Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समशेरा
समशेरा
Prime वर ( का का का ? घरच्यांनी लावला म्हणून )
काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या नादात अत्यंत ढिसाळ चित्रपट.
Spolier ( अजूनही एखादा / एखादी असेल जिला वाईट वाटू नये म्हणून दिलाय. खरंतर नकाच बघू
पहिल्या वेळीच तो काझा वर हल्ला करतो,तेव्हाच का बंदी लोकांना सोडवत नाही?
शमशेरा नेटाने बघायचा प्रयत्न
शमशेरा नेटाने बघायचा प्रयत्न केला. पण इतका बकवास होता कि संयम संपला. सगळ्यांनी एकत्र वेळ काढून बघायला बसलेलो. नशीब थिएटर मधे गेलो नाही. मग मूड गेल्यावर इकडे तिकडे विनाकारण सर्च झाले. सफर हा पिक्चर बघितलेला नाही, गाणी गाजलेली आहेत म्हणून लावला.
रणवीराशमशेरा नंतर काहीही चांगले वाटू शकते.नशीब थिएटर मधे गेलो नाही.
नशीब थिएटर मधे गेलो नाही.
शमशेरा OTT वर आला आहे?
आला असेल शमशेरा ओटीटीवर
आला असेल शमशेरा ओटीटीवर
मला माहीतही नाही हा पिक्चर. पण काल की परवा घरच्यांनी विचारलेले, शमशेरा लावायचा का?
पण शमशेरा हे नाव ऐकूनच मी असा लूक दिला की पुन्हा कोणी काही विचारलेच नाही..
मग काल मी सुई धागा बघितला. तोच आपला वरुन धवन आणि अनुष्का शर्माचा. कुठेतरी वाचलेले चांगला आहे म्हणून. चांगलाच निघाला. धवन आणि शर्माची भागीदारी जशी क्रिकेटमध्ये रंगते तशीच ईथे रंगली. अनुष्कावर बनलेल्या मीम्समुळे उगाच या चित्रपटाबद्दल मनात एक अढी बसली होती. काल निघाली.
आला असेल शमशेरा ओटीटीवर
आला असेल शमशेरा ओटीटीवर
मला माहीतही नाही हा पिक्चर. पण काल की परवा घरच्यांनी विचारलेले, शमशेरा लावायचा का?
पण शमशेरा हे नाव ऐकूनच मी असा लूक दिला की पुन्हा कोणी काही विचारलेच नाही..
मग काल मी सुई धागा बघितला. तोच आपला वरुन धवन आणि अनुष्का शर्माचा. कुठेतरी वाचलेले चांगला आहे म्हणून. चांगलाच निघाला. धवन आणि शर्माची भागीदारी जशी क्रिकेटमध्ये रंगते तशीच ईथे रंगली. अनुष्कावर बनलेल्या मीम्समुळे उगाच या चित्रपटाबद्दल मनात एक अढी बसली होती. काल निघाली.
मला सुद्धा सुई धागा आवडलेला !
मला सुद्धा सुई धागा आवडलेला !
धवन च्या आयुष्यातील milestone म्हणावा लागेल .
धवन च्या आयुष्यातील milestone
धवन च्या आयुष्यातील milestone म्हणावा लागेल
>>>बदलापूर पण आहे !
" दोबारा" बघितला.
" दोबारा" बघितला.
ज्यांना SCI-FI बघायला/वाचायला आवडत त्यांनी अवश्य बघावा.
मला आवडला.
शाबास मितू हा क्रिकेटर मिताली
शाबास मितू हा क्रिकेटर मिताली राज वरचा बायोपिक बघायला घेतला. तापसी पन्नूची एन्ट्री
होईपर्यंत चांगला वाटला. त्यानंतर ती नेहमीच्याच रागीट, खुनशी अभिनयाने माती करते पार.
बरं स्टोरी तरी चांगली असावी म्हणून नेट लावून बघत राहीलो तर तेच ते क्लिशे प्रसंग, तोच स्ट्रगल, तसाच कडक शिस्तीचा कोच, तसेच बेपर्वा क्रिडा अधिकारी आणि मग बंड वगैरे
सगळ्याचा चावून चोथा झालाय पार
बीसीसीआय विरुद्ध बंड पुकारते तिथे माझी सहनशक्ती संपली आणि झोपलो. बायको शेवटपर्यंत बघत होती, ती नंतर म्हणाली फारच बंडल निघाला. म्हणलं चला उगा कष्ट वाचले...
