Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन फोटोतील व्यक्तींनी
दोन फोटोतील व्यक्तींनी एकमेकांना मिठी मारण्याचा व्हिडिओ AI च्या मदतीने बनवायचा असेल तर एखादे फ्री ऍप आहे का?
Pixverse AI म्हणून एक आहे असे कळले आणि त्यात २ फोटोज् feed करून ट्राय केले. पण ते हवे तसे झालेच नाही. एका माणसाच्या शरीरातून दुसरा माणूस प्रकट होत होता आणि मग त्याला मिठी मारत होता.
हे हिरण्यकश्यपू स्टोरीचे AI वर्जन ट्रायल एरर करतानाच ते "तुमचे क्रेडिट संपले. आता पैसे देऊन ऍप विकत घ्या" असे सांगू लागले.
अजून कोणते फ्री ऍप आहे का?
एका माणसाच्या शरीरातून दुसरा
एका माणसाच्या शरीरातून दुसरा माणूस प्रकट होत होता आणि मग त्याला मिठी मारत होता >>> बापरे! हॉरर रील्स बनवायचं अॅप आहे का?
नाही ग !! पण AI ला नीट prompt
नाही ग !! पण AI ला नीट prompt कळला नाही तर अशा गमती होतात हे ठाऊक आहे. म्हणूनच तर ट्रायल एरर बऱ्याच वेळा करावं लागतं. फक्त ३ किंवा ४ ट्रायल फ्री देणारे AI उपयोगाचेच नाही.
चांदीची नाणी भेfunction at()
चांदीची नाणी भेfunction at() {
[native code]
}ट म्हणुन मिळाल्यावर त्यांचे काय करायचे असते? माझ्याकडे पडुन आहेत. ती आता कोणी कोणी दिलीत ते आठवतही नाही.
विकून सराफाकडून पैसे घेऊ शकता
विकून सराफाकडून पैसे घेऊ शकता ..छोटे सराफ घेतात नाणी..
मोड देऊन एखादी मोठी वस्तू
मोड देऊन एखादी मोठी वस्तू घ्या
मिळाल्यावर त्यांचे काय करायचे
मिळाल्यावर त्यांचे काय करायचे असते? माझ्याकडे पडुन आहेत...... पुढच्या पिढीसाठी लॉकर मध्ये ठेऊन दे.नाहीतर माझेमनne सांगितल्याप्रमाणे कर.
मी रोज पाव टीस्पून औषधी पूड
मी रोज पाव टीस्पून औषधी पूड ग्लासभर पाण्यात मिसळून रोज घेतो. इतके दिवस / महिने ग्लासात पाणी ओतून त्यात ती पूड घालून घ्यायचो. आधी चमचा , मग त्याने गुठळ्या मोडत नाहीत, म्हणून काट्याने ढवळून घेत होतो. तरीही कुठे ना कुठे गुठळी राहायचीच. ती फोडली की तिच्या आतली पूड अगदी कोरडी दिसे. अर्थात त्या पुडीतले सगळेच पदार्थ पाण्यात विरघळणारे नाहीत. ग्लासात पाणी दोन तृतीयांश भरून ढवळलं की , पाणी बाहेर उडायचा धोका कमी झाल्याने जोरात ढवळता येतं हे कळलं. पर्सनल ब्लेंडरमधून फिरवलं तर फेस येतो, म्हणून ते नको वाटलं.
आज असंच डोक्यात आलं म्हणून आधी ग्लासात पूड घातली आणि वरून पाणी ओतलं, आणि ढवळलं. तर फार कमी गुठळ्या झाल्या आणि त्या चटकन विरल्या.
यामागचं विज्ञान काय असेल?
असं आणखी कुठे करता येईल? ताक+ बेसन कढी करताना ? कणीक मळतानाही आपण असंच करतो - पिठावर पाणी घालतो ; पण इथे पाण्याचं प्रमाण कमी असतं.
फार विचार न करता लिहितोय ...
फार विचार न करता लिहितोय ... पण सर्फेस टेन्शन शी निगडीत काही असावं.
दह्याचे ताक करताना आधी ग्लासात दही घेऊन त्यात थोडं पाणी घालून मिश्रण चमच्याने ढवळून एका कन्सिस्टन्सी चे/ एकजीव करत करत पाण्याचं प्रमाण वाढवत राहिलं तर अजिबात गुठळी होत नाही. तेच ढोपरभर पाण्यात चार चमचे दही घातलं की काय वाट्टेल ते करा एकजीव मिश्रण सहजी बनत नाही. नुसत्या चमच्याने ढवळून तर नाहीच.
