४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ब्लीच प्या वगैरे ट्रंप उपरोधाने म्हणाला होता. पण जाउंदे पालथ्या घड्यावर पाणी ओतून काय उपयोग? असो. पुन्हा ट्रंप आणलाच. जरी दोन वर्षे उलटून गेली तरी त्याचे तुणतुणे वाजवणे कमी होत नाही. असो.

२०१६ साली ट्रंप निवडून आल्यावर हिलरी पासून अनेक नेते, पंडीत उच्चरवाने रशियन लोकांनी हॅक करून जिंकलेली निवडणूक असे ठणाठणा बोंबलत होते. त्यांना इलेक्शन डिनायर, लोकशाही विरोधी वगैरे काही बोलले जात नाही. पण ट्रंपच्या बाजूने तसे काही करताच लोकशाही संपली वगैरे बोंब मारायला डावे मोकळे. एकाला एक न्याय दुसर्‍याला दुसरा. एक गोष्ट आता उघड आहे. बायडन पुत्राचा भ्रष्टाचार जाणीवपूर्वक झाकला गेला. तमाम सोशल नेटवर्क कंपन्या ह्या कामासाठी कंबर कसून मदतीला धावल्या. ह्या विषयावरील पोस्ट तात्काळ काढून टाकल्या. वेळ पडल्यास लेखकावर बंदी घातली गेली. अशा प्रकारे बायडनविरोधी बातमी लोकांपर्यंत पोचू न देणे ह्यातून काही मते मिळवली असतील का ? अशा प्रकारे मुस्कटदाबी करून निवडणूकीचे निकाल वळवणे बेकायदा नसले तरी अनैतिक आहे की नाही? नक्कीच आहे. आणि ह्याला निवडणूकीतले गैरप्रकार म्हटले तर "लोकशाही बुडाली हो!" करून गळा काढण्यासारखे काय आहे? लोकशाहीमधे प्रश्न विचारायला मनाई असता कामा नये आणि ही गोष्ट निवडणूक त्यातील त्रुटी ह्याकरता लागू आहे.

कोविड ची लस ह्याविषयी अनेक उलट सुलट दावे झाले आहेत. लसीचे फायदे तोट्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. हा दावा. लहान मुलांमधे हा रोग नगण्य असताना, त्यांच्यात मृत्यू अत्यंत कमी असताना त्यांनाही सक्तीने लस घ्यायला लावणे. लस घेतल्याने लहान मुलांना फायदा होतो असा डेटा नसताना ही जबरदस्ती करणे.
लस घेतल्यावर हॉस्पिटलमधे जावे लागत नाही असे महात्मा फौची अनेकदा म्हणालेले आहेत. आज जो काही प्रकारचा व्हायरस आहे त्यात लस न घेतलेल्या लोकांनाही हॉस्पीटलमधे फार जावे लागत नाही. त्यामुळे लस घेऊन काय मोठे दिवे लावले आहेत? लशीचे दुष्परिणाम कुणी सांगू लागला तर आजही त्याच्यावर तात्काळ बंदी येते.
फायझर व अन्य कंपन्या ह्या महाभागांना लशीचा प्रचार करण्यासाठी किती पैसे देत आहेत, कोण किती रॉयल्टी कमावत आहे ही माहिती सार्वजनिक करत नाहीत.
एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा समग्र हिशेब करून कुणी किती गंडवले ह्याचा तपशील उघड केलाच पाहिजे. अशा गोष्टीची पुनरावृत्ती होता कामा नये.

लाखो लोक बेकायदा घुसत आहेत. आणि त्यातले अनेक ड्रग आणत आहेत ही वस्तुस्थिती आहे. कुठलाही हिशेब न ठेवता लाखो अर्धशिक्षित वा अशिक्षित, गुन्हेगारी पार्श्व भुमी, आरोग्य पार्श्वभुमी न तपासता लाखो लोक देशात बेकायदा आयात करणे हे कुठल्या अर्थाने शहाणपणाचे आहे हे अनाकलनीय आहे. कदाचित ह्या निवडणूकीनंतर ह्याला आळा बसेल.
हॅलोविनला कुणी अमली पदार्थ मिसळलेली कँडी खाऊन मेला नाही म्हणून हुरळून जाण्यासारखे काय आहे? फेन्टनिलचा डोस जास्त होऊन मरणार्‍यांची संख्या गगनाला भिडत आहे. अधिकृत आकडेच तसे सांगत आहेत. आणि हे हिमनगाचे टोक आहे. असल्या व्यसनाला बळी पडून आयुष्य बरबाद करणारे आणखी जास्त असतील.
बेकायदा घुसखोरीमुळे असले घातक पदार्थ देशात सहज पोचतात हे कळणे अवघड आहे का? पण झापडबंद बायडन प्रेम असेल तर अवघड आहे.

न्यू यॉर्कमधे अशा बेकायदा घुसखोर लोकांना रहायला, झोपायला, रमवायला भक्कम पैसे खर्च करून मोठे वास्तव्यस्थान बांधलेले आहे. भारतातून कुणाचे आईबाप येतात तेव्हा त्यांना हजारो डॉलर देऊन शिवाय इंटरव्ह्यू वगैरे सोपस्कार करावे लागतात. इंटरव्ह्यूत नापास झाले तर काहीशे डॉलर गमवावे लागतात. स्वतःच्या खर्चाने अमेरिकेत आल्यावर पुन्हा एकदा इमिग्रेशन ऑफिसरचे प्रश्न, कागदपत्रे तपासणी हे सगळे सोपस्कार झाल्यावर मगच अमेरिकत प्रवेश मिळतो. आल्यावर सरकार खास आदरातिथ्य वगैरे काही करत नाही. हे एक चित्र आणि कुणी अ‍ॅन्जेलो, रिकार्डो, मारिसेला, दक्षिण वा मध्य अमेरिकेतील कुठल्यातरी देशातून निघते. कुठल्या माफियाला शे दोनशे डॉलर देऊन मजल दरमजल करत अमेरिकेत घुसतात आणि मग मनसोक्त फुकटचा सरकारी पाहुणचार उपभोगतात. हे दुसरे चित्र. हा भेदभाव का? भारतातूनही येणार्यांनाही विमान तिकिट काढा आणि घुसा अमेरिकेत अशी सवलत द्यावी. जर म्हातारबा आणि कमलाबाईच्या लेखी अमेरिकेच्या सीमारेषा निरर्थक आहेत तर आमच्या आईबापांनी काय घोडं मारलं आहे?

लशीची सक्ती करताना, चार पाच दहा जे काही बूस्टर आहेत त्यांची सक्ती करत असताना कुणाला कोविड झाला आहे का? आणि त्यातून त्याला पुरेशी प्रतिकारशक्ती मिळाली आहे का हे कधी विचारात घेतले नाही.
रँड पॉलने हा प्रश्न विचारला असताना फौचीने उडवाउडवीची उत्तरे दिली होती.
ट्रंपवर ब्लीच वाले तेच तेच पांचट विनोद करून इतक्या लोकांची बरबाद झालेली आयुष्ये नीट होणार नाहीत.

