Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Hi really ground breaking
Hi really ground breaking content is on Apple TV
शांत प्राणी
शांत प्राणी
पूर्वी पाईपमध्ये सिनेमा दाखवत
पूर्वी पाईपमध्ये सिनेमा दाखवत
ते खोके घेऊन लोक फिरत असत , त्याला चार बाजूने टोपणे असत
शांत प्राणी
शांत प्राणी
+७८६
पण मागे मी आणि काही जणांनी एकदा लकडाऊन चित्रपटाबद्दल आवडला नाही असे लिहीले होते. तेव्हा मला आपल्याकडून बरेच ऐकावे लागले होते.
लकडाऊन सेम पिंच. >>> हो ना, काय होता तो. म्हणजे कुठूनही काहीही आचरटपणा सुरू झालेला. एकीकडे आपण झोंबिवली बनवतोय आणि दुसरीकडे पुन्हा असे मागे घेऊन जाणारे चित्रपट.
Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2022 - 10:51
त्यावर आपल्याकडून हे ऐकावे लागले होते.
<<<< चांगला आहे लकडाऊन. आपण त्याचा आजवरचा प्रवास पाहिला आहे. इथपर्यंत तो पोहोचला याचं मायबोलीकर म्हणून कौतुक आहे. नाही आवडला तर टीका करावी, पण पूर्ण पाहून. आपल्या माणसासाठी वेळ काढणे अशक्य नसावे. मायबोलीवरचे वैभव जोशी, कौतुक शिरवाडकर तसेच अन्य ठिकाणचे काही जण (प्रणव सखदेव), स्व. मुरली खैरनार यांच्या प्रगतीचा अभिमान वाटायचा/ वाटतो. प्रेरणा मिळते.
पिक्चर पूर्णही न बघता त्यावर टीकेची झोड उठवायची याच्यावर मी एक शब्दही बोललो नाही. रागावू नका. दहा मिनिटात पिचर बंद केला हे इतर टुकार सिनेम्यांना ठीक आहे. पण आपुलकीची भावना असेल , पिक्चर टुकार नसेल तर अभिमानाने सांगायची काय गरज आहे ? यात काय तीर मारला दहा मिनिटात बंद करून ?
>>>>>>
थोडक्यात काय, तर हा मनुष्यस्वभाव आहे. कोणालाच चुकला नाहीये
ईथे चित्रपट आवडला वा आवडला नाही असे काही लिहीत असाल तर विरोधी मते असलेले कोणीतरी येऊन तुम्हाला सुनावणारच याची मनाची तयारी ठेवूनच ईथे लिहावे
सर आपली गोष्टच निराळी. आपण
सर आपली गोष्टच निराळी. आपण सर्वच पब्लिकच्या विरोधातले आपले मत रेटण्यात एक नंबर आहात. आपणापुढे सर्वांनी शरणागतीच पत्करली आहे. इतकेच काय लॉजिक शोधू नका असेही चटकन आपण म्हणत असता. आपल्यासारख्यांसाठीच गुंडा, मवाली सारखे उत्तम चित्रपट बनत असतात त्याचा रिव्ह्यू काय आपण लिहीत नाही.
आता मागे जाऊन लकडाऊनच्या माझ्या पोस्टच्या विरोधात आपण आघाडी उघडली होती का हे शोधण्याइतके त्राण आणि पाईपमधे बसायला जागा दोन्हीही नाहीत. माझा इथूनच आपणासारख्या थोर व्यक्तिमत्वास पास. आपल्यावर अन्याय झाला असल्यास मैलामंडळ येईलच.
सर त्यांना सोयीस्कर असतात
सर त्यांना सोयीस्कर असतात त्या गोष्टी लक्षात ठेवतात
आणि अडचणीत आणणाऱ्या विसरून जातात
अजूनही त्यांनी ते डोंगर पेटवला प्रकरण अर्धवट ठेवलं आहे
असो चिकवा धाग्याला अनुसरून प्रतिसाद
मेझ रनर कोणी पाहिला आहे का?
(No subject)
नेटफ्लिक्स वर Get Smart (Anne
नेटफ्लिक्स वर Get Smart (Anne Hathaway, Steve Carell, Dwayne Johnson) >>>>
Siegfried: How do I know you are not from CONTROL?
