समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
अग्निवीरांचे चार वर्षानंतरचे
अग्निवीरांचे चार वर्षानंतरचे भवितव्य
https://boltahindustan.in/social/girish-malviya-questions-on-future-of-a...
वर एका प्रतिसादात लिहिले होते
वर एका प्रतिसादात लिहिले होते की ही योजना मागे घ्यायला हवी.
रेल्वेचे काही डबे आणि थोडे इंधन वाचेल. मग ही मुले शांतपणे आय ए एस वगैरे करू शकतील. उगीच काय पाय ओढायचे बिचाऱ्यांचे!
गुजरातेत तर घरटी आयएएस /
गुजरातेत तर घरटी आयएएस / आयपीएस आहेत कि २००२ च्या बॅचचे.
बाबरी समतल बॅचचे आय ए एस एव्हांना अग्निवीरचे निर्माते असतील.
ही आंदोलने लष्कर भरती सक्तीची
।
आत्ताच्या भरती प्रक्रियेत
आत्ताच्या भरती प्रक्रियेत
आठवी पास /दहावी पास आणि बारावी पास असे ओ आर म्हणून भरती होतात. १० +२ वाल्यांना ट्रेडसमन म्हणून घेतात.
हॉटेल मॅनेजमेंट / इंजिनिअरिंग व इअर डिप्लोमा असलेल्यांना जेसीओ म्हणून घेतात.
यापूर्वी ज्या पोस्टससाठी दहावी पास ही अट गरजेची होती, त्यासाठीच विशेष भरती म्हणून दहावी नापासांना पण घेत असत. पण कायमस्वरूपी.
बेफिकीर , गुगल करून बघा.
सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ
सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली तर तीस वर्षे लष्करी नोकरी नक्की! Actually खरंच चांगली आयडिया आहे.
या भंकस योजनेचे मुद्देसुद
या भंकस योजनेचे मुद्देसुद समर्थन करता येत नाही म्हणुन अंधाधुंद गोळीबार सुरु आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या
विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिनुसार जे पटलं ते त्यांनी केलं, आता जाळपोळ करण्याचं ज्ञान कोणी जन्मतःच घेऊन येत नाही, आणि आपल्या देशाची ही शोकांतिका आहे आणि सत्य ही, हिंसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणी ढुंकून ही पाहत नाही.
आपल स्वतःच उदाहरण घ्या तुमचं कंपनीत selection झालं पण कोरोना मुळे कागद पत्रांच काम अडकल आणि ३वर्षांनी स्थिती पूर्ववत झाली आणि कंपनी वाले बोलले की नाहीं आता मागचं सगळ संपल पुन्हा परीक्षेची तयारी करा , तर तुम्ही कंपनी वाल्यांशी सहमत असाल नाहीं ना , मग हे प्रकरण पण असच आहे.
३वर्ष सकाळ संध्याकाळ पळायचं, व्यायाम करायचा, भरती काढायची मेडिकल काढायच , फक्त पेपर बाकी ते झाले की झालं पण ते होण्यासाठी ३ वर्ष वाट पाहायची ,admit card वर Admit card येतायेत पण paper नाही आणि तीन वर्षांनी ही असली थेर मांडायची आणि मागचं सगळं Cancel आता नव्याने भरती द्या म्हणायचं , मग जाळपोळ नाहीं होणार तर काय होणार सज्जन विचारवंतांनो,
ज्याच जळत , त्यालाच कळत
ज्यांना ही योजना शेटजींचा
ज्यांना ही योजना शेटजींचा मास्टरस्ट्रोक वाटतो त्यांनी आपापल्या घरातलं लेकरु, ती हिंमत नसेल तर भावकीतलं तरी एखादं पोरगं अग्नीवीर होईल हे पहावं.
जाळपोळीचे समर्थन करणारा निदान
जाळपोळीचे समर्थन करणारा निदान एक तरी प्रामाणिक प्रतिसाद आला. आत्तापर्यंत इतर भल्याभल्यांना हे इच्छा असूनही जमत नव्हते.
जाळपोळ केल्याचा निषेध
जाळपोळ केल्याचा निषेध
पण म्हणून योजना समर्थनीय ठरते का?
आता फक्त या मुलांना फंडिंग कसे पाकिस्तान, खलिस्तान मधून होते आणि देशाचे तुकडे करण्यासाठी कसा देशव्यापी प्लॅन रचला गेलाहोता या पोस्टीं यायचा बाकी आहेत
येतीलच लवकर
जे जे सरकार विरोधात ते ते देशद्रोही
https://www.bbc.com/marathi
https://www.bbc.com/marathi/india-61840623
महाराष्ट्रातील सैनिक टाकळी गावातील लोकांना काय वाटतं वाचा.
