दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही आवाज 'आयडियल' म्हणून आपल्या डोक्यात बसलेले असतात. लता मंगेशकरांचा गाण्यात, अमिन सयानी यांचा रेडिओ जॉकी म्हणून आणि प्रदीप भिडे यांचा वृत्तनिवेदक म्हणून. बाकी कोणाचेही आवाज आपण ऐकले तर त्या त्या क्षेत्रातल्या आयडीयल आवाजाशी आपण नकळत तुलना करत राहतो. ह्या लोकांनी 'मेरी आवाजही पहचान है' म्हणणे हा सुद्धा एक विनयच झाला. त्यांचा आवाज हा केवळ त्यांची ओळख म्हणून मर्यादित नाही; उलट त्यांनी त्या त्या क्षेत्रात आवाज कसा असला म्हणजे सर्वोत्तम म्हणता येईल याचे मापदंडच उभे केले. (हे आवाज सर्वांनाच सर्वोत्तम वाटत असतील असे नाही, हे नम्रतापूर्वक नमूद करतो. तरीही एका मोठ्या लोकसंख्येला ज्या आवाजांनी भारावून टाकले, ते काही नक्कीच साधेसुधे नव्हते.)

प्रदीप भिडे ह्यांना श्रद्धांजली _/\_

दूरदर्शनचा चेहरा झालेला जादूभरा, धीरगंभीर आवाज हरपला!
“नमस्कार आजच्या ठळक बातम्या” बातम्या द्यायची ह्यांची एक वेगळीच पद्धत होती.. बातम्या म्हणजे प्रदिप भिडे सर !
भावपूर्ण श्रद्धांजली… ॥ॐ शांती ॥

मला वाटलेले सगळ्या चॅनेलवर ही बातमी दाखवत असतील पण कुठेच नव्हती. सह्याद्री वर नऊ (की साडे नऊ) च्या बातम्यांमध्ये दाखवली ही बातमी आणि नंतर सह्याद्रीवरच त्यांनी घेतलेली एक मुलाखत दाखवली. खाजगी न्यूज चॅनेल एकावरही बातमी नाही, खाली स्क्रोलपण नाही. असो. श्रद्धांजली!

खरं तर बातमी असायला हवी होती सगळीकडे. आपल्या क्षेत्रातील एका मोठ्या नावाला नमस्कार, किमान बातमी देण्यास काहीच हरकत नाही.

एबीपी वर दाखवली बातमी असे आई म्हणाली. मी रात्री नऊ नंतर टीव्ही लावला तेव्हा मला तर दिसली नाही कुठे. असो. आवाज खासच होता. व्यक्तिमत्वही छान होते. लवकर गेले. कॅन्सर झाला होता बहुतेक.

रवि परांजपेंची बालभारतीच्या पुस्तकांत असलेली चित्रे अजून स्मरतात. मोठे कलाकार, त्यांची शैलीच वेगळी होती. आदरांजलि.

बऱ्याच आधी एका साईटवर त्यांच्या एका चित्रावर लिहिलेले दोन शब्द. आणि विनम्र श्रद्धांजली ___/\___

