Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोपर्यंत चारणे, चरणे फक्त
तोपर्यंत चारणे, चरणे फक्त जनावरांसाठी वापरतात असे वाटायचे.
Submitted by नाबुआबुनमा on 18 June, 2022 - 18:05
जनावरे चरायला सोडतात किंवा नेतात.
मुलाला चार/पाज" हे को-सा-सां
मुलाला चार/पाज" हे को-सा-सां ग्रामीण भागात विशेषतः मागच्या पिढीतल्या लोकांत कॉमन होते.
Submitted by अतुल. on 18 June, 2022 - 20:13
आजही आम्ही असेच बोलतो सगळे आणी आमची पिढी नवीन आहे.घरातील मुलेपण असेच बोलतात.
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर>>>>> जीवंत नाग
Submitted by mrunali.samad on 17 June, 2022 - 15:16
हो जिवंत नाग.
माझ्या भावाचा सर्पमित्र मित्र आहे त्याने एकदा पंचमीला घरी अस्सल (दहा चा आकडा आणी काळापट-पिवळा )नाग आणला होता.खूप सापडतात नाग,धामिण,मण्यार ,घोणस तर आठवडयाला एक मग त्याला फोन केला की तो पकडून लांब रानात नेऊन सोडतो.गावाच्या चारी बाजूला शेती आहे.आणी खूपदा ओढयाला पूर आला की ही सरपटणारी जनावरे जास्त येतात.
ऑफिस मधील अमरावतीचा एक कलीग
ऑफिस मधील अमरावतीचा एक कलीग डब्यात साबुदाण्याची उसळ आणलीय म्हणाला. तुम्ही साबुदाण्याची उसळ करता का हे मी दोन तीनदा विचारले. तो हो म्हणाला. काम करताना वाटप घातलेले साबुदाणे कसे लागतील याचाच विचार करत होते आणि जेवताना डबा उघडला याने तर डब्यात साबुदाण्याची खिचडी . खरच कल्चरल शॉक होता. त्यांच्या कडे साबुदाण्याची खिचडी म्हणत नाही उसळच म्हणतात. खिचडी म्हणणे हा त्याच्यासाठी कल्चरल शॉक होता
साबुदाण्याची ऊसळ ईंटरेस्टींग
साबुदाण्याची ऊसळ ईंटरेस्टींग आहे.
काही जणांना डाळभाताच्या खिचडीला खिचडी म्हणतात हे सुद्धा झेपत नाही.
त्यांच्या कडे साबुदाण्याची
त्यांच्या कडे साबुदाण्याची खिचडी म्हणत नाही उसळच म्हणतात. खिचडी म्हणणे हा त्याच्यासाठी कल्चरल शॉक होता>>>>>>
आमच्याकडे/ सांगली कडे भगर म्हणतात.आणी वरिच्या तांदळाचा भात.
त्या नवीन शब्दाकडे खुलेपणाने
त्या नवीन शब्दाकडे खुलेपणाने पाहावे, इतके मात्र आणि इतकेच आपल्या हातांत आहे.
नवीन Submitted by हीरा on 17 June, 2022 - 23:05
तुमची संपूर्ण पोस्ट पटली। छान रिप्लाय।
मॉरल - मुंबईकरांवर आपली शुद्ध
मॉरल - मुंबईकरांवर आपली शुद्ध आणि पुस्तकी, मराठी वा हिंदी भाषा न लादणे हेच ऊत्तम Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 June, 2022 - 00:41>>>>.रिप्लाय आवडला व पटला सुद्धा।
अंड्याचे हाफ-फ्राय मी पुण्यात
अंड्याचे हाफ-फ्राय मी पुण्यात आलो तेंव्हा पहिल्यांदा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये पाहिले. ग्रामीण भागात घरी बहुतांश "अंड्याची पोळी उर्फ ऑम्लेट" करतात. त्यामुळे अनेक वर्षांनी एकदा घरी हाफ-फ्राय करायला सांगितले तेंव्हा आणि ते त्यांच्या भाषेत "अर्धेकच्चे तसेच?" खाताना पाहून त्यांना क शॉ बसला होता.
ग्रामीण भागात घरी बहुतांश
ग्रामीण भागात घरी बहुतांश "अंड्याची पोळी.....आहाहा बरं वाटलं हा शब्द ऐकून.लहानपणी इथे मुंबईतही अंड्याचो पोळे खाल्ले आहेत.नंतर मात्र ऑमलेटच.
