प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा

Submitted by संयोजक on 27 August, 2022 - 06:01

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा

पाणी हे जीवन आहे. भर उन्हात डोंगरदर्यातून फिरताना एखादा झरा, ओढा वाटेत लागला की त्याचं पाणी किती गोड लागतं हे फिरणाऱ्याला चांगलंच जाणवतं.
तर आजचा विषय आहे जलाशय. विहिर,नदी, शेततळे,तलाव, ओढा, झरा, धरण, समुद्र, कुंड अशा प्रकारची कोणतीही जलाशय असलेली प्रकाशचित्रे झब्बू म्हणून द्यायची आहेत.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.

Screenshot_20220907-090841_WhatsApp.jpg

हे कोल्हापूर जवळील रामलिंग या ठिकाणी असलेलं कुंड आहे. इथे डोंगरावरून बाराही महिने पाणी झिरपत असतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाण्यासाठी दाही दिशा Happy

IMG_20220907_085810.jpg

ऋ मस्त फोटो.
पाण्यासाठी दाही दिशा कावळा ही ..गळणाऱ्या नळातले चार थेंब मिळाले शेवटी त्याला.
20220907_091031.jpg

आमचं आपलं भंडारदरा.... अंब्रेला फॉल

Fall.jpg

मस्त फोटो सगळे
यावेळी विषयही छान दिलेत. अभिनंदन संयोजक

थॅंक्यु अवल Happy . यावेळी सगळयांचेच झब्बूच्या धाग्यांचे प्रचि झकास आहेत. छान वाटतेय बघायला.

कोकणातल्या मंदिरांचा विषय निघालाच आहे तर हा फोटो न देऊन कसे चालेल?
या पद्धतीचे रहाट फक्त मी कोकणातल्या विहिरींवरच बघितले आहेत.

IMG_5271.JPG

धन्यवाद!
हरिणाची जोडी सरिस्का अभयारण्यात कॅमेर्‍यात टिपलेली!

पाणीपुरी Lol

कोकणातल्या विहिरीचा हा अजुन एक:

IMG_5255.JPG

Pages