समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
>>>>समाजातला जो वर्ग सैन्यात
>>>>समाजातला जो वर्ग सैन्यात भरती होण्याचा असतो तो पूर्वी ही ह्याच वयोगटातला होता व १० किंवा १२ पासच असायचा. हा वर्ग सैन्यात गेला नाही तरी ग्रॅज्यूएट होणारा नसतो. >>>>
- हा वर्ग कितव्या वर्षी रिटायर होतो?
- त्यांना रिटायरमेंट नंतर काय benifits मिळत होते?
- पेन्शन +रिटायरमेंट benifits + te जी काही छोटी नोकरी करत असतील ते त्यावर त्यांचा संसार चालत असेल तर त्यांना ग्रॅज्युएशन ची गरज अजिबात पडणार नाही
पण 25 वर्षाचा काहीही benifits che कव्हर नसणाऱ्या मुलाला पैसे मिळवण्यासाठी काय पर्याय उरतो?
आणि सगळं आधी होतं तसच आहे,
आणि सगळं आधी होतं तसच आहे, फक्त नव्या रुजु होणाऱ्यांना फक्च चार वर्षांतीच हमी अन नो पेन्शन. असं वाटतय वरचा प्रतिसाद वाचून.
>>पूर्वी ही राबवला जायचा नाही व आता ही जाणार नाही.
>>सैन्यात भरती होण्याचा असतो तो पूर्वी ही ह्याच वयोगटातला होता व १० किंवा १२ पासच असायचा.
बाकी शिक्षणा बद्दलचं सगळच ___/\___
अग्निवीरांना द्रायव्हिंग ,
अग्निवीरांना द्रायव्हिंग , केटरिंग , लौंड्रि , केस कापणे इ ज्ञान देणार म्हणे
म्हणजे पूर्वी सैनिक दुसर्या वर्णात होते ,, क्षत्रिय
आता ते चौथ्या वर्णात , शूद्र
(No subject)
They want job security and
They want job security and NOT security job!
धागा वाचणाऱ्या एका नॉन माबो
धागा वाचणाऱ्या एका नॉन माबो व्यक्तीने विचारलेला प्रश्न.
" हे रणजित चितळे ,केतकी चितळे चे कुणी लागतात का? "
प्रश्न वैयक्तिक वाटला तर आधीच sorry म्हणून ठेवतो
(No subject)
" हे रणजित चितळे ,केतकी चितळे
" हे रणजित चितळे ,केतकी चितळे चे कुणी लागतात का? " >>>> आतापर्यंत तुम्ही Filmy इतके थर्डक्लास नसाल असा समज होता. धन्यवाद. विचार नाही पटले कि बदनामी हे बुलिंग मधे मोडतं. कसे का असेनात, त्यांनी एक आर्मी ऑफीसर म्हणून सेवा दिली आहे. तुमच्याप्रमाणे चकाट्या पिटत बसले नाहीत.
सरकारी पगार व पगारवाढ हा
सरकारी पगार व पगारवाढ हा समाजात एक बेंचमार्क म्हणून मानला जातो, म्हणजे सरकारी पगार 5000 वाढले की मग खाजगीतही एक दोन हजार वाढतात.
सरकारी नोकर हेही जनतेचेच भाग आहेत, ते कुणी रोहिनग्या नाहीत.
सरकारी नोकरीतही लायक असेल तरच नोकरीवर ठेवतात , नाहीतर हाकलतात.
लोक आरोप करतात की सरकारी लोक काम करत नाही. कुठले सरकारी कर्मचारी काम करत नाहीत म्हणे?
डॉकटर करतात , नर्स मुलांना डोस देतात , बसचे ड्रायव्हर कनडकटर काम करतात , शाळेत शिक्षक काम करतात , पोलीस काम करतात , पोस्टमन करतात, सैनिक करतात. सरकारी यंत्रणेच्या जीवावरच मोदीजी विश्वातील महान व्हाक्सीनगुरू झाले. त्यांनी सरकारी सफाई कामगारांचेही चरणामृत घेतले होते म्हणे.
उलट , लोकप्रतिनिधीच काम करत नाहीत , पण दोन लाख पगार , पाच वर्षात जन्मभर पेन्शन घेतात.
त्यांना मिळते तर सामान्य लोकांना का मिळू नये ?
2014 पूर्वी कुणालाही पगारवाढ झाली की सर्वाना आनंद वाटत होता. कुणी नोकरीत कायम झाले की आनंद वाटायचा. कुणा ना कुणाला पगार मिळाला तरी तो पैसा समाजातच येणार असतो व इतरांनाही मिळणार असतो.
