दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी नुसतीच भाजलेली बडीशेप खाण्यापेक्षा त्यात तीळ + ओवा + शेपा + सुके किसलेले खोबे टाकुन भाजुन मिक्स करावे. पचनाला उत्तम.

मी तरी कच्चीच खातो. दुष्परिणाम जाणवले नाही.
"कच्ची बडीशेप पचायला जड जाते" हे विधान पचायला जड जातेय.

हे माझे मत नाही मानवदा. एका वैद्याचे आहे. त्यांनीच तसे संगीतले की बडीशेप भाजुन खाल्ली तर जास्त उपयोगी बनते, पोटातील गॅस, दुर्गंध घालवते. पण कच्ची पचायला जड जाते. आपण चमचाभरच खातो त्यामुळ कळत नसेल.

प्रक्रिया केलेले अन्न शरीरास अत्यंत हानिकारक आहे असे संशोधक ओरडुन सांगत आहेत.तरी पिझा, बर्गर,वडापाव किंवा असे अनेक खाद्य पदार्थ आणि शित पेये लोक रोज खातात,पितात.
का असे वागत असतील.आणि रोगांना आमंत्रण देत असतील.

हेमंत, हा धागा किरकोळ प्रश्नांसाठी आहे.
गहन प्रश्नासाठी वेगळा धागा काढल्यास तिकडे चर्चा करता येईल, प्रश्न चांगला आहे तुमचा

भाजकी बडीशेप खाते मी, क्रंची लागते म्हणुन बाकी कारण नाही. भाजके तीळ, शेपा, ओवा, काळे मीठ असं खातात पब्लिक. त्याने गॅस कमी होतो.

शाळकरी वयात ओली बडीशेप मिळायची ती फार आवडायची .>>+१

मानव +१
विशेषत: तिखटामुळे तोंड पोळले असेल तर कच्ची बडीशेप इज द बेस्ट उपाय

सहा महिन्यांंपूर्वी असाच एक धागा काढलेला कोणीतरी तो उडवला गेला होता.
मी कोणतीच बडीशेप खात नाही. कच्ची, पक्की, कोवळी,भाजलेली, हॉटेलात बिलाच्या ताटलीतलीही. तारुण्य गेलं चहा ढोसण्यात, आता कसचं पचन सुधारतंय त्रयोदशगुणी विडे आणि बडीशेप खाऊन.

कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

या मूळ प्रश्नाला बगल देऊन पोस्टी करू नका रे.
"तुम्ही अमुक पदार्थ कसा खाता?" / "तुम्ही दारू कशी पिता?" वगैरे प्रमाणे _तुम्ही बडीशेप कशी खाता?" असा धागा नाहीये. तेव्हा किमान मूळ प्रश्नाचे उत्तर देऊन (भले मग ते "काही कल्पना नाही बुवा" असे का असेना) मग बाकीचे लिहा पुढे.

नाहीतर धागा उडवतील Admin .

सहा महिन्यांंपूर्वी असाच एक धागा काढलेला कोणीतरी तो उडवला गेला होता.>>>+१ मालबोलीवर आधी चर्चा झाली असेल तर शोधायचे कष्ट घ्या. अशी सूचना सुद्धा होती धागा उडवायच्या आधी.