नंतर आंतरजालावर चेकलं तर सुपर डुपर फ्लॉप झालाय, मला तर हा कधी येऊन गेला हेही माहीती नव्हतं.
मिताली राजच्या लहाणपणीचे काम करणारी आणि तिची मैत्रीण हाच मोठा प्लस पॉइंट आहे, फार गोड घेतल्यात दोघी
मी सुद्धा या आठवड्यात पाहिला
मी सुद्धा या आठवड्यात पाहिला हा शाब्बास मिठू.. मिताली राज !
ओवरऑल चित्रपटात नेमके काय दाखवायचेय हे गंडल्यासारखे वाटले. क्रिकेट कमी आले ते बहुधा मुळातच महिलांचे क्रिकेट सामने कमी होत असल्याने झाले असावे.
तसेच धोनी चित्रपटासारखे वर्ल्डकप जिंकलोय असा हाय पॉईंटवर क्लायमॅक्स शक्य नव्हता. तर त्या जागी वर्ल्डकप सेमीला हरूनही मुली चमकल्या, त्यांना ओळख मिळाली, जी मिळवून देण्यात मिताली राजचा फार मोठा हात होता अश्या नोटवर पिक्चर संपला. पण तेच योग्य प्रकारे मांडता आले नाही चित्रपटात.
बालपणीचे फूटेज जास्त झाले असे वाटले. अर्थात ते मालगुडी डेज सारखे बघायला छान वाटले पण त्याने वेळ खूप खाल्ला.
महिला खेळाडूचा संघर्ष म्हणजे आधी तिची एक मुलगी म्हणून या पुरुषप्रधान समाजाशी लढाई हे ओघाने आलेच. पण त्यापलीकडचा संघर्ष व्यवस्थित दाखवता आला नाही.
तरी यातही काही शॉट आवडले.
जसे महिला क्रिकेट टीम ईंग्लंडला जाताना एक्स्ट्रा लगेज अलाऊड नसल्याने त्यांना एअरपोर्टवरच अपमानास्पद वागणूक मिळते. लगेज कमी करायला ईंग्लंडच्या थंडीत गरजेचे असलेले जाडजूड कपडे काढून ठेवावे लागतात. आणि त्या हे करत असताना तिथे पुरुषांची क्रिकेट टीम पोहोचते.
अचानक एअरपोर्टवरचा बदललेला माहौल. त्यांचे होणारे सहर्ष स्वागत. त्यावेळी त्या मुलींच्या नजरेत जे भाव दाखवलेत तो सीन खूप आवडला.
बाकी तापसी तर मला आवडतेच. जर पुरुषांची मक्तेदारी मोडणारी स्त्री दाखवायची असेल तर तिच्याकडे बघूनच ती तशी वाटते. बरेच पुरुषांची या कारणासाठी ती नावडतीही असावी. स्पेशली थप्पड चित्रपटापासून
असो, चित्रपट अजून चांगला होऊ शकला असता. उत्तरार्धाने निराश केले. कारण मिताली राजचे जे महिला क्रिकेटमध्ये योगदान आहे त्याला अजून चांगल्या प्रकारे न्याय देणारा चित्रपट हवा होता असे वाटले. तरीही बघून माझा वेळ वाया गेला असे वाटले नाही. यामागे क्रिकेट खेळावरचे प्रेम आणि महिला क्रिकेटबद्दलची कळकळ आहे. पण म्हणून ईतरांना तो बघायला सुचवणार नाही.
तापसीचा अजून एक साऊथ मुव्ही
तापसीचा अजून एक साऊथ मुव्ही आहे
ती नाव बदलून पुरुषाशी लग्ने करून इस्टेट बलकावत असते
लेडी लखोबा लोखंडे
आला असेल शमशेरा ओटीटीवर
आला असेल शमशेरा ओटीटीवर
मला माहीतही नाही हा पिक्चर. पण काल की परवा घरच्यांनी विचारलेले, शमशेरा लावायचा का?
ऋन्मेऽऽष सर यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नाही, पण त्यांचे चित्रपटप्रेम व त्याविषयीच्या पोस्ट वाचून त्यांना शमशेरा नावाचा चित्रपट (ज्यात रणबीर कपुर, संजय दत्त सारखे अभिनेते आहेत) माहीत नसेल हे पटत नाही. (ह. घ्या.)
