चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज गंमत म्हणून जुना पहिला ज्युरासिक पार्क बघितला. नव्याने जाणवले म्हणजे शेव्टी फक्त हिरो हिरवीण, पार्क चा मालक व त्याची नातवंडे आणि तो दुसरा शास्त्रज्ञ इतकेच हेलि कोप्टर मधून निघून जातात. पण बाकीचा स्टाफ पहिले दाख व लेला - जसे जीप चे ड्रायव्हर, शेफ व इतर सपोर्ट स्टाफ, सिक्यु रिटी गार्ड साधे कुठे आहेत म्हणून पण तो म्हातारा बिलिऑनर मालक तोंडदेखले पण विचारत नाही. ते लॅब मध्ये काम करणा रे सफेद कपड्यातले डॉक्टर व इतर टेक्निशि अन पण पुढे एकदाही दिसत नाहीत. त्यांनी काय पोहत पोहत जीव वाचवायचा का.
टिपिकल व्हाइट रिच अमेरिकन बिहेविअर. मैं मेरा देखतुं . तू १३ देख.

कला पाहिला. सुरुवातीला काही विजुअलस चांगले वाटले, पण पुढे पुढे फारच कंटाळवाणा वाटला. संपूर्ण चित्रपटात अंधार आहे. तो काहीतरी सूचित करत असेल, नसेल, पण गाण्याच्या मैफिलीत गायकाच्या आणि सहायक वादकांच्या चेहऱ्यावर अंधार आणि नायिका, तिच्या आई आणि एक काका प्रेक्षकांत असूनही त्यांच्यावर स्पॉट असली प्रकाशयोजना बघून मी चित्रपटापासून कित्येक योजने लांब गेलो. बाबुलचा अभिनय ठीकठाक आहे. ठुमरी गायिका दाखवली आहे ती आई, तिच्या हाताखाली पोरे तयार होतात, पण एकही धड ठुमरी नाही आहे ह्यात. एक कुठलं तरी शास्त्रीय (?) संगीत गाताना नायिका पाश्चात्त्य कपड्यात बसली आहे. ती अनुष्का शंकर असती तर एकवेळ ठीक आहे. सतार वाजवून गाणारे मी तरी चित्रपटाबाहेर फार कुणी बघितले नाहीत, विलायत खान किंवा आजकाल शुजात हुसेन खान असे काही सन्माननीय अपवाद सोडले तर. चित्रपटात मात्र तानपुरा न घेता सरळ सतार वाजवत (ताराच खाजवायच्या ना - ह्या न्यायाने) लोक बिनधास्त गात असतात. पाहा - १. मेहबूबा चित्रपटात पहिल्या जन्मातला राजेश खन्ना, २. शोम शोम शोम शा शा गाण्यात अमरीश पुरी (हे भन्नाट आहे), ३. कला चित्रपट.

नाही ती अनौन्समेंट होते की
बोट निघायला 15 मिनिटे अवकाश आहे, जे जाणार असतील त्यांनी निघा म्हणून

आणि मूव्ही मध्ये जॉन hamond ला फारच चांगला दाखवला आहे
मूळ पुस्तकात तो दुष्टच घेतला आहे एवढा हाहाकार होऊनही त्याचा दुसरीकडे ज्यूरसिक पार्क उघडायचा प्लॅन असतो
तसेच पैसे पण त्याला प्रचंड मिळवायचे असतात

पुस्तकात तो कोंपी कडून मारलाय

हपा खूपच सूक्ष्म निरीक्षण. फारेंडची कमेंट आहे असे वाटले वाचताना.
मेहबूबा च्या गाण्यात गिटार घेऊन राजेश खन्ना गात असतो.

