अग्निपथ

Submitted by रणजित चितळे on 17 June, 2022 - 02:56

समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.

सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.

आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बेरोजगारी भयन्कर आहे हे मलाही दिसतेय आजुबाजुला. त्याच वेळेस कामे करायला माणसे मिळत नाहीत ही रड सुद्धा आहेच. यावर उपाय काय? जे उपलब्ध आहे ते काम त्या वेळेस करायचे.
बबल बबल की काय तो ह्यालाच म्हणत असावेत. उद्या ह्यांच्या शेतीची कामे करायला मजूर मिळाले की ह्यांच्या दृष्टीने देशातली बेरोजगारी गायब.
अजून पॉकेटमनी, पोस्ट ग्रॅड, एम बी ए आहेच

<< Proud चेव वगैरे काही नाही हो! लाखो ग्रॅज्युएट
बेकार आहेत. त्याहून अधिक मुलांना दहावी बारावीनंतर शिक्षण सोडावे लागत आहे. त्यांच्यापुढे अंधार आहे. ही जी दहावी बारावी करून मोकळी होणारी मुले आहेत त्यांना एक हमखास व बऱ्यापैकी पगार, विमा, शेवटी एक ठीकठाक रक्कम वगैरे मिळून नंतर इतर काही करण्याचा मार्ग खुला राहणार आहे. काहींना सैन्यातच घेणार. टीव्हीवर तरी , राजकीय पक्षाशी संबंध नसलेलेही तज्ञ, सैन्यातील ज्येष्ठ किंवा निवृत्त अधिकारी हे लोक योजनेच्या बाजूने बोलत आहेत. ते सगळे ठार चुकीचे आहेत असा येथील सूर आहे.
एरवी या मुलांनी जे इतर मार्ग निवडले असते त्यात पगार, चार वर्षे नक्की नोकरी यांची खात्री नसती. कएक प्लेसमेंट सेल्स ना कॉम्प्युटर इंजिनियर नोकरीला लावताना पंधरा हजारहून अधिक स्टार्ट मिळत नसतो.
Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2022 - 00:04 >>

-------- कॉम्प्युटर इंजिनियर नोकरीला लावताना किती कमी स्टार्ट असतो पण या दहावी झालेल्यांना ३०,००० महिना आणि चार वर्षे नक्की नोकरी... तुलना अजिबात पटली नाही. लाखामोलाचा जिव गमवावा लागण्याची शक्यता दोन्ही जॉब मधे सारखी नाही आहे हा मोठ्ठा फरक आहे. " शहिद " झाल्यावर ४८ लाख दिले काय किंवा दोन कोटी करायचे काय त्याचे?

अग्निविर या गोंडस नावाखाली, हतबल/ लाचार/ अशिक्षित/ आर्थिक दृष्टीने गरिब अशा तरुणांचे शोषण होणार आहे...

. बेफिकिर.
हे निर्लज्ज सरकार आहे.त्यांना लोकांच्या भावना समजून च घ्यायच्या नाहीत..
CAA विरोधात किती तरी दिवस लोक शांतेत आंदोलन करत होते..
पंतप्रधान किंवा संबंधित मंत्री ह्यांनी लोकांचे आक्षेप समजून घेतले का दुर्लक्ष केले.
शेतकरी आंदोलन पण शांततेत चालू होते.
पंतप्रधान आणि संबंधित मंत्री ह्यांनी काय प्रतिसाद दिला.
आणि अजून एक ह्या सरकार ची खासियत आहे.
गृहविभाग चा प्रश्न असेल तर त्याला अर्थ मंत्री उत्तर देणार.
रेल्वे चा प्रश्न असेल तर विदेश मंत्री उत्तर देणार.
ज्या खात्याचा प्रश्न आहे त्या खात्याचा मंत्री उत्तर च देणार नाहीं

<< पंतप्रधान आणि संबंधित मंत्री ह्यांनी काय प्रतिसाद दिला.
आणि अजून एक ह्या सरकार ची खासियत आहे.
गृहविभाग चा प्रश्न असेल तर त्याला अर्थ मंत्री उत्तर देणार.
रेल्वे चा प्रश्न असेल तर विदेश मंत्री उत्तर देणार.
ज्या खात्याचा प्रश्न आहे त्या खात्याचा मंत्री उत्तर च देणार नाहीं >>

----- कुठल्याही महत्वाच्या प्रश्नावर पंतप्रधान मौन बाळगतात. मग ते चीनने केलेले आक्रमण असेल, शेतकर्‍यांचे अनेक महिने चालणारे आंदोलन असेल किंवा नुपूर शर्मा यांचा थयथयाट असेल. त्यांच्यासाठी, शेतकर्‍यांशी बोलणी करण्यापेक्षाही महत्वाची कामे आहेत जसे मोराला दाणे भरवणे.