हं. बरोबर. एखाद्या पदार्थात
हं. बरोबर. एखाद्या पदार्थात कॉर्नफ्लोअर घालायचं असेल तर ते सगळ्या पदार्थात एकदम न घालता थोड्या दुधात / पाण्यात मिसळून गुठळ्या मोडून मग सगळ्या पदार्थात घालतात. व्हाइट सॉसचं उदाहरण आठवलं.
छान प्रश्न आहे. कोरावर ह्यावर
छान प्रश्न आहे. कोरावर ह्यावर चर्चा सापडली.
सावळा गोंधळ का म्हणतात. गोरा
सावळा गोंधळ का म्हणतात. गोरा गोंधळ का म्हणत नाहीत?
न विरघळणारी आणि पाण्यापेक्षा
न विरघळणारी आणि पाण्यापेक्षा हलकी पावडर असेल ( कोरडी वर तरंगणारी, भिजली तर खाली जाणारी) तर पावडर वर पाणी वरुन ओतले तर ओतण्याच्या क्रिये मुळे सुरवतीला ढवळल्या सारखे होउन पावडर थोडी मिक्स होइल, आणि कोरडी पावडर वर येत असताना ओली होऊन् मिक्स व्हायला मदत होत असावी. जर पावडरवर थोडेसेच पाणी घातले तर चमच्याने नीट मिक्स करुन पूर्ण ओली करता येते. मग हवं तेवढं पाणी घालुन जरा ढवळलं की झालं.
सावळा गोंधळ का म्हणतात. गोरा
सावळा गोंधळ का म्हणतात. गोरा गोंधळ का म्हणत नाहीत? Happy > थोड्या वेळाने सांगतो.
दोन अर्थ आहेत.
दोन अर्थ आहेत.
१ काही घराण्यात लग्न कार्य झाले की तुळजा भवानीचा "गोंधळ" घातला जातो. मी नुकताच एक गोंधळ बघितला. तो विनोदांनी खच्चून भरलेला होता. पण पारंपारिक गोंधळात मुरळ्या म्हणजे देवदासी येऊन गाणी गातात. जर ह्या देवदासी "शीलवान" नसतील तर तो सावळा "गोंधळ." असे वि का राजवाडे सांगतात. कृपया मी काय म्हणतो ते समजून घ्या.
२ हा मला जास्त सयुक्तिक वाटतो. सावळा म्हणजे ना पांढरा ना काळा म्हणजे करडा GRAY. म्हणजे ज्या वादावादीत प्रश्नाची काही तड निघत नाही तो सावळा "गोंधळ." हे मत वा. गो. आपटे "आनंद" मासिक ह्यांचे आहे.
ज्या वादावादीत प्रश्नाची काही
ज्या वादावादीत प्रश्नाची काही तड निघत नाही तो सावळा "गोंधळ." >> थोडक्यात मायबोलीवरची वादावादी.
उबो!
उबो!
त्यांचा प्रश्न वेगळा आहे.
त्यांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांना सावळा गोंधळ म्हणजे नेमके काय माहित आहे. पण त्याला सावळा हेच नाव का?
सावळा शब्दाचा वर्णाव्यतिरीक्त दुसरा अर्थ आहे का?
बरोब्बर, मानव.
बरोब्बर, मानव.
त्याचंच तर उत्तर दिलं आहे ना
त्याचंच तर उत्तर दिलं आहे ना केकूंनी?
मानव
मानव
मला वाटतंय की त्यांना असे म्हणायचे आहे की जसा सावळा गोंधळ असतो तसा गोरा गोंधळ असतो का?
कुठल्या गोंधळाला आपण गोरा गोंधळ म्हणावे?
किंवा सावळ्या गोंधळाला सावळा गोंधळच का म्हणतात? गोरा गोंधळ का नाही म्हणत? जर हा प्रश्न असेल तर मला वाटतंय की आपटेंनी त्याचे उत्तर दिले आहे.
Anyway सावळा गोंधळ ह्या वाक्सम्प्रदायाचे मला एव्हढेच clarification माहित आहे.
शिवाय मराठी बृहद कोश मधली ही एन्ट्री बघा
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%...
मला वाटते आपटे यांनी एखाद्य
मला वाटते आपटे यांनी एखाद्य वादावादीला गोंधळ का म्हणतात ते सांगितले आहे. ज्या वादावादीत प्रश्नांची तड निघत असेल त्यालाही गोंधळ म्हणणार का? त्यात ना पांढरा ना काळा म्हणजे पांढरा गोंधळ, काळा गोंधळ असे वापरात आहे, तड निघत नाही त्यात दोन्ही नसल्याने सावळा असा अर्थ काढला असे वाटते तो मला पटला नाही.