भयानक आळस आल्यावर आळूचं फदफदं बनवावं त्या पद्धतीने गिटार वाजवले आहे आणि हावभाव दर्शवले आहेत. हा गडी अमिताभ सोडाच पण ऋषी कपूरला तरी फाईट देऊन पुन्हा कमबॅक कसा करणार हीच काळजी राखप्रेमींच्या मनात असेल.
पडद्यावर गिटार वाजवावे ते ऋषी कपूरनेच . अगदी अचूक नाही तरी आळूच्या वड्या चांगला रूचकर करायचा गडी.

अक्षय खन्ना आणि संवेदना सवालका यांचा दृश्यम २ पाहिला. अन्य काही कलाकारही आहेत जे पहिल्या भागात होते.
दृश्यम २ मल्याळम पाहिला तेव्हां खास नाही वाटला. आता हिंदीत पाहिला तेव्हां आवडला. मल्याळम पाहून खूप दिवस झालेत. किंचितसा फरक केलाय का ? त्यानंतर दोन तीन असेच सिनेमे पाहिल्याने काही दृश्यांची सरमिसळ झालीय डोक्यात. कदाचित चित्रपट वाचून आणि ऐकून बघताना फरक पडत असेल.

मल्याळम पाहताना नायक सुपरहिरो वाटला होता ज्याला आधीच सगळी कल्पना असते. हिंदीत तसे वाटले नाही. कदाचित काही वाक्यं वाचायची राहून गेली असावीत. आताही मोबाईल वर आलेला मेसेज पाहताना फॅमिली आउटिंग नंतर तो एका माणसाला भेटून त्याला मदत करतो ते राहिलं बघायचं. त्याचा संदर्भ शेवटी आहे.

बापरे! हिणवायचा हेतू नव्हता. जेन्युईनली हीरोईन ला पाहून वा छान अशी प्रतिक्रिया येते मनात, डोळ्यात बदाम वगैरे येत नाहीत म्हणुन सहज विचारले. सॉरी.
परत विषयावर वळूया.
द्रुश्यम २ पाहत आहे प्राईम वर अजय दे. चा.
मुळ मल्ल्याळम पाहिला आहे..तो जास्त प्रभावी वाटत आहे सध्या!
तब्बू चे काम फार च मस्त!

जेन्युईनली हीरोईन ला पाहून वा छान अशी प्रतिक्रिया येते मनात, >> काल माझे असे झाले. सर्व करून भागल्यावर जुना लमहे लावला. श्रीदेवी ओपनिन्ग फ्रेम पासून फारच सुरेख दिसते. ती असताना कोणाकडे नजर जात नाही. पहिला तरूण अनील कपूर एकदमच साल काढलेल्या मुळ्या वाणी दिस्तो. श्री देवीचा नवरा पण अगदीच बोगस. ती मात्र एकदम स्टार स्टार!! पुढे मुलगी म्हणून तिचा रोल आहे. तो थोडावेल बघितला. पण पहिलीची मॅजिक जायला नको. म्हणून बंद केला. हेमा, ही , माधुरी एकदम सुरेख दिसत राहतात. काही पण सिचुएशन असूद्यात.

बोडके, बालगुडे यांचा मराठी भय पाहिला आहे का कुणी?
( भय हा चित्रपट पहा अशी आडवळणाने सूचना करण्याचा हेतू नाही).
पुरूषोत्तम किंवा फिरोदिया मधे एकांकिका सादर करून जो कंड शमवून घेता आला असता त्यासाठी पूर्ण चित्रपट कशाला उगाच? भयाचे प्रकार या विषयावर मला काही तरी वेगळे करायचे आहे म्हणून बनवलेला चित्रपट असे वाटते.
पाहू नका. मानबा मधला गुरू अभिजीत खांडकेकर यात ऊत आणतो. सतीश राजवाडेला वाया घालवले आहे. अनेकांच्या कथा गुंफण्यात अपयश आले आहे.
का बनवतात असे सिनेमे?

फोन भूत पाहिला. पूर्वार्ध टाईमपास वाटला . नंतर पीळ काढलायं
विनोद काही उच्च दर्जाचे नाहीत पण चालून गेलेत.