पण 2014 नंतर द्वेषाचे राजकारण रुजवले आहे, एसटी वाल्याना हाकलले की आरोग्य खात्यातील लोकांना आनंद वाटतो, मग त्यांची पगारवाढ नाकारली की बँकेतील लोकांना आनंद वाटतो, मग ब्यांकातही कर्मचारी कपात सुरू होते , त्याने अजून कुणालातरी आनंद होतो. आता सैन्यातील लोकांना पेन्शन , घर , पगारवाढ नाकारली तर सगळे दिव्यानंदात नाचू लागले आहेत.
समाजाच्या एकेक घटकांचा सरकारी तिजोरीवरील हक्क संपवून त्यांना गुलाम करणे , याची ही सुरुवात आहे.
पुढे शिक्षण घेण्याची इच्छा
पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना बारावीशी समतूल्य प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्यांच्या आवडीने अभ्यासक्रम निवडता येईल
https://www.loksatta.com/explained/explained-agnipath-scheme-what-agnive...
हे कसे जमवणार म्हणे ? बारावी केली तर मार्क लिस्ट मिळते , त्यावर पुढची वेटिंग लिस्ट बनते,
ह्यांना अमुक यांच्या समान माना असे जरी म्हटले, तरी मार्क किती धरणार आणि लाखोंच्या वेटिंग लिस्टमध्ये ह्यांना कुठे ढकलणार ?
आणि आर्ट सायन्स कॉमर्स ह्यात ह्यांना कुठे कसे क्लासिफाय करणार ?
ज्या विविध देशात अग्निपथ
ज्या विविध देशात अग्निपथ सारखी व्यवस्था आहे त्याचे दाखले bjp सरकार आणि काल सैन्य अधिकारी देत होते
त्या देशातील स्थिती आणि भारतील स्थिती वेगळी आहे.
त्यांची आणि भारताची तुलना करता येणार नाही.
ते सर्व देश लोकसंख्येने लहान आहेत तिथे सैन्य service सक्ती ची आहे.
सक्ती सर्वांवर आहे मग तो गरीब असो किंवा श्रीमंत.
अशा देशातील तरुण ह्या सक्ती का वैतागले आहेत.
देश सोडून जात आहेत किंवा आजारी असल्याची खोटी certificate विकत घेवून सैन्यात जाणे टाळत आहेत.
भारतात अशी अवस्था नाही इथे 1 सैनिक हवा असे तर हजार मुल उपलब्ध आहेत स्व खुशी नी सैन्यात जाण्यासाठी.
का?
कारण सैन्यात भरती झाले की आयुष्यात दुसरा उद्योग नाही केला तरी मरे पर्यंत त्याला आर्थिक सुरक्षा आहे.फॅमिली ल सुरक्षा आहे.
मरण जरी आले तरी त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते.
म्हणून आज पर्यंत सैनिक मन, तन एकाग्र करून युद्धात भाग घेत.
हे ४ वर्ष कॉन्ट्रॅक्ट वाले आहेत त्यांची मन स्थिती कशी असेल.
>>>>>ह्यांना अमुक यांच्या
>>>>>ह्यांना अमुक यांच्या समान माना असे जरी म्हटले, तरी मार्क किती धरणार आणि लाखोंच्या वेटिंग लिस्टमध्ये ह्यांना कुठे ढकलणार>>>
सरांनी सांगितले ना एकदा यांना पुढे शिकण्यात इंटरेस्ट नसतो म्हणून, मग कशाला हव्यात तुम्हाला चौकश्या.
विसरलोच होतो
विसरलोच होतो
इथल्या सर्व सरांना आता सर
इथल्या सर्व सरांना आता सर क्रमांक एक, सर क्रमांक दोन असे आकडे किंवा अ आ इ ई, क ख ग घ किंवा अ ब क ड अशी अक्षरे अशी ओळख चिहने द्यावीत. भोळ्या भाबड्या लोकांचा गोंधळ उडतो ना.
सर एकच , म्हणजे धागामालक
सर एकच , म्हणजे धागामालक
इंदिरा गांधींनी संस्थानिकांची पेन्शन बंद केली होती, मोदींनीही सर्व जुन्या लोकांच्या पेंशनीही बंद करून टाकाव्यात.
चितळेंची पेन्शन गेली तर आनंदच वाटेल , राष्ट्रहितासाठी त्याग होईल
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) के अलीगढ़ (Aligarh) स्थित टप्पल इलाके में बीते शुक्रवार, 17 जून को 'अग्निपथ' (Agnipath Scheme) योजना के विरोध में हिंसक प्रदर्शन हुए थे. इस उपद्रव को लेकर पुलिस ने कुछ कोचिंग सेंटर संचालकों को हिरासत में लिया था. उनके ऊपर युवाओं को हिंसा करने के लिए उकसाने का आरोप लगा. खबर है कि पूछताछ के बाद पुलिस ने आधा दर्जन से अधिक कोचिंग सेंटर संचालकों को जेल भेज दिया है. इनमें भारतीय जनता पार्टी (BJP) के एक पदाधिकारी सुधीर शर्मा का नाम भी शामिल है.
https://www.esakal.com/amp/saptarang/sudheendra-kulkarni-writes-narendra...
