Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोडायचे वरून गोंधळ झाला असेल
सोडायचे वरून गोंधळ झाला असेल तर एखादा समर्पक शब्द सुचवा. मी पुढच्यावेळी तो वापरेन>>>
किती भाबडे असल्याची पराकाष्ठा कराल सर?
तुम्ही लिहिलेलं तुम्ही वाचता का कधी ?
नसाल वाचत तर वाचत जावा अधूनमधून
ओके मी मुद्दाम मुर्ती हा शब्द
ओके मी मुद्दाम मुर्ती हा शब्द वापरला नाही आणि सोडायचो हा शब्दही मुद्दाम वापरला कारण लोकांना आम्ही खराखुरा नाग घरी आणायचो असे वाटावे.
चला आता जाऊया पुढे...
असेच प्रामाणिकपणे आपल्या थापा
असेच प्रामाणिकपणे आपल्या थापा कबूल केल्यात तर शिव्या खायची वेळ येणार नाही सर
अजूनही सुधरू शकता तुम्ही, बघा प्रयत्न करून
ओके आशूचॅम्प.
ओके आशूचॅम्प.
उद्याच सर्व थापा कबूल करणारा धागा काढतो
गूड नाईट
नागपंचमीला नागाची मुर्ती आणून
नागपंचमीला नागाची मुर्ती आणून पूजा करतात हे मी फार उशिरा बघितले. माहेरी बाबा पाटावर चंदनाने नाग काढायचे आणि त्याची पुजा करायचे, तो पाट रात्रभर चाळीत असणाऱ्या झाडात, नंतर गॅलरीतलया रोपाच्या कुंडीजवळ ठेऊन विसर्जन. इथे आम्ही तांब्याच्या नागाची पुजा करतो (नवरा करतो ह्याची पुजा), जो देव्हाऱ्यात आहे. मी नाग नागिण, तीन पिल्ले अशी छोटी रांगोळी काढून त्याची पुजा करते.
आपसूक माझा गणपती पाळला जातो.>
आपसूक माझा गणपती पाळला जातो.>>>>> खूप जास्त खटकलं कानाला. खरचं वाचत जा प्रतिसाद.
आमच्या इथे पण कर्नाटक येथील
आमच्या इथे पण कर्नाटक येथील कुलकर्णी आहेत ते त्याच दिवशी विसर्जन करतात. >>> भारीच. तेच तर नसतील ना. आता ना सो सोडून वीस वर्ष झाली त्यामुळे तिथले माहिती नाही, जुने बरेच जण ना सो सोडून इथे तिथे शिफ्ट झालेत.
तो पाट रात्रभर चाळीत असणाऱ्या
तो पाट रात्रभर चाळीत असणाऱ्या झाडात, नंतर गॅलरीतलया रोपाच्या कुंडीजवळ ठेऊन विसर्जन. >> पाट विसर्जित करतात? हा क शॉ आहे माझ्यासाठी.
हाहाहा. म्हणताना असंच
हाहाहा. म्हणताना असंच म्हणतात पण तो पाट परत घरात आणतात, पाटावर काढलेल्या नागांचे विसर्जन झालं असं समजतात.
अच्छा, मग ठीक आहे. मी तो क शॉ
अच्छा, मग ठीक आहे. मी तो क शॉ गिळून टाकतो.
ऋन्मेऽऽष हा आयडी कैच्याकै आहे
ऋन्मेऽऽष हा आयडी कैच्याकै आहे. ह्यांचे प्रतिसाद गाळून वाचायची सोय आहे का?
Submitted by अमरेंद्र बाहुबली on //
कोणताही प्रतिसाद वाचताना आधी खाली स्क्रोल करून प्रतिसादकर्त्याचं नाव बघायचं. आणि त्यानुसार ठरवायचं की प्रतिसाद वाचायचा अथवा नाही. यामुळे खूप वेळ वाचतो, निरर्थक प्रतिसाद skip करता येतात.
नागाची मूर्ती घरी आणून तिची
नागाची मूर्ती घरी आणून तिची पूजा सातारा साइडला पण करतात. बेंदराला बैल जोडी, हरितालिकेला गौरीच्या बाहुल्या मिळतात तश्या नागाच्या मूर्ती मिळतात बाजारात. पूजा करून दुसऱ्या दिवशी नदीत, तलावात विसर्जन करतात. काहीजण तुळशीच्या कुंडीत ठेवून देतात मूर्ती आणि त्यालाच विसर्जन केले असे म्हणतात.
