तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@aashuchamp - हो मज्जा पण याय ची, पण रहाणाऱ्या करता असा वाडा म्हणजे खूप काम असतं.
आधी मातीची जमीन , भिंती म्हणजे नियमित सारवण, खूप मेंटेनन्स लागतो, ओल येते. ओवर ऑल घट्ट बंद होणाऱ्या खिडक्या वगैरे नसतात सो वारा/छोटे प्राणी ह्यांचा त्रास होऊ शकतो..

अंधार पण सारखा नकोसा वाटतो.

आई एकदा माझ्या लहान असलेल्या कझिन laa रात्री टॉयलेट ला घे ऊन गेली. हे आवाडा मध्ये होत.. तिला उचललं, तर कोपऱ्यातल्या नागाने फणा काढला... घरात तीन ल हान मुलं आणि आ ई. माझी आ ई अतिशय स्ट्राँग आहे, पण ती पण घाबरलेली त्या दिवशी. देवघरात घुसून गीतेचा अकरावा अध्याय म्हणत बसली मग!

नंतर टॉयलेट घराच्या पुढच्या भागात, एका बाजूला बांधलेले, पण मुख्य घरात नव्हतेच, रात्री भीती वाटायची मला तरी.. मग मोठ मोठ्यांदा गाणी म्हणाय चे ..lol
बाकी कधी भीती वाटायची नाही , दिवसभर बऱ्याचदा एकट्याच असायचो मी आणि ताई किंवा आमच्यातली एकच जण तरी.
खालीच 7 खोल्या /+ देवघर + अंगण वगैरे होत, आणि वर 4..
We miss that house, pan आत्ताचे पण asthetically सुंदर आणि सोयीचं झालं आहे घर. आटोपशीर आणि जरुरी इतके.

हिरा तुम्ही विनाकारण लांबलचक पोस्टीं लिहून विषय वाढवत आहात

सरांनी आमच्याकडे नाग आणतात आणि पिशवीतून सोडतात हे लिहिलं होतं
ते हेतुपुरस्सर लिहिलं होतं
नाग जिवंत प्राणी असतात आणि आहेत आणि हे पिशवीतून सोडतात
गणपती किंवा अन्य कोणी नसतात
त्यामुळे त्यांनी अमच्याकडे गणपती सोडतात, ओततात, सांडतात, वाढतात असे काहीही म्हणलं असतं तरी अय्या खरे गणपती का असे कोणाला वाटलं नसतं
इथं उगाच गणपती काय आणि शीलवणे काय असले फाटे कशाला फोडत आहात
उगाच आपलं काय तरी

अजून एक - घर जेवढं मोठ तेवढा राबता जास्त!
सतत पाहुणे आणि येणारी जाणा री लोक असायची..
आ ई 9 ची गाडी गाठायची तरी सकाळीच 4- 5 वेळा कमीत कमी chahaa व्हायचा.. सकाळी आणि संध्याकाळी गप्पा मारायला म्हणूनही regular लोक असायचे+ रहायला येणारे पाहुणे.

जाणयेणं अजूनही भरपूर असतं, पण पूर्वीपेक्षा कमी Lol

एकदा नाग सापाला म्हणाला, 'ए सापड्या'. त्याला काही उत्तर देण्यापूर्वी सर्वांना हा पानचट जोक माहीत आहे ह्या विचाराने सापाला कल्चरल शॉक बसला. चला पुढे.

>> त्यांनी टोपली ठेवली तर ते सळसळ करत पळून गेलं!

हे कथन अजून पुढे सुरू रहायला हवे होते. असं वाटत होतं की नाग कसा पकडायचा याचे वर्णन येईल पुढे. वाडा प्रकरण फार इंटरेस्टिंग असते. मी काही वाडे पाहिले आहेत ज्यांच्या भिंतीची जाडी आताच्या एखाद्या छोट्या खोलीइतकी असेल. गूढता तर माहेरवाशीणच असते अशा ठिकाणी.

>> गंज भरून पाणी ठेवलंय तापवायला
गंज शब्द अनेक वर्षांनी ऐकला. माझ्या लहानपणी पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जे छोटे पिंप असते (शक्यतो स्टेनलेसस्टीलचे) त्याला गंज म्हणत. आणि न्हाणीघरातला तो बंब. आता ह्या गंजाची जागा फिल्टर् ने व बंबाची जागा गिझरने घेतली. आता स्वयंपाकघरात शिजवलेले अन्न, दूध इ. ठेवण्यासाठीचे जाळीचे कपाट (फडताळच शब्द ना?) सुद्धा बघायला मिळत नाहीत. फ्रीज एवढे मोठे आलेत की फ्रीजच फडताळसारखा वापरला जातोय आजकाल.

हिरा तुम्ही विनाकारण लांबलचक पोस्टीं लिहून विषय वाढवत आहात.
सरांनी आमच्याकडे नाग आणतात आणि पिशवीतून सोडतात हे लिहिलं होतं
ते हेतुपुरस्सर लिहिलं होतं>>> +१.

