑरॅकल शिकतोस? मग जावा कशी शिकणार आणी अमेरिकेत कधी जाणार ?

अमीर्पेट मध्ये टिपिकल कॅफ मध्ये चहा सिगारेट , समोसे, दिलखुश, वगैरे बरोबरच LC, W2, Visa Appointment, Rejection, वगैरे चर्चा रंगत.

>>>>>>>>ती टिपिकल तेलेगूत म्हणाली की "इतके दिवस फक्त ऑरॅकल शिकतोस? मग जावा कशी शिकणार आणी अमेरिकेत कधी जाणार ?
लोल!!!! प्रचंड मस्त किस्सा.

@ vijaykulkarni ,

मस्त किस्सा अम्माचा.

तेलुगुजन अगदी आधीच्या पिढीतलेही 'अमेरिकेतली नोकरी' या बाबतीत प्रचंड अपडेटेड असतात खरे, Y2K च्या जमान्यापासून Happy किती पगार, किती खर्च, किती बचत, तिकडे राहायला कुठले स्टेट्स चांगले, कुठले कोर्सेस सगळे माहित असते अम्मा-अप्प्पाना.

अमीरपेटेत राहून 'लुकमे' नाही आले तुमच्या चायपानी लिस्ट मध्ये Happy

और ये एक लेटेस्ट लतिफा भेजे मेरेको हमारे एक हैदराबादी सहेली ने :-

बीवी - बूस्टर डोझ ले लिये क्या ?

हबी - हौ, ले लिये आज

बीवी - दरद होरा क्या ?

हबी - नै होरा

बीवी - दूसरी औरतां पूरी सुई भी चुभाते तो दरद नै होता तुमकू और मेरी जरा-जरा सी बात भी चुभ जाती देखो

Happy Happy

Pages