माझ्या सासरी नाग चतुर्थीची पूजा पण करतात. तेव्हा देवाजवळ नागाची रांगोळी काढून पूजा करतात. घरातही जागोजागी नागाची रांगोळी काढतात. मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, एकदोनदाच बघितले आहे.
सर तुमच्या लहानपणी दिवाळीत
सर तुमच्या लहानपणी दिवाळीत खरा नरकासुर पण आणला असेल ना>> rofl
अमेरिकेतल्या क शो वरून -
अमेरिकेत अनेक राज्यात लग्नाचे मिनिमम वय नाही आणि काही कम्युनिटी त्याचा मुलींचा बालविवाह करायला दुरुपयोग करतात हे कळल्याने धक्का बसला.
गर्भपात विरोधी मंडळी आणि कायदा हा तर अत्यंत बावळटपणा आहे .. आणि it's really sad
“ सर तुमच्या लहानपणी दिवाळीत
“ सर तुमच्या लहानपणी दिवाळीत खरा नरकासुर पण आणला असेल ना” - म्हणजे? मी तर नरकासुराचा वध सरांनीच केला ह्या समजुतीत होतो.
ऋन्मेश जे लिहतो त्या
ऋन्मेश जे लिहतो त्या प्रत्येकवेळी इथल्या लोकांना टेपा का वाटतात कुणास ठाऊक. इथे ठाणे मुंबईत बहुतेक जण नाग आणला, गणपती, बाप्पा आणला असेच बोलतात (म्हणतात)
बोलीभाषा आणि लिखित भाषा यावर इथे बराच उहापोह झाला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला यावरून टोकणे जरुरी आहे का? खरंतर याच कारणाने इथे लिहण्यास भीती वाटते. कारण आपण जसा विचार करतो, बोलतो तसेच पटकन लिहिले जाते.
ऋन्मेश खूपदा अती करतो परंतू प्रत्येकवेळी तो फेकतच आहे हेच गृहीत धरले जात आहे. (लांडगा आला रे आला सारखे झाले आहे)
बरं जर त्याची बाजू घेऊन नव्हे त्याचे जे पटतंय त्याबद्दल जर बोललो तर सरांच्या महिला गँग मध्ये नियुक्ती होते. त्यामुळे जास्तीत जास्त वाचनमात्र राहण्याचा प्रयत्न असतो.
आणि प्रतिसाद तपासा याबद्दल जर बोलत असाल तर लेख, कविता, कथा वैगरे लिहताना प्रमाण भाषा वापरावी व एकदा तपासून प्रकाशित करावे इथपर्यंत ठीक आहे पण प्रतिसादही तपासून प्रकाशित करावे हे अतीच आहे. एखाद्या लेखावर दिलेला प्रतिसाद किंवा उपप्रतिसाद ही आपली इन्स्टंट रिअक्शन असते जी शक्यतो आपल्या बोलीभाषेतच उमटतात. इतरांना त्यात काही खटकले तर पुन्हा प्रतिसाद देऊन स्पष्ट करता येते की. आणि तेच करतोय ऋन्मेश, पण त्याचे स्पष्टीकरणही टेपा वाटतात तर माणूस काय करू शकतो.
बाकी मी तरी ऋन्मेशसोबत बरेचदा रिलेट करते. जेव्हा तो त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलतो ते बहुतेक वेळी मीसुद्धा अनुभवलेले असते.
नानबा
नानबा
अशाच त्रुटी चा फायदा आत्ता आत्ता पर्यंत काही राज्यात (फ्लोरिडा आणि मिसूरी दोन नोटेबल उदाहरण) चाईल्ड सेक्स ऑफेंडर घेत होते.
ह्या राज्यात अगदी 5-6 वर्षा पूर्वी पर्यंत मॅरी युअर रेपिस्ट टाईप चे लॉ होते.
प्रमाणभाषा आहे की नाही हा
प्रमाणभाषा आहे की नाही हा मुद्दाच नाही. पकाऊ बोअरिंग पोस्ट्स अगदी प्रॉपर प्रमानभाषेत लिहिल्या तरी skip च करणार आणि एखाद्याने रोचक किस्से लिहिताना प्रमानभाषा वापरली नाही तरी ते वाचायला आवडणारच.