Max: If I were from CONTROL you would be already dead
Siegfried: If you were from CONTROL YOU would be already dead
Max: Well, since neither of us is dead obviously I am not from CONTROL
That does make sense
That does make sense
Steve Carrel चे कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. तो तिला आपला लठ्ठ असतानाच फोटो दाखवत म्हणतो , आपण दोघंही अग्ली होतो, we share a bond ,मगं ती तिचा प्रि प्लास्टिक सर्जरी फोटो दाखवते ते व त्याला जेव्हां कळते ड्वेन तिचा एक्स आहे तेव्हाचे एक्सप्रेशन्स, त्या दलिप नावाच्या गुंडाचे गच्चीवरील थेरपी सेशन व हग, विमानाच्या टॉयलेटमधील निशाणेबाजी, आपल्याच चिफला फायर एक्स्ट्विंगिशर मारतो ते
Anne Hathaway ही जबरदस्त काम करते, ने ह मी च !
हो
हो
प्रिन्सेस डायरी आणि इंटर्न
दोन्ही मस्त मुव्हीज
गुंडा वरून आठवलं, कुणी लोहा
गुंडा वरून आठवलं, कुणी लोहा पाहिला आहे का इथे? कांती शाहचाच आहे. बहुतेक कुणीच फारसा पाहिला नसावा. त्यामुळे, जसं लोक इतर धाग्यांवर आपल्या जुन्या धाग्यांची रिक्षा फिरवतात, तसं कांती शाहने गुंडा चित्रपटात लोहाची रिक्षा फिरवली आहे. गुंडा मधला लंबू आटा म्हणतो की 'आपने कांती शाह की फिल्म लोहा नहीं देखी? उसमे एक डायलॉग है - ... छत्री होती है खोलने के लिये ...' असं म्हणून अख्खा डायलॉग जसाच्या तसा रिपीट केला आहे. तसा तो खराच आहे का हे बघायला मी लोहा पाहिला. त्यात तो लंबू आटा पोलीस झाला आहे. आणि त्यात खरंच तो डायलॉग आहे. बाकी धर्मेंद्र हिरो असून त्याच्या हातावर मारलेल्या बंदुकीच्या गोळ्या तो बडीशेपसारख्या झटकतो. ह्या सिनेमात गुंडाप्रमाणे गाजलेले काव्यमय संवाद नाहीत. त्यामुळे हा खरा टॉर्चर आहे.
डॉली, किट्टी और वो चमकते
डॉली, किट्टी और वो चमकते सितारे- नेटफ्लिक्स. कोकणा आणि भूमी पेडणेकर या दोन चुलत बहिणींची गोष्ट आहे. अलंक्रिता श्रीवास्तव हिचा हा ट्रेडमार्क झालाय, बायकांच्या गरजा आणि भावना. बरा आहे, एकदा बघू शकतो.
मी बघितला डॉली--चमकते सितारे.
मी बघितला डॉली--चमकते सितारे. २-३ तास आयुष्यातले फुकट गेले अस वाटल. प्रचंड बोर आणि आखीर केहना क्या चाहते हो अस झाल. उगाच काहीतरी भडक दृश्य टाकायची किंवा प्रचंड हिंसा दाखवायची हा जो बॉलीवुड मध्ये ट्रेंड आला आहे तो फार कंटाळवाणा आणि वैतागवाणा आहे. त्यात गे/लेस्बिअन रिलेशनशिप्स दाखवायचे हे पण. अगदी ओढून ताणुन.
डॉली मध्ये कोकणाच्या सहा
डॉली मध्ये कोकणाच्या सहा वर्षाच्या मुलाला मुलींसारखे राहायला आवडते. तो बाहुल्यांशी खेळतो, मेकप करतो, आईची अंतर्वस्त्रे घालून शाळेत जातो. त्या मुलाकडून कसा अभिनय करून घेतला असेल की ती मुलगीच असेल. पोरगा अगदी गोड आहे. अंगावर काटा आला. एका रेलशनशिप मधून बाहेर पडायला लगेच दुसरे हे वैतागवाणे आहे.
काल नायकन बघितला कमल हसनचा
काल नायकन-तमिळ बघितला कमल हसनचा प्राईमवर.
बोटीवरचं गाणं आल्यावर कळलं असंच गाणं दयावान सिनेमात आहे.दयावान पाहिला नाहीए...दयावान नायकन चा रिमेक आहे होय..मग युट्युब वर दयावान काही सीन्स पाहिले..ओरिजिनल कि बात रिमेक मे कहा असे वाटले.
हिंदीतला नायकन् आहे का कुठे?
हिंदीतला नायकन् आहे का कुठे? मी खूप वर्षांपूर्वी पाहिलाय. परत बघायचाय. चाची ४२० पण हिंदीत सापडला नाही.