आमच्याकडे पण साबूदाणा उसळ
अमरावती विभागात साबूदाणा उसळ म्हणतात. खिचडी डाळ तांदूळाची, वरीचे तांदूळाला भगर म्हणतात , पिठलं म्हणजे बेसन , शिजवलेली डाळ म्हणजे वरन(तुरीचं,मुगाचं,फोडणीचं वरन)
हीरा, Runmesh, तुमच्या
हीरा, Runmesh, तुमच्या पोस्ट्स आवडल्या! मायबोली वर मुंबई che कल्चर थोडे underrepresented आहे पण म्हणुन तसे काही नाहीच असे इथे म्हणतात ते वाचून गंमत वाटते. म्हणुनच Runmesh च्या पोस्टी relate करता येतात.
बाळाला चारणे (भरवणे) हा शब्द प्रयोग आम्ही ही करतो.
या धाग्याची आता वाट लागली आहे
या धाग्याची आता वाट लागली आहे. उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत. भांड्याला गंज किंवा भगुनं म्हणतात ..बसला शॉक, शाबुदाणा खिचडीला उसळ म्हणतात..बसला शॉक. काहीही... (कुणाची चेष्टा करायचा उद्देश नाही पण असली उदाहरणे कल्चरल शॉक कशी काय याचा विचार करा).
>>या धाग्याची आता वाट लागली
>>या धाग्याची आता वाट लागली आहे. उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत.<< +१
"चाय पिली" हे मुंबईच्या बंबैय्या हिंदित सर्रास बोललं जातं; मराठीत नाहि. अरे यार, मैने अब्बिच चाय पि ली. यात कोणाला कल्चर शॉक बसणं हाच एक मोठा शॉक आहे...
कोंकणात गोव्यापर्यंत ती चाय/
कोंकणात गोव्यापर्यंत ती चाय/ च्या असेच म्हणतात. ही कोंकण्यांची मुंबईला देन आहे. आणि पिली हे पी ली असे असू शकते. तसे असेल तर मैं ने अब्बीच चाय पी ली हे अभिजात मुंबई हिंदी वाक्य ठरू शकते.
मुंबईचे कल्चर हे विविध भाषा
मुंबईचे कल्चर हे विविध भाषा आणि संस्कृतींची सरमिसळ होत तयार झाले आहे. >>>>
हा गैरसमज हिंदी भाषकांनी मुंबईत पसरवलाय. मूळात मुंबई हा मराठी भाषकांची नी त्यांच्या संस्कृतीचीच आहे. पण तसं म्हटलं तर हिंदी कशी लादता येनार?
या धाग्याची आता वाट लागली आहे
या धाग्याची आता वाट लागली आहे. उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत. भांड्याला गंज किंवा भगुनं म्हणतात ..बसला शॉक, शाबुदाणा खिचडीला उसळ म्हणतात..बसला शॉक. काहीही... (कुणाची चेष्टा करायचा उद्देश नाही पण असली उदाहरणे कल्चरल शॉक कशी काय याचा विचार करा). >>>
+१
नागपंचमी वर तर फार पांचटपणा झाला.
या धाग्याची आता वाट लागली आहे
या धाग्याची आता वाट लागली आहे. उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत. > +१.
या धाग्याची आता वाट लागली आहे
या धाग्याची आता वाट लागली आहे. उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत. > +१.
ज्ञानवर्धक (?) पोस्ट पाडण्याच्या अट्टाहासाला पण आवरायला हवेय
(कुणाची चेष्टा करायचा उद्देश
(कुणाची चेष्टा करायचा उद्देश नाही पण असली उदाहरणे कल्चरल शॉक कशी काय याचा विचार करा).
Submitted by योगी९००>> पुजापाठ कराचं सोडुन तुमी काहुन काड्या करुन रायले योगीबाबा.
आजकालचे योगी पूजापाठ नई करत
आजकालचे योगी पूजापाठ नई करत
बुलडोझर घेऊन घरे पाडतात
उगीचच छोटी छोटी उदाहरणे
उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत. > +१.
+७८६
ज्ञानवर्धक (?) पोस्ट
ज्ञानवर्धक (?) पोस्ट पाडण्याच्या अट्टाहासाला पण आवरायला हवेय
>>>
+७८६
आजकालचे योगी पूजापाठ नई करत
आजकालचे योगी पूजापाठ नई करत
बुलडोझर घेऊन घरे पाडतात
>>>
काळ बदलला आहे. यात आता कसलाही कल्चरक शॉक वाटत नाही.
आमच्या वर्गात एक पंडित नावाचा मुलगा होता. त्याचे वडील एका गणपती मंदिराचे पुजारी होते. वा आताही असतील. कल्पना नाही.
