चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी सुरू केला पण सबटायटल्स मुळे सोडून दिला. >>> +१
आपण सबटायटल्स सहीत पहायची पद्धत पाडली कि यांना वाटेल चला हे अ‍ॅडजस्ट करून बघतात आपल्या भाषेतले चित्रपट. कधी कधी स्टेट बँकेच्या कस्टमर केअरला सकाळी आठच्या आधी फोन केला कि तिकडून रूबाबात सांगतो "ओन्ली तमिळ ऑर इंग्लीश " मी पण त्याला सांगतो "ओन्ली मराठी ऑर हिंदी" . तमिळ महाराष्ट्रातल्या लोकांनी शिकून घ्यायची का ? हे लोक मराठी, बंगाली, हिंदी चित्रपट बघत नाहीत कळत नाही म्हणून. भाषेचा अभिमान नक्कीच असावा पण दुराभिमान म्हणून इतर राज्यातल्या लोकांवर तमिळ , तेलगू समजण्याची सक्ती हा हलकटपणा आहे ( & vice versa).

एखादे वेळी ठीक असतं. तुम्हाला डबिंग ची गरज नाही ना वाटत मग आम्हालाही बघायची गरज वाटत नाही हा बाणा ठेवून आपण पहायचे सोडले की ओटीटी वाले आपोआप डब्ड व्हर्जन आणतील किंवा रीमेक करतील.
कुणी सांगितलेय डोळ्याच्या खाचा होईपर्यंत पळणारे सब टायटल्स वाचा आणि चित्रंही बघा ....

प्रादेशिक भाषेतून हिंदीत डब करण्याचा खर्च वेगवेगळा आहे. रेकॉर्डिंग स्टुडीओचे दिवसभराचे भाडे रू २००० ते रू ५०००० पर्यंत असते. डबिंग आर्टस्टची फीस सुद्धा दिवसाला रू २००० ते एक लाखापर्यंत असू शकते. पाच दिवसात डबिंग पूर्ण झाले तर डबिंगचा खर्च २०००० रूपये ते ३० लाख रूपयांपर्यंत असू शकतो.
सबस्क्रीप्टचा खर्चही ६० हजार रूपयांपासून ते तीन लाखांपर्यंत वेगवेगळा असू शकतो.
वरची लिमिट धरली तरी सबस्क्रीप्ट पेक्षा खूपच अव्वाच्या सव्वा खर्च डबिंग मधे येत नाही. त्यामुळे डब का करत नाहीत हे कळत नाही.

जुन्या चित्रपटातला अगदी आवडता आणि बर्‍यापैकी शेवटपर्यंत रहस्य राखलेला चित्रपट म्हणजे ज्वेल थीफ. पहिल्यांदा बघितला तेव्हा अगदी रहस्य उघड होईपर्यंत वाटत होते की देव आनंदचा डबल रोल आहे व अशोक कुमार अजिबात व्हीलन वाटला नव्हता. हा चित्रपट सर्व अर्थाने परिपुर्ण होता. छान गाणी, चांगली कथा, चांगला अभिनय वगैरे. कधी कधी कंटाळा आला तर परत परत बघतो.

तसेच कुठे तरी वाचले म्हणून देव आनंदचा "महल" चित्रपट पाहिला. हा ही एक रहस्यमय चित्रपट आहे पण ज्वेल थीफच्या लेवलच्या अजिबात जवळ जात नाही. महल मधली "आंखो आंखो में हमतुम आणि ये दुनिया वालें पुछेंगे, मुलाकात हुई क्या बात हुई" ही गाणी फार छान वाटतात ऐकायला.

मी उलट डबिंगऐवजी सब-टायटल्स निवडते.
डबिंगचे आवाज म्हणजे संवादफेक, चढ-उतार, इंटेन्सिटी, (अजून तरी) मला अजिबातच आवडत नाही.

'मशाल'च्याच आगेमागे दिलीप कुमार, ऋषी कपूरचा 'दुनिया' आला होता. तो पण तेव्हा आवडला होता.
धाटणी साधारण तीच.

मी उलट डबिंगऐवजी सब-टायटल्स निवडते.
डबिंगचे आवाज म्हणजे संवादफेक, चढ-उतार, इंटेन्सिटी, (अजून तरी) मला अजिबातच आवडत नाही.>>>> True

मलापण डबिंगपेक्षा सबटायटल्स आवडतात. अर्थात मी फार नाही बघितलेले दक्षिण भारतीय सिनेमे. पण इंग्लिश सिनेमे आणि मालिका बघतानापण सबटायटल्स ठेवण्याची सवय झाली आहे त्यामुळे वाचत वाचत एकीकडे बघायचा त्रास नाही वाटत.