सावळा गोंधळ ही टर्म मुळात देवापुढे घातलेल्या एक प्रकारच्या गोंधळाला आधी पासून अस्तित्वात असावी आणि त्यावरून जिथे तड निघत नाही वगैरेला ती वापरत असावेत.
त्यामुळे तुम्ही दिलेला पहिला राजवाडेंचा अर्थ अधिक संयुक्तिक वाटतो.
पण त्यातही सावळा म्हणजे वर्णाच्या उपमेने हलका असे दिसते.
मोल्सवर्थचा अर्थ मला त्याहुन संयुक्तिक वाटला.
"सावळा गोंधळ sāvaḷā gōndhaḷa m (सावलें Poor and mean लुगडें & गोंधळ; or see derivation under the next.) A shabby and make-shift गोंधळ q. v.; a गोंधळ performed in poor or the ordinary attire. 2 See सावळेंगोंधळें."
सांवळे/ले चा अर्थ स्त्रीचे लुगडे, वस्त्र. (पक्षी साधे वस्त्र?)
हे कोरा वरून:
"गोंधळांत गोंधळी खास पारंपरिक वेषभूषा करतात. लांब भरजरी पायघोळ अंगरखा, उपरणे, पगडी, दिवटी, बुधली असा जामानिमा असतो. त्याऐवजी साधे नित्याचेच कपडे घालणे किंवा जुने फाटके कपडे घालणे गोंधळांस साजेसे नाही. "पूर्वी गोंधळ्यांच्या अंगांत मलमलीचे अंगरखे, गळ्यात कवड्यांच्या माळा व डोक्यावर कंगणीदार पगड्या असत." असे नसेल तर हा सावळा गोंधळ होतो.
साधे सांवळे घालुन कसाबसा केलेला (हलक्या प्रतीचा) गोंधळ, (याने कार्यसिद्धी होणार नाही.) असा याचा अर्थ लागतोय.
मी सर्व संदर्भ दिले आहेत.
मी सर्व संदर्भ दिले आहेत.
पण वर्तमान पत्रात सावळा गोंधळ हे श्री आपटे यांनी दिल्या प्रमाणे वापरले जाते.
संसदेत सावळा गोंधळ हे एक उदाहरण.
मानव, न विरघळणारी आणि
मानव, न विरघळणारी आणि पाण्यापेक्षा हलकी पावडर हे बरोबर.
---
सांवळा गोंधळ-पु. १ हलक्या प्रकारचा गोंधळ; तमाशा. (सं. शांभलिकः गौन्दळः-राजवाडे). २ सावपणाच्या पांघरुणा- खालीं चाललेला अनिष्ट प्रकार; गुप्त अनाचार; व्यभिचार - यशवंत रामचंद्र दाते
आपट्यांच्या शब्दरत्नाकरातही दुसरा अर्थ दिला आहे.
त्यातच सावळ गोंदे म्हणजे अव्यवस्थेनंतर कसेतरी करून एकदाची पुनः व्य वस्था स्थापित करणे ; एखाद्या निर्णयाची संदिग्धता.
आता सावळा म्हणजे धड गोरा नाही, की काळा नाही. म्हणून संदिग्धसाठी सावळा.
तसंच कृष्णकृत्य - काळं ते वाईट म्हणून सावळा गोंधळ.
भरत, तुम्हाला बहुतेक ग्रे
भरत, तुम्हाला बहुतेक ग्रे म्हणायचे आहे!
एक जुने गाणे आहे, ' आई मला
एक जुने गाणे आहे, ' आई मला हवी'
You tube वर मागे एकदा मिळालेलं, पण आता नाही मिळत आहे.
कोणाला माहीत असेल तर लिंक द्या
किट्टू२१ - https://www
किट्टू२१ - https://www.youtube.com/watch?v=8OAM_hFWLhU
साधना सरगम यांनी गायलेलं
साधना सरगम यांनी गायलेलं गाणं आहे हे.
शमा खळे यांची बालगीते रेडिओवर प्रसिद्ध झाली त्याच काळातले.
https://youtu.be/qnwUejLwGvE?feature=shared
शरद जाम्भेकरांचे एक गाणे
शरद जाम्भेकरांचे एक गाणे आहे
माझी कोण गती सांगा पंढरीनाथा
कुणी लिंक द्याल का? माझ्या अजोबांंचे खूप आवडते होते
https://youtu.be/K26E5P3sSNA
https://youtu.be/K26E5P3sSNA?si=efzt9KMI-f4gsAjj
हे?
(कोणगतीचे कोंगाठी झालेय तिथे शीर्षकात)
Pages