Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खाकरा , शेंगदाण्याची चटणीत
खाकरा , शेंगदाण्याची चटणीत थोड तु किंवा तेल घालुन त्याबरोबर खाताना बघितलयं.
वाहता धागा केला तर बरं होईल. कदाचीत टिकेल.
वाहता धागा केला तर बरं होईल.
वाहता धागा केला तर बरं होईल. कदाचीत टिकेल. >> +१
मौल्यवान प्रतिसाद गळून जातात
मौल्यवान प्रतिसाद गळून जातात पण अशाने
आणि नंतर येणाऱ्यांना काहिही बोध होत नाही
खाकऱयावर तेलात थोडं लाल तिखट
खाकऱयावर तेलात थोडं लाल तिखट आणि मीठ घातलेली पेस्ट चोळायची, नावाला चाट मसाला भुरभुरायचा.. प्रत्येक घासानंतर एक घोट चहाचा घेत खाकरा खायचा
धागा वाचला तर बोध पचास ना!
धागा वाचला तर बोध पचास ना!
सगळ्या पोस्ट्स सेव्ह केल्या
सगळ्या पोस्ट्स सेव्ह केल्या तर त्यापैकी मौल्यवान तशाही 'नीडल इन द हे स्टॅक' असतील
खाक्र्यावर आलं चींचेची लाल
खाक्र्यावर आलं चींचेची लाल चटणी आणि कोथिंबीर पुदिना चटणी लावून घ्यायची. त्यावर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायची, मसाला पापडवर टाकतात त्या प्रमाणे. त्यात लसणाची चटणी ही घालता येईल.
तेवढं खाखरा करता का प्लीज.
सर्वच- तेवढं खाखरा करता का प्लीज. गुजराथीत असं लिहीतात ખાખરા (दोन्ही ख आहेत). मराठीत "खाकरा" क्रियापद आहे.
(क चा ख ह्याला नीडलपद द्या हो! )
धन्यवाद, माझ्या पोस्टमध्ये
धन्यवाद, माझ्या पोस्टमध्ये बदललं.
(
बाकी नीडलपद देणारी मी कोण! )नीडल इन द हे स्टॅक' >>
नीडल इन द हे स्टॅक' >>
कारण मायबोलीकर कुठलाही प्रश्न किरकोळ घेत नाहीत
हे म्हणजे म्युनिक नको मुंशेन
हे म्हणजे म्युनिक नको मुंशेन करा सारखं झालं.
आता ते जर्मन India ला Indien म्हणतात आणि लिहितात.
कोण कोणाला सांगत बसायचं आपण?
नीडल इन द (हे) स्टार्क!
नीडल इन द (हे) स्टार्क!
प्रश्न असतील तर ते बोल्ड करून
प्रश्न असतील तर ते बोल्ड करून प्रतिसाद लिहिल्यास बरे होईल. नंतर जे कोणी वाचतील त्यांना प्रश्न दिसणे महत्वाचे.
मौल्यवान प्रतिसाद गळून जातात
मौल्यवान प्रतिसाद गळून जातात पण अशाने
आणि नंतर येणाऱ्यांना काहिही बोध होत नाही>> परत विचारतील त्यांना तोच प्रश्न असेल तर. माहिती सेव्ह करण्यासाठी नाही करायचा ह्या धाग्याचा उपयोग.
सर्वच- तेवढं खाखरा करता का
सर्वच- तेवढं खाखरा करता का प्लीज. >>>> अॅकचुअली... +७८६
हे खाकरा म्हणजे हे बघा गूगलवर काय मिळाले.
घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
ख ख खाकरा from epiglottis
आणि यासोबत काय खावे लोकं विचारत आहेत. कमाल आहे बाई.
खाखरा एकेक तुकडा तोडून तो
खाखरा एकेक तुकडा तोडून तो दह्यात बुडवून खायला छान लागतो.
अरे कोणीतरी त्या बजरंग लेपाची
अरे कोणीतरी त्या बजरंग लेपाची पण पोस्ट/प्रश्न वाचा. नंतर लगेच खाण्याबद्दलची पोस्ट आल्यामुळे सगळे त्याच दिशेने गेलेले दिसतात
किती खिरखिर करताय! पुढचा
किती खिरखिर करताय! पुढचा प्रश्न येउंद्यात.
तुम्ही जेंव्हा एखाद्या
तुम्ही जेंव्हा एखाद्या प्रसंगी ' कळतंय पण वळत नाहीये ' मोड मध्ये जाता, तेंव्हा त्यातून कसे बाहेर पडता ? काही नेहेमीचे यशस्वी उपाय असतील तर ऐकायला आवडेल
तुम्ही जेंव्हा एखाद्या
तुम्ही जेंव्हा एखाद्या प्रसंगी ' कळतंय पण वळत नाहीये ' मोड मध्ये जाता, तेंव्हा त्यातून कसे बाहेर पडता>>>>
तुम्हाला बाहेर पडायचे नसतेच.. बाकिच्यानी कसे स्क्रोल डाउन करायचे, इग्नोरास्त्र मारायचे, धागे टाळायचे यासाठी सल्ले मागा….