पण ट्रंपच्या बाजूने तसे काही करताच लोकशाही संपली वगैरे बोंब मारायला डावे मोकळे. >>> ओ ते काय ते ६ जानेवारीला जाउन सत्ताबदल रोखणार होते तसे काही हिलरीने केले का? मीडियाने दाबले असेल बहुधा. बिल्डिंग तर ठीकठाक होती चार वर्षे.

डिनाय करा पाहिजे तेवढे. डेम्सही करतात. उगाच स्ट्रॉंमॅन काढत बसू नका. इथे आख्खा सत्ताबदल रोखायला निघाले होते.

ट्रम्पच्या चाहत्यांना उपरोध कळतो ही नवीन बातमी आहे.

Fact-check: Did Trump tell people to drink bleach to kill the coronavirus?
Jessica CalefatiPolitiFact.com
Former Vice President Joe Biden said on COVID-19, Donald Trump said that "maybe if you drank bleach you may be okay." Is that true? PolitiFact explores.
This piece was originally published onPolitiFact.com on June 11, 2020

Joe Biden: On COVID-19, Donald Trump said that “maybe if you drank bleach you may be okay.”

PolitiFact’s ruling: Mostly False.

Here’s why: Joe Biden criticized President Donald Trump’s handling of the coronavirus pandemic, saying during a speech on the economy that Trump had given up trying to manage a crisis he’s ill equipped to solve.

"And when it comes to COVID-19, after months of doing nothing, other than predicting the virus would disappear, or maybe if you drank bleach you may be okay, Trump has simply given up," said Biden, who delivered his remarks at a metalworks factory near his hometown of Scranton on Thursday.

Trump spoke about the role he thought disinfectants could play in tackling an infection caused by the virus during a now infamous April 23 briefing. But he didn’t say people should drink bleach.

His comments came after William Bryan, the undersecretary for science and technology at the Department of Homeland Security, presented a study that found sun exposure and cleaning agents like bleach can kill the virus when it lingers on surfaces.

Trump remarked on the effectiveness of those methods and wondered if they could help address infections in the human body.

Here are his full comments:

"A question that probably some of you are thinking of if you’re totally into that world, which I find to be very interesting. So, supposedly we hit the body with a tremendous, whether it’s ultraviolet or just very powerful light, and I think you said that hasn’t been checked, but you’re going to test it. And then I said supposing you brought the light inside the body, which you can do either through the skin or in some other way. (To Bryan) And I think you said you’re going to test that, too. Sounds interesting, right?"

He continued.

"And then I see the disinfectant, where it knocks it out in one minute. And is there a way we can do something like that, by injection inside or almost a cleaning, because you see it gets in the lungs and it does a tremendous number on the lungs, so it’d be interesting to check that, so that you’re going to have to use medical doctors with, but it sounds interesting to me. So, we’ll see, but the whole concept of the light, the way it kills it in one minute. That’s pretty powerful."
उगाच लशींवर खर्च केला आणि लाखोंची आयुष्य उद्ध्वस्त केली. हा सैपा उपाय आजमावून पाहायला हवा होता लाखो लोकांवर.

<<<<<<आज जो काही प्रकारचा व्हायरस आहे त्यात लस न घेतलेल्या लोकांनाही हॉस्पीटलमधे फार जावे लागत नाही. त्यामुळे लस घेऊन काय मोठे दिवे लावले आहेत? >>>>>>

बहुसंख्य लोकांनी लस घेतल्यामुळे च हे शक्य झाले आहे. हे असे व्हावे म्हणुन च कुठल्याही रोगासाठी लस निर्माण केली जाते. जिथे लस परिणाम कारक नाही असे निष्पन्न झाले त्या चीन मध्ये एक रुग्ण सापडला तरी अख्ख शहर महिनोन्महिने लाॅकडाऊन च्या चक्रातुन जात कारण असं केलं नाही तर तिथे मृतांची संख्या बेसुमार वाढेल अशी तिथल्या सर्वेसर्वांना भिंती वाटते.

हॅलोविनला कुणी अमली पदार्थ मिसळलेली कँडी खाऊन मेला नाही म्हणून हुरळून जाण्यासारखे काय आहे? फेन्टनिलचा डोस जास्त होऊन मरणार्‍यांची संख्या गगनाला भिडत आहे. >>> ओ पुन्हा पुन्हा ते स्ट्रॉमॅन आणताय. फेण्टानिल चा मामला गंभीर आहे की नाही याबद्दल हे चाललेले नाही. दिवसरात्र तुमचे लोक ओरडून सांगत होते की कॅण्डीज मधून फुकट वाटणार आहेत ड्रग्ज. ते फुस्स झाले म्हणून आता नवीन कर्व्हबॉल्स.

ट्रम्पचे तुणतुणे? मग फाउची कोणी आणला? ते तुणतुणे नाहीतर काय आहे? हमारा रेफरन्स तुणतुणा और आपका रेफरन्स एकदम डीप मिनिंगफुल स्टफ? आणि तुमचे लोकही ट्रम्पचे तुणतुणे कालपर्यंत वाजवतच होते की. अजूनही गावागावात वाजवत आहेत. प्रायमरीज नंतर मॉडरेट्सना खेचायचे म्हणून बंद केले आहे फक्त. ८ नोव्हें नंतर पुन्हा सुरू होईल.

करा हिशेब कोणत्या कंपन्यांनी किती कमावलेचा. कोणी रोखले आहे? २०२० च्या डिसें पर्यंत तरी महान नेते चालवत होते ना सरकार. अ‍ॅब्सोल्यूट पॉवर ने? त्यांनी का नाही केले.

बाकी इथल्या जनरल वाचकांकरता काही निरीक्षणे. खूप मोठी पोस्ट झाल्याने दोन भागांत लिहीतो.