माझ्या लहानपणी पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जे छोटे पिंप असते (शक्यतो स्टेनलेसस्टीलचे) त्याला गंज म्हणत>>>>> अजून एक शॉक Lol कारण गंज म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ताकाचा गंज येतो. ती नागपूरवाली म्हटली तेव्हाही तसंच झालं होतं.

नागपंचमीला आमच्या गावी आई ज्वारीच्या लाह्या करत असे. त्या लाह्या, हळदी- कुंकू वाहून वारूळाची पूजा आणि मग माहेरवाशीणी झोके खेळत असत. आदल्या दिवशी पंचमीची खरेदी मुली करत, मेंदी, बांगड्या, नेलपेंट वगैरे. माहेरवाशीणींचा हा आवडता सण, नटून थटून अनेक खेळ खेळत. तसेच नाभिक जमातीसाठी मोठा उत्सवाचा सण असतो हा. नागपंचमीच्या कहानी वाचली जाई. आणि मुले पतंग उडवत. पतंग नागपंचमीला पुण्यात कुणीच उडवत नाही हे पाहून आधी शॉक बसला होता.
मला नागपंचमी न आवडण्याचे एक कारण म्हणजे त्या दिवशी चिरत, भाजत नाहीत म्हणून उकडीचे पुरणाचे उंडे केलेले असत, जे मला आजिबातच आवडायचे नाहीत. आणि दुसरे म्हणजे पतंग खेळताना मी गावच्या बारवेत पडलो होतो आणि एका मुलाने उडी मारून मला वाचवले होते.
ज्यांना भाऊ नाही अशा बायका नागाला भाऊ मानून प्रार्थना करतात.

आणि दुसरे म्हणजे पतंग खेळताना मी गावच्या बारवेत पडलो होतो आणि मरता मरता एका मुलाने उडी मारून मला वाचवले होते.
मरता मरता??? म्हणजे तो मुलगा मरत होता पण त्याने वाचवले.
सॉरी (एस ओ आर आर इ) पुंबाजी. इतकं भरकटवताय सगळेच. म्हटलं तुमच्या कडुन एक टायपो झालाय तर आपण पण भरकटायला (धाग्याला) मदत करावी.

अजुन एक असंबद्ध प्रतिसाद -

मन्गला बर्व्यांच्या अन्नपुर्णात घेवर तळायला गन्ज वापरा असे लिहिलेय. आता हा अजुन कुठला गन्ज?
मला लोखंदाला चढणारा गण्ज फक्त माहित आहे.

ताकाच्या व इतर भांड्यांसाठी तकली, डीचकी, पातेलं, भुगूनं इत्यादी शब्द होते. Lol यातला भुगूनं शब्द एकदा एका हिंदी चित्रपटात आला होता ते पाहून मौज वाटली होती. शब्द म्हणजे त्या त्या भागातले कल्चर असते (हूश्श! कल्चर शब्द आला Proud )

डेचकी अल्युमिनियम ची असायची ना?
गंज आमच्याकडे ताकासाठी असतो, उभट पातेले

आताच्या पिढीला तर कल्हई प्रकार कळणारच नाही

त्यामुळे त्यांना डोक्याला कल्हई सांगूनही उपयोग नसतो

भ(भु नाही बहुदा)गूनं सांगली भागात ऐकला आहे जे भाजीला वापरतात. डीचकी वेगळी तिचा आकार पण वेगळा असतो अल्युमिनियमची असते आणि ती.
मन्गला बर्व्यांच्या अन्नपुर्णात घेवर तळायला गन्ज वापरा असे लिहिलेय>>असे काही असेल तर वाचायला हवे. घेवर चा आकार बघता गंजात कसा बनेल तो, जाळी कशी पडेल??

टीव्ही कुकरी शोमध्ये घीवर गंजात तळलेला पाहिला आहे.
वरूनसुद्धा गरम तुपाची धार सोडतात बहुतेक.

माझी आई कोकणातली. तिचं ही एक भगुणं आहे.

अरे भगोणे/ भगुने हे हैद्राबाद कडे खूपच कॉमन शब्द आहे. कोकणात टोप म्हणतात तसे भाताचे भगुणे असते. तिथे हरबर्‍याला हरी बूट म्हणतात. पहिल्यांदा ऐकले तेव्हा हा काय बूट हिरव्या रंगाचा अस्तो बरे असे वाटले होते. डेगची म्हणजे बहुतेक पसरट भांडे असावे ज्यात बिर्या णी लावून सील करतात दम साठी. अल्युमिनिअमचे ठोक्याचे भांडॅ. खालून मातीने लेपतात.