'खरं चित्रांमधलं फार कळत नाही. पण काही चित्र फार पटकन भावतात. तशात रविजींना 4-5 वेळा बघितलंय, एकदा थोडं बोलताही आलंय. त्यामुळे एकदम छान वाटलं.
रविजी मूळचे बेळगावचे अन मग मुंबईत कामानिमित्त राहिलेले. जाहिरात क्षेत्रात त्यांचं काम फार मोठं. इलस्ट्रेशन त्यातही त्यांची आर्किटेक्श्चरल इलस्ट्रेशन्स नावाजली गेली.
नंतर ते पुण्यात स्थाईक झाले. जनसामान्यांमधे चित्रकलेचे प्रेम अन ज्ञान पसरवणे ह्यासाठी ते सध्या कार्यरत आहेत. त्या दृष्टीने त्यांनी चित्रकलेवर अनेक सोप्या भाषेतली पुस्तकं लिहिली, लिहित आहेत. त्यांचे " ब्रश मायलेज" हे आत्मचरित्रही जरूर वाचावं असं!
संगीत हे त्यांच्या चित्रांना स्फुर्ती देतं असं ते म्हणतात. संगीत ऐकताना चित्र, त्याचे विषय सुचत जातात असं ते मानतात. कलाकार कसा सर्वांगाने कलाकार असतो याचे हे उदाहरणच! असं म्हणतात की त्यांची चित्र मॅजिकल रिअॅलिस्टिक आहेत.
त्यांच्या व्यक्तित्वात एक हसरं मूल दडलय असं मला नेहमी वाटतं. अतिशय गोड आजोबाही त्यांच्यात दिसतात मला. जीवनातील कष्टप्रद, ताणकारक गोष्टींना पार पाडून, सकारात्मकच नव्हे तर हसरी सकारात्मकता कृतिशीलता कशी असावी हे रविजींकडून शिकावं. हसतमुख, सकारात्मक आणि सृजनशील असं मन लाभलेला हा कलाकार!
यांच्या चित्रावर कविता करायची हे मोठच चॅलेंज. माझी काही ती पात्रता नाही. पण चित्र पहाताना जे सुचलं ते मांडते.
त्यांच्या बहुतेक चित्रांमधे त्यांची सकारात्मकता अन जगण्याची अलवार जीवनेच्छा दिसत रहाते. त्यांनी निवडलेले रंग, त्या रंगांचा एकमेकांशी संवाद- मिलाप, त्यांच्या चित्रातली त्रिमितता-खोली, त्यांनी चितारलेल्या व्यक्तींचे डोळे, त्यांची उभं रहाण्याची पद्धत, ... अशा अनेक गोष्टी आवडतात.
हे विशिष्ठ, निवडलेलं चित्र विशेष भावलं. कारण कुठेतरी मला मी त्यात सापडले.
https://i.pinimg.com/originals/ce/b5/be/ceb5be670dfcd3b3c42da866faa47d29...
यातले पेस्टल कलर स्किम तर भावलीच. त्यातून येणारा सुकून, शांतता, आश्वासकता पोहोचली. चित्राची नायिका साधी वनवासी प्रौढा. पण तिला रेखावं वाटलं रविजींना! तिची उभं रहाण्याची ढब सुचवतेय का, की ती खुप चालून आलीय, दमलीय. थोडी धाप कमी करायला थांबलीय. आणि तरीही तिला स्वत:ची अशी जाणीव आहे, अस्तित्वाची जाण आहे, मागे वळून बघताना एक ग्रेस आहे.
सोबतची म्हटलं तर निष्पर्ण झाडं, पण तिच्या मनाने जगलेले सारे रंग मिसळून गर्द राई वाटणारे! निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी, अगदी शेळ्यामेंढ्याही महत्वाच्या मानणारी ही प्रौढा; काठीचा आधार तर घेतेय पण अशा नजाकतीने की क्या बात!
तर असं हे सगळं भावलं मला. मग ते या ओळींतून उतरलं. बघा आवडतय का

पाहते वळुनि मागे
दिसती विविध पाने
उधळण रंगाची ही
मोही मनास भारी
फिरती निवांत चरती
रानात मुक्त विहरत
माझेच हे सवंगडी
मोही मनास भारी
भोवती सभोवतीस
ही राई गर्द हिरवी
मज लपेटुनी घेई
मोही मनास भारी
जीवनाचे दिसे सार
जगले ते, रंग सारे
आजची तृप्तता ही
मोही मनास भारी'
---

मराठीतील अस्सल गझल, करम प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व माझी जिवलग मैत्रीण, सुप्रिया जाधव यांचे आज निधन झाले आहे.

फारच अनपेक्षित आणि दुःखद Sad
माबोवर त्यांच्या कविता वाचत होतो
शेवटच्या ओळी काय लिहून गेल्या:

>> जायचे आहेच प्रत्येकास येथे शेवटी
>> ऱ्हायचे आहे मनांमध्ये रहस्यासारखे

श्रद्धांजली_/\_

अरेरे ! ही किती वाईट बातमी वाचली. मनापासुन वाईट वाटलं. Sad

मी क्वचित आठवडा / चार दिवसातुन उगवते, तेव्हा त्यांची एखादी गझल दिसायचीच. सवयच झाली होती, फार मिस करणार.

<< मराठीतील अस्सल गझल, करम प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व माझी जिवलग मैत्रीण, सुप्रिया जाधव यांचे आज निधन झाले आहे. >>
------- या बातमीने वाईट वाटले Sad

Pages