इथल्या मध्यावधी निवडणुका तीन दिवसांवर आलेल्या आहेत. टीव्हीवर, इंटरनेटवर आणि रस्त्यांवर कॅम्पेनिंग जोरात सुरू आहे. अर्थात भारतातल्यासारखे इथे सगळा सीन विद्रूप करणारी होर्डिंग्ज नसतात. रस्त्यांच्या बाजूला, चौकांमधे यार्ड साइन्स सारख्या तीनेक फूट उंचीच्या पत्र्याच्या साइन्स असतात उमेदवारांची नावे लिहीलेल्या. निवडणुकीनंतर ते ताबडतोब काढले जातात. खेडेगावांत अनेक लोकांच्या फ्रण्ट यार्ड्स मधे "Firewood for sale" या साइन्सही खूप असतात व अशा गावांमधे सहसा रिपब्लिकन उमेदवार निवडून येतात. त्यामुळे इथे कायम सांगितला जाणारा विनोद म्हणजे यार्ड साइन्स वरून मोजले, तर ट्रम्प पहिला, फायरवूड दुसरे व बायडेन तिसरा असे पोल येइल Happy

इंटरनेट व टीव्हीवरच्या जाहिराती थोडीफार अतिशयोक्ती करणार्‍या व नॅरेटिव्ह बनवता येइल अशा पद्धतीने फॅक्ट्स वळवणार्‍या असतात. म्हणजे तो प्रचार आहे तो पूर्णपणे खोटा म्हणता येत नाही पण न्युआन्स बघितला तर जे सांगत आहेत अगदी तसेही नाही - असे काहीतरी असते. काही काही वेळा न्यायालये एखादी अशी अ‍ॅड काढायला लावतात. काही अ‍ॅड्स उमेदवार स्वतः अ‍ॅप्रूव्ह करतात व अ‍ॅडच्या शेवटी तसे सांगतात. तर काही उमेदवाराला सपोर्ट करणार्‍या ग्रूप्सनी केलेल्या अ‍ॅड्स असतात. अनेकदा काही संस्थांनी, कंपन्यांनी त्या उमेदवाराला फंडिंग केलेले असते व त्यामुळे तो जिंकावा (व नंतर त्याने आपल्या हिताचे निर्णय/कायदे करण्यात मदत करावी) म्हणून कंपन्याही अशा अ‍ॅड्स करतात. या अ‍ॅड्स करता कोणी पैसे दिले हे सांगण्याचा बहुधा नियम असावा. कारण शेवटी ते ही येते या अ‍ॅड्स मधे. पण यातही खूप चलाखी असते. पहिली ४-५ नावे ही कोणत्यातरी अगम्य संस्थांची असतात (उदा: कॉन्झर्वेटिव्ह्ज असतील तर फेथ, फॅमिली, फ्रीडम, हेरिटेज टाइप नावे हमखास असतात) आणि मग नीट लक्ष दिलेत तर यामागे असलेल्यांची नावे ऐकू येतात. अर्थात इथे उमेदवाराला कोणी फंडिंग केले आहे ही माहिती पब्लिक असतेच. पण लॉबी ग्रूप्स असतील तर त्या नावांमागचे लोक शोधणे क्लिष्ट असते.

बायबल बेल्ट वगैरे समजल्या गेलेल्या राज्यांमधेही अर्बन भागांत गेल्या १५-२० वर्षात झालेल्या बदलांमुळे तेथे डेमोक्रॅट्सचा प्रभाव वाढला आहे. शिक्षित, नोकरदार लोक वाढू लागले की सहसा डेमोक्रॅट्सची मते वाढू लागतात. पण जरा शहराबाहेर पडले की सगळा रिपब्लिकन भाग. हे सगळे लोक रेसिस्ट असतात असे नाही. किंबहुना बर्‍याचदा रेसिस्ट असण्याचा आणि रिपब्लिकन्/डेमोक्रॅट असण्याचा फारसा संबंध नसतो. काही अपवाद सोडले तर हे लहान गावांतील लोक अगदी फ्रेण्डली असतात. कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क इत्यादी भागातील शहरी लोक थोडे वेगळे वागतात. गावात समोर आलेला माणूस सहसा हसून काहीतरी बोलल्याशिवाय जात नाही. त्यातही अमेरिकन साउथ मधे एकदम अघळपघळ पब्लिक. पण हे बरेचसे लोक लिबरल्स, डेमोक्रॅट्स बद्दल साशंक असतात. सध्या तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार्‍या बातम्या वेगळ्याच आहेत, त्यामुळे तो एक वेगळाच एको चेंबर आहे.

आपल्याकडे पूर्वी वोटिंग सेण्टरच्या १०० मी पर्यंत कॅम्पेनिंग करता येत नसे. बहुधा अजूनही नाही. इथे अगदी सेंटरच्या दारात सुद्धा उमेदवार उभे असतात प्रचाराला. गर्दी असेल्/नसेल त्याप्रमाणे अगदी सहज गप्पा मारायलाही. दोन्ही पार्ट्यांचे बूथ असतात व लोक तेथेही पॅंप्लेट्स वगैरे वाटतात. भारतात मला आठवते की प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी मतदान केंद्रात असतात आणि ते मतदारांवर शंका वगैरे घेउ शकतात. इथे हा प्रकार दिसला नाही. हॉल मधे जर कोणी तरूण व्यक्ती पहिल्यांदाच मतदानाला आले तर सगळे जोरात टाळ्या वगैरे वाजवतात. First time voter! असे ओरडून. हॉलच्या बाहेर एखाद दुसरी साइन असते "मी मतदान केले" असे लिहीलेली. तेथे उभे राहून लोक फोटो काढतात.

निवडणुकीच्या दिवसाच्या आधीच होणारे "अर्ली वोटिंग" आजपर्यंत होते. आता दोन दिवस काही नसेल. मग एकदम मतदानाचा दिवस. त्या रात्रीच मतमोजणी होईल व निकालही येउ लागतील. सगळे मतदान एकाच दिवसापर्यंत होत असल्याने आपल्यासारख्या तीन फेजेस मधे वगैरे निवडणुका नसतात. ऑफिसेस ना सरसकट सुट्ट्या नसतात पण मतदानाच्या दिवशी शाळांना असतात कारण बरीच मतदान केंद्रे ही शाळांमधे असतात.

मतदानाच्या "बॅलट" वर एरव्ही अध्यक्षपदाचे उमेदवार असतात पण या मधल्या निवडणुकांमधे सर्वात मोठा उमेदवार म्हणजे यूएस सिनेटचा - जो सहा वर्षानी पुन्हा उभा असतो, मग यूएस हाउस चा स्थानिक डिस्ट्रिक्ट मधला उमेदवार. त्यानंतर राज्य सिनेटचा व राज्य हाउसचा - हे राज्याराज्याप्रमाणे थोडेफार बदलते. याखेरीज लोकल जजेस, पोलिस "शेरीफ", स्थानिक स्कूल बोर्ड, वॉटर बोर्ड वगैरेच्या काही पदांकरता उभे असलेले लोक असतात. यातील बरेच लोक पार्ट्यांतर्फे असतात तर काही पदे ही स्वतंत्र असतात - म्हणजे उमेदवार अमुक पार्टीचा वगैरे प्रकार नसतो. यानंतर लोकांनी थेट हो किंवा नाही मार्क करून मान्य करण्याकरता काही प्रश्न/प्रपोझिशन्स असतात. म्हणजे स्थानिक शाळांकरता करामधे आणखी अमुक इतकी वाढ करावी का? वगैरे. मतदान करायच्या आधी या सगळ्याबद्दल माहिती काढून जावे लागते. कारण मुख्य उमेदवारांबद्दल जरी लोकांचे ठरलेले असले तरी अशा "डाउन बॅलट" उमेदवारांबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. त्याबद्दल पूर्वी स्थानिक वर्तमानपत्रे एक "एण्डोर्समेण्ट" प्रकाशित करत. पण आता पेपर्स वाचणे कमी झाल्यामुळे एखाद्याने वेबसाइटवर बघितले तरच ते कळते. अशा एण्डोर्समेण्ट्स मधे त्या त्या उमेदवाराबद्दल, एखाद्या प्रपोझिशन बद्दल माहिती असते, ज्यावरून आपण ठरवू शकतो.

ही प्रपोझिशन्स सुद्धा कधी कधी खूप परिणामकारक असतात. उदा: कॅलिफोर्निया मधे काही वर्षांपूर्वी "गे मॅरेज" ला बंदी करण्याकरता "प्रपोझिशन ८" निवडणुकीत आणले गेले होते. ते थोड्या मतांच्या फरकाने मान्य झाले होते (गेल्या ८-१० वर्षांत आणखी काय बदल झाले माहीत नाही). पण एकूणच या प्रपोझिशन्स मधली भाषा व त्या बाजूने/विरोधात केला जाणारा प्रचार प्रचंड गोंधळ उडवून देणारा असतो. त्यामुळे सहसा एखाद्या विश्वासू सोर्स कडून ती माहिती मिळवावी लागते.

एकूण इथली मतपत्रिका ही सहसा बरीच मोठी व क्लिष्ट असते. कधीकधी तर २०-३० वेगवेगळ्या पदांकरता एकाच मतपत्रिकेवर मतदान असते, त्यामुळे अशा मतपत्रिका दोन तीन पानांपेक्षाही मोठ्या असतात. बरीच माहिती काढून मतदानाला जावे लागते. त्याकरता वेळ बराच असतो पण तसे लक्षात ठेवून तयारी करावी लागते.

मध्यावधी निवडणुकांमधे सहसा मतदान अध्यक्षीय निवडणुकांपेक्षा खूप कमी होते. तसेच जनरली आधी निवडून आलेल्या पक्षाच्या विरोधात मतदान होते. ओबामा व ट्रम्पच्या काळातही हेच झाले. त्यामुळे मुळात सध्या अगदी तुल्यबळ असलेल्या सिनेट मधे व हाउस (ऑफ रेप्रेझेंटेटिव्ज) मधे यावेळेस रिपब्लिकन बहुमत येणार असे अंदाज आहेत. सिनेटच्या १०० जागांपैकी १/३ प्रत्येक निवडणुकीत ओपन असतात, तर हाउस च्या सर्वच्या सर्व जागा दर दोन वर्षांनी निवडल्या जातात. यातले "घट्ट" रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट्स सोडले तर सध्या ४-५ लढती अगदी इंटरेस्टिंग आहेत. सध्याच्या पोल्स नुसार या बहुतांश खूप तुल्यबळ आहेत. तेथे दोन्ही पक्षांमधले दिग्गज जाउन कॅम्पेनिंग करत आहेत.

या काही लढती (डेम्स वि रिपब्लिकन या क्रमाने)
- जॉर्जिया मधली एक सिनेट सीटः राफाएल वॉरनॉक वि. हर्शेल वॉकर
- जॉर्जिया गव्हर्नर पदः स्टेसी एब्राम्स वि. ब्रायन केम्प
- ओहयो सिनेटः टिम रायन वि जे डी व्हान्स
- पेनसिल्वेनिया सिनेटः फेटरमन वि डॉ ऑझ
- अ‍ॅरिझोना सिनेटः मार्क केली वि ब्लेक मास्टर्स
- अ‍ॅरिझोना गव्हर्नर: केटी हॉब्ज वि केरी लेक
- नॉर्थ कॅरोलीना सिनेटः शेरी बिझली वि टेड बड

यातल्या सिनेटच्या लढती फक्त अमेरिकेच्या काँग्रेसकरता महत्त्वाच्या आहेत (इथे काँग्रेस हा शब्द सहसा दोन्ही सभागृहे या अर्थाने वापरला जातो).

पण वरच्या गव्हर्नर्स च्या लढतीसुद्धा चर्चेत आहेत. विशेषतः इतके दिवस जॉर्जियाची मार्जोरी टेलर ग्रीन ही २०२४ मधे उपाध्यक्षपदाची उमेदवार होऊ शकेल अशी चर्चा होते. ती आता अ‍ॅरिझोनाची केरी लेक होईल असेही म्हणतात. पण आणखी काही महत्त्वाच्या लढती आहेत ज्यात अशी पदे निवडणुकीत आहेत ज्यावर निवडून आलेले लोक २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीवर परिणाम करू शकतात. २०२० मधे बहुतांश रिपब्लिकन लोकांनी सुद्धा राज्याराज्यांमधे निवडणूक सर्टिफाय केली. पण उघडपणे २०२० ची निवडणूक फ्रॉड होती हे म्हणणारे, व ट्रम्पचे बॅकिंग असलेले लोक यावर्षी जर प्रभाव असलेल्या पदांवर आले तर २०२४ मधे काय होईल हे सांगता येत नाही, असा डेमोक्रॅट्स चा प्रचार आहे. आणि असे बरेच लोक सध्या ठिकठिकाणी बॅलट्सवर आहेत. "यावर्षी लोकशाही हीच बॅलटवर आहे" ते या अर्थाने.

डेम्सचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गर्भपात. सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी रो वि. वेड रद्द केल्यावर गर्भपाताचे निर्णय राज्यांनी करण्याचा मार्ग खुला झाला. पण त्याहीपुढे जाउन रिपब्लिकन उमेदवारांनी जाहीर सांगितले आहे की ते याबद्दल "फेडरल लॉ" आणतील. आणि त्याचे जे "पोश्चरिंग" सुरू आहे त्यात "कसलाही अपवाद ठेवणार नाही" हे ही एक आहे. सध्या लिबरल राज्ये तरी आपापले नियम लावू शक्तात. पण काँग्रेसमधे जर दोन्ही सभागृहांत यांचे बहुमत झाले तर अमेरिकाभर लागू होणारा कायदा ते आणतील ही भीती लोकांमधे आहे. पण एकूण हा मुद्दा जितका सतत हॅमर करायला हवा तितका तो डेम्स करत नाहीत असे सध्याचे चित्र आहे. कदाचित असेही असेल की आफ्रिकन अमेरिकन्स व लॅटिनोज - जे सहसा डेमोक्रॅट्सचे मतदार समजले जातात - हे लोक सुद्धा धार्मिक असल्याने त्यांच्यामधेही याला विरोध असणारे तितके नसतील.