डब्ड सिनेमा पाहून वाटलेच तर मूळ भाषेत सिनेमा पाहणे जास्त सोयीचे वाटते.
साऊथ सिनेमांचे सबटायटल्स वाचून पूर्ण व्हायच्या आत बदलतात हा माझा अनुभव असल्याने आता सबटायटल्सच्या नादी लागत नाही.

ते एक डोळा खाली एक वर नाही जमत. >>> काही काही साऊथचे सिनेमे सबटायटल्स शिवायही समजायला अडचण नाही आली. दक्षिणेच्या भाषा एकूणच वेगळ्या आहेत. त्यांचं बोलणंही फास्ट आहे. त्यातून शब्दबंबाळ संवाद असले तर सबटायटल्स बनवणारे आणि वाचणारे यांची परीक्षाच असते. युट्यूबला सापडला तर एका सिनेमाची लिंक देईन. सिनेमाच्या रन टाईममधेच सबटायटल्स वाचून दाखवा आणि हजार रूपये कमवा ही पैज !

गुजराती भावनी भिवई पाहिला तेव्हां बर्‍यापैकी कळाला. बंगाली तोंडओळख असल्याने फक्त सबटायटल्स असले तर चालते. पंजाबी पण थोडा प्रयत्न केला कि समजते. या ओळखीच्या भाषांसाठी डबिंगची गरज नाही वाटत. (महाराष्ट्रातल्या अहिराणी भाषेतले काहीच समजत नाही).
अब आगे... Lol

मी पुणे ५२ विथ सबटायटलस् पाहिला. तरी कळला नाही. >>> Lol

वैचारिक मराठी चित्रपटांकरता अर्थपूर्ण सबटायटल्स त्यांनाच लिहायला सांगितली पाहिजेत. इव्हन टायटल्सच्या वेळेस चित्रपटाचे नाव काहीही असो, त्याचा अर्थ "मध्यमवर्गीय आनंदांत मग्न असणार्‍यांना एक आरपार आरसा दाखवणारा चित्रपट" असा दाखवावा सबटायटल्स मधे. नंतर संवादांच्या वेळेस जे बोलले जात आहे त्यापेक्षा दिग्दर्शकाला यातून काय सांगायचे आहे ते सबटायटल्स मधे यावे. उदा:
- "इथे सोनाली कुलकर्णी चिमण्यांच्या घरट्याचा उल्लेख करते तो यांच्या घराच्या संदर्भात आहे
- इथे या चित्रातील विरोधाभास पाहा
- इथे या काकांनी पुस्तक वाचायला दिवा लावणे हे इथल्या "डार्क" थीमशी संबंधित आहे
- हे काका इथे गचकले म्हणजे जुना काळ संपला

आणि उगाच आपण भलतेसलते अर्थ लावत बसू नये म्हणून काही सीन्सना हे फाइन प्रिण्ट द्यावे:
- इथे गिरीश कुलकर्णी फक्त इकडून तिकडे जातोय. यात कसलाही गूढ अर्थ अभिप्रेत नाही.

Happy

नेटफ्लिक्सवर 'कुमारी' बघितला. (धन्यवाद, माधव Happy )
सबटायटल्स वाचतच बघावा लागतो. एकंदरच दक्षिणेतली लोक बोलघेवडी आहेत, त्यामुळे मला पुलंच हंगेरीत 'किल्ल्याकडे घ्या' म्हणायला ५० वाक्यं लागतात, हा संदर्भ आठवत रहातो. आपण लहानपणी प्रभुदेवाची गाणी बघायचो तेव्हा शब्द आटून जायचे पण तोंड वळंवळंत रहायचं, तसं डबड्या व्हर्जनात होतं. त्यामुळे सबटायटल म्हणजे 'किल्ल्याकडे घ्या' आणि डब्ड म्हणजे 'येक्स्ट्रा वळंवळं' ह्यापैकी एकाही अनुभवाला मुकायचं ठरवूनही मुकताच येत नाही. Proud