Press Trust of India
@PTI_News
MHA sanctions VIP security cover of CRPF to 10 Bihar BJP leaders in view of threats to them by Agnipath protesters: Officials

बिहारमध्येच एका भाजप कार्यालयाला आग लावली गेली ना? तिथे राष्ट्रपती राजवट का नाही लावत?

त्यांच्यासाठी, शेतकर्‍यांशी बोलणी करण्यापेक्षाही महत्वाची कामे आहेत जसे मोराला दाणे भरवणे.>> सरळ सरळ आरोप आहे हा. ते योगा करतात, मन की बात करतात, अक्षय ला मुलाखती देतात, त्यांच्या आणि कॅमेऱ्यामध्ये कोणी आला तर त्याला बाजुला करतात....

चार वर्षानंतरचा विचार आहे काही..
जरी बळजबरीने ही योजना लादली गेलीच, तर चार वर्षांत काय अराजकता माजेल सैन्यात, याचा विचार कोणी करत नाही, सैनिकांच्या मनात हिनतेची भावना रुजली जाईल .
कुठल्या निकषांवर ठरवणार कुठले २५% ठेवायचे, सैन्यात सुद्धा कमी
जास्तपणाची भावना असते का, सैन्यात भेदभाव केव्हापासून सुरू झाला
आहे ते ४ वर्ष सैनिक देशसेवेत नाही तर चढाओढीत घालवतील, टिकुन राहण्याच्या शर्यतीत घालवतील, न जाणो कोणाला जीव ही गमवावा लागेल.
आणि मग पुन्हा मायबोलीवर धागा निघेल- आजकालची सैन्याची परिस्थिती

<< न जाणो कोणाला जीव ही गमवावा लागेल. >>

----- कोणावरही जिव गमावण्याची परिस्थिती यायला नको. तशी वेळ आलीच तर लाचार पुढारी लोक त्या गेलेल्या जवानांच्या बलिदानाच्या नावानेही मतांची भिक मागतील. पुलवामा स्फोट ताजे उदाहरण आहे.

स्वदेशी च्या नावाखाली सैन्याला लागणारी हत्यार बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना मिळवून दिले.
दर्जा काय आहे ह्याला काही अर्थ नाही.
आपलेच सरकार आणि आपलीच माणसं दर्जा ठरवणार आहेत.
लुटा देश.
सरकारी कंपन्या आहेत, heavy industries सरकारी मालकीच्या आहेत.
काँग्रेस नी सर्व तयार करून ठेवले आहे.
ह्यांनी ह्याच सरकारी उद्योगांना बळ देण्याचे सोडून मित्रांचे भले केले.
मित्र प्रसाद म्हणून परत परम मित्राला नक्की प्रसाद चढवतात.
आता हे चार वर्षाचे जवान ही योजना लागू करण्यात यश आले .
की ह्यांचे कॉन्ट्रॅक्ट पण मित्रांना दिले जाईल.
एका जवान पाठी महिना एक लाख सरकार मित्रांना देईल आणि मित्र 20 हजार जवानांना महिना देतील.
प्रसाद मित्र देतील च नंतर.
जनतेने विरोध केला की ही खासगी सेना जी सरकारी पैशाने च उभी असेल ती जाणते विरुद्ध वापरली जाईल.
सर्व टीव्ही चॅनल,सर्व प्रिंट मीडिया ह्यांची अवस्था ह्यांनी काय केली आहे.
फक्त सरकार चेच गुणगान गायचे असा आदेश आहे.
तसे वागले नाही तर.
घर गडी cbi,ed, आहेच उपाय करायला .

आश्चर्य काँग्रेसचे वाटते. शेटजी इतके मुद्दे देत असतानाही यांचा परिवारावर भरोसा. अरे आता तरी बाळराजाचा आणि त्याच्या बाळलीलांचा नाद सोडा आणि मैदानात उतरा.