>> नागाची मूर्ती घरी आणून
>> नागाची मूर्ती घरी आणून तिची पूजा सातारा साइडला पण करतात. ....काहीजण तुळशीच्या कुंडीत ठेवून देतात मूर्ती आणि त्यालाच विसर्जन केले असे म्हणतात.
+1 सातारा सांगली कोल्हापूर व इतरही भागात हेच कल्चर आहे. खेडेगावात तर मुले स्वतःच चिखलापासून नागाची, बैलाची मूर्ती बनवतात. निदान पूर्वी तरी असेच होते, अजूनही असेल. गणपतीच्या मुख्य मूर्तीशेजारी छोटा 'गणोबा' असतो. साधा मातीचा. हा सुद्धा मुलंच बनवतात.
मनमोहन,https://www.maayboli
मनमोहन,
https://www.maayboli.com/node/7295
इथे पहिल्या दोन पानांवर चर्चा झाली आहे.
https://www.manogat.com/node/8256
इथेही आहे.
तुम्ही कृपया वैयक्तिक घेऊ नका माझा आधीचा प्रतिसाद.
इतरांनीही मूर्त्या, मुर्त्या असं लिहिलं होतंच.
नाग पंचमी म्हणजे नागाची पूजा.
नाग पंचमी म्हणजे नागाची पूजा.
शेतकऱ्यांसाठी साप हे महत्वाचे काम करतात.साप असतील तर उंदीर शेतात येत नाहीत.शेतकऱ्यांच्या हिताचा प्राणी म्हणजे साप.
बैल हा प्राणी पण शेतकऱ्यांना खूप महत्वाचा.
म्हणून त्याचा पण एक सण असतो.
त्या दिवशी बैला लं बिलकुल काम दिले जात नाही.
त्याला गोड धोड खायला देवून त्याची पूजा केली जाते.
तेच वडाच्या झाडाचे हे झाड विस्तृत पने वाढते.
अनेक पशू पक्षी,कीटक ह्यांना आश्रय देते.
म्हणून त्याची पूजा.
खरोखर पूर्वी च्या लोकांनी उपकार करणाऱ्या प्राणी ,वनस्पती ह्यांचा सन्मान केला आहे सण साजरे करून.
म्हणजे? मी तर नरकासुराचा वध
म्हणजे? मी तर नरकासुराचा वध सरांनीच केला ह्या समजुतीत होतो. >>>>

BTW वाघ आणला राणीच्या बागेतून आणि सोडला जंगलात???
(बिचारा.. त्याला आधी tiger vs wild तरी दाखवायचे)
भारतात - The Union Law
भारतात - The Union Law Minister presents the CJI's final recommendation to the Prime Minister, who then advises the President of India in appointing the Supreme Court judges
गेल्या काही वर्षांत काही नावांना कायदा मंत्रालयाकडून आलेल्या नकारामुळे वाद झाले आहेत.
एखाद्या न्यायाधीशाचे वर्तन गैर वाट ल्यास त्याची चौकशी करून नंतर संसदेने बहुमताने निर्णय घेतल्यास राष्ट्रपती त्याला काढतात. याला इथेही इम्पीचमेंट म्हणतात.
निल्सन, +११११
निल्सन, +११११
मी हेच लिहायला घेतले होते.
'तुमच्याकडे गणपती येतात का? गेले का तुमचे गणपती? गणपती आणायला चाललोय, महालक्ष्म्या आल्या का,' असेच इथे बोलले जाते. ( महालक्ष्मी अनेकवचनात)
आणि ऋन्मेssष बद्दलच्या प्रतिसादालाही +११.
खरं तर काही आयडींचे तथाकथित sarcastic ( आणि वास्तवात पकाऊ) प्रतिसादही बोअर करतात. ऋन्मेssषच्या लिखाणापेक्षा जास्त बोअर करतात.
पण न वाचता पुढे सरकायचा पर्याय आपल्यालाही आहेच.
Nilsan अणि हिरा यांना अनुमोदन
Nilsan अणि हिरा यांना अनुमोदन.
Troll/bully याची काही सीमा? बर यांनी सर सर केले तर चालते पण Runmesh च्या पटणार्या मुद्द्यांची बाजू घेतली तर सर सर गँग?
