अग्निपथ

Submitted by रणजित चितळे on 17 June, 2022 - 02:56

समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.

सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.

आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक तर येथून पुढे मुल जन्माला घालू नका.
जन्म दिला तर प्रतेक महिन्याला त्याच्या नावावर एक ,दोन हजार टाका..
शिक्षण घेण्याची काही गरज नाही
भाषा आणि व्यवहार समजला खूप झाले
मुल १८, वर्षाचे होईल तेव्हा चक्रवाढ व्याज नी १५ लाखाचे तरी मालक होईल.
खुप झाले .
अग्निपथ मध्ये जावून गुडघे फोडून घेण्याचे काही कारण नाही.
गरीब आणि सामान्य लोकांनी.
शाहिद,देश प्रेम,देशाचे Dushman असल्या फालतू भावनिक पॉइंट पासून स्वतःला दूर ठेवावे.

बरोबर .

17 वर्षात हे कोणत्या लढाईत लढले होते ? की नुसती परेड करत बसले होते ?

प्रत्यक्ष युद्धात लढलेला सैनिक आणि युद्ध झालेच नाही , नुसतेच परेड करत बसलेले सैनिक , यांच्या पगार भत्त्यात फरक असतो का ?

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अशीच वेळ स्वातंत्र्य सैनिकांवर आली होती.
तोपर्यंत तो त्यांच्या आयुष्याचा फोकल पॉईंट होता आणि आता अचानक काय करणार असा प्रश्न निर्माण झाला.
माझ्या आजोबांनी "तुम्ही त्यांना पेंशन देऊ नका, त्यापेक्षा नोकरी द्या" असा मुद्दा मांडलेला.. मोरारजीभाई देसाईंबरोबर सभा होती तेव्हा.

(अवांतर: मोरारजी भाई म्हणाले "तुम्ही काय एन्कॅश करायला निघालात काय". आजोबांनी "तुम्ही खुर्चीत बसलाय ते काय आहे" असे विचारले होते. Proud आजोबा स्वतः वकील होते, त्यामुळे हा मुद्दा त्यांच्या स्वतःकरता नव्हता)

ते नंतरही काही लोकांचे शिक्षण अर्धवट राहिलेले, नोकरी धंद्याची तशी सवय नसणे, त्यामुळे कामधंदा न मिळणे आणि त्यामुळे आलेले फ्रस्ट्रेशन ह्याची उदाहरणे सांगायचे.
जर खरोखरच ह्या स्कीम मुळे लोकांचे शिक्षण अर्धवट राहिले, बाहेर सामावून घेतले गेले नाही तर अर्धवट वयात प्रॉब्लेमेटिक हो ऊ शकेल काय असे वाटले मला, स्वातंत्र्यसैनिकांच्या उदाहरणावरून)

जर राज्य सरकार आणि इतर नोकर्‍यात काही % रिजर्वेशन असणार असेल तर कदाचित हा प्रोब्लेम येणार नाही.
१७-१८ वय मात्र कमी वाटतय. किमान पदवी हातात असावी..

राज्य सरकारे / पॅरामिलिटरी फोर्सेस / हिंद्रा सारख्या संस्था अग्निवीरांना सामावून घेऊ शकत असतील तर त्यांनी थेट भरती का करू नये? अग्निवीरच कशाला हवेत? लाखो आयटीआय / डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेले बेकार का फिरतात?

अवांतर: मोरारजी भाई म्हणाले "तुम्ही काय एन्कॅश करायला निघालात काय". आजोबांनी "तुम्ही खुर्चीत बसलाय ते काय आहे" असे विचारले होते. >>>
जबरा, आवडलं हे Happy

प्रत्यक्ष युद्धात लढलेला सैनिक आणि युद्ध झालेच नाही , नुसतेच परेड करत बसलेले सैनिक , यांच्या पगार भत्त्यात फरक असतो का ?>> काय बाता करुन रायले सर. लढाई व्हईल तवा हे परेड करणारेच जातात ना सामोरे, का
तुमच्यावानी माबोवरचे पडीक लोके जातील ?

