Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजकालचे योगी पूजापाठ नई करत
आजकालचे योगी पूजापाठ नई करत
बुलडोझर घेऊन घरे पाडतात
>>>
काळ बदलला आहे. यात आता कसलाही कल्चरक शॉक वाटत नाही.>>>>
जेव्हा भाबडेपणा ची पराकाष्ठा करावी लागते तेव्हा ती हास्यास्पद होते
आणखी एक. इंदूरला गणपतीचा वार
आणखी एक. इंदूरला गणपतीचा वार मंगळवार नाही. मला नक्की आठवत नाहीए, पण बुधवार किंवा शनिवार असतो.>>>
बुधवार.
गेल्या महिन्यात मी शेजारणीला गणपतीचा मंगळवार असं म्हणाले तर तिला कशॉ बसला होता.
ईंदूरला अंगारकी संकष्टी कधी
ईंदूरला अंगारकी संकष्टी कधी असते मग?
ईंदूरला अंगारकी संकष्टी कधी
ईंदूरला अंगारकी संकष्टी कधी असते मग?
माझ्या ऑफिसातील कलीग मंगळवारी
माझ्या ऑफिसातील कलीग मंगळवारी नॉनव्हेज खायचा आणि बुधवारी उपवास पकडायचा। का तर बुधवार विठ्ठलाचा वार। आणि तो पंढरपूर निवासी होता त्याचे नावही पांडुरंग होते। मला मोठा शॉक बसला होता।
भरत , गणपतीचा वार बुधवार
भरत , गणपतीचा वार बुधवार समजतात हे मला इंदोरचे नातेवाईक दर बुधवारी सकाळी गणपतीचा फोटो पोस्ट करतात यावरून समजलं.
गणपतीला वार च नाहीये
गणपतीला वार च नाहीये स्पेसिफिक काही
सोमवार शंकर
मंगळवार - देवी (कुठली ते माहिती नाही)
बुधवार - बृहस्पती
गुरुवार - दत्त
शुक्रवार - पुन्हा देवी
शनिवार - शनी /मारुती
रविवार - सूर्य
बहुदा दोन वार मिळल्याने देवीने गणपतीला एक वार दिला असावा संकष्टीपुरता
जेव्हा माझे सासरे निवर्तले
जेव्हा माझे सासरे निवर्तले तेव्हा माझा मोठा भाऊ दिवसाला गेला होता. त्याच्या ठिकाणाहून विमानाने कलकत्ता, तिथून कारने १.५-२ तास प्रवास, भेट घेऊन त्याच दिवशी परत असा प्लॅन.
तिथे गेल्यावर त्याला चक्क बंगाली मिठाई देण्यात आली. सगळे स्वतः घेत होते आणि आल्या - गेल्याला देतपण होते.
त्याच्यासाठी हा मोठाच शॉक होता. तो मला फोनवर अवाक् होऊन सांगत होता.
मी मुलाच्या परीक्षेमुळे गेले नव्हते आणि याची काहीच कल्पना नव्हती. दादाला हे माहