आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
बरोबर!
बरोबर!
:लोल: मानव.
कोडं आणि उकल दोन्हीही भारी.
यात सोळा दमडी कुठे आहे...
यात सोळा दमडी कुठे आहे...
एक आना म्हणजे सोळा दमडी ?
पास नहीं आना >>>>
पास नहीं आना >>>>
कोडं आणि उकल दोन्हीही भारी. >>> +१
पास नहीं आना >> भारी!
पास नहीं आना >> भारी!
च्रप्स , पॉइंट आहे!
मानव, कल्क्युळेशन कळलं नाही. पूर्वी रेशो वेगळा होता काय? बहुतेक पूर्वी ६४ पैसे म्हणजे १ रुपया होता, त्यानुसार मग हे बरोबर आहे.
हो हरचंद. मी आधी १०० पैसे =
हो च्रप्स, हरचंद. मी आधी १०० पैसे = १६ आणे हिशेबाने २५ दमडी असे कोड्यात लिहिले होते. मग दुरुस्त केले. कारण जेव्हा दमडी होती तेव्हा जुनेच गणित असणार, ४ पैशांचा आणा.
१६ दमडी = १ आणा
कौतुक करायचे राहून गेले.. एक
कौतुक करायचे राहून गेले.. एक नंबर होते.. आणि उकल पण...
छोट्या बंटीला एके ठिकाणी
छोट्या बंटीला एके ठिकाणी चित्रकार चित्र काढत असताना दिसतो. तो त्याचा जवळ जातो. चित्रकार त्याला नाव विचारतो. तो सांगतो आणि त्याला "तुम्ही चित्र काढत आहात का?" असे विचारतो. चित्रकार हा व्याकरणाचा पक्का आणि आग्रही असतो. त्याला बंटीने एक शब्द दीर्घ ऐवजी ऱ्हस्व उच्चारला आहे हे खटकते. मग तो त्याला करेक्ट करायला दीर्घ उच्चारावर भर देऊन, ऱ्हस्व उच्चार चुकीचा आहे हे सांगायला कोणते गाणे म्हणतो?
१. गाणं हिंदी आहे.
१. गाणं हिंदी आहे.
म्हणजे चित्राला हिंदी शब्द शोधणे आले.
तो सापडला की फार अवघड नाही.
तस्वीर बनाता हू तस्विर नही
तस्वीर बनाता हू तस्विर नही बंटी
बिंगो मोरोबा!
बिंगो मोरोबा!
एक लाजरीबुजरी म्हैस असते. ती
एक लाजरीबुजरी म्हैस असते. ती पान्हा देत नसते. गवळी जाम वैतागतो आणि 'कशी दूध देत नाहीस बघतो' असं म्हणून आणखीच जोर लावतो. आरडाओरडा ऐकून पाचपन्नास बघे गोळा होतात. ते पाहून म्हैस आणखीच लाजते आणि हे गाणं म्हणते.....
छोड दो आँचल जमाना क्या कहेगा
छोड दो आँचल जमाना क्या कहेगा
करेक्ट
मानवदादा व मोरोबा, कोडे व उकल
मानवदादा व मोरोबा, कोडे व उकल धमाल
ही दोन्ही कोडी व उकल धमाल
आंचल ... आंचळ कळायला वेळ
आंचल ... आंचळ कळायला वेळ लागला मला.. एक नंबर...
:haha: दोन्ही कोडी आणि
:haha: दोन्ही कोडी आणि उत्तरं मस्त.
तस्वीर नहीं बंटी भारीच!
तस्वीर नहीं बंटी भारीच!
मोरोबा, मला त्या शब्दाचा लहानपणी तोच अर्थ वाटायचा. त्यामुळे असं वाटायचं की किती बोल्ड शब्द आहेत!
नवीन कोडे.
नवीन कोडे.
बकासुर समोर काय येईल ते खात सुटला. खाता खाता त्याचा आकार इतका मोठा झाला की त्याला समोर काय आहे हे नीट दिसतही नसे. तो तसाच घाईघाईत बकाणा भरत असे. एकदा त्याला जेवण वाढायला आई आलेली असताना त्याने आईसकट अन्न पोटात गिळलं. आतून आईचा आवाज आल्यावर लक्षात आलं की आपल्या पोटात आई आहे. आता काय करायचं ह्या विचारात तो एका वैद्यबुवांना भेटला आणि म्हणाला माझ्यावर उपचार करा, माझ्या पोटात आई आहे. वैद्यांना एक असं झाड माहिती होतं, की ज्याचा डिंक खायला घालून मग ह्या प्रकारचा उपचार करता येतो. पण तो डिंक त्यांच्याजवळ नव्हता. ते बकासुराला म्हणाले की आधी तो डिंक घेऊन ये.
हा वरचा दोघांमधला संवाद कुठल्या गाण्यात चालेल?
(No subject)
मेरे मेहेबूबचं कडवं?
मेरे मेहेबूबचं कडवं?
एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है..
..
अब तो मिल जा के मेरे जान पे बन आई है
हाहा. हे थोडं जुळतय, पण गाणं
हाहा. हे थोडं जुळतय, पण गाणं मराठी आहे. पण वावे, योग्य विचार करता आहात.
अजून एक क्लू देतो. नाट्यगीत आहे. शिवाय शब्द कळायला तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत या चारही भाषा वापरायला लागतील (संस्कृत कदाचित नाही लागणार).
मम आत्मा गमला...
मम आत्मा गमला...
मम आत मा, गम ला..
मराठी नाट्यगीत क्लु मुळे कळले चटकन. मी हिंदी गाणी आठवत होते.
मम 'आत' मा 'गम' ला...... ?
.
मम आत्मा गमला हा
श्रद्धा, ह पा ... छानच!!
मम आत्मा गमला
मम आत्मा गमला
श्रद्धा, परफेक्ट!
श्रद्धा, परफेक्ट!
मम आत्मा गमला >>>
मम आत्मा गमला >>>
वा वा! भारी हपा आणि श्र.
वा वा! भारी हपा आणि श्र.
Pages