आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
इतक्या कमी शब्दांत इतक्या
इतक्या कमी शब्दांत इतक्या भाषा बसवण्याचे कसबही महान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडे आणि उकल भारी!
कोडे आणि उकल भारी!
इतक्या कमी शब्दांत इतक्या
इतक्या कमी शब्दांत इतक्या भाषा >> सिद्ध करतात की आपण इतकी मिश्र भाषा रोज लीलया वापरतो, किंबहुना तीच आपली भाषा आहे. 'आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात ...' आठवलं.
मस्तं कोडं,
मस्तं कोडं,
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो तर हर्पा , फक्त 'बावा लागी सुसू' होऊ नये एवढी काळजी घेतली की झालं ...
(No subject)
राज्यात निवडणुका येऊ घातल्या
राज्यात निवडणुका येऊ घातल्या म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी निशांत दुषणला पाचारित केले. तो आणि त्याची टीम मुख्यमंत्र्यांच्या पक्ष्याचा जनसंपर्क हाताळणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकीर्दीत हवी ती कामं न केल्याने (आणि नको ती कामं करून ठेवल्याने) जनता खवळली होती. निशांत दुषणचे लोकं जेव्हा जेव्हा संपर्क अभियानांतर्गत जनतेसमोर जात तेव्हा त्यांना जनतेचा संताप, सरकारला विचारलेले जळजळीत प्रश्न, जनतेच्या अहिताच्या कारभाराबद्दल शिव्याशाप आणि क्वचित प्रसंगी मारहाण होऊ लागली. या घटनांमुळे त्याचे टीममेंबर लोकांसमोर जाण्यास घाबरू लागले. तेव्हा आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी निशांतने एक मिटिंग घेतली आणि टीमला त्यांचे कार्य आणि ते करण्यासाठी लागणारे धैर्य यांची आठवण करून देण्यासाठी एक गाणेच म्हणून दाखवले .....
बावा लागी सुसू. >>> हे काय
बावा लागी सुसू. >>> हे काय आहे अस्मिता?
हर्पा, अस्मिता...
हर्पा, अस्मिता...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी, पुलंच्या पूर्वरंग पुस्तकातलं आहे. मलाय, इंडोनेशियन भाषेत सुसू म्हणजे दूध.. एका घरी असताना त्यांना चहात दूध हवे असते तेव्हा त्या बाई मेडला 'बावा लागी सुसू' (बावा म्हणजे आण) असं सांगतात.
ओह ओके. मी पुलं पारच विसरून
ओह ओके. मी पुलं पारच विसरून गेले आहे हे जागोजागी जाणवत आहे. असो.
प्यार ( PR) किया तो डरना क्या
प्यार ( PR) किया तो डरना क्या?
PR प्यार हे विसरूनच गेलो होतो
PR प्यार हे विसरूनच गेलो होतो.
प्यार करने वाले कभी डरते नही
PR . वरची दोन्ही बरोबर वाटत
PR
. वरची दोन्ही बरोबर वाटत आहेत.
श्रद्धा, मला वाटतंय 'लागी'
श्रद्धा, मला वाटतंय 'लागी' म्हणजे 'आण'.
छातीला 'दादा' म्हणतात पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत!
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शिवाय रॉंग नंबरला 'साला' म्हणतात मलाय भाषेत.
PR करने वाले कभी डरते नही. >
PR करने वाले कभी डरते नही. >>> हे माझ्या मनातलं गाणं होतं.
वावे, तुझंही बरोबर फिट होतंय.
PR करने वाले कभी डरते नही
जो डरते है वो, PR करते नही
छातीला 'दादा' म्हणतात पण
छातीला 'दादा' म्हणतात पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत! >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
श्रद्धा, मला वाटतंय 'लागी'
श्रद्धा, मला वाटतंय 'लागी' म्हणजे 'आण'.<<< नाही.
बावा म्हणजेच आण. लागी म्हणजे 'पुन्हा/अजून'. पुस्तकात मात्र लागी चा अर्थ त्यांना माहीत नव्हता असे लिहिले आहे.
पुस्तक घरात आहे त्यामुळे 'लागी'च चेक करून घेतले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ओह अच्छा!लागी'च चेक करून
ओह अच्छा!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लागी'च चेक करून घेतले.
लागीच कोडं भारी होतं मामी.