ताकाचा गंज असतो तसाच पाच पट मोठा साधारण स्टीलचा गंज असतो व मिळतो हैद्राबाद कडे दुकानातुन. मला हा लग्नात आहेर म्हणून आला होता व मी तो वर लिहिल्या प्रमाणॅच अंघोळीचे पाणी तापवायला कायम वापरला आहे. आच सर्व बाजूने लागते व पाणी लवकर तापते. दहा मिनिटात. व नॅपकिन ने उचलून बकेटीत ओतायला सोपे जाते.

मी शाळेत असताना शेजारी एक कुटुंब होते. त्यांची मुले लहान होती. त्या काकूंच्या बोलण्यात "मी मुलाला/मुलीला चारून येते" असं यायचं. तेव्हा खूप आश्चर्य वाटले होते. माणसाला जेवण भरवण्याला चारणे हा शब्द तेव्हा पहिल्यांदाच ऐकला. तोपर्यंत चारणे, चरणे फक्त जनावरांसाठी वापरतात असे वाटायचे.

सांगली मिरज कडे लग्नाचा बस्ता बांधायला "कपडे काढणे" असे म्हणतात. "याद्या झाल्या, आता चला कपडे काढायला ! " हे वाक्य ऐकून क शॉ बसला !

साधारण गारुडी किंवा सर्पमित्रसुद्धा साप जाड पिशव्यांमधूनच वाहून नेतात, आणि "सोडणे" हे क्रियापद जिवंत सापालाच जोडून वापरले जाण्याची शक्यता आहे.

बाकी, नागपंचमीला तरी स्वतः ऐवजी इतर कुणाची पूजा करतोय हा माणूस हे वाचून मला क शॉ बसला.

गर्दीत साप सोडणे आणि, धाग्यावर अभिषेक येणे हे समानार्थी वाक्प्रचार आहेत.

माणसाला जेवण भरवण्याला चारणे हा शब्द तेव्हा पहिल्यांदाच ऐकला. ..... हा बहुतेक सातारा साईडचा असावा
माझी शेजारीण विट्याची होती.ती हा शब्द बरेचवेळा उच्चारत असे.दरवेळी मला अकारण कसंसच व्हायचे.

आता चला कपडे काढायला ! >>> Lol

मी मार्चमध्ये भारतात गेले होते. तिथे कपड्यांच्या दुकानात गेले असताना काऊंटर समोर फक्त स्टूल होते तेही मोजकेच, तिथे लोक लग्नाची खरेदी करायलाही येतात , तीन चार मजली दुकान, दुकानात लिफ्टही आहे पण बसायची सोय नाही. मी मैत्रिणीला म्हटले 'बस्ता कसा घ्यायचा मग न बस्ता' Proud तर हे ऐकून मदतनीस हसायला लागला.
बस्ता म्हणजे मस्त गाद्यांवर बसून तासनतास चर्चा, हे पातळ कुणाला आवडेल, धोतर जोडा ऐवजी धोतराचं पान दिलं तर तात्या मागच्या वेळेसारखे रूसतील का इ इ, चहा/उसाचा रस पित-पित केलेली खरेदी , ती मजा स्टूलावर कशी येणार !!
स्टूल बघून मला क शॉ बसला , नियमानुसार कल्चरल शब्द आणलाय.

बस्ता न बस्ता. वाह! Lol

"मुलाला चार/पाज" हे को-सा-सां ग्रामीण भागात विशेषतः मागच्या पिढीतल्या लोकांत कॉमन होते.

मी शाळेत असताना शेजारी एक कुटुंब होते. त्यांची मुले लहान होती. त्या काकूंच्या बोलण्यात "मी मुलाला/मुलीला चारून येते" असं यायचं..>>>

माझे पुण्यातले काका तसे एखाद्या व्यक्तीला (बस stop वर वगैरे) सोडून येणे याला 'घालवणे' म्हणतात! उदा. एकदा आम्ही त्यांच्याकडे जायच्या थोडा वेळ आधी त्यांच्या सुनेचे आई-वडील आले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते म्हणाले, आत्ताच हिचे (सुनेचे नाव) आई-बाबा आले होते, त्यांना घालवून आलो!' मी शॉकड्!! मनात म्हटले, "बिचारे आपल्या मुलीचा संसार कसा सुरु आहे ते पाहायला आले असतील तर त्यांना असे 'घालवून' का द्यायचे???' नंतर बोलता बोलता त्यांच्या नातीबद्दल म्हणाले की, हिची सकाळी अमुक वाजताची शाळा असते मग तिला अमुक वाजता 'घालवतो' तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की 'घालवणे' म्हणजे सोडून येणे!!!

गंज मला ताकाचा आणि दुसरा गंजते वस्तू त्यातला एवढंच माहितेय.

श्रीरामपूरला चारणे आणि भगुले ( न किंवा ण नाही शेवटी, ल ) हे शब्द मी पहिल्यांदा ऐकले.

गंज 1) चहा करायचा, भाजी करायचा 2) लोखंड गंजने.या अर्थाने आमच्या भागात वापरला जातो. उभट भांड्याला दूध किंवा ताकाचं भांडं म्हटलं जातं.

Pages