डेम्सचा तिसरा प्रचाराचा मुद्दा म्हणजे काँग्रेस जर रिपब्लिकन्स कडे गेले तर ६ जाने. चे इन्वेस्टिगेशन ते बंद करून टाकतील. त्यातून फक्त ट्रम्पच नव्हे तर त्यावेळेस लोकांना पेटवणारे सगळे मोकळे सुटतील आणि इतक्या मोठ्या प्रकाराबद्दल कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही. अर्थात प्रत्यक्षात आत गेलेल्या लोकांना शिक्षा ऑलरेडी झाल्यात, अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात. पण त्यांना पेटवणार्‍यांना अजून काहीच फरक पडलेला नाही.

पण सर्वसामान्य लोकांना एक दोन वर्षांपूर्वी $२ असलेला गॅस (पेट्रोल) आता $३.५-$४ (कॅलिफोर्नियात तर $६ पेक्षा जास्त) झाला आहे, नेहमीच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत, एकूणच इकॉनॉमी मंदावली आहे - हे प्रश्न साहजिकच जास्त महत्त्वाचे आहेत. निवडणुक कशी राबवली जाते वगैरे क्लिष्ट गोष्टी एकतर बहुतेकांना समजत नाहीत, आणि समजले तरी दैनंदिन प्रश्नांपेक्षा ते जास्त महत्त्वाचे वाटत नाहीत. गर्भपाताचा मुद्दा कदाचित लोकांना मतदानाला बाहेर काढू शकेल. पण एकूणच सर्वसामान्य पब्लिकला समजेल अशा सोप्या पद्धतीने प्रचार करण्यात डेम्स कमी पडतात. आणि खरे म्हणजे या गोष्टींबद्दल डेम्स नक्की काय इलाज करत आहेत ते ही कळत नाही. इमिग्रेशन वगैरे बद्दल डेम्स मधले "लेफ्ट" लोक नेहमीच भोंगळ वाटतात, तसेच क्राइम बद्दलही. तसेच सध्या खूप वाढत असलेल्या कॅन्सल कल्चर बद्दलही डेम्स मधल्या "वोक" ग्रूप्सना जबाबदार धरले जाते. विचारस्वातंत्र्याचा एरव्ही जप करणारे लिबरल्स अशा वेळेस ते स्वातंत्र्य दाबून टाकतात अशी अनेक उदाहरणे आहेत.

याउलट रिपब्लिकन्स. त्यांचा प्रचार जनरल क्राइम, डेम्सचा इल्लिगल इमिग्रेशन बद्दलचा सॉफ्ट अ‍ॅप्रोच आणि सध्याची महागाई यावर आहे. त्यांचे प्रचाराचे मुद्दे लोकांपर्यंत सहज पोहोचणारे असतात. हे खोडून काढणार्‍या स्लोगन्स वगैरे मधे डेम्स फिके पडतात. त्यामुळे अमेरिकेचा मुख्य कल हा सहसा रिपब्लिकन असतो व एखाद्या वर्षी डेम्सनी जर रान उठवले तरच ते तिकडे कलतात असा माझा समज आहे. २००८/२०१२ मधे ओबामामुळे व २०२० मधे बायडेन व करोनामुळे ते झाले. यावर्षी इथल्या ट्रॅडिशनप्रमाणे दोन्ही सभागृहे रिपब्लिकन्स कडे जातील असे चित्र आहे, व डेम्स जरी सिनेट स्वतःकडे ठेवू शकले तरी ते क्रेडिटेबल होईल असे लोक म्हणतात.

ते व्हायला कदाचित पुन्हा यावर्षी जॉर्जियाच्या सिनेट लढतीवर सगळे अवलंबून राहील अशीही एक शक्यता आहे. तेथील नियमांप्रमाणे विजयी उमेदवाराला जर ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत तर टॉप दोन उमेदवारांमधे पुन्हा एक लढत होते - "Runoff election". ती २०२० मधे झाली होती, त्यात डेमोक्रॅट वॉरनॉक विजयी झाला होता. त्या विजयामुळेच सिनेट मधे डेमोक्रॅट्सचे पारडे जड झाले. ते सगळे पुन्हा रिपीट व्हायचे चान्सेस आहेत.

बाकी इलेक्शन संबंधित गमतीही खूप असतात. दर दोन वर्षांनी यावेळेस प्रत्येक अमेरिकन हा "Hardworking American" असतो. प्रत्येक उमेदवाराच्या भाषणात आपण कसे सर्वसामान्य बॅकग्राउण्डमधून वर आलो हे सांगण्याची चढाओढ असते. बाप कोठेतरी कोल माइन मधे होता, आई दोन जॉब्ज करत होती वगैरे काय काय असते. डेमोक्रॅटस ची भाषणे सहसा इंटलेक्च्युअल असतात, त्यांचे लोक व्हाइट कॉलर टाइप, तर रिपब्लिकन्सची मुद्दाम सोपी केलेली भाषा, व सह्सा macho व्यक्तिमत्त्वे. आता हे राज्याराज्यांत बदलत असेल - टेक्सास मधला डेमोक्रॅट माणूस हा व्हरमॉण्ट मधल्या रिपब्लिकन माणसापेक्षा रिपब्लिकन वाटेल- पण ढोबळमानाने उमेदवाराची अंगकाठी, उच्चार्/अ‍ॅक्सेण्ट व बोलायची पद्धत यावरून एकही मुद्दा न ऐकताही तो रिपब्लिकन आहे की डेमोक्रॅट याचा अंदाज अनेकदा लावता येतो Happy

First Tuesday after first Monday in November!
अमेरिकेत सहसा कोणत्याही गोष्टी, नियम ई. सर्वसामान्य लोकांना सहज समजतील असे लिहीले जातात. वर्तमानपत्रे, वेबसाइट्स ई. वरचे अर्थशात्रावरचे, राजकारणावरचे लेख सुद्धा क्लिष्ट शब्द वापरून फक्त त्यातील जाणकार लोकांनाच समजतील असे नसतात. कोणालाही सहज समजतील असेच लिहीण्याकडे कल असतो. एखादा क्लिष्ट शब्द कोणी वापरलाच, तर त्याच्या पहिल्या वापराबरोबर त्याचे स्पष्टीकरण देण्याची पद्धत सहसा पाळली जाते.

अशा पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी होणार्‍या निवडणुकीची तारीख ८ नोव्हेंबर, किंवा "नोव्हेंबरचा पहिला मंगळवार" अशी न ठरवता "पहिल्या सोमवार नंतरचा पहिला मंगळवार" अशी कोडे घातल्यासारखी का आहे हा मला बरीच वर्षे प्रश्न होता. मंगळवारीच एक तारीख आली तर तेव्हा निवडणूक नको असे काहीतरी असावे हे लक्षात आले. पण ते का, हे माहीत नव्हते. मला वाटायचे हॅलोवीनच्या अगदी दुसर्‍या दिवशी नको असे असेल. पण शोध घेतला तर तसे काही कारण नव्हते.