चांगला धागा.
आधी उडाला असेल तरी काढत राहिलं पाहिजे. अशा धाग्यांची गरज आहे. असं अनेकदा होत राहिलं तर मत बदलून (नाही तर कंटाळून) कदाचित जगेलही असा धागा, कोणी सांगावं?
तर बडीशेप!!! Proud Proud इतक्या बारक्या गोष्टींचे ज्या दिवसात ५-१० ग्रॅम खातो, आणि ज्या एडिबल आहेत, त्यांचा दृष्य स्वरुपात काही दुष्परिणाम दिसला नाही तर जे आवडतं, सोपं आहे, वेळेला उपलब्ध आहे ते करावे. मला कुडुमकुडुम भाजलेली बडीशेप आवडते, तो भाजलेला गंध, स्वाद आवडतो. त्यात किंचित मीठ असलं तर फारच उत्तम. पण म्हणून भाजलेली संपली आणि खाविशी वाटली तर भाजायचे श्रम करायचे का संपलेली माहित असल्याने उठायचेही श्रम करायचे नाहीत, का उठायचे श्रम तर केले आता ते उठायचे श्रम सत्कारणी लावायला कच्ची खायची यातलं सगळं आलटून पालटून करतो. या धाग्याचे मिषे | #बडिशेपसेवनसवये | ब्रेनस्ट्रॉर्म होतसे!
ता.क. : हा हॅश टॅग प्रकार भारतीय संस्कृतीत पूर्वापार होता असे आमच्या आत्ताच लक्षात आले आहे. संस्कृते त्यासी संधी असे म्हणती. पण हल्ली संधीसाधू बोकाळल्याने त्या संधीसी टॅग लावुनी त्यांनी स्वत:चे हसू करुन घेतले आहे. एतः हसूटॅग: पक्षि #हॅशटॅगपुराण समाप्तः! ॐ शांती ॐ. शांती शांती ॐ. ॐ SSSS शांती ॐ शांती शांती ॐ!

अमितव #हॅशटॅग #एकनंबर Happy

“ मांस सोडून” - मांसाचा जो भाग हवेच्या संपर्कात येतो तोच शिजवणं गरजेचं असतं (बॅक्टेरिया संसर्ग). बाकी चव, टेक्श्चर ही कारणं वेगळी. ‘रेअर मीट‘ आवडीनं खाणार्यांची संख्या कमी नाही.

मी आणि माझा मित्र कॉफी प्यायला गेलो तर आवर्जून कडक कॉफी आणि आजिबात साखर नको असे सांगतो
आणि ती कडू कॉफी प्यायल्यावर बिलासोबत येते ती साखरगुंठीत पांढरी बडीशेप खातो
हे पाहून वेटर आम्हाला एक दिवस ती बडीशेप कॉफी मध्ये घालून देणार आहे असा संशय आहे Happy

अय्यो मी पण हाटेलातली ती कच्ची शोप व खडी साखर दोन चमचे घेते बाकी काही सवय नाही. मला एक प्रश्न आहे की खाकर्‍याबरोबर काय खातात?

बजरंग लेप कपाळावर लावता येईल का? 15 दिवसापूर्वी कपाळ आदळून सूज आली होती. आता सूज नाहीये पण गाठ सारखं झालंय जरा. Heparin cream try करून झालिये.

गुज्जू लोक आहेत म्हणजे 'कढी-चटनी' खात असतील. इकडे फाफडा, ड्राय पात्रा (अळूवडी) च्या पाकिटात कढी०चटनी म्हणून एका पिशवीत डाळीचं पीठ+सीझनिंग येतं. ते गरम उकळत्या पाण्यात कालवून खायचं असतं. बरं लागतं.

भाई आय लिव्ह इन गुज्जु हेवन ओन्ली इथे दग्ड फेकला तरी कोण्त्यातरी जय जलाराम स्वीट फरसाण ला लागतोय. व ते पात्रा खमण फाफडा ढोकला टनानी रोज विकते आहे. पण काय आहे परवा घी सधा खाकरा आणला. तो चहा बरोबर खाल्ला पण नो व्हॅल्यु अ‍ॅडिशन. कढी चटणी करके देखतुं. टू मच एफर्टिंग.

एक तुकडा नटेला मध्ये बुडवून खाल्ला.

मला एक प्रश्न आहे की खाकर्‍याबरोबर काय खातात? >> ज्येना दीपच्या खाकर्‍याबरोबर एक मसाल्याचे पाकीट मिळते तो मसाला , कोरड्या चटण्या, सँडविच मसाला इ खातात .
चिल्लर नागरिक फुरिकाके / पोकी काके असे जपानी / कोरियन स्प्रिंकलिंग पदार्थ पण खाकरा / मॅगी बरोबर आवडीने खातात

नुसता चाट मसाला भुरभुरवूनही चांगला लागतो खाखर्‍यावर.
किंवा खाखरा चुरून त्यात कांदाकोथिंबीर आणि चाट मसाला घालून.

अमित Lol

Pages