सर लोकाईचे पिकच आलेलं दिसुन रायलं बगा माबोवर.

देशात रोजगार च नाही.लोकांना देश सोडून दुसऱ्या देशात रोजगार साठी जावं लागत आहे.
आखाती देशात कचऱ्या सारखी भारतीय लोक आहेत..इथे रोजगार नाही ,योग्य मोबदला मिळत नाही म्हणून लोक तिथे गेली आहेत..
शिक्षित लोक अमेरिकेच्या अंबॅसी समोर रात्र भर वाट बघत बसलेले असतात.
ह्या खासगी कंपन्या काय ह्यांना रोजगार देणार.
आठ दहा हजार वर पगार देण्याची कुवत भारतीय उद्योगात नाही....
महिंद्रा पासून बाकी चमचे फक्त फेकत आहेत.
रोजगार देतील पण पगार आठ हजार.
इथे शिकलेल्या मुलांना,स्किल वर्कर लोकांना पण २० हजार पण पगार देण्याची नियत भारतीय उद्योगपती ची नाही

Job देऊ म्हणणाऱ्या सगळ्या कॉर्पोरेट नी
गेल्या 10 वर्षात किती ex सर्व्हिस मेन ला नोकऱ्या दिल्या ( त्यांचे कवालिफिकेशन आणि कोणती नोकरी, हे डिटेल सुध्धा हवेत) हे जाहीर केले तर त्यांच्या आश्वासनाला वजन येईल .

दर वर्षी आपण किती लोकांना नोकऱ्या देऊ याबद्दल हमीपत्र. त्या दिल्या गेल्या नाहीत तर penalty क्लोज

त्या हमीपत्राला कोण विचारणार
मोठ्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते पण शाळा फी वाढ करून बाकी पालकांच्या खिशातून हे पैसे काढतात

रोजगार देणारे हेच करतील, बाकी लोकांची कपात किंवा पगार कपात करतील
वर देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी आपण इतकं केलाच पाहिजे करत देशभक्ती चा मुलामा देतील
स्वतःच्या खिशाला तोषिश न देता

मोठ्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते पण शाळा फी वाढ करून बाकी पालकांच्या खिशातून >> स्वतःच सवलत देतात ? शासकीय योजनेत ज्या सवलती द्याव्या लागतात त्यासाठी शाळांना एक पैसा खर्च येत नाही. गरीब विद्यार्थ्यांचे पैसे शासनाकडून शाळेला (उशिराने का होऊना) भरपाई म्हणून येतात.

भारतीय उद्योगपती हे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत.
महिंद्र असू किंवा आणि कोणी स्वतःचे खिसे भरणे,बँका बुडवणे,टॅक्स चोरी करणे.
सर्व बेईमान आहेत ते काय नोकऱ्या देणार.
कोणती तरी बँक १००, रुपयाला बुदवतील आणि अग्नी वीरांना ५ रुपये देतील.

खंडणी प्रकरणात कसला पुरावा नाही म्हणे

माफीचा साक्षीदार केस चालवणार म्हणे

एक बिनपगारी पोलीस खंडणी , खून करतो म्हणे

आता तर 4 वर्षे आर्मीत काढलेले लोक मिळणार तयार

भाजपची मजा

पाहिले तर खूप गैर समाज देशात पसरवले आहेत.
आर्मी मध्ये जे जातात त्यांना देशा विषयी मोठे प्रेम असते असे काही नाही..
कारण हीच लोक रोजच्या जीवनात असे वागतात त्या मुळे देशाचे नुकसान च होते.
फक्त नोकरी एक पोट भरण्याचे साधन हाच हेतू असतो..
असे पण युद्ध होत नाहीत..
जे अग्निपथ कसे चांगले ह्याचे ज्ञान देत होते त्या अधिकाऱ्यांनी फक्त पगार घेतला,सुविधा घेतल्या .कोणत्याच युद्धात भाग नाही.. हुतात्मे तर हे झालेच नाहीत.
काहीच न करता करोडो रुपये देशाने ह्यांच्या वर खर्च केलें