पण तो आज सरकारी नोकरीत ईंजिनिअर आहे. नॉनवेज खातो, ओल्या पार्ट्या करतो, अगदीच नास्तिक झाला नाही पण देवधर्माची फारशी आवड नाही.
बंगलोरला रहायला आल्यावर,
बंगलोरला रहायला आल्यावर, तिरुपतीला जाऊन डोक्यावरचे सगळे केस अर्पण करून आलेल्या बायका बघितल्यावर मला सांस्कृतिक धक्का बसला होता. महाराष्ट्रात मी अशी कुठली बाई बघितली नव्हती.
आमच्या एका घराजवळ एक लहानसं
आमच्या एका घराजवळ एक लहानसं देऊळ होतं. तिथे रोज एक पुजारी पूजा करायचा. सकाळी ९/९:३० ला बाहेर पडलं तर दिसायचा. त्याची बायको त्याला मदत करताना दिसायची.
कधीकधी त्यांचा तरुण मुलगा पूजा करताना दिसायचा. तेव्हाही आई मदत करायची, वडील नसायचे.
मला त्या तरुण मुलाचं कौतुक वाटायचं, की तो मनोभावे वडिलांचं काम करतोय.
एकदा असंच मी सकाळी भाजी आणायला बाहेर पडले. पुजारी आणि बायको दिसले. मुलगा नव्हता.
परत येताना कल्चरल शॉक बसला- पुजारी आणि मुलाची भर रस्त्यात तुफान हाणामारी सुरू होती. बायको दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत होती. दोघं एकमेकांना शिव्या देत होते. एकमेकांची मानगूट धरत होते. कानाखाली लगावत होते. दोघांची धोतरं फाटली होती, सदरे फाटले होते. दोघांची डोकी टोटल आऊट झाली होती.
Culture shock describes the
Culture shock describes the impact of moving from a familiar culture to one that is unfamiliar. It includes the shock of a new environment, meeting lots of new people and learning the ways of a new country
महाराष्ट्रातून बिलासपूर मध्यप्रदेशात गेल्यावर गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती पिशवीतून आणताना दिसणे हे कल्चरल शॉकचे पर्फेक्ट उदाहरण वाटते. तसंच आपल्याकडे गणपतीचं एवढं कोड कौतुक असतं, तिथे त्याला काकडीच्या कापांवर कटवलेलं पाहून मला धक्का बसला होता. आरती बसून करताना पाहूनही.
आणखी एक. इंदूरला गणपतीचा वार मंगळवार नाही. मला नक्की आठवत नाहीए, पण बुधवार किंवा शनिवार असतो.
या धाग्याची आता वाट लागली आहे
या धाग्याची आता वाट लागली आहे. उगीचच छोटी छोटी उदाहरणे कल्चरल शॉकच्या नावाखाली येऊ लागली आहेत. भांड्याला गंज किंवा भगुनं म्हणतात ..बसला शॉक, शाबुदाणा खिचडीला उसळ म्हणतात..बसला शॉक. काहीही... (कुणाची चेष्टा करायचा उद्देश नाही पण असली उदाहरणे कल्चरल शॉक कशी काय याचा विचार करा).>>>>>>> धाग्याची वाट लागणे हा प्रकार माबोवर काही नवीन आहे का?
शॉक लागण्याचा प्रकार सरपटणाऱ्या प्राण्यांवरुन भांड्यांवर आणणारी मी आहे म्हणून उत्तर देतेय. माझ्या आधीच्या हिरा यांच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण लहानपणापासून जे काही ऐकतो, वाचतो त्यापेक्षा काही वेगळं ऐकायला मिळालं की त्याचा धक्का बसतो. अंघोळीच पाणी तापवण्याच्या मोठ्या भांड्याला गंज म्हणणं हा माझ्यासाठी नुसताच शॉक होता कारण माझ्या डोळ्यासमोर गंज म्हटल्यावर उभट आकाराचं ताकाचं भांड आलं ज्यामध्ये अंघोळीच पाणी तापवु शकत नाही,
या पोश्टीत धाग्याच्या सो कॉल्ड नियमाप्रमाणे कल्चरल वगैरे शब्द वापरलेलाच नाहीये आणि तसं माझ्या पोश्टीत लिहीलेले पण आहे.
खरं म्हणजे ताक लागण्यासाठी जे
खरं म्हणजे ताक लागण्यासाठी जे विरजण घालतो आपण त्याला कल्चरच म्हणतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तो कल्चरल शॉकच म्हणता येईल.
ह.पा.
ह.पा.
Pages