गिरीश मालविय लिहीत असलेले खरे
गिरीश मालविय लिहीत असलेले खरे असेल तर सरकारी पैशाने पर्यायाने जनतेच्या पैशाने खाजगी क्षेत्राला भाडोत्री सैन्य भरती करून देण्याची योजना दिसत आहे. नंतर ४-५ वर्षांनी सोयीस्कर पणे गुंडाळून पण टाकायची. देशाबरोबर सैन्य पण विकाऊ केले. कुठे आहे पुलावामा चा रिपोर्ट? कोणी केला होता अटॅक? लागला का काही शोध? कुठून आले होते आरडीएक्स?
अजुन भिरभिरलेले आहेत म्हणुन
अजुन भिरभिरलेले आहेत म्हणुन पोस्टी यायच्या आहेत. सावरल्यावर बघा..
'भल्याभल्यांमध्ये' कोण कोण
'भल्याभल्यांमध्ये' कोण कोण स्वतःला गणतात हे माहीत नव्हते. समर्थनीय योजना कशी असावी ही चर्चा सुरू होण्यापूर्वी झालेले नुकसान कोण भरून देणार कोण जाणे!
नोटबंदीनंतरच्या नव्या नोटेत
नोटबंदीनंतरच्या नव्या नोटेत काहीतरी भारी सिस्टीम बसवलेली होती म्हणे. उच्चप्रतीच्या भक्तांनाच मिळाल्या अशा नोटा.
योजना बंधनकारक नाही, इथेच
योजना बंधनकारक नाही, इथेच दंगल करण्याचे कारण नष्ट होते.
दंगल करणे बंधनकारक असले तर माहीत नाही.
त्यांची सुई तिथेच अडकली आहे
त्यांची सुई तिथेच अडकली आहे
जाऊ दे मुद्दे नाहीत समर्थन करायला
भक्तांची दया येते अनेकदा
विश्वगुरू इतक्या वेळा तोंडघशी पाडतात तरी एकदा व्रत घेतले आम्ही अंधत्वाचे ते सोडणार नाही हा बाणा काय सुटत नाही यांचा
इथल्या माननीय विचारवंतांना
इथल्या माननीय विचारवंतांना महाराष्ट्रातच १६, १७ आणि त्यापुढील तरुण काय करत आहेत ते माहिती आहे का? Instagram वर जाऊन #तस्कर, वाळूमाफिया शब्द शोधा.
इंदोरमध्ये कोण कश्यप नावाचं एक पोरगं होतं, त्याचा आदर्श घेऊन तशी वेशभूषा वगैरे करणारे पोरं तुम्हाला लहान सहान शहरातून दिसतील. बेकारीमुळे आधीच वाया जात असणारी ही पिढी.. जिथे 4 वर्षे व्यवस्थित डिग्री करून नीटसे जॉब नाहीयेत तिथे ह्या निवृत्त अग्नीविरांची काय पत्रास?
संघटित गुन्हेगारी शहरी व निमशहरी भागात तुफान वाढली आहे. तुमचे तन्मय चिन्मय कॅटेगरी पोरं म्हणजे तरुणाई नव्हे! व्यसनांची सवय लागलेली, त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने पैसा उभा करायला तयार असणारी पोरं म्हणजे तरुणाई.. उर फुटेस्तवर पहाटे पहाटे भरतीच्या गावाखेड्यांच्या रस्त्यावर आशेने पळणारी पोरं म्हणजे तरुणाई. यांना येणारं फ्रस्ट्रेशन जगावेगळ आहे. समजत नसेल तर इंटरनेट फुकट आहे म्हणून काहीही टायपू नका. अनेक घरात पोरं बेरोजगारीच्या लाजेपायी बापासमोर जेवायला बसत नाहीत, ते अश्या स्कीममध्ये ४ वर्षे घासून येऊन परत येऊन पुन्हा बेरोजगार राहतील तेव्हा काय? गुन्हेगारी हा सगळ्यात सोपा मार्ग वाटायला लागलेला असताना असे well trained तरुण अजून काय करतील?
पुण्याचा तो संतोष जाधव, महाकाळ वगैरे लोकांबद्दल वाचा एकदा.
आणि २५ टक्के नोकरीच्या बाता हेपलनाऱ्याना सूचना, डोळे उघडुन वाचा, upto म्हटलंय.. शेकडा शून्य ते शेकडा २५ यातले काहीही.. जिथे भरती प्रक्रिया पूर्ण करून बसलेल्या मुलांना नियुक्तीपत्र मिळेना, तिथे ह्या गाजराची काय शाश्वती.. अंधभक्तांनो, तुमच्यामुळे देश मातीत जाईल, आणि फकीर आदमी झोला उचलून निघून जाईल तेव्हा बसा कपाळ बडवत, नाहीतर तुमच्या मुलाबाळांना पाठवा लोहपुरुष पुतल्यापाशी किंवा अयोध्येत भिका मागायला.