पाहिले तर खूप गैर समाज देशात पसरवले आहेत.
आर्मी मध्ये जे जातात त्यांना देशा विषयी मोठे प्रेम असते असे काही नाही..
कारण हीच लोक रोजच्या जीवनात असे वागतात त्या मुळे देशाचे नुकसान च होते.
फक्त नोकरी एक पोट भरण्याचे साधन हाच हेतू असतो..
असे पण युद्ध होत नाहीत..
जे अग्निपथ कसे चांगले ह्याचे ज्ञान देत होते त्या अधिकाऱ्यांनी फक्त पगार घेतला,सुविधा घेतल्या .कोणत्याच युद्धात भाग नाही.. हुतात्मे तर हे झालेच नाहीत.
काहीच न करता करोडो रुपये देशाने ह्यांच्या वर खर्च केलें

केवळ लोक मरायला तयार व्हावेत म्हणून राजेशाहीने सैनिकांना ग्लॅमर दिले होते

आता ग्लॅमर देऊ नये , त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला द्यावा

अग्निविर , अग्निपथ अशी मरतमढी नावे देण्यापेक्षा रक्षक , विजय अशी पॉझिटिव्ह नावे द्यावीत

पगार द्यायचा नाही आणि उगाच विमानातून फुले उधलायची.

लेख लिहिणार्याना स्वतःच्या पगारा पेन्शणीत वाटेकरी नको आहेत , दहा लाखात भागते तर ह्यांनी सोडाव्यात नोकर्या आणि आनंद महिंद्राच्या कंपनीच्या दारात सिक्युरिटी गार्ड म्हणून रहावे.

हिंदुत्व हे वर्ण वर्चस्वावर चालते , प्रत्येक क्षेत्रात ह्यांना बुट्टी उचलायला एक श्रमिक शोषित वर्ग उर्फ शूद्र वर्ण हवा असतो , तसा हा अग्निपथ म्हणजे शूद्र वर्ण आहे , ह्या लोकांना पुढे शिंपिकाम , इस्त्री , लौंड्रि , गार्ड , बागकाम इ शिकवणार म्हणे.

सगळ्याच क्षेत्रात अशा नोकर्या घडवणे हे बाजपेईपासून सुरू आहे,

मीडिया,उद्योगपती,सनदी अधिकारी,आता लष्करी अधिकारी.आणि सरकार.
अशी युती आताच्या सरकार नी केली आहे.
एक प्रकारची गँग च आहे ही.

ह्या खासगी कंपन्या काय ह्यांना रोजगार देणार.
आठ दहा हजार वर पगार देण्याची कुवत भारतीय उद्योगात नाही....
महिंद्रा पासून बाकी चमचे फक्त फेकत आहेत.
रोजगार देतील पण पगार आठ हजार.

भारतीय उद्योगपती हे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत.
महिंद्र असू किंवा आणि कोणी स्वतःचे खिसे भरणे,बँका बुडवणे,टॅक्स चोरी करणे.
सर्व बेईमान आहेत ते काय नोकऱ्या देणार.

आर्मी मध्ये जे जातात त्यांना देशा विषयी मोठे प्रेम असते असे काही नाही..
कारण हीच लोक रोजच्या जीवनात असे वागतात त्या मुळे देशाचे नुकसान च होते. >> हेमंतसर, तुमी सगळ्या लोकाले काहुन झोडपुन रायले. एखादाले तं सोडा ना बाप्पा.

