चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागील काही पानावरील review वाचुन आणि tvवर पहायला मिळाले म्हणून हे सिनेमे बघितले. माझ्याबाबतीत वयामुळे घडतंय की काही दुसर कारण आहे, माहित नाही.>>>सेम पिंच. मलाही साउथचे सो कॉल्ड हिट सिनेमे झेपत नाहीत. चालायचंच आवड आपली आपली Happy

मस्त रिव्ह्यू अस्मिता!

वाचायला सुरुवात केल्यावर काही ओळींनंतर खाली जाऊन आधी नाव वाचले. मला वाटले फा ने लिहीलाय की काय!

अस्मिता, कॉमी, एकदम भारी लिहिलंय
पिक्चर पूर्ण पाहिला.शेवटी इतकी vfx आग होती की मी गाडीपाशी गेले तरी डोळ्यासमोर नारिंगी वर्तुळं होती.
,मला मुख्य कल्पना आणि अस्त्रांची माहिती आवडली.पण बाकी फारच टाईमपास केलाय.
आम्हि सारखी ते शिवा चं प्रत्यक्ष पात्र दिसेल आणि तो rrr मधला राम चरण असावा याची वाट बघत होतो.
मला नंतर आमच्या फॅमिलीने(सगळे माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत.त्यांना टेनेट पण कळला होता) दीपिका पण दिसली सांगितलं.मला खुप आगीमुळे दिसली नसावी.
एकंदर मजा आली.आलिया गोड दिसते. मौनी छान दिसते पण बिचारीला पूर्ण पिक्चर भर लाल लेन्सेस लावावे लागलेत.
ते 2 व्हिलन आवडले.चांगले पोटेनशीयल वाले भिडू आहेत.
हिरोचे मित्र वाया घालवलेत.आश्रम मधली मुलं गोड आहेत पण अगदी छोट्या भूमिका आणि खूप आगीमुळे काही दिसत नसल्याने नीट वापरली नाहीयेत.डिंपल वाया घालवलीय.अमिताभ चे उच्चार मला हल्ली कळत नाहीत.त्याला जरा सोपी वाक्यं देत जा.

त्यांना टेनेट पण कळला होता >>>>>>>
Happy
इतक्या दिवस दुर्लक्ष केले होते पण काल टेनेट बघत होतो .
अर्धा पिक्चर झाला तरी श्टोरी डोक्यात घुसायला तयार नाही.
शेवटी वैतागून सोडून दिला !
त्यातील रिव्हर्स इंजिनियरिंग ला आद्य मानून माघार घेण्यात शहाणपण दिसून आले .
असाच अनुभव पूर्वी मॅट्रिक्स वेळी आला होता .
पुण्यातील विजय थेटर मध्ये दोन तीन वेळा जाऊन बघितला तरी श्टोरी बाऊन्स होत असे .
बर तरी पिक्चर बऱ्या पैकी गर्दी खेचत होता !
बहुतेक श्टोरी न समजलेले माझ्यासारखेच सगळे जण असतील .

अमिताभ चे उच्चार मला हल्ली कळत नाहीत.त्याला जरा सोपी वाक्यं देत जा. >>> अजून किती सोपी Proud

ब्रम्हास्स्त्र सिनेमा पहायला गेलो. तिकीट काढायला काऊंटर वर गेलो तर काऊंटरबाॅय बोलला कार्ड, कॅश किंवा पेटीएम असेल तर तिकीट मिळेल नाही तर नाही.

आणि

शेवटी समोरच्या पानीपुरीवाल्याला पेटीएम केले पैसे नी कॅश घेतली.
@अमरेंद्र जर पेटीएम होतेच तर डायरेक्ट थेटरवाल्यला का नाही पैसे पाठवले. ते पण पेटीएमच मागत होते ना?

@अमरेंद्र जर पेटीएम होतेच तर डायरेक्ट थेटरवाल्यला का नाही पैसे पाठवले. ते पण पेटीएमच मागत होते ना? >>>>
माफ करा. पेटीएम नाहीतर फोन पे केले.

अनु! Lol >>त्यांना टेनेट पण कळला होता>> Biggrin मला त्या टेनेटच्या रिव्हू/ एक्सप्लेन्ड वाल्या पोस्ट वाचतानाही झोप येऊ लागली. त्यापेक्षा मुलगा आता मोठा झालाय तर परत एकदा इनसेप्शन बघणार आहे मी. सधाकुंप.

रघूसरांच्या आश्रमात सगळे ज्येना हास्यक्लबात हात वर करून हसतात तसंच काहीतरी गेटटुगेदर करत अस्त्र अॅक्टिव्हिटी करतात. >>>
शिवाय दोन संवांदांच्यामधे जो शून्य काळ असतो तो गरजेपेक्षा जास्त वाटतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लुलेस दिसत राहते. >>> Lol

अस्मिता ती सगळी पोस्टच धमाल आहे. वाढवून पूर्ण रिव्यू लिही जमले तर.