काय राव, काहीतरी उद्बोधक चर्चा होईल अन काहीतरी ज्ञानवर्धक वाचायला मिळेल ही अपेक्षा पण आजकाल सोशल मीडिया अन त्यातही मराठी जालावर दुर्मिळ झाली ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला, सगळीच टोटल कर्कश्य झाली.

जेम्स बाँड..
अग्निपथ च फायदा ,11 लाख 23 लाख ह्या वर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.
अग्निपथ मुळे सैन्याचा दर्जा किती खाली जाईल.

ही योजना आणायचा नक्की हेतू काय.
ह्या योजनेत कोण कोण हात धुवून घेईल.
ह्या वर तुमचे मत मांडा...इथे 11 लाख 23 लाख मोजायला आम्हाला वेळ नाही
त्या मुळे लाखावर बोलू नका.

धागा पूर्ण वाचला,
जेम्स वांड मुद्देसुद पोस्ट लिहिली आहेत.

साधना आणि बेफिकीर, तुम्ही मुद्देसुद चर्चा करायचे म्हणता, मग जे वां च्या पोस्ट ला 1-1 उत्तर का देत नाही?
जे मुद्दे क्लिअर नसतील किंवा ज्यांचा डेटा तुमच्याकडे नसेल ते मोकळे ठेवा, जो मुद्दा चुकीचा वाटेल तिकडे तुमचे मत लिहा.
Fair enough??

उगाच कोणतातरी दुय्यम महत्वाचा मुद्दा घेऊन त्यावर तिरकस प्रतिसाद दिल्याने विषय तर पुढे सरकत नाहीच, उलट तुमच्यावर "एक भूमिका घेऊन लिहिण्याचे" आरोप होतात.

रच्याक, व्हाइटhat म्हणजे सनव असे पहिल्या काही पांनात कळले, हे खरे aahe kaay?

भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय इंदौरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "..जर भाजप ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक ठेवायचं असेल, तर मी अग्निवीरांना प्राधान्य देईन."

चला हे एक बरे झाले, निदान भविष्यात काय आहे हे बोलले
आता तरुणांनी आंदोलन मागे घेऊन लष्करात भरती व्हावे
सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा

भारताची लोकशाही ची चौकाट आज तुटून पडली
भारताच्या राज्य घटनेचा आज पराजय झाला तरी रामदास आठवले मंत्री म्हणून च आहेत.
सरकारी योजनेवर सरकार नीच बोलणे गरजेचे होते.
आज तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जाहीर रित्या सरकारी योजनेवर बोलत आहेत.

लष्कराने असे कृत्य कधीच केले नव्हते.
सरकारी योजनेवर लोकनियुक्त सरकार शिवाय कोणीच बोलणे अपेक्षित नाही.
भारताची वाटचाल पाकिस्तान च्या दिशेने तर होत नाही ना.

कठीण आहे! किती ही असंवेदनशीलता.

ह्या विजयवर्गीयांचाच मुलगा ना तो बॅटने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धोपटत होता? तो सध्या काय करतो?

बिनडोक भक्त सोडले तर आज सर्व हिंदू ज्यांनी धार्मिक उन्माद लं बळी पडून bjp ल मत दिले त्या सर्वांना आज पश्र्चाताप होत असेल.
आर्मी ऑफिसर देशाच्या निती वर बोलू लागले.
जे स्वतः पन्नाशी मध्ये आहेत आणि तरुण आर्मी हवी असे सांगत आहेत.

‘अग्निपथ योजना रद्द होणार नाही’; तीनही सैन्यदल प्रमुखांनी केले स्पष्ट

हे जे घडतं आहे ते देश साठी अती धोकादायक आहे.
विरोधी पक्षांनी सर्व मतभेद विसरून एक होणे गरजेचे आहे.
परत देशात ही लोक कधीच सत्तेवर येता कामा नयेत.

सैन्यात असे दोन वेगवेगळे प्रकार नकोत. आधीची रिक्त पदं भरली तर बेरोजगारांना नोकरी मिळेल.
देशांतर्गत दंगे, नैसर्गिक आपत्ती, आग, भूकंप अशा वेळी मदतकार्य करण्यासाठी आधीपासून होम गार्ड नावाची संस्था आहे. हे स्वयंसेवक असतात आणि त्यांना पगार नसतो. जर अशा प्रकारच्या कामांसाठी अग्निवीरांची भरती करणार असतील तर त्यापेक्षा होमगार्ड्स ला वेतन देऊन त्यात एन सी सी केलेल्यांना प्राधान्य द्या.

Pages