सैन्य भरती , पोलीस भरतीसाठी क्लासेस चालवणारे आता खपले.
एक रोजगार नष्ट झाला
https://m.facebook.com/groups
https://m.facebook.com/groups/2514200428695387/permalink/5251092728339463/
चितळे सर,
चितळे सर,
मला पेन्शन मिळाली पाहीजे, पण या नवीन लोकांना नको असा अर्थ तुमच्या लेखातून निघतो. नवीन लोकांना पेन्शन बंद व्हायला पाहीजे. ते ही सैनिकांना. अधिकार्यांना कायमस्वरूपी नोकरी चालूच राहणार आहे. आय ए एस, आय पी एस इकडे आता परीक्षा न देता खासगी क्षेत्रातून लोक येऊ शकणार. या नोकर्या चार चार वर्षांसाठी का नाहीत ? जे युपीएससी पास झालेले नाहीत अशांना कशाला कायमस्वरूपी नोकरी ? त्यांना आता पुन्हा पेन्शन सुरू झालेली आहे. एक काय ते धोरण ठेवा ना. एका वरीष्ठ अधिकार्याच्या पगारात दहा सैनिक भरती होतात. पिरॅमिडचा विचार केला तर अधिकारी सक्तीने रिटायर करायला पाहीजेत आणि सैनिकांची भरती केली पाहीजे.
तुम्ही पिरॅमिडचा उल्लेख केला आहे तर पिरॅमिड हा बढतीच्या ठिकाणी असतो. बढतीसाठी सेवा कायमस्वरूपी पाहीजे. भाडोत्री सैनिकांना कशी बढती मिळणार ?
अग्निवीरांना नोकरी देणारे
अग्निवीरांना नोकरी देणारे आनंद महेंद्र यांना मोदी सरकारकडून रिजर्व ब्यांकेत 4 वर्षांची नोकरी लाभली
अभिनंदन
https://www.autocarindia.com/industry/anand-mahindra-venu-srinivasan-joi...
Mahindra Group Chairman Anand Mahindra and TVS Motor Company Chairman Emeritus Venu Srinvasan have been appointed as non-official directors on the Reserve Bank of India (RBI) Central board.
मीडिया,उद्योगपती,सनदी अधिकारी
मीडिया,उद्योगपती,सनदी अधिकारी,आता लष्करी अधिकारी.आणि सरकार.
अशी युती आताच्या सरकार नी केली आहे.
एक प्रकारची गँग च आहे ही.
"मध्य हिंदुस्तानात आणि उत्तर
"मध्य हिंदुस्तानात आणि उत्तर महाराष्ट्रात पेंढाऱ्यांचा त्रास होता. शिंदे, होळकर आणि पवारांचा पाडाव झाल्यावर सुटे झालेले सैनिक पेंढारी लुटारूंना मिळाले. त्यांची संख्या अदमासे ३०,००० असावी. ते अतिशय क्रूरपणा करीत. गावोगावी लुटालूट करून पैसे मिळवीत"
शेजारच्या संस्थळा वरून कॉपी पेस्ट.
Hemant - मग चांगलेच की. सबका
Hemant - मग चांगलेच की. सबका साथ सबका प्रयास.
सिम्बा - आडणाव भगिनी म्हणू शकता
सर धन्य आहात तुम्ही.
सर धन्य आहात तुम्ही.
मध्य हिंदुस्तानात आणि उत्तर
मध्य हिंदुस्तानात आणि उत्तर महाराष्ट्रात पेंढाऱ्यांचा त्रास होता. शिंदे, होळकर आणि पवारांचा पाडाव झाल्यावर सुटे झालेले सैनिक पेंढारी लुटारूंना मिळाले. त्यांची संख्या अदमासे ३०,००० असावी. ते अतिशय क्रूरपणा करीत. गावोगावी लुटालूट करून पैसे मिळवीत">>>>
तद्दन मुर्खपणाची तुलना आहे
तेव्हा सैनिकांना प्रशिक्षण वगैरे काही नसे, कोणीही कुठेही लढत असतं, शत्रू जड जातोय असं वाटल्यास ढु ला पाय लावून पळून जात, तेव्हा तनखा मिळेलच याची खात्री नसे त्यामुळे सैन्य आजूबाजूच्या प्रदेशातून ओरबाडूनच घेत
चितळे sir.
चितळे sir.
