आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
श्रद्धा.... !! दंडवत तुला!!
दंडवत तुला!!
दंडवत श्रद्धा _/\_
दंडवत श्रद्धा _/\_
कर्रेक्ट श्रद्धा! सगळे
कर्रेक्ट श्रद्धा! सगळे शॉर्टफॉर्म्स बरोब्बर!
तू महान आहेस!!
बाब्बो! कोडं घालणारी आणि उकल
बाब्बो! श्र, भन्नाट!!
कोडं घालणारी आणि उकल करणारी दोघीही भारी. दोघींना एक एक किलो मनभावन देण्यात येत आहे.
दोघींना एक एक किलो मनभावन >>
दोघींना एक एक किलो मनभावन >>
श्रद्धा, महानच्याही पलीकडे!
श्रद्धा, महानच्याही पलीकडे! साष्टांग दंडवत.
श्रद्धा, महान आहेस
श्रद्धा, महान आहेस
श्रद्धा जबरी... कसे सुचते
श्रद्धा जबरी... कसे सुचते तुम्हाला?
काही दिवसांपूर्वी मी एक तरस पाळलेल्या मुलाचे कोडे घातले होते ... मला वाटले होते कोणालाही नाही जमणार पण श्रद्धा तेंव्हाही तुम्ही एकाच फटक्यात उत्तर दिले होते...
दंडवत तुम्हाला...
आणि वावे तुम्हालादेखील ... कठीण पेपर सेट केला होता...
पीएचडी लेवल कोड्यानंतर उतारा
पीएचडी लेवल कोड्यानंतर उतारा म्हणून एक बालवाडी लेवल कोडं.
'लेडीज वर्सेस.....' या चित्रपटाचा हिरो नाक्यावर उभा असतो. समोरून त्याची क्रश रिया जात असते. तिला पाहून तो 'ती पहा माझ्या हृदयाची स्वामिनी जात आहे' असं म्हणतो.
श्र देवींनी अजून एक कोडं
श्र देवींनी अजून एक कोडं सोडवलं आहे.
हा धागा जुना आहे. इथे कोडी टाकू नका कृपया.
लेटेस्ट धागा : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८) : https://www.maayboli.com/node/79546
बंद झालेला धागा. बंद
बंद झालेला धागा. बंद झालेला धागा. बंद झालेला धागा. बंद झालेला धागा.
वावे, श्र - सुपर महान आहे ते
वावे, श्र - सुपर महान आहे ते कोडे आणि उकल!
Pages