Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे काय नवीन? हे कुठे कुठे
हे काय नवीन? हे कुठे कुठे लागू होणार?
Dear Customer, starting 20-Oct-22, all transactions on your ICICI Bank Credit Card towards rent payment will be charged a 1% fee.
आताचा सर्वात ज्वलंत प्रश्न
आताचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे.
टीव्ही,जाहिराती ,विविध समाज माध्यम वर व्यक्त होणारे विचार ह्या मुळे समाज स्वस्थ बिघडले आहे
व्यक्ती स्वतंत्र लं वेगळेच रूप दिले आहे,स्त्री पुरुष भेद मिटण्या ऐवजी जास्त वाढत आहे.
आई वडील आणि बायको ह्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे पुरुषांना कठीण जात आहे.
ज्यांनी पायावर उभे केले .लाखो रुपये खर्च करून शिक्षण दिले ते आई वडील आणि व्यक्ती स्वतंत्र,स्त्री मुक्ती ह्या अंध श्रद्धा मध्ये अडकलेल्या आजच्या स्त्रियां
ह्या मुळे अनेक कुटुंब दुःखी आहेत.
पुरुष आई आणि बायको ह्या दोन्ही स्त्रियांची मन राखणे आणि त्यांना सुखी ठेवणे ह्या साठी कसरत करत आहे
घ्या!
घ्या!
प्रश्नच विचारले नाहीत तुम्ही कोणी. तरी आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली. मजा करा लोकहो!
अरे देवा.. गमतीतच लिहिलंय..
अरे देवा..
गमतीतच लिहिलंय..
लहान मुलांना फटके मारावेत का
लहान मुलांना फटके मारावेत का?
https://www.maayboli.com/node/82469
लहानपणीच दिले असते फटके तर आज
लहानपणीच दिले असते फटके तर आज हे असं झालं नसतं आणि लोकांना त्रास सहन करावा लागला नसता
लहानपणीच दिले असते फटके तर आज
लहानपणीच दिले असते फटके तर आज हे असं झालं नसतं आणि लोकांना त्रास सहन करावा लागला नसता >> सहमत...
गणेशोत्सव संपला आणि आता परत फालतू धागे , तेच ते प्रतिसाद आणि जिथे तिथे धिंगाणा सुरू झाला
तरी सुद्धा गणेशोत्सवात एकंदर माबोवर शांतता ठेवल्याबद्दल मंडळ आभारी आहे
अरे देवा. एका नविन धाग्याला
अरे देवा. एका नविन धाग्याला हातभार लावला मी. आशुचँप, सॉरी.
त्या गुगलबायवर माझा अजिबात
त्या गुगलबायवर माझा अजिबात विश्वास नाहीये आणि नवऱ्याचा आणि भावाचा फार विश्वास आहे आणि ती नेहेमी उल्लू बनवते, घुमव घुमव घुमवते.
सोनू तुझा गूगल मॅप वर भरोसा
सोनू तुझा गूगल मॅप वर भरोसा नाय का ! नाय का !!
गुग्गल मॅप फिरवते आम्हाला गोल गोल ! गोल गोल !
फिरून फिरून झाला तोंडपाठ आमचा भूगोल ! भूगोल !!
तरी दिशा चूकते.. ठिकाण चूकते गूगल आमचा घोळ करते !
सोनू तुझा गूगल मॅप वर भरोसा नाय का ! नाय का !!
एकदम मस्त
एकदम मस्त
अज्नानी,
अज्नानी,
गुगल मॅप एकदा गोदावरीच्या
गुगल मॅप एकदा गोदावरीच्या भरलेल्या पात्रात घुसण्यास सांगत होतं.
वैकुंठ नगर, असा काही पत्ता
वैकुंठ नगर, असा काही पत्ता टाकला होता का मॅप मध्ये?
भर सोमवारी सकाळी मालाडच्या
भर सोमवारी सकाळी मालाडच्या सोमवार बाजारात आम्हाला गुगल मॅपने नेले होते.
नवख्या एरीआत विशेषतः भारतात ग्रामिण, डोंगराळ एरीआत लोकल लोकांशी बोलून घेणे मी प्रिफर करते.
नाविक डालो करावं का? कुणी वापरतं का भारतात?
वैकुंठ नगर, असा काही पत्ता
वैकुंठ नगर, असा काही पत्ता टाकला होता का मॅप मध्ये?>>>
नाही, पत्ता बरोबर होता पण पुल अस्तित्वात नव्हता.
विशेषतः भारतात ग्रामिण, डोंगराळ एरीआत लोकल लोकांशी बोलून घेणे मी प्रिफर करते.>>> +१
यावर्षी जून मध्ये गूगल मॅप
यावर्षी जून मध्ये गूगल मॅप ने गोव्यात मंदिराऐवजी कुठल्या तरी डोंगराळ भागात सोडले - मंदिर भलतीकडेच होते, लोकल लोकांनी बरोबर दाखवले! मुंबईत व परदेशी ( मुख्य शहरात) कधी गूगल मॅप ने दगा दिला नव्हता त्यामुळे चांगले लक्षात आहे
अज्ञानी मस्त कविता.
अज्ञानी मस्त कविता.
लोकल लोकांशी बोलून घेणे मी प्रिफर करते. >>> सगळीकडेच तसं करणे योग्य वाटतं मला.
टिटवाळ्याला डोंबिवलीहून कितीदा तरी गेलोय, गुगल मॅप हवा कशाला, बरं माहिती असून ती सांगते तिथेच वळायचे का मग पचका होतो. नवरा भाऊ दोघेही होते.