ब्लॅक कॅट शी सहमत आहे.
शाहिद होणे आणि मरणे ह्या मध्ये काय फरक आहे.
दोन्ही एकाच आहेत..
माणूस मरतो तो परत येत नाही.
सैनिकांचे उदात्तीकरण ठरवून केलेले आहे की लोकांनी मारायला तयार व्हावे.आणि त्यांनी काही अपेक्षा पण ठेवू नयेत.
वीस हजार पगारात धोकादायक अशा स्थिती मध्ये राहावे.
आणि आपला जीव पण द्यावा.
आणि बाकी लोकांनी देशाला खूप लुटावे.
सैनिक हा पण पेशा आहे त्यांना त्यांच्या मेहनत आणि जीव नेहमी धोक्यात असतो त्याची किंमत जिवंत असताना च द्यावी.
मेल्यावर गौरव नको.
आणि कोणती पदक पण नकोत.

यांच्या स्वतःच्या योजनांची नावे मन की बात , विश्वगुरु , व्हॅकसिन गुरू , जनधन

आणि जनतेच्या योजना , अग्निपथ , अग्निविर , कोविड योद्धा

काय बिघडले

आपलेच नागरिक आहेत

तुम्ही विनायक नथुराम नावे द्या

<< तुम्ही विनायक नथुराम नावे द्या >>

------ त्यांना आधी कामे करु द्या, देशाच्या विकासाला हातभार लावा. मग द्या खुशाल नावे पंडित गोडसे शांती पुरस्कार, सावरकर खेल रत्न, प्रज्ञा ठाकूर सद्भावना पुरस्कार,

आता पर्यंत काँग्रेसकाळातली कामे हायजॅक केली, किंवा अगोदर असलेली नावे बदलली. एकाच योजनेचे पुन्हा एकदा उद्घाटन केले.

आत्मनिर्भरतेच्या गप्पा आणि परिस्थिती मधे बराच फरक आहे. अजुनही फोडाफोडी शिवाय सरकारे स्थापन होत नाही, सत्तेशिवाय करमतही नाही, मग विकासाच्या कामांना वेळ कुठे आहे?

Proud

कामे नाहीत
अर्धी केली तरी नावे द्यायला नर रत्ने नाहीत

Proud किती ते दुखणे ह्यांचे विचित्र

काँग्रेसने 60 वर्षात 600 संस्था गांधी नेहरू नावाने काढल्या म्हणून भक्त बोंबलत असतात.

यांची भाजपाची 15 वर्षे 13 दिवस सत्ता झाली , ह्यांच्या 150 ची यादी कोण देईल का ?

ह्या bjp वाल्या लोकांनी ठरवले आहे नाव कोणाची द्यायची ते.
मोदी बँक लुटून पळाला तो.
अडाणी,अंबानी जे देशाची मलई फुकट खात आहेत.
मल्ल्या चे पण कोणता तरी शहराला द्यावे हे पंतप्रधान आणि त्यांचा एकमेव चेला ह्यांच्या डोक्यात असेल.

भारतीय जनतेला खूप मोठा पश्र्चाताप होणार आहे त्यांच्या मूर्ख पना चा
ह्या बिनडोक लोकांना निवडून दिले.
२०२४ लोक शहाणी असतील तर ह्यांना पूर्ण हद्ध पार केले पाहिजे.

<< २०२४ लोक शहाणी असतील तर ह्यांना पूर्ण हद्ध पार केले पाहिजे. >>

-------- हेमंत तुमची कळकळ समजते.... पण २०२४ मधे तरी शक्य नाही. थोडा अजून वेळ लागेल.... तो पर्यंत नुकसान (करेक्शनची किंमत) होतच रहाणार.

देश कठीण प्रसंगातून जात आहे राज्य घटना आणि लोकशाही दोन्ही धोक्यात आहेत.
अशा वेळी न्यायलाया न वर देश वाचवण्याची जबाबदारी जाते.
न्यायव्यवस्था ने देशातील स्थिती ची दखल घेणे गरजेचे आहे.

Pages