फिल्मबाजी -भाग १ (फिल्म फोटोग्राफी - मॅक्रो लेन्स)

Submitted by manya on 11 September, 2022 - 15:11

कणेकरांची "माझी फिल्लमबाजी* परिचित आहेच, ह्या धाग्याच फक्त शीर्षक त्यावरून घेतल आहे, पण हा धागा फिल्म फोटोग्राफीशी (चित्रफित प्रकाशचित्रण) संबंधित आहे. सध्या मोबाईल कॅमेरा च्या युगात फिल्म फोटोग्राफी पुरातन काळातील गोष्ट वाटेल. पण माझ्या सारखे कूणी हौशी असतील, त्यांच्या कडे काही जुने/नवे फोटो, फिल्म कॅमेरा ने काढलेले असतील तर ती प्रदर्शित करता यावी तसच त्याबद्दल चर्चा व्हावी ह्या हेतूने हा धागा सुरु करत आहे.
ह्या भागात फिल्म कॅमेरा बरोबर मॅक्रो लेन्स वापरून काढलेली प्रकाशचित्र पोस्ट करत आहे.

माझी प्रकाशचित्रिकरणाची (photography - माझ्या माहितीत खर तर छायाचित्रण हा शब्द होता पण प्रकाशचित्रण अधिक योग्य वाटतो. असो. ) सुरुवात झाली ती kodak 35mm point and shoot film camera पासून. आधी घरच्या गणपतीचे फोटो नंतर कॉलेज पिकनिक चे. हे दोन kodak point n shoot 35 mm canera ने काढलेले
प्रचि -अ
Kodak_01-2.jpg
प्रचि -ब
Kodak_02-2.jpg

पण खरी सुरुवात झाली ती सिंगापूरला गेल्यावर. काही महिने बचत करून मी पाहिला SLR camera घेतला सिंगापूरला मुस्तफा मधून. अर्थात त्यावेळी DSLR यायचे होते. 24 किंवा 36 चा रोल संपवून तो प्रिंट होऊन आल्या शिवाय आपण काढलेला फोटो कसा आलाय हे कळायला मार्ग नव्हता, थोडस परीक्षे सारखं, एकदा पेपर हातातून गेला आणि क्लिक करून mirror बाजूला गेला की काय परिणाम होणार ह्याची वाट पाहण्या शिवाय पर्याय नव्हता. पेपर तपासणारा परिक्षक चांगला असेल तर चांगले मार्क मिळण्याची शक्यता जास्त, तसच रोल डेव्हलप करणारी लॅब चांगली असेल तर फोटो प्रिंट सुंदर येतिल अस वाटायच . पण खर तर पेपर लिहिताना केलेले प्रयत्न आणि फोटो घेताना केलेल कंपोझीशन हेच महत्वाच हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही .
मग आपण काही फार भारी प्रकाश (छाया) चित्रकार नाहीत हे ही कळून चुकल . पण एक हौस म्हणून बरेच फोटो काढले...ते अगदी माझे फोटो कुणा professional photographer ने काढे तोवर (म्हणजे माझ्या लग्नात, उगाच मी मॉडेल वैगरे झालो असा विचारही करू नका)
ते फोटो आता साधारण वीस वर्षांनी पुन्हा इथे पोस्ट करतोय
हे फोटो canon Eos Rebel ने 100 mm macro lens (एखाद दूसरा कदाचित 300mm zoom lens) ने काढलेले. तो camera, आणि lens अजूनही वापरात आहे पण हल्ली फिल्म प्रिंट करून घ्यायला कुठे जायचं हा विचार आधी करावा लागतो आणि मग हात DSLR वर जातो. पण DSLR च कौतुक हया धाग्यात नाही, इथे फक्त चालणार फिल्म्बाजी.
सध्या जरा 20 वर्ष मागे सिंगापूर च्या वनस्पती उद्यानात (botanical garden) मधे नेतोय पहा आवडत का.
प्रचि -०१
flower01.jpg
प्रचि -०२
flower02.jpg
प्रचि -०३
flower03.jpg
प्रचि -०४
flower04.jpg
प्रचि -०५
flower05.jpg
प्रचि -०६
flower06.jpg
प्रचि -०७
flower07.jpg
प्रचि -०८
flower08-1.jpg
प्रचि -०९
flower09.jpg
प्रचि -१०
flower10.jpg
प्रचि -११
flower11.jpg
प्रचि -१२
flower12.jpg
प्रचि -१३
flower13.jpg
प्रचि -१४
flower14.jpg
प्रचि -१५
flower15.jpg
प्रचि -१६
flower16.jpg
प्रचि -१७
flower17.jpg
प्रचि -१८
flower18.jpg
प्रचि -१९
flower19.jpg
प्रचि -२०
IMG_20220911_0001.jpg
प्रचि -२१
IMG_20220911_0002.jpg
प्रचि -२२
IMG_20220911_0003.jpg
प्रचि -२३
IMG_20220911_0004.jpg
प्रचि -२४
IMG_20220911_0005.jpg
प्रचि -२५
IMG_20220911_0006.jpg
प्रचि -२६
IMG_20220911_0007.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच फोटो अप्रतिम !
कणेकरांची " फिल्लमबाजी " होती, फिल्मबाजी नव्हे.