नोव्हेंबर महिनाच का, त्याचे कारण सहज समजण्यासारखे आहे. समर मधली शेतीची कामे संपत आल्यावर पण जोराची थंडी सुरू व्हायच्या मधल्या काळात निवडणूक व्हावी, म्हणून नोव्हेंबर.

पण ती "पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवार"ची भानगड समजावून घ्यायला दोनशे वर्षे मागे जाउन तेव्हाची परिस्थिती बघावी लागेल. बहुसंख्य लोक धार्मिक होतेच पण दर रविवारी चर्च मधे सगळ्या कम्युनिटीने भेटणे हे कॉमन होते (अजूनही खूप ठिकाणी आहे). तसेच मतदान केंद्रांवर जायला कार्स ई नव्हत्या त्यामुळे अनेकदा आदल्या दिवशी जावे लागे. त्यामुळे एक विशिष्ठ तारीख ठरवली आणि ती रविवारी आली तर पंचाईत व्हायला नको म्हणून तसे ठरवले नसावे. अमेरिकेत अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत रविवारी दुकाने बंद असत. गेल्या २०-३० वर्षांत ते काही राज्यांत बदलले, पण बायबल बेल्ट मधे अजूनही रविवारी खूप व्यवहार बंद असतात. तसेच बहुतांश ठिकाणी अजूनही रविवारी संध्याकाळी लौकर बंद होतात. पूर्वी रविवारी दुकाने उघडतच नसत असे वाचले आहे. त्यामुळे ठराविक तारीख चालली नसेल.

मग सरळ सोपे असे "पहिला" किंवा "दुसरा" मंगळवार का नको? तर त्याचे उत्तर जरा गुंतागुंतीचे आहे. इथे साधारण डिसेंबरच्या पहिल्या काही दिवसांत राज्याराज्यांतील "इलेक्टर्स" (सध्यापुरते "प्रतिनिधी" असे समजू. इलेक्टर्स हा एक स्वतंत्र विषय आहे) एकत्र भेटून झालेले मतदान व निकाल "अधिकृत" करतात. ते जेव्हा भेटतात त्याच्या आधी ३४ दिवसांत निवडणूक व्हायलाच हवी असे ठरले. जर १ नोव्हेंबरला मतदान असेल तर काही वर्षांमधे ते ३४ दिवसांच्या बाहेर होई. आता ही ३४ दिवसांची संख्या कोठून आली ते अजून समजले नाही. पण या सगळ्या नियमांमधून मतदानाचा दिवस ठरला. त्या त्या वर्षाप्रमाणे तो २ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर यामधे असू शकतो. सोमवारी लोक प्रवास करून मतदानाच्या गावी येऊ शकत. यावर्षी ८ नोव्हेंबर आहे. नुसतेच "दुसरा मंगळवार" ठरले असते, तर काही वर्षांमधे ते १४ नोव्हेंबर पर्यंत लांबले असते. आता त्यात नक्की अडचण काय होती ते ही समजले नाही. बहुधा थंडी वाढण्याची व दिवस आणखी लहान होण्याचीच असावी. कारण याच सुमारास इथे घड्याळ एक तासाने मागे केले जाते व ५-५:३० पासूनच अंधार पडू लागतो.

तर यावर्षी १ नोव्हेंबरला मंगळवार होता. त्यामुळे पहिला सोमवार हा ७ नोव्हेंबर व मतदान ८ नोव्हेंबरला. २०२० च्या निवडणुकीत ३ नोव्हेंबरलाच झाले होते.

फारएण्ड >>> काही का असेना (क्लिष्ट) खूप सखोल विचार करून निवडणुकीची तारीख ठरवली दिसते. नाहीतर भारतात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या सोयींनी ठरवल्या जातात. टी. एन. शेषन ह्यांनी जराशी तरी शिस्त आणली, पूर्वी तर सगळा आनंदी आनंदच होता असे ज्येष्ठ लोक नेहमीच सांगतात.

फारेंड, मस्त सविस्तर समजवुन सांगीतले आहेस. मिडटर्म निवडणुकीचे बरोब्बर चित्र उभे केले आहेस.

शेंडेनक्षत्रांच्या तुणतुणे वाजल्यासारख्या त्याच त्याच पोस्ट्स वाचुन कंटाळा येउ लागला आहे. आणी त्यांच्याच पोस्टीत “ तुणतुणे” हा शब्दप्रयोग त्यांनी वापरणे हे फारच विनोदी आहे! राज , तु असल्या तुणतुण्या” पोस्टींना “ पॅशनेट“ कश्या म्हणु शकतोस? तेच तेच मुद्दे प्रत्येक पोस्टीत दामटवले म्हणजे ते वाचणार्‍यांना खरे वाटु लागतील असा काहीसा त्यांचा( गोड) गैरसमज असावा.

मला तर त्यांच्या पोस्टी वाचुन तेच स्वतः हातात हातोडा घेउन बायडन व सर्व डेमोक्रॅट्सच्या मागे त्यांची डोकी फोडायला निघाले आहेत की काय असा भास होतो! असो. चालु द्यात!

राज, माझे मुद्दे व विचार असल्या थयथयाट करुन पोस्टीं लिहीणार्‍या माणसांना काय कप्पाळ समजणार? त्यापेक्षा विचारपुशीतच आपण विचारांची कंस्ट्रक्टिव्ह देवाणघेवाण केलेली बरी व मला आवडेल!

<<<ज्या पक्षाला असे काही होते आहे हेच मान्य नाही तो त्या प्रकाराला काय थांबवणार डोंबल? >>>
तर तो पक्ष काही करणार नाही हे मान्य केले तर दुसरा पक्ष तरी काय करणार आहे? का पेलोसि प्रकरण हंटर बायडेन चा पीसी, क्लिंटनने व्हाईट हाउस मधे केलेले चाळे हे सर्व मान्य केले की आपोआप इन्फ्लेशन, महागाइ कमी होणार आहे?
दुसरे येते काय त्या पक्षाला? फक्त टॅक्स कमी करणे नि इतरांना शिव्या देणे एव्हढेच त्यांना येते.
वर कुणि लिहिले आहे की जे त्रम्पवर आरोप करतात त्यांचे धंदे पहा. काय उपयोग आहे त्याचा?
आणि हेच बघायचे असेल तर त्रम्पच्या स्टाफ पैकी किती जणांचे गुन्हे सिद्ध झाले पण त्यांना त्रम्पने माफी दिली?

हे वाचा:
President Trump's Impact on the National Debt - The Balancehttps://www.thebalancemoney.com › trump-plans-to-re...
Jan 26, 2022 — The national debt under President Trump increased by almost 36% to $27 trillion in January 2020.