असो चिकवा धाग्याला अनुसरून
असो चिकवा धाग्याला अनुसरून प्रतिसाद>> चिकवा काय प्रकरण आहे? अजून १-२ ठीकाणी वाचले.
चित्रपट कसा वाटला आहे ते
चित्रपट कसा वाटला आहे ते
चिकवा काय प्रकरण आहे? <<
चिकवा काय प्रकरण आहे? <<
चित्रपट कसा वाटलाचं संक्षिप्त रूप
ओह्ह समजले.
ओह्ह समजले.
>>हिंदीतला नायकन् आहे का कुठे
>>हिंदीतला नायकन् आहे का कुठे? मी खूप वर्षांपूर्वी पाहिलाय. परत बघायचाय. चाची ४२० पण हिंदीत सापडला नाही.>> youtube
यूट्यूबवर चाची आहे पण
यूट्यूबवर चाची आहे पण क्वालिटी चांगली नाही फारशी. नायकनची चांगली दिसतेय. धन्यवाद मी अमि.
ते चिकवा म्हटले की मला नेहमी
चिकवा काय प्रकरण आहे? अजून १-२ ठीकाणी वाचले.
>>>>
मलाही हा शॉर्टफॉर्म मजेशीर वाटलेला.
कारण चिकवा म्हटले की मला नेहमी हे दोन आठवतात. आणि याच टोनमध्ये चिकवा गायलेही जाते
https://www.youtube.com/watch?v=ru_5PA8cwkE&t=102s
https://www.youtube.com/watch?v=lXX9IH12WR8&t=93s
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/11335
इथे आहे ते चिकवा. माबो फटाक्यांचे दुकान.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/11335
Submitted by अश्विनीमावशी on 12 July, 2022 - 12:24
>>>> पाहिलं ते दुकान
बादवे, मामीची मावशी झालीय काय
Ho aaba
Ho aaba
(No subject)
काल धुरळा हा मराठी चित्रपट
काल धुरळा हा मराठी चित्रपट पहाण्याचा योग आला. सहज म्हणून कुठलातरी सिन या चित्रपटाचा पाहिला आणि नंतर पुर्णपणे चित्रपट पाहिला. हा चित्रपट मी थेटरमध्ये का नाही पाहिला असे वाटले. सिद्धार्थ जाधवचा "ह्या चा बाबा", सई व सोकू चा तोच तोच अभिनय, अलका कुबलचा रडवेपणा, अंकूश चौधरीचे शायनिंग, अमेय वाघ चे बटबटीत डोळे अजून बाहेर काढून बोलणे, प्रसाद ओकचे नेहमीचा बेरकीपणा हे असले कशाला सारखे पहायचे हा विचार केला आणि आधी हा चित्रपट पाहिला नव्हता.
सुदैवाने वर लिहील्याप्रमाणे कोणीच त्यांचा नेहमीचा अभिनय केलेला नाही. सरपंच पदाच्या निवडणूका, त्यावरचे राजकारण आणि घरात पडलेली फूट असा नेहमीचा विषय आहे. पण कथेची मांडणी व सर्व कलाकारांचा अभिनय यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो. सई व सोकू चक्क चांगला अभिनय करू शकतात असे वाटले. सिद्धार्थ जाधवने एक दोन प्रसंगात फार सुरेख सिरीयस अभिनय केला आहे. अंकूश, प्रसाद, अमेय आणि अलकाताई यांनीही त्यांच्या भुमिकेला न्याय दिला आहे. सोकूचा एक डायलॉग मात्र खटकला. तिच्या घरच्या लोकांकडे नवर्याविषयी तक्रार करत असताना म्हणते की, "ते (म्हणजे तिचे दिर-जाऊ) घरात वडील आजारी असताना पण सेक्ससाठी वेळ काढतात, पण हे नाहीत". कितीही फॉरवर्ड असले तरी १०-१२ घरच्या लोकांच्यात कोणी इतके बिन्धास्त बोलत नाहीत.
मला आवडलेला चित्रपटातला एक डायलॉग म्हणजे "किंग काँग हा माकडच असतो पण प्रत्येक माकड किंग काँग बनू शकत नाही."
धूरळा फार अगोदर पाहिला होता.
धूरळा फार अगोदर पाहिला होता.
सगळ्यांची काम आवडली. चित्रपटातले ट्विस्ट न टर्न्स पण आवडले .
बहुतेक सगळ्यांची भुमिका त्यान्च्या रेग्युलर एमेज पेक्षा वेगळ्या आहेत .
कुठे आहे धुरळा?
कुठे आहे धुरळा?
Pages