येडबांबु कुठले
जे वा, उत्कृष्ट प्रतिसाद.
जे वा, उत्कृष्ट प्रतिसाद.
जेम्स वांड, पहिलवन, जेम्स
जेम्स वांड, पहिलवन, जेम्स वांड, अजिंक्यराव पाटील, अश्विनीमावशी छान विचार मांडले आहेत. चितळे यांना मोठा गृहपाठ मिळालेला आहे.
सैन्यात गेल्याने जागरूकता किंवा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो हे बाळबोध गृहितक ( हेडर मधेच तसे आहे ) किती चुकीचे आहे हे एव्हाना सिद्ध झाले आहे.
योजना बंधनकारक नाही, इथेच
योजना बंधनकारक नाही, इथेच दंगल करण्याचे कारण नष्ट होते. >> पक्षी भंगार योजना आहे. तिच्या वाटेला शहाण्या माणसाने जाऊ नये?
कृपया याबद्दल सविस्तर धागा काढुन लिहाल का? माझी जेमतेम तिन एकर शेती आहे, अजुन धड उभी नाहिये तोच सरकार खिळखिळी करतेय तर मला माहिती घ्यायला हवीच. >> साधना, तुमची शेती हौशी शेती आहे ना? मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत नाही. तसे असेल तर मग तुम्हाला काळजीचे कारण नाही. ज्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन केवळ शेती आहे आणि जे अल्पभूधारक आहेत अशांची परिस्थिती फार कठीण आहे.
सैन्याविषयी रोमँटिक कल्पना
सैन्याविषयी रोमँटिक कल्पना असणाऱ्यांनी "रोबो" ही दिनानाथ मनोहर यांची कादंबरी वाचावी हा फुकटचा सल्ला देतो.
आणखी एक बातम्या पाहून किंवा
आणखी एक बातम्या पाहून किंवा गूगल करून माहिती घेत, तिच्यावर जर सुज्ञ वाचक मत व्यक्त करत असतील तर पूर्ण चर्चाच निष्फळ ठरते.
जवळ पास कोणी सैन्यात जाण्याची तयारी करत असेल तर त्याला या योजनेबद्दल विचारा , तेव्हा ही योजना काय आहे हे कळेल तुम्हाला आणि शहरात राहनाऱ्यांनी तसदी ही घेऊ नये, कारण अश्या २५-३० हजारात देशा साठी प्राण देणारा सैनिक हा फक्त "गावाकडेच" मिळणार. जय हिंद.
त्योजना बंधनकारक नाही. संघ
योजना बंधनकारक नाही. संघ शाखा सुद्धा बंधनकारक नाहीत. टणाटण प्रभात, बजरंग दल हे तरी कुठे बंधनकारक आहेत. या सर्वांकडून शांतीमार्चचे वेळोवेळॉ जे प्रदर्शन झालेले आहे त्याला लष्करी प्रशिक्षणाने चार चांद लागणार आहेत.
बाकि, हिंसाचारावरून एकाच बाजूला झोडपण्यात अर्थ नाही. तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आहे. बेहरामपाड्यात झालेल्या हिंसाचारावरून मुंबईत जी दंगल झाली त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. एका मुख्यमंत्र्याची विकेट पडली आणि पवारसाहेब महाराष्ट्रात आल्याबरोबर दंगल शमली. आता या सरकारने श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींनुसार हयात असलेल्या दोषींवर कारवाई केली पाहीजे. तरच मुस्लिमांबाबतची सहानुभूती किती खरी आहे हे कळून येईल.
श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशीं
https://www.mha.gov.in/about-us/commissions-committees/ccsap-justice-ret...
अजित डोवाल यांच्या नावाने एक फेक फेसबुक पोस्ट फिरतेय. त्यात दंगाईंचा बंदोबस्त करण्यासाठी अग्निवीर योजना आहे असे सांगितले आहे. हे फेसबुक पोस्ट फेक आहे. मूळ पोस्ट आयटीसेल कडून चार वर्षांपूर्वी व्हायरल केली होती. त्या वेळी अनेकांनी शेअर केली होती. म्हणजे अग्निवीरची योजना अचानक आलेली नाही. आयटी सेलला कल्पना होती. ती कशासाठी हे ही त्यांना ठाऊक होते. या पार्श्वभूमीवर बेफिकीर यांचा उपहास हास्यास्पद आणि बालिश वाटतो. साधनाताई आणि बेफिकीर यांचे संवाद (एकमेकांची एकमेकांना साथ मिळाल्याप्रमाणे) चेव आल्याप्रमाणे वाटतात. ना त्यात मुद्दे, ना कुठला वैचारीक खल. बाबरी मशीद पाडताना कारसेवकांचे जे झाले ते अग्निवीरांचे का होणार नाही हा विचार यांच्या मनाला न शिवण्याचे कारण उघड आहे.