Berserk trilogy मधला पहिला सिनेमा पाहिला. आवडला. पण एक संपूर्ण गोष्ट अशी अपेक्षित असते ती नाही मिळाली. तिन्ही भाग बघायला हवेत त्यासाठी.

कुणी वाळवी पाहिला का? कसा आहे? फार कौतुक ऐकले
>>>>

मी देखील फार कौतुक ऐकले आहे. ट्रेलरनेही उत्सुकता वाढवली आहे. पण आता थिएटरला जाता येणार नाही सध्या. ओटीटीची वाट बघेन.

माय नेम गोविंदा
अगदीच अ आणि आ चित्रपट
ना धड कॉमेडी, ना सस्पेन्स
लहान मुलांनाही आता पुढे काय होणार हे कळेल इतकं घिसेपिटे कथानक

विकी कौशल ला अजिबात कॉमेडी किंवा त्या ढंगाने जाणारा अभिनय येत नाही
त्याववजी इथं अभय देओल हवा होता
धमाल आली असती

चक्क किरा अडवाणी ने चांगला रोल केलाय

पप्पी गाणं भन्नाट, हिट कसे नई झालं ते

सयाजी शिंदे, वकील, रेणुका शहाणे आणि साऊथ वाला विष्णू आणि इन्शुरन्स एजंट यांनीही मस्त केलेय

पण मुळातच सिनेमा अति अति प्रेडक्तीबल असल्याने मजा जाते

Berserk trilogy मधला पहिला सिनेमा पाहिला. आवडला. पण एक संपूर्ण गोष्ट अशी अपेक्षित असते ती नाही मिळाली. तिन्ही भाग बघायला हवेत त्यासाठी. >>>

Berserk माझी सर्वात आवडती मांगा आहे. एक अक्खी स्टोरी आर्क एका सिनेमात बसवायला खूप कात छाट करावी लागली असती म्हणून तीन भाग काढले.

तिन्ही भाग बघा.

काल तहकीकात पाहिला. डब्ड आहे कि दक्षिणेचे अभिनेते घेऊन हिंदीत काढला आहे समजले नाही. खोदा पहाड सारखी अवस्था आहे सस्पेन्सची.

उतारा म्हणून धर्मेंद्रचा जुना यकीन पाहिला. गाणी ऐकताना अरे, हे यातलं आहे ? असं होत होतं. धर्मेंद्रचे स्पाय मूव्हीज होते त्यातला त्या काळातला चांगला वाटला.

प्रियामणी आहे का त्यात? >> नाव चेक करावे लागेल.
नायकाच्या डोक्याला एकही केस नाही. तो पोलीस निरीक्षक असतो. कार अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीची केस बघत असतो.

प्रियमणीचा काही रोलच नाही त्यात..डोक्यावर एकही केस नसलेल्या पोलिसाची बायको असते ती.. बरोबरे तोच सिनेमा आहे मग राभु.

हपा, भारीय कमेंट Lol
पोलीस केसला काय शब्द आहे मराठीत?

मृणाली, मला पण वाटलं होतं. हा चेहरा ओळखीचा वाटला होता. नावही. पण हीच ती म्हणून खात्री नव्हती.
तीच केस ( इं) ला कलाटणी देते ना! आधी तपास वेगळ्या दिशेने चालू असतो.

हाहा. वरती मृणाली यांनी बदल केल्यावर काय ते लक्षात आलं. तुमच्या पण प्रतिसादात दोन्ही (अर्थाने) केस आले होते, ते मजेशीर वाटले.

ह पा Lol

हो बहुतेक राभु..खूप दिवस झाले बघून..त्यानंतर इतके साऊथ सिनेमे पाहिले असतील..कुठल्या सिनेमाचं कुठलं इन्वेस्टीगेशन... डिटेल्स आठवेना आता Lol

Pages