हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज जुम्मे का फरेश किस्सा. Written by yours truly:

जुम्मन शब्बो का अफ़ेयर आगे कू बढ़ रा. तो उनों अब्बू से अपनी शादी के बारे बात करनेकू सोचे.

- अब्बू मेरे कू एक लड़की बहुत पसंद आ रई. मै उसकूच अपनी दुल्हन बनाना चाहता. 😍

- क्या वो लड़की भी तेरे कू पसंद करती जुम्मन ?

- हौ

- फिर नै हो सकती तेरी शादी उस के साथ

- कायकू नै हो सकती अब्बू ?

- जिस लड़की की पसंदच इतनी घटिया है उस कू अपने ख़ानदान की बहू कैसे बना सकते?

😂 😂 😂

Lol

ऋतुराज यांची कॉमेंट मस्त आहे.

हैदराबादेत म्हणतात “सुहल / सुहाल - सारण नसलेला कुरकुरीत समोसा,............. असंच पण अतिशय पातळ तळलेल्या पुरीवर करंजीचे सारण पसरवून अशीच घडी करतात.या पदार्थाला कोकणात 'चवडा' म्हणतात.

या पदार्थाला कोकणात 'चवडा' म्हणतात>>>>

देवकी चवडे कारवारी भागात करतात. कारवारातुन कोकणात स्थानांतरीत सुना करत असाव्यात. माझ्या एका कारवारी मैत्रिणीकडे पहिल्यांदा खाल्ले तेव्हा फसगत झाल्याची भावना मनात आली. Happy करंजी पण करंजी नाही. तळलेली पुरी नरम असतानाच सारण पसरुन चौघडी घालणे मला कठिण वाटले होते.

कोकणी शब्दाची गंमतच आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे भाग कोकण. पण इथली भाषा मालवणी. जे इथले नाहीत ते मालवणीला कोकणी म्हणतात. कारवार, मेंगलोर, गोवा हे अधिकृतरित्या कोकणात नाहीत पण तिथली भाषा मात्र कोकणी.

अब्बु इत्ता सच बोलते ……

ऐसे वालिद किसी को नक्को दे ऊपर वाले Lol

@ स्वाती_आंबोळे,

ती BrainyQuote ची साइट छान आहे, smart.

>> "ऐसे वालिद किसी को नक्को दे ऊपर वाले" >>
बेचारे जुम्मनमियां... 😀

आजकी दस्तखत:

"जिसके अंदर पाना रखतें
उसकू हम बोलतें 'पानदान'
जिसके अंदर चुहें फंसते
उसकू हम बोलतें 'चुहेदान'
फिर क्यां सोचको नाम रखां हैं
की समझमें मेरी नै आ रा हैं
सोच सोचको परेशान हूं
भेजा मेरा चकरा रा हैं
मच्छर बाहेर, आदमी अंदर
कैसा होतां 'मच्छरदान'
आपडी की तुपडी पोती के पान...
मुमाने नें पकडे मामू के कान..."

मच्छरदान Lol

इथे “मुमाना” = भाचा, बहिणीचा मुलगा.

मुमानी = भाची

पिछले जुम्मे के मेरे क़िस्से कू पसंद किएवास्ते सबकू थँक्यू है.

ये लो आज का फ़रेश हैदराबादी किस्सा - written by yours truly:

- सुनो जुम्मन, मेरी जानिब देख तू बताओ, मेरे कू मेकअप की ज़रूरत दिखरई क्या ?

- नै

- ठीक से देख कू बताव तुम.

- नै. मेकअप की ज़रूरत नै तुमकू शब्बो.

- हाय हाय, मै वैसेच खूबसूरत दिखती ना ? 😍

- पूरी बात नै सुनते ना तुम. तुम कू मेकअप की नै पलास्टिक सर्जरी की जरूरत है 😂 😂 😂

.

.

.

(जुम्मन का जनाजा कल सुभू को १० बजे इमलीबन क़ब्रिस्तान कू जाएँगा. दुआ करना. )

Pages