दोन कंपू बनवायचे आणि आपल्याला गैरसोयीचे मुद्दे नजरेआड करून समोरच्यांच्या गुन्ह्यांना हायलाईट करत वर्षानुवर्षे तेच तेच वाद घालत रहायचे यामुळे थोडे वेगळे विचार असणारे असल्या चर्चेत पडत नाहीत. पडले की फिल्मी सारखे छपरी आणि विकृत आयडी वैयक्तिक हल्ले करून बाद करायला पाहतात. यांना फक्त आपापल्या पक्षाची बाजू मांडायची आहे. देशहित, समाजहित याच्याशी दोन्ही कंपूंना घेणे देणे नाही. ज्यांना असेल त्यांची माफी.
सुखवस्तू घरातून किंवा "शहरी
सुखवस्तू घरातून किंवा "शहरी" या शब्दातून जे अपेक्षित आहे त्यातून जे कुणी लष्करात भरती होतात ते अधिकारी किंवा मेडीकल,तांत्रिक विभागात भरती होतात. सैनिक म्हणून भरती होण्यासाठी झोपडपट्ट्यातून जातात, पण गुटख्यामुळे दातांच्या तपासणीत रिजेक्ट होतात.
गुटखा?? खरंच ही किंमत करता
.
वाटलंच होतं. कशाची कसली
वाटलंच होतं. कशाची कसली माहिती नसते आणि एखादा खटकलेला शब्द घेऊन हिंमत बिंमत काढतात. एका लष्करी अधिकार्याने फेसबुकवर माम्डलेले मत आहे ते. त्याच्यावर त्या वेळी सडकून टीकाही झाली होती. पण नंतर त्याने आपले म्हणणे सिद्ध केले होते.
दातावरून रिजेक्ट केले असे लिहीले म्हणजे छाती, स्टॅमिना, उंचीवरून रिजेक्ट केले जात नाही असे लिहीले आहे असा अर्थ काढायला मराठीत किती गुण मिळाले होते तुम्हाला ?
किती विचार केला तुमचा तरी
किती विचार केला तुमचा तरी तुम्ही विरोध करतात
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://hindivivek....
वीरूजी , विवेकची लिंक देऊन
वीरूजी , विवेकची लिंक देऊन दात घशात घातलेत तुम्ही. हेच तर संघाचे लोक सांगायचे.
सरकारी नोकर निकम्मा असतो हे सांगताना वरचे सगळे आय ए एस, आय पी एस यांचे कौतुक होते. प्रायव्हेट मधे भ्रष्टाचार होत नाही का ? सरकारी बँकांची कर्जे काढून बुडवली जातात, मल्ल्या सरकारी पैशाने अय्याशी करतो त्याबद्दल ही मंडळी ब्र सुद्धा काढत नाहीत. यांची डोकी अशी घडवलेली असतात कि सरकारी क्षेत्रावर सगळी वाफ काढली कि प्रायव्हेट क्षेत्रामुळे सगळे चांगले होईल. प्रायव्हेट मधे "आपले" असतात, पूर्वी ते सरकार मधे असताना सरकारी क्षेत्र चांगले होते असे पढवलेले असते आणि त्यावर ही मंडळी डोळे झाकून विश्वास ठेवतात.
याच "प्रामाणिक" मंडळींनी निवृत्त झाल्यावर कन्सल्टन्सी फर्म्स बनवल्यात, अनेक सरकारि योजनांना कोट्यवधीचे सल्ले दिले आहेत, त्यांच्या मुलांनी सरकारला लागणार्या सेवा, वस्तू पुरवणारे कारखाने काढले. याची ईडी चौकशी झाली तर निकम्मे कोण हे समोर येईल. सध्या प्रायव्हेट क्षेत्रातला एक भाग सरकारी कर बुडवण्यात आणि कर्ज माफ करून घेण्यात आघाडीवर आहे. सरकारी संस्था घशात घालण्यात आघाडीवर आहे.
याच क्षेत्राला सरकारी खर्चाने प्रशिक्षित सुरक्षा सैन्य पुरवण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. मग निकम्मे तर मोदी शहा पण आहेत.
Pages