आमच्याकडे नवीन पिक्चर कळायचा
आमच्याकडे नवीन पिक्चर कळायचा सोर्स एकच आहे आणि तो म्हणजे मायबोली. ट्रेलर वगैरे बघणे प्रकार नाही आमच्याकडे.
तरी नंतर लक्षात आले की क्रिकेट सामन्यांच्यामध्ये रणबीर कपूर काहीतरी वेगळ्याच गेट अप मध्ये येऊन क्रिकेटची जाहीरात करायचा. तो शमशेराचा असावा बहुधा.
माझे चित्रपट प्रेम आता भूतकाळ झालाय. तरी हल्ली हल्ली मी पिक्चर पुन्हा बघू लागलोय. अन्यथा मधल्या काळात किती कमी पिक्चर बघायचो हे मी मागेही कुठेतरी लिहिले होते.
लिंक देतो शोधून
हे घ्या सापडले - या लेखातील १० क्रमांकाचा मुद्दा वाचा
ट्वेंटी-२० वर्षाचे संकल्प - https://www.maayboli.com/node/72916
आणि हो, रणबीर कपूर, संजय दत्तसारखे हे शाहरूख खान आणि आमीर खान सारखे च्या थाटात काय बोलत आहात
काहीही अपेक्षा न ठेवता 'मेरी
काहीही अपेक्षा न ठेवता 'मेरी प्यारी बिंदू' बघितला (प्राइमवर) आणि आवडला.
लव्हस्टोरी आहे, पण शेवट साचेबद्ध केलेला नाही. स्क्रिप्ट, स्टोरीटेलिंग, लोकेशन्स चांगली आहेत.
आयुषमान खुराना, परिणिती चोप्रा दोघंही मला आवडतात.
----------
जरा अपेक्षा ठेवून YZ बघितला. (प्राइम)
याचीही कथा चांगली आहे, अभिनय सर्वांचे चांगले आहेत,
पण स्क्रिप्टमध्ये सिनेमा जरा गंडला आहे. त्यामुळे जरा भ्रमनिरास झाला.
yz चे प्रियतमा गाणे मस्त आहे.
yz चे प्रियकरा गाणे मस्त आहे.. पर्ण कातिल दिसते त्यात...
काहीही अपेक्षा न ठेवता 'मेरी
काहीही अपेक्षा न ठेवता 'मेरी प्यारी बिंदू' बघितला (प्राइमवर) आणि आवडला.
लव्हस्टोरी आहे, पण शेवट साचेबद्ध केलेला नाही.
>>>>
हे सेम असेच मी या चित्रपटाबद्दल अजून काही जणांकडून ऐकलेले. बरे झाले आठवण केली. हा बघायला हवा पुढच्या फावल्या वेळेत.
धवन च्या आयुष्यातील milestone
धवन च्या आयुष्यातील milestone म्हणावा लागेल
>>>बदलापूर पण आहे !
>>>>>
त्याने हंप्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्री की दुल्हनिया वगैरे चित्रपटातही चांगले काम केलेले. एबीसीडी -२ मध्येही चांगला वाटलेला. तिथे तर प्रभू देवालाच फारसा अभिनय येत नसल्याने हा आणखी उजवा वाटायचा.
पण मुळात तो एक गुणी अभिनेता आहे. दिग्दर्शकाने त्याला योग्य वापरले तर कुठलाही थिल्लरपणा न करता संयत अभिनय करतो. नॉन ग्लॅमरस भुमिका आणखी छान करतो. त्यामुळे सुई धागा मधील भुमिका त्याला पेलली असणार हा विश्वास होताच आधीही. चांगली बेअरींग पकडलेली शेवटपर्यंत.
YZ मला खुप आवडलेला.
YZ मला खुप आवडलेला.
नाना पाटेकरचा आपला माणूस
नाना पाटेकरचा आपला माणूस पाहिला.
नानाने दोन व्यक्तिरेखा सुरेख साकारल्या आहेत.
पहिल्या अर्ध्या भागात उत्तम संवादलेखन आणि मिस्टरी मुळे सिनेमा पकड घेतो. पण नंतर ट्विस्ट्स मध्ये तोच तोच पणा जाणवतो आणि शेवटी तर अगदी फडतूस आहे. शेवटामुळे पूर्ण सिनेमा माझ्या लेखी नापास झाला.