अमिताभने जर शुध हिंदी बोलत अनावश्यक जोर देउन संवाद म्हंटले असतील तर ते फार बोअर होतात. अमिताभची मजा त्या सलीमजावेदी भाषेतच आहे. आजकाल तो एरव्ही बोलतो तसेच त्याला पिक्चर मधे बोलायला लावतात. किंवा आजोबा तसे बोलू नका, हे केबीसी, जाहिरात किंवा मुलाखत नाही हे सांगायला कचरतात.

अंतरंगी - धन्यवाद Happy

धन्यवाद अतरंगी , ऑटोकरेक्टने अंतरंगी केले होते ! Happy
धन्यवाद मैत्रेयी Happy
धन्यवाद फा Happy

अस्मिता ती सगळी पोस्टच धमाल आहे. वाढवून पूर्ण रिव्यू लिही जमले तर. >>> हे परीक्षणाचे ट्रेलर होते. ओटीटीवर आला की 'चुनचुनके बदला लुंगी' Wink !

किंवा आजोबा तसे बोलू नका, हे केबीसी, जाहिरात किंवा मुलाखत नाही हे सांगायला कचरतात.>>>> Proud

दीपिका पण दिसली सांगितलं.मला खुप आगीमुळे दिसली नसावी.>>> हे खरंच लिहिलय की सारकॅस्टीक? इतकी आग लागलिये का पिक्चरात? Lol

अगं मला खरंच दिसली नाही दीपिका.
एक बाई रणबीर ची आई म्हणून केस आणि लेग दाखवल्या आहेत पण तिचा चेहरा मला दिसला नाही.

अस्मिता तुमचा review अगदी चपखल आहे। अगदी अगदी माझ्या मनात होते तेच तुम्ही व्यवस्थित शब्दात मांडलात। खरंच एकदम भारी लिहिलंय, तुम्ही काढाच एक स्वतंत्र धागा पूर्ण मुवि बघून।

Submitted by mbhure on 18 September, 2022 - 21:१७ >>>। तुमच्याशी पूर्णपणे सहमत

इतक्या दिवस दुर्लक्ष केले होते पण काल टेनेट बघत होतो .
अर्धा पिक्चर झाला तरी श्टोरी डोक्यात घुसायला तयार नाही.
शेवटी वैतागून सोडून दिला !

>>>>> माझ्या अनुभवाप्रमाणे टेनेटची कोअर कथा समजणे फारसे अवघड नाहीये. प्रसंग समजणे अवघड आहे. नक्की काय घडतेय हे तर्कसुसंगतपणे आपल्याला पचायला वेळ जातो. त्यामुळे "घडतेय ते कसे घडतेय ?" ह्याकडे फारसे लक्ष न देता "काय घडले ?" इतके समजून घेतले तर टेनेट समजायला हरकत नाही.

अस्मिता, रिव्यू धमाल आहे. सुरुवातच सिक्सर - "अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिसक्कन हसू आलं. त्याला रघूगुरू असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला लघूगुरू सारखं ऐकू आलंय." Lol Lol

“आजोबा तसे बोलू नका, हे केबीसी, जाहिरात किंवा मुलाखत नाही हे सांगायला कचरतात.” Lol

अमिताभने त्याच्या दुसर्या (का तिसर्या) इनिंगमधे जाणीवपूर्वक तयार केलेली ‘प्रेमळ पण कर्तव्यपरायण आजोबा‘ इमेज आहे ती. बराच वेळ, पैसा, श्रम लागतात त्यासाठी. ती तो अशी सहजासहजी सोडणार नाही. Happy

त्यामुळे "घडतेय ते कसे घडतेय ?" ह्याकडे फारसे लक्ष न देता "काय घडले ?" इतके समजून घेतले तर टेनेट समजायला हरकत नाही.>>> बाप रे ! मुव्हि आहे की गणिताचा अभ्यास ?

गंमत अशी की काय घडले हेही फार रोचक वाटले नाही.(असामी असामी टाईप झालं.'हा कुठे पिक्चर आहे, तो काळा सूट वाला बाबाजी नुसताच एअरपोर्ट वर धावतोच' Happy )

अरे, एवढा मोठा रिव्ह्यु इकडे टाकला अस्मिता. धमाल आहे.
नवीन धागा किंवा आधी आलेल्या त्या धाग्यात सुद्धा लिहायचा असता.

असे पीच्चर बघण्यापेक्षा असेल रिव्ह्यु वाचण्यात खरी मजा असते Proud

हर्पा, स्वाती, अजनबी , मानवदादा, सस्मित, जाई थँक्स Happy
मानवदादा, मला तितका मोठा रिव्यू वाटला नाही, तरी नवीन धागा काढू म्हणता तर काढते. Happy तुम्ही सगळे पुन्हा हसा पण Lol

टपाल हशील निराळे Happy

पण सिरीयसली, जरूर काढ. माबोच्या परिभाषेत अशा मागणीला चाहत्यांनी "लिहाच आपण" वाजवलेली लाडिक पिपाणी ("लापि") असे म्हणतात.

फा Lol

Pages