एकमेकांना शिव्या देणे बंद करा - सगळे राजकारणी चोर असतात. पण जर त्यांना निवडून द्यायचे तर ते इन्फ्लेशन, महागाइ कमी कसे करतील, या मुद्द्यावरच चर्चा व्हावी.

आज मतदानाच्या वेळा संपत चालल्या आहेत तसे काही निकाल आणि प्रोजेक्शन्स येऊ लागली आहेत. फ्लोरिडा मधे रॉन डिसॅण्टिस आणि मार्को रुबियो दोन्ही बहुधा जिंकतील असे प्रोजेक्शन आहे. रूबिओ हा २०१६ मधे प्रायमरीज मधे ट्रम्प व इतरांबरोबर होता. तर डिसॅण्टिस हा २०२४ चा एक उमेदवार मानला जातो. फ्लोरिडातील मोठ्या विजयाचा त्याला २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत फायदा मिळेल. रूबिओचा काय प्लॅन आहे माहीत नाही.

ट्रम्पने उमेदवारी जाहीर केली नाही तर हे सगळेच पुन्हा रिंगणात असतील. पण त्याने जाहीर केली तरी रॉन डिसॅण्टिस असेलच असे दिसते.

आज व्होट केले.रिपब्लिकन कोणीतरी निवडुन यावे म्हणुन नाही तर डेम्स्ची मते कमी व्हावीत. त्यांना अवघड जावे म्हणून.

अमेरिकेत हे जे 'हिंदू जातियवादी आहेत ' प्रचार चालू आहे (https://www.washingtonpost.com/technology/2020/10/27/indian-caste-bias-s...) सर्व भयंकर आहे. काही युनिव्हर्सिटीजनी (https://qz.com/india/2081765/us-universities-like-uc-davis-ban-indian-ca...) पाठिंबा दिलेला आहे. जातियवादाचा, मुद्दा उचलून धरलेला आहे. या प्रचाराचे दूरगामी परिणाम काय आहेत? लवकर कळेलच.

कॅलिफोर्निया डेमोक्रॅटिक पार्टीचा 'जातियवाद निर्मूलनास' पाठिंबा आहे.
>>>>>>>>>>>>>The California Democratic Party is the largest state party in the nation to take a stance on caste discrimination, marking an important step forward in the fight against caste-based oppression in the United States.

आणि इंडियन अमेरिकन मुस्लिम लोकांनी फार आनंदाने हा निर्णय साजरा केलेला आहे म्हणा, कौतुक केले आहे. (https://twocircles.net/2021sep01/443511.html) - The Indian American Muslim Council (IAMC), an advocacy organization dedicated to safeguarding India’s pluralist and tolerant ethos Wednesday hailed the California Democratic Party’s decision to designate caste as a protected category.

https://time.com/6146141/caste-discrimination-us-opposition-grows/
https://dsnuk.org/2021/09/07/the-californian-democratic-party-adds-caste...
https://www.reuters.com/business/sustainable-business/caste-california-t...

रियुटर्स नुसार - मध्यंतरी, कॅलिफोर्नियात मधील 'employment regulator' ने २ उच्चवर्णिय लोकां वर खटला दाखल केला कारण काय तर त्यां दोघांनी एका निम्नवर्णिय नोकरदाराच्या प्रगतीत अडथळा निर्माण केला.. निम्न व उच्च त्या बातमितील शब्द आहेत.

Happy
हिंदू जातीयवादी आहेत हा फक्त प्रचार असलेल्या नंदनवनात राहायला आवडेल.

भारतात जातियवाद म्युच्युअल आहे. मी जातीच्या कडबोळ्यात वाढलेले आहे, लग्न झालेले आहे. दोन्हीकड चे कटु अनुभव व मते जाणुन आहे.
अमेरिकेत जातियवाद नाहि पाहिला. सिस्को च्या त्या नोकरदाराचा खटला कोर्टात गेलेला आहे. येथिल व भारतातील अ‍ॅकंदरच कोर्टावरति विश्वास आहे. न्याय व्हावा ही सदिच्छा.

म्युच्यल , सार्वत्रिक असणारच. द्वेष आहे. पण उच्चनीचतेच्या कल्पना बदललेल्या नाहीत.

हा आणखी एक हिंदुविरोधी प्रचार बघा
https://www.nytimes.com/2022/09/25/nyregion/bulldozer-indian-parade-new-...
बिचाऱ्या आयोजकांना माफी मागावी लागली यासाठी. फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन गेलं खड्ड्यात.

सामो, मला काही समजले नाही तुझे लॉजिक. म्हणजे हिंदू जातीयवादी नाहीतच असे म्हणतेस का? Uhoh अमेरिकेत जातीयवाद नसेलच असे का वाटते तुला?
त्या वॉ पो च्या बातम्या वाचल्या.
कॅलिफोर्निया डेमोक्रॅटिक पार्टीचा 'जातियवाद निर्मूलनास' पाठिंबा आहे. >>> म्हणून तुला त्यांची मते कमी करायची आहेत ? हे उलगडून सांगतेस का ?

फा, छान लिहिल्या आहेत पोस्ट्स.

“ २०२० मधे बायडेन व करोनामुळे ते झाले.” - मला वाटतं बायडेन ट्रंपमुळेच निवडून आला. दोन्ही बाजूच्या कट्टर पाठीराख्यांची मतं फिरली नाहीत, पण न्युट्रल / सेंटर राईटवाले ट्रंपमुळे बायडेनकडे गेले.

https://www.nbcnews.com/news/asian-america/harvard-adds-caste-bias-prote...

हार्वर्ड ने 'caste bias protections' हाती घेतलेले आहे. >>>>Harvard is the first Ivy League school to spotlight the discrimination students from oppressed and marginalised castes face on campus. जातियवाद अमेरिकेत नाही असे नसेल पण आहे असेही प्रुफ नाहीये ना. करा ना ते सिद्ध. ते सिद्ध होण्याआधीच हे लोक 'प्रिव्हेन्टीव्ह मेजर्स' घेतायत पण ते कसे ज्याने अन्य कोणावर तरी अन्याय होतो ना. काही जातींकरता झुकतं पारडं अन्य जातींवर अन्यायजनक आहे.

डेमोक्रॅटिक लोकांना कोणा ना कोणा 'सो कॉल्ड विक्टिम्स चे' रक्षण करण्यावाचून चैन पडेल तर ना. इतर महत्वाचे मुद्दे राहीले दूर. यांच्या राज्यात स्तॉक्स पडलेत, महागाई गगनाला भिडली आहे पण हे काहीतरी 'काल्पनिक' मुद्दा धरुन बसणार. काप्ल्पनिकच अनटिल प्रुव्हन.