आपला माणूस पिच्चर मला फारच
आपला माणूस पिच्चर मला फारच बायस्ड वाटलेला
आपला माणूस अगदीच बकवास होता.
आपला माणूस अगदीच बकवास होता.
टाईम वेस्ट आहे आपला माणूस
टाईम वेस्ट आहे आपला माणूस
मला ट्रेलर बघूनच बोअर वाटलेला
मला ट्रेलर बघूनच बोअर वाटलेला. कोणी म्हटले असते चांगला आहे तरी नॉट माय टाईप म्हणून सोडला असता.
मलापण अजिबात आवडला नव्हता
मलापण अजिबात आवडला नव्हता आपला माणूस
त्याने हंप्टी शर्मा की
त्याने हंप्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्री की दुल्हनिया वगैरे चित्रपटातही चांगले काम केलेले.
>>> येस ... स्पेशली बद्री कि दुल्हनिया... हा मुव्ही प्रचंड अंडर रेटेड आहे.. इट्स मस्ट वॉच ... मेसेज पण फार सुंदर आहे... आलिया चा वन ऑफ द बेस्ट मूवी ..
साधारण अशीच स्टोरी असलेला
साधारण अशीच स्टोरी असलेला 'शादी में जरूर आना ' आवडतो मला.
दोघांची ॲक्टींग चांगलीये त्यात. वन ऑफ द अंडर रेटेड मूव्ही चांगला असूनही.
काही पाने आधी "धुरळा" चा
काही पाने आधी "धुरळा" चा उल्लेख वाचला होता. काल पाहिला (झी५ ). जबरदस्त पिक्चर आहे. पटकथा व संवाद चांगले असले की कलाकार काय कमाल करून जातात ते जाणवते. अनेकदा अरे याचे/हिचे काम यात सर्वात भारी आहे असे वाटत असताना पुढच्या सीन मधे दुसरेच कोणीतरी तितकेच चांगले काम करते.
सई ताम्हणकर, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी (ज्यु), सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, अमेय वाघ आणि अलका कुबल या क्रमाने भन्नाट कामे. त्यातल्या त्यात अलका कुबलचे पात्र जरा नीट लिहीलेले नाही. काळजी करणारी आई यापेक्षा वेगळा लूक आणि आविर्भाव तिच्या चेहर्यावर फारसा येतच नाही.
कथा/पटकथा अगदी फ्लॉलेस नाही पण तरीही जमली आहे. माझ्या दृष्टीने दोन जबरी सीनः
१. प्रसाद ओक व त्याच्या बायकोचे "जनरल जॉलेज" वरून भांडण. तुफान हसलो. बर्याच दिवसांनी इतका जेन्युइन मराठी कॉमिक सीन पाहिला.
२. स्पॉइलर नको म्हणून इतकेच - सई ताम्हणकर चे पारंपारिक वेषात बायकांसमोर गाणे/मोनोलॉग. एकदम जमला आहे.
अनेक ठिकाणी चपखल आणि खटकेबाज संवाद आहेत. अनेकदा समोर एंगेजिंग सीन सुरू असताना मागे, आजूबाजूला काहीतरी आणखी असते - ते ही लक्षपूर्वक पाहा.
फुल रेको.
धुरळा मधला मला सगळ्यात जास्त
धुरळा मधला मला सगळ्यात जास्त आवडलेला सीन म्हणजे सई ताम्हणकर प्रचार सभेत जाऊ, दिर, सासू यांचा भारुडाच्या माध्यमातून जो समाचार घेते... तो सीन
आजूबाजूला काहीतरी आणखी असते -
आजूबाजूला काहीतरी आणखी असते - ते ही लक्षपूर्वक पाहा
हे जरा विस्कटून सांगा की. एवढ्या चांगल्या चित्रपटामधलं आमच्या कडून काही मिसलं असेल तर समजेल.
लिहीतो. अनेक सीन्स मधे असे
लिहीतो. अनेक सीन्स मधे असे जाणवत होते की मागेही काहीतरी आहे. उदा: लगान च्या पोस्टरवर बेतलेला प्रसाद ओक व बाकी लोकांचा फ्लेक्स. एकदा मागे कोणीतरी शेतावरचे बुजगावणे घेउन चालले आहे. या अशा गोष्टी बहुधा दुसर्यांदा बघताना जाणवतात.
तो भारूड शब्दच आठवत नव्हता. मी वरती #२ मधे म्हंटलो तो तोच सीन. मस्त आहे ते.
Pages