अतिशय रमणीय गाव व डोंगररांगा दाखवल्यात. ऐश्वर्य लक्ष्मी व शाईन टॉम म्हणून दोघे मुख्य भूमिकेत आहेत. खूप छान काम केलेय दोघांनी. सिनेमा कुठेही ओंगळवाणा वाटत नाही. तुंबाडपेक्षा वेगळा आहे. तुंबाडची स्क्रिप्ट व व्यक्तिरेखा फार स्पष्ट होत्या. त्यातली लालसा वाढत जाणं फार नैसर्गिक वाटतं. इथे ते थोडं वेड किंवा ऑबसेशन वाटलं. तिथे राग आला म्हणून मुडदे पाडले नाहीत. इथे मात्रं सटासट ..... बाळाला जन्म द्यायचा सीन फार रिअल वाटला. ह्या कुमारीचा अभिनय बोलका वाटला व व्हिलन नवऱ्याचा भेदक वाटला. आधी दोन अमानवीय एन्टिटी आहेत हे लवकर कळालं नाही. पिढ्यानुपिढ्या पूर्वीच्या शापातून मुक्त होण्यासाठी लेकराचा बळी द्यायला निघालेल्या बापापासून आई आपल्या लेकराला कसं वाचवते, हे जरा वेगळ्या ढंगात दाखवलंय. मला आवडला. फक्त ते भूत बारा पिढ्यांपासून तळघरात बसलेलं असतं, ते बळी घ्यायला बाहेर येतं तेव्हा आधी फक्त त्याचे हात वगैरे दाखवून भयनिर्मिती केली आहे. पण ते जेव्हा शेवटी पूर्ण दाखवलं , ते आळोखेपिळोखे देऊन एकदम शाखाच्या सिग्नेचर पोजमधेच गेलं. आत्ता 'मितवाss' म्हणेल असं वाटलं. या पोजमुळे त्यांची बारा पिढ्यांची प्रतिक्षा व माझ्या दोन तासांच्या हॉरर वाईब्स क्षणात बेचिराख झाल्या. Wink पण सिनेमा भारी आहे.

मी पुणे ५२ विथ सबटायटलस् पाहिला. तरी कळला नाही.
>>>> Proud
सगळ्यांत अनाकर्षक इंटिमेट सिन्स असलेला सिनेमा आहे. बालमनावर उलट्याबाजूने विपरीत परिणाम की काय ते.... Proud

अस्मिता, अश्याच एका थीम वर धारपांची 'तळघरातलं, चांदीच्या पिंजऱ्यातलं ते' अशी एक कथा आहे.(अर्थात कुमारी वाल्याने वाचली नसेल, त्याने कोणत्या तरी पश्चिम थीम मधून घेतली असेल)

सगळ्यांत अनाकर्षक इंटिमेंट सिन्स असलेला सिनेमा आहे >>> Lol टोटली. त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे Happy

मी पुणे ५२ विथ सबटायटलस् पाहिला. तरी कळला नाही. >>> पुणे ५२ वरची चर्चा वाचली तर आपण सोडून इतर सर्वांना समजलाय म्हणून भयंकर कॉम्प्लेक्स येतो. पण काय समजलंय हे कुणीच लिहीत नाही, त्यामुळे आपली एव्हढीही पात्रता नाही कि प्रतिसादरूपी नैवेद्यात तरी सिनेमाचा अर्थ सापडावा.. या विचाराने नैराश्य येतं.

फा Lol पुणे ५२ च्या पोस्ट्स सही आहेत अगदी. इकडून तिकडे जाणार गिकु Rofl

अस्मिता Proud मितवा पोज लक्षात नाही आली. परत पाहायला पाहिजे.

सगळ्यांत अनाकर्षक इंटिमेंट सिन्स असलेला सिनेमा आहे >>> Lol टोटली. त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे >>> फुटले हे वाचून Rofl

इथे गिरीश कुलकर्णी फक्त इकडून तिकडे जातोय. यात कसलाही गूढ अर्थ अभिप्रेत नाही.>> Lol

अस्मिता, तो बोलघेवडेपणा बहुतेक हंगेरीबद्दल लिहिला आहे ना त्यांनी?

हंगेरी केलं, हर्पा Happy
जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे >> Lol 'तरूण मनावर विपरीत परिणाम' लिहायला हवं होतं मी !
मितवासाठी पुन्हा बघं तेवढंच , रमड.
अनु, हो का... हे वाचलेलं नाही. थोडं तसंच आहे खरं.

कुमारी बघितला. चांगला आहे, पण हस्तर तुंबाड इतका परिणामकारक अजिबातच नाही. एकतर प्रचंड मोठा आहे. शेवटी क्लायमॅक्सला भिती वगैरे नाही वाटली. संपवा एकदाचा असंच फील होतं. एकदा बघायला ठीक आहे. बॅग्राऊंड स्कोर भारी आहे. आ SSSS ए ए ए ! करतच झोपी गेलो आणि स्वतःला थोडं घाबरवलं. Happy

Pages