हो त्या काळी फिल्म क्याम्रे हे प्रगत समजले जायचे. पण उजेड आणि अंतर यात मार खाल्लेला. उजेड वाढवण्यासाठी flash टाकला तर फोटो धुतला जायचा. फुलांचे macro शक्य होते, पण फुलपाखरांचे शक्य नसत.

शरद
प्रचि - १५ आणि १६ हे मॅक्रो लेन्स ने काढले होते

त्यावेळी मी canon speedlight 540EZ वापरायचो, बऱ्याचदा auto mode मधे exposure, apperture व्यवस्थीत मिळायच, मग त्या नोंद करून तशाच प्रकारच्या फोटो साठी त्याच range मधे manual settings वापरून पाहिले, view finder मधला बार setting balance आहे का नाही हे दाखवतो, त्यानुसार काही प्रयोग करून पाहिले होते, अर्थात DSLR इतकं trial and error attempt करता येत नव्हते कारण रिझल्ट पटकन कळत नव्हते. पण तेवढं सोडलं तर थोड्याशा practice नंतर बरेच चांगले फोटो मिळाले, अगदी portrait सुद्धा १००mm मॅक्रो ने छान आलेत तेंव्हा.

सुंदरच फोटो.
फिल्म रोल वर फोटोग्राफी शिकणे आणि करणे हे वेळखाऊ, खर्चिक काम होत.
हॅट्स ऑफ तुमच्या जिद्दीला

धन्यवाद कुमार आणि झकासराव
मी फोटो काढायला सरूवात केली तेंव्हा डिजिटल हा पर्याय नव्हताच
तेंव्हा फोटोग्राफी एक व्यवसाय किंवा कला म्हणून जोपासता येत होती, माझ्या सारखे काही वेडे हौस म्हणून करत होते. जेंव्हा जरा परवडणारे SLR कॅमेरे बाजारात आले तेंव्हा आमच्या सारख्यांना मोठी संधी मिळाली
फिल्म फोटोग्राफी खर्चिक आणि वेळखाऊ होती अशा एकंदर प्रतिक्रिया दिसतात. ते साहजिक आहे.
हल्ली मोबाईल फोन मुळे २ वर्षाचं मुलंही फुकटात फोटो काढू शकत आणि फोटो काढतानाच कळत फोटो कसा येणार, ... झटपट आणि चकटफू..

पण आशा आहे की कुणीतरी एखादा माझ्या सारखा वेडा इथे असेल.
पुढच्या भागात काही निसर्ग चित्र पोस्ट करण्याचा विचार आहे.

नमस्कार मन्याराव...
अगदी तुम्ही ज्या प्रवासातून गेला आहात अगदी तसाच प्रवास मी प्रकाश चित्र क्षेत्रात केला आहे.. खूप वर्षांनी इथे मायबोली वर आलो आणि ही पोस्ट वाचली. वाचून मलाही माझे काही फोटो सामायिक करायची तीव्र इच्छा झाली आहे. वेळ मिळाला की नक्की सामायिक करतो... आणि हो, मीही अगदी तुमच्या सारखाच वेडा आहे तेव्हा छान वाटले भेटून.

खूप दिवसांनी पुन्हा इथे आलो.
बऱ्याच मान्यवर मंडळींचे प्रतिसाद दिसतात वरती
@वावे
@अस्मिता
@छन्दिफन्दि
@अज्ञातवासी
@केशवकूल
खूप खूप धनयवाद

@ultimatebipin - तुमच्या पोस्ट ने ह्याचा पुढचा भाग पोस्ट करण्याचा विचार करतोय
कन्याकुमरी, वेंगुर्ला चा सूर्यास्त, मुन्नार च्या बागायती, मलेशियातील जंगल अशा काही आठवणी आहेत.

@रघू आचार्य, @अवल धन्यवाद
लिंक वरील प्रकाशचित्र ही नेत्रसुखद पर्वणी आहे
लिंक पोस्ट केल्याबद्दल विशेष आभार

ह्या रवीवारी पर्यंत अजून काही चित्रफितीवरील प्रकाशचित्र (फिल्म्बाजी) पुढच्या भागात पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो

सगळेच फोटो सुरेख आलेत !

हा छंद जोपासावा हे स्वप्न नेहमी राहून जातं. असा तपशीलवार धागा वाचनात आला कि हुरूप येतो.
सायकल काढावी आणि जगभर फोटो काढत भ्रमंती करावी !

धन्यवाद कमन, रुपाली
आचार्य जी ... खरंय, नेहमीच्या चाकोरीबद्ध जीवनात असे छंद बाळगायला वेळ काढावा लागतो, हल्ली नाही जमत तेवढं.