नवीन शहरात पत्ता माहीत नसतो
नवीन शहरात पत्ता माहीत नसतो.आता google मॅप आहे पहिला तो पण नव्हता तेव्हा इच्छित जागेवर पोचण्यासाठी पत्ता विचारावा लागे.
तेव्हा सांगणाऱ्या व्यक्ती वर किती विश्वास ठेवावा ही समस्या उभी राहत असे .
तेव्हा अनेक जणांना पत्ता विचारून बहुमत च्या बाजूने निर्णय घेण्याचा प्रकार मी तरी करत असे.
चुकीचा पत्ता सांगणाऱ्या लोकांचा अनुभव कोणी घेतला आहे का.
<<>चुकीचा पत्ता सांगणाऱ्या
<<>चुकीचा पत्ता सांगणाऱ्या लोकांचा अनुभव कोणी घेतला आहे का.>>>
लोकांचा नाही पण गुगल मॅचचा खूप वेळा घेतला आहे.
चांगला सुबक आणि कायदेशीर जवळचा रस्ता असून सुद्धा मला 3-4 किमी जास्त फिरवून आणायला गूगल ला गंमत वाटत असावी.
सरळ मायबोलीवर धागा काढावा
सरळ मायबोलीवर धागा काढावा पत्ता विचारायला. ते विश्वासार्ह!
गुगल मॅप खरेच बेभरवशाचा आहे
गुगल मॅप खरेच बेभरवशाचा आहे
मी एकदा कोविड लस साठी हॉस्पिटल शोधायचा प्रयत्न केला मॅप लावून
फिरवून फिरवुन गुगल ने मला एका शेतात आणून सोडले
आणि you have arrived your destination असे जाहीर पण केलं
खरेच
खरेच
चांगल्या डेस्टिनेशन सोडले तुम्हाला
Paid Google map
Paid Google map
Paid step counter pedometer
Gaana.
अशी अनेक ॲप फ्री आणि विकत दोन्ही प्रकारची आहेत.
जेव्हा पासून पैसे घेवुन सुविधा विकणे सुरू झाले तेव्हा पासून फ्री वाले ॲप चुका करायला लागलेत.
Pedometer तर अर्धा तास चालून पण पाचच मिनिट दाखवते आणि अंतर 800 मीटर.
मी गुगलबाईवर विश्वास ठेऊन
मी गुगलबाईवर विश्वास ठेऊन निर्धास्त प्रवास केलेला आहे. कधितरी चुकलेही पण ती माझी नकाशावाचनाची चुक होती. फक्त एकदाच गुगलबाईने चुक केलेली पण तेव्हा तो रस्ता आठ दिवसांपुर्वी बंद केला होता, जे गुगलला कळले नाही. तेव्हाही तिथुन बाहेर पडायला गुगल बाईनेच मदत केली. रस्त्याची कामे सुरु असताना गुगल चुकते हा अनुभव घेतला आहे.
रस्त्याची कामे सुरु असताना
रस्त्याची कामे सुरु असताना गुगल चुकते हा अनुभव घेतला आहे.>>>> +११
काही त्रुटी असतात गुगल मॅप
काही त्रुटी असतात गुगल मॅप मध्ये.
आमची इमारत आमच्या गल्लीत मध्ये आहे ती गुगल मॅप रस्त्याच्या एका टोकाला दाखवते.
ती दुरुस्ती करण्यास मी स्वतः आणि इमारतीतील दोघांना सांगून गुगल मॅपला दोनदा विनंती केली. त्यासाठी तसे फोटोसुद्धा अपलोड केले सोबत. पण दोन्ही वेळेस त्यांनी आमची विनंती विश्वासार्ह वाटत नाही म्हणून फेटाळून लावली.
पण एकंदरीत ९५% वेळेस गुगल मॅप बरोबर जागी आणि योग्य त्या रस्त्याने घेऊन जातो असा अनुभव आहे.
रस्ता माहीत नसेल तेंव्हा अथवा
रस्ता माहीत नसेल तेंव्हा अथवा रस्ता माहीत आहे पण ट्रॅफिक कंडीशन माहीत नाही अशा दोन्ही प्रसंगी बहुतांश वेळा गुगल नेव्हीगेशन वापरलेय आणि खूपच छान अनुभव आहे. फार क्वचित (एकदोनच) चुकल्याचे अनुभव आहेत. पण गुगल जेंव्हा चुकते तेंव्हा जबरी चुकते, किरकोळ नाही पुण्यात पासपोर्ट ऑफिस सतत बदलत असे. पूर्वी से.बा. रोड वर होते. तिथून कुठेतरी गेले, मग तिथून परत कुठेतरी गेले. (आता तरी कुठे स्थिर झालेय का अजून बदलत आहेत कल्पना नाही) अशा वेळी गुगल तरी काय करेल. नेऊन सोडले एकदा मला कुठल्याशा गल्लीत आणि "You have arrived!" असे ठिकाण कि दूरदूर हून त्याचा आणि पासपोर्ट चा काही संबंध असण्याची शक्यता नव्हती. "इथे पासपोर्ट ऑफिस कुठे?" असे तिथे कुणाला विचारायची सुध्दा लाज वाटत होती. "काय थोडी टाकून आलाय का भाऊ?" असे उत्तर आले असते
अखेर मीच गुगल वर करेक्शन केले परत घरी आल्यावर.
Pages