बाकी बरेचसे की स्टेट रिजल्ट्स अजून हँगिंग आणि टू क्लोज टू कॉल असले तरी रिपब्लिकन पार्टी ला अपेक्षित होती तशी "रेड वेव्ह" आलेली आत्ता तरी दिसत नाही. फ्लोरिडात डीसान्टिस, रुबिओ हे सहज जिंकले, ते अपेक्षित होतेच. असे काही मोजके क्लियर विनर सोडता रिपब्लोकन्स साठी अंडरवेल्मिंग रिजल्ट्स आहेत.
मला आनंद झाला तो बहुचर्चित पेन्सिल्वानिया सीनेट रेस मधे ट्रम्प च्या बॅकिंग च्या जोरावर येणार येणार अशी हवा झालेला ऑझ हरल्याचा!! ट्रम्प चं बॅकिंग म्हणाजे काहीतरी गोल्डन टिकेट असल्याचा फुगा फुटला असावा एव्हाना. २०२४ वर याचा फरक पडेल नक्कीच.
काही "फर्स्ट् एवर" - मॅसॅचुसेट्स मधे पहिली महिला आणि LGBTQ गवर्नर (डेम.) मॉरा हिली, अर्कार्न्सस मधे पण पहिली महिला गर्वर्नर (रिप.) सारा हकाबी सँडर्स, मेरीलँड मधे (डेम.) वेस मूर पहिला अफ्रिकन अमेरिकन गवर्नर!
काही स्टेट्स मधे जिथे अबॉर्शन चा प्रश्न बॅलट वर होता तिथे ( कॅलिफोर्निआ, मिशिगन, व्हर्मॉन्ट) लोकांनी अबॉर्शन राइट्स प्रोटेक्ट करण्याचा कौल दिला. आणि त्यासाठी फाइट केलेल्या मिशिगन गवर्नर (डेम.)व्हिट्मरला ही लोकांनी पुन्हा निवडुन दिले.

मग आता बायडेन हॅरिसला इम्पिच कसे करणार?
ठीक आहे.
पण शिव्या देणे तर चालू राहील ना? शिवाय कोन्स्पिरसी थेअरीज करायला आणखीनच ऊत येईल.
शेंडेनक्षत्र, राज, लिहीत रहा. जरा विनोदी काही असले की रुक्ष राजकारणात जरा मजा येते.
कारण आता फक्त ग्रीन एनर्जी नि इन्फ्रास्ट्रक्चर सारखे बोअरिंग विषय.

मुकुंद, मैत्रेयी, नाबुआबुनमा, फेफ - धन्यवाद! विषय डोक्यात ताजा असल्याने लिहून ठेवायचे होते आणि अशी माहिती मराठीत कोठे दिसली नाही. फेफ - तो "करोना" चा उल्लेख याकरता की करोनामुळे अनेक लोक बायडेनकडे झुकले असावेत. इतके होऊन सुद्धा जेमतेम विजय होता. जर "नॉर्मल" वर्ष असते तर कुंपणावरचे लोक इतक्या संख्येने बायडेन कडे गेले असते का अशी मला शंका आहे.

बाकी बरेचसे की स्टेट रिजल्ट्स अजून हँगिंग आणि टू क्लोज टू कॉल असले तरी रिपब्लिकन पार्टी ला अपेक्षित होती तशी "रेड वेव्ह" आलेली आत्ता तरी दिसत नाही >>> हो तसेच दिसते. बहुतांश "जैसे थे" परिस्थिती आहे. वरती लिहीले होते तसे शेवटी सिनेटचा कंट्रोल पुन्हा यावर्षी सुद्धा "जॉर्जिया रनऑफ" मुळे ठरणार की काय असे चान्सेस दिसतात. डेम्स नी एक सीट फ्लिप केली आहे (फेटरमन) पण दुसरीकडे एका ठिकाणी रिपब्लिकन उमेदवार मूळच्या डेम सीटवर आघाडीवर आहे (नेवाडा - लॅक्सॉल्ट). तेथे अजून मतमोजणी सुरू आहे आणि फरक थोडासाच आहे. ती सीट जर डेम्स नी टिकवली आणि रनऑफ मधे वॉरनॉकच परत आला, तर डेम्सची एक सीट अ‍ॅक्च्युअली वाढेल. नाहीतर पुन्हा ५०-५० आणि कमला हॅरिस मुळे निर्णायक बहुमत. अ‍ॅरिझोनामधेही एक लढत क्लोज आहे (मार्क केली (डेमोक्रॅट) वि ब्लेक मास्टर्स (रिपब्लिकन)) पण तेथे डेम्सची आघाडी जास्त आहे.

सिनेटबद्दल नाही पण सर्वात इंटरेस्टिंग निकाल होऊ शकेल तो केरी लेक चा, अ‍ॅरिझोना गव्हर्नर निवडणुकीत. ती सध्या मागे आहे. अजून मोजणी सुरू आहे. उरलेल्या काउंटीज या जास्त ग्रामीण आहेत की शहरी यावर ती मते कोणाकडे जातील हे ठरेल. पण निवडणुकीपूर्वी केरी लेक ही दणदणीत जिंकेल आणि २०२४ ची वाइस प्रेसिडेण्टपदाची उमेदवार असेल अशी शक्यता दिसत होती. अजूनही होऊ शकेल, पण किमान हा विजय अगदी मोठा नसेल. सध्या तरी मागे आहे.

नाहीतर बाकी एखाद दुसरे अपवाद सोडले, तर आधी जी पार्टी बहुमतात होती, जे उमेदवार त्या पदावर होते तेच जिंकलेले दिसत आहेत.

सामो यांची पहिली पोस्ट कळाली नव्हती पण नंतरच्या वाचून जरा क्लिअर झाले. पण हे लक्षात आले नाही की जातीयवाद निर्मुलनाला पाठिंबा असणे यात गैर काय आहे?

महागाईबद्दल बरोबर आहे. पण त्याबद्दल नुकतेच एक मोठे बिल पास झाले की. आता ते आवश्यक ते करत आहेत की नाही याबद्दल लोकांचे काय मत असेल ते असेल आणि समजा तुम्हाला वाटत असेल की डेम्स ना महागाई महत्त्वाची वाटत नाही, तर तुम्हाला तसे मत असण्याचा अधिकार आहे. पण एकच पार्टी दहा वेगवेगळ्या सोशल विषयावर अ‍ॅप्रोच ठरवू शकते ना?

बाकी स्टॉक्स पडत आहेत त्याबद्दल एक राजकीय पार्टी काय करणार? तसेच खाजगी विद्यापीठांच्या पॉलिसीबद्दलही ते काय करणार Happy

शुभ प्रभात. फार एंड सर्व पोस्टी माहिती पूर्ण व मेहनत घेउन लिहिल्या आहेत. मी दोन दा वाचणार आहे. क्लॅरिटी साठी. डेमोक्रॅट विजयासा ठी हार्दिक अभिनंदन.

हर्शेल वॉकर ची निवड णू क रन ऑफ मध्ये गेली!! त्याचे निकाल कधी येतील? किती तो थापाड्या.

Pages