आज चा विचार करून चालत नाही.आज चा विचार केला तर .
अग्नी पथ आणि माझा काडी चा संबंध नाही.
मस्त नोकरी आहे मुलगा पण चांगले शिक्षण घेत आहे अग्निपथ त्याला अग्नी पथ ची गरज नाही.
तरी तळमळी नी विरोध करत आहे.
देशात सर्व लोक सुखी असतील ,सर्व गरजा त्यांच्या भागात असतील तर च आपण पण सुखी असू.
पगार कमी होणे,आवशकय इतके पैसे न मिळणे आणि .
गुन्हेगारी,खून,ह्या संबंध आहे.
आज आपण चूक केली तर पुढची आपलीच पिढी त्याचे परिणाम भोगेलं .
कोणत्याच स्थिती मध्ये राज्य घटनेची chokat अनधिकृत पने modata कामा नये.
नाही तर ते देश साठी खूप धोकादायक ठरेल.
Press Trust of India
Press Trust of India
@PTI_News
Agnipath scheme: We will compress training timeline without compromising on quality, says Navy official
म्हणजे आतापर्यंत टाइमपास चालायचा?
जेव्हा हातातले ठराविक उत्पन्न
जेव्हा हातातले ठराविक उत्पन्न सुटते तेव्हा माणूस काहीही करून त्यातला थोडा अंश तरी परत मिळविण्याच्या मार्गाला लागतो. शिंदे होळकरांकडे प्रशिक्षित सैन्य होते आणि वेळोवेळी पेंढा ऱ्यांची मदतही घेतली जात असे. जनकोजी राव शिंदे दुसरे ह्यांच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर संस्थानात अंदाधुंदी माजून जनानखान्यातून कारभार सुरू झाला. आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला ग्वाल्हेर संस्थान ब्रिटिशांनी हस्तक्षेप करून जिंकले. तहामध्ये संस्थानाची १०००० च्या आसपास असलेली फौज कमी करून तीन हजारांवर आणली. हे कमी करण्यात आलेले सैनिक सैन्यात त्यांचे आधीच सहकारी असलेल्या पेंढाऱ्यांकडे गेले. पुढे आणखी एका तहात सैनिकांची संख्या ब्रिटिशांनी ५००० पर्यंत वाढवली खरी पण पेंढारी आणि जुने सैनिक ह्यांचे सख्य राहिलेच.
प्रतिसाद लांबलचक झालाय. क्षमस्व.
होळकरांकडेही साधारण असेच घडले. विगतवार लिहीत नाही. प्रतिसाद लांबेल.
Agnipath: Data shows veterans
Agnipath: Data shows veterans fail to find govt jobs after retirement
Even as Union ministers allay misgivings over Agnipath, figures show a meagre 2.4 per cent of the ex-servicemen who applied for a government job could get one as the Centre and the states have been unable to recruit against the reserved quotas
Public sector undertakings (PSUs), ministries, and officials of Sainik Boards have blamed it on the lack of skill among ex-servicemen. They say veterans’ inability to qualify in selection exams is one of reasons for this.
Also, non-recognition of qualifications obtained from the military are reasons why their recruitment has remained significantly low, pushing them towards low-skill jobs.
https://www.business-standard.com/article/current-affairs/agnipath-data-...
खरे सत्य.
खरे सत्य.
कोणत्याच राजकारणी लोकांवर विश्वास ठेवू नका.
कोणत्याच धर्माचा अभिमान बाळगू नका.
कोणत्याच देशाचा अभिमान बाळगू नका.
लवचिक रहा.
जो आपला फायदा करेल तो आपला.
मग तो व्यक्ती असू,धर्म असू ,किंवा देश असू.
फालतू निष्ठा ठेवण्याची गरज नाही..
अग्निपथ मध्ये जा हत्यार चालवायला shika.
आणि हत्यार चे licence ghya aani नोकऱ्या,उद्योग,व्यवसाय मिळवा.
कोणाची मेहेरबानी घेण्याची गरज नाही
सैन्यात जाउ पाहणारे
सैन्यात जाउ पाहणारे चिंताग्रस्त आहेत, कारण जी नोकरी कायमस्वरूपी, हक्काची म्हणून तिची ते तयारी करत होते, ती आता चारच वर्षांसाठी. पुढे काय ?
जनता चिंताग्रस्त आहे ते यासाठी, कि एकदा जवान भर्ती झाला कि निवृत्त होताना पैशाची व्यवस्थित तजवीज झालेली असते, घरचे प्रश्न सुटलेले असतात, समाधानी जवान असतो. तोच चार वर्षात बाहेर पडला, प्रश्न आ वासून पुढ्यात असतील आणि शस्त्र चालवण्याचं ज्ञान असेल... काय होईल ?
Pages