Vave - thanks for the links. पर्सनल कशाला वाटेल , बोर्डाच्या परीक्षेतही मूर्त्या, भाकर्या असेच लिहिले असेन आणि असेच म्हणत /ऐकत आलो आहोत
डेटा लागतोच त्याशिवाय मान्यता देत नाही म्हणुन संदर्भ विचारले. Baghte नीट links.
माझ्या लहानपणी गावातल्या
माझ्या लहानपणी गावातल्या मुलांना "तूनं" "मीनं" असे बोलायची सवय होती. म्हणजे "तू बघितलंस का?" च्या ऐवजी "तूनं बघीतलंस का?" किंवा "मी खाल्लं" ऐवजी "मीनं खाल्लं" इत्यादी. मग आमचे गुरुजी/बाई अशा मुलांना खडसावून सांगत, "तूनं मीनं म्हणायचं नाही, तू मी म्हणायचं"
पण टेक्निकली बघीतलं तर तूनं मीनं हेच बरोबर वाटतं. जसे अतुलनं, संदीपनं, अशोकनं इत्यादी, तसेच "मी"नं, "तू"नं
नाही का?

हिंदीत सुद्धा तुने मैने असेच आहे की. हे जेंव्हा लक्षात आले तेंव्हा वाटले ती खेडवळ मुलंच योग्य होती कि काय
"मी"नं, "तू"नं >> हे खूप
"मी"नं, "तू"नं >> हे खूप आध्यात्मिक आहे. समोरच्या व्यक्तीकडे आणि स्वतःकडेही त्रयस्थपणे बघता येऊ शकण्याचं हे उदाहरण आहे. त्या गुरुजींना क्षमा करा. त्यांना माहीत नाही ते काय करत होते ते!
हिंदीत सुद्धा तुने मैने असेच
हिंदीत सुद्धा तुने मैने असेच आहे की. हे जेंव्हा लक्षात आले तेंव्हा वाटले ती खेडवळ मुलंच योग्य होती कि काय Lol Light 1
नवीन Submitted by अतुल. on 17 June, 2022 - 11:26
>>
What do you mean हिंदीत सुद्धा? Is it the single undisputed gold standard language of reference for grammar? Marathi is older than Hindi.
संस्कृतामध्येही सर्वच
संस्कृतामध्येही सर्वच सर्वनामांचे कर्मणि भूतकाळाच्या विशेषणासोबतचे ( हे क्रियापद म्हणूनही वापरले जाते,)रूप तृतीया विभक्तीतच असते.
मी पाहिलं- पाहिलेलं = मया दृष्टं. म्यां पाहिलें/ लेंलें
तू पाहिलं- पाहिलेलं (स) = त्वया दृष्टम्. त्वां/तुवां देखिलें/लेंलें.
त्याने पाहिलें - पाहिलेंलें = तेन दृष्टम्. ताणें/ त्याणे पाहिलें/लेंलें
ह. पा. ह्यांनी विनोदाने लिहिले आहे, पण ते खरे आहे. [माझ्याकडून पाहिले गेले, मी कर्ता नाही, पण असेच सहज (ते) पाहिले गेले.]
हिंदी, गुजराती आणि कोंकणीत असा वापर आढळतो.
बाकी नागपंचमीला लहानपणापासून
बाकी नागपंचमीला लहानपणापासून गारुडी त्याच्या टोपलीत खरे नाग आणताना बघते आहे (अंबरनाथ ला). अगदी आता आता त्यावर कायद्याने बंदी आली तोपर्यंत प्रत्येक नागपंचमीला गारुड्याच्या नागाची पूजा केलेली आहे. त्यामुळे नागपंचमी ला नागाची मूर्ती आणणे हेच कशॉ आहे माझ्यासाठी.>> +११ मला इथे वाचे पर्यंत माहितच नव्हते नागाच्या मुर्ती आणून वगैरे पूजा कर तात.. एकतर गारूडी खरा नाग घेऊन येतो किंवा नागाचे चित्र / रांगोळी याची पूजा
असो एव्हाना नागाने बरेच हातपाय पसरले आहेत
>> समोरच्या व्यक्तीकडे आणि
>> समोरच्या व्यक्तीकडे आणि स्वतःकडेही त्रयस्थपणे बघता येऊ शकण्याचं
हा जो मी आहे, या "मी"नं 
नेमकं
>> What do you mean हिंदीत सुद्धा?
टेक्निकली
Pages