हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओके.. Lol
नही.. वैसे, तनहाई में दोनू दिल की बातां वगैरा लिखा ना आपने... अब ..ये तो मुमकीन नै लगता ना, शादी को अरसा होने के बाद.... सो पूछी...!!

कुल्हाडी 😁

अरे वो संजै भाई किधर कू गए ? उन के “दस्तख़तां” नै आरै, भौत दिनां हो गै ना

>>अरे वो संजै भाई किधर कू गए ?>>
अपुन इधरीच है मियां... बीचमे कामां ज्यादा होनेके वास्ते थोडी रुखसत ली थी बस इतनाईच... आता जल्दीच कुछ नई दस्तख़तां लेको 😀

रायलसीमा रुचिलु (Not a restaurant review) हैदराबाद मधले एक प्रसिद्ध रेस्तरां. लोकं चवबदल म्हणून जातात. तेलंगानापे़क्षा थोडी निराळी चव.

075c80e9-86cc-4917-9072-eb9ab3c3e513.jpeg

यंदा भर पाडवा, त्यात रविवार असूनही कामामुळे बाहेर जेवण. उगादी स्पेशल पण मोस्टली तिखट्ट Happy

सोबत कैरीचे पन्हे आणि उगादी स्पेशल चटणी/पचडी/ drink (not in picture). यात चिंच, कडुलिंबाची पाने, गूळ, मीठ, सालासकट कैरी आणि हिरव्या मिरच्या असे खारट, गोड, तुरट, तिखट सर्व रस स्वाद असतात. नवीन वर्ष असेच सर्व प्रकारचे अनुभव घेऊन येणार, त्याला enjoy करावे हा भाव. How thoughtful.

ते नाचणी चे उंडे नाही आवडले. रंगहीन, वासहीन, चवहीन. सोबतच्या लोकांनी मात्र चवीने खाल्ले.

नॉनव्हेज प्रेमींनी रायलसीमा स्पेशल बिरयानी घेतली, खाशे हैदराबादकर असून त्यांना खूप आवडली. It’s different than Hyderabadi Biryani and more “rustic” in flavours असा त्यांचा अभिप्राय होता.

ते नाचणी चे उंडे नाही आवडले. रंगहीन, वासहीन, चवहीन. सोबतच्या लोकांनी मात्र चवीने खाल्ले.>>> मला पण नाही आवडत ते..इकडं पण लोक चवीने खातात..स्पेशली नॉनव्हेज आणि ते रागी बॉल्स..
ताट मस्त...

इकडं पण लोक चवीने खातात…

म्हणजे कुठे? नाव दुसरे असेल काही पण कर्नाटकात हे उंडे म्हणजे पॉप्युलर फूड Happy

हैदराबादी पब्लिक नै खाते ज्यादा

अनिंद्य, मी रायलसीमा भागात राहते. इथली चव आम्हांलापण झेपत नाही. प्रचंड तिखट.
मेनू त कमी तिखट काय म्हणून विचारले की काजू पनीर मसाला घ्या म्हणतात. तोपण आम्ही घोट घोट पाण्याबरोबर खातो. एक प्लेट बिर्याणी मागवली की तीन वेळा दोन जणांना पुरते. बिर्याणी मागवली की मी घरी साधा भात करते. मग बिर्याणीत तो भात मिसळून जरा तिखट झणका कमी होतो.

आजच पाहिला हा धागा. आता निवांत वाचते.

.. आता निवांत वाचते….
जरूर. धमाल गंमती चाललेल्या असतात इथे

तिखटाबद्दल + १

तेलंगाना + AP दोन्ही राज्ये म्हणजे तिखटजाळ जेवण. हैदराबाद त्यातल्या त्यात थोडे कमी तिखट. एखाद्या दिवशी ठीक, रोज नाही खाता यायचे.

त्यात माझा spice tolerance quotient वर्षागणिक कमी कमी होतो आहे 😁

म्हणजे कुठे? नाव दुसरे असेल काही पण कर्नाटकात हे उंडे म्हणजे पॉप्युलर फूड Happy>>>>>> तमिळनाडू... इकडचं पण फेमस फुड आहे हे...रागी मुद्दे म्हणतात..

तेलंगाना + AP दोन्ही राज्ये म्हणजे तिखटजाळ जेवण. हैदराबाद त्यातल्या त्यात थोडे कमी तिखट. एखाद्या दिवशी ठीक, रोज नाही खाता यायचे.>>>>> +१००
माझं सासर आहे आंध्रा-गुंटुर.

गुंटुर ? वा वा.

गुंटुर इडली माय फेव्ह Happy वो पोडी तीखा रैता लेकिन मजा आ जाता देखो Happy

Pages