लागीच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कोडं भारी होतं मामी.
लागी कलेजवा कटार हे हिंदीत
लागी कलेजवा कटार हे हिंदीत पहिल्या प्रेमात तर इंडोनेशियन दुसऱ्या+ प्रेमात गात असतील.
(No subject)
रघुरामन, त्याची बायको
रघुरामन, त्याची बायको कीर्तिप्रिया आणि त्यांची जुळी मुलं, कीर्तिसूर्यउदयन आणि त्रिभुवनविजयन असं चौकोनी कुटुंब पुण्यात रहायला आलं. तिथे त्यांच्या शेजारी लेले कुटुंब रहात होतं. लेल्यांना, मुख्य म्हणजे मिसेस संजना लेल्यांना या दक्षिण भारतीय नावांमधली अक्षरांची उधळपट्टी पसंत नव्हती. त्यामुळे त्यांनी लवकरच त्या सगळ्यांसाठी संक्षिप्त नावं वापरायला सुरुवात केली.
एकदा रघुरामनची दोन्ही मुलं लेल्यांच्या मुलाशी, संदीपशी खेळायला नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेली होती. संदीपच्या आईने, म्हणजे संजनाने मनभावन ही बंगाली मिठाई बनवली होती. ती या दोन्ही मुलांना इतकी आवडली, की एरवी गोड न खाणाऱ्या त्या मुलांनी लेलेकाकूंची नजर चुकवून ती मिठाई संपवून टाकली. थोड्या वेळाने लेलेबाई स्वैपाकघरात गेल्या तेव्हा त्यांना मिठाई संपलेली दिसली. आपल्या पाककौशल्याला मिळालेली ही दाद बघून त्या मनात खूषच झाल्या, पण वर वर लटक्या रागाने रघुरामनला हाक मारून त्या मुलांची तक्रार सांगू लागल्या. रघुरामनला, आपल्या मुलांनी चोरून मिठाई खाल्ली याचं आश्चर्य वाटलं आणि तोही खेळकरपणे मिसेस लेल्यांना म्हणाला की माझी मुलं असं करणंच शक्य नाही!
फारसं हिंदी न येणारी कीर्तिप्रिया मात्र काहीशा संशयाने या दोघांमधला गाण्यातला संवाद ऐकत होती.
कुठलं गाणं म्हणत होते ते दोघे?
प्रचंड उत्सुकता आहे मला..
प्रचंड उत्सुकता आहे मला.. वावे काय खतरनाक चॅलेंज दिलेय ...
नावं वाचून त्रिभुवनकीर्तीची
नावं वाचून त्रिभुवनकीर्तीची गोळी घ्यावी असं वाटायला लागलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धमाल वर्णन आहे. बाजिराव-मस्तानी भेटी पोन्नियीन सेल्वन आले गा - असा अनुभव आला. आता कोड्याचा विचार करतो.
नाट्यगीत आहे का?
नाट्यगीत आहे का?
नाही मानव. ह.पा.
नाही मानव.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ह.पा.
आत्तापर्यंतचे सर्वात भारी
आत्तापर्यंतचे सर्वात भारी कोडे....:-)
उत्तर काहीही असो....वावे...तुलाच शंभर पैकी शंभर मार्क्स!!!
बाजिराव-मस्तानी भेटी
बाजिराव-मस्तानी भेटी पोन्नियीन सेल्वन आले गा >>> :haha:
वावे तू भारी आहेस.
वावे तू भारी आहेस.
बापरे मला आता टेन्शन आलंय
बापरे मला आता टेन्शन आलंय
लेलेबाई नुसती तक्रार करत नाहीत, तर मुलांना घेऊन जायलाही सांगतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जानेमन जानेमन तेरे दोन 'यन'
जानेमन जानेमन तेरे दोन 'यन' (पोरांची नावं)
चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन(भावन)
मेरे दोन यन चोर नही सजन (संजनाचं लाडिक रूप?)
तुमसे ही खोया होगा कही तुमहारा मन..
हा फारच अंधारातला तीर आहे!
आणि रघुरामनला शेजारीण जानेमन म्हणत असेल तर कीर्तिप्रिया संशयाने पाहील, हे ओघानेच आलं. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जा ने 'मन' तेरे दोन यन... बसतंय आता बरोब्बर!
Pages