एकदा नवरा नव्हता बरोबर, भाऊ गाडी चालवत होता, ठाण्यात जात होतो, कळव्याला डेड एंडला नेले तिने, समोर मैदान मग लोकाना विचारलं तर जरा वळून डावीकडून गाडी काढा सांगितलं, कसला चढ होता तिथे मेन रस्त्याला लागण्यासाठी, नशीब भावाने झटकन चढवली गाडी आणि लागलो नीट रस्त्याला.
कोणाकडून मदत घेण्यात मलाही
कोणाकडून मदत घेण्यात मलाही अगदी कमीपणा वाटतो. नाही सापडलं म्हणून हात हलवत परत येईन पण कोणाला विचारणार नाही. मग तो पत्ता असेल स्टोअर मधली कुठली वस्तू असेल. गूगल करुन, त्या स्टोरच्या वेबसाईट वर जाऊन चित्र बघून, कुठल्या आएल मध्ये असेल ते बघून अगदी जीव गेला की मग कुणाला विचारायचं. तोवर नाही. परवा जॅपनीज अक्षरांची चित्र कॅमेरात बघुन भाषांतरीत करत होतो तर एकाने दया येऊन आपणहुन मदत केलीन.
मला गूगल मॅपचा त्रास नाही
मला गूगल मॅपचा त्रास नाही वाटत फार.. ॲपल मॅप जास्त त्रास देतो.. पण तरीही मी अधूनमधून वापरते .. वापर वाढला तरच ॲपमधे सुधारणा होतील असं वाटतं
अॅपल मॅप अनॉईंग आहे. त्यातलं
अॅपल मॅप अनॉईंग आहे. त्यातलं फक्त हा लाईट सोडून मग पुढच्या लाईटला टर्न घ्या फीचर आवडते. डाऊनटाऊन मध्ये लाईट्स जवळजवळ असले की चित्रात दोन सिग्नल दिसले की दुसर्याला वळायचं यात चूक होत नाही. गूगलच्या ३०० मीटरवर वळा मध्ये हा का पुढचा यामध्ये गोंधळ होतो कधीकधी. बाकी रंगसंगती, आपण बोललेलं पहिल्या फटक्यात समजणे, इंट्युटिव्हनेस यात अॅपल मॅप भोपळा आहे. मी गूगल वापरतो.
गूगल मॅपचं पूर्ण भरोसा टाकून
गूगल मॅपचं पूर्ण भरोसा टाकून ऐकल्यावर नेहमीच पुण्यातून डोंबिवली येताना पनवेल सर्कलला गूगल बाई डावीकड़े वळायला लावून कळंबोलीमध्ये जबरदस्ती फेरफटका मारायला भाग पाडायची. असे २दा झाल्यावर मग सरळ जे एन पी टी च्या ट्रक/ ट्रेलरची शेपुट पकडून जाणे रास्त वाटू लागले.
थोडक्यात सांगायचे तर पूर्ण विसंबुन राहिल्यास कमी अंतरावरच्या शार्प टर्न / यु टर्नला दुरुनच राज्य परिवहनाचे बोर्ड वाचून आपापला निर्णय घ्यावा आणि अश्या मोक्याच्या क्षणी गूगल बाईना म्यूट करावे हे श्रेयस्कर.
मी तर माहित असलेल्या
मी तर माहित असलेल्या रस्त्यावरही कार प्ले मध्ये गूगल मॅप टाकतो... पुढे ट्रॅफिक असेल तर आधीच कळते आणि दुसरा रस्ता घ्यायला मदत होते....
इथे साधी रिक्षा केली ( म्हणजे
इथे साधी रिक्षा केली ( म्हणजे ओला / उंबर मधून नव्हे) रिक्षा वाला पण विचारतो मॅप है ना.
अरे पण प्रश्न काय होता? दोन
अरे पण प्रश्न काय होता? दोन तीन पाने मागे जाऊन सुद्धा कळलं नाही की हे गूगलचं काय मध्येच सुरू झालं.
धाग्याचे नाव बदलून 'अस्ताव्यस्त गप्पा' करा
आजचा प्रश्न : टर्किश टावेल
आजचा प्रश्न : टर्किश टावेल वापरावा की सुती पंचा?
अंग किती खसखसून पुसलेलं आवडतं
अंग किती खसखसून पुसलेलं आवडतं त्यावर अवलंबून आहे. आणि कपडे उन्हात वाळत टाकायला जागा आहे का त्यावरही. हेमावैम
केस आणि चेहरा पुसायला पंचा ,
केस आणि चेहरा पुसायला पंचा , अंग पुसायला टर्किश टावेल
मिनीमलिस्ट शैली वाल्यांसाठी
मिनीमलिस्ट शैली वाल्यांसाठी पंचा आणि सामान्य शैलीवाल्यांसाठी टर्किश..
.
.
.
असं काही नाही.
उन्हाळ्यात पंचा, पावसाळ्यात लौकर वाळतो म्हणून पंचा, हिवाळ्यात टर्किश.
जॅपनीज अक्षरांची चित्र
जॅपनीज अक्षरांची चित्र कॅमेरात बघुन भाषांतरीत करत होतो तर एकाने दया येऊन आपणहुन मदत केलीन.>>> अमितव
माझा नवरा कायम मला पुढे करतो काहिही माहिती विचारायची असल्यास. दुकान असो, रस्ता असो.
माझा किरकोळ प्रश्नः dyaneshwar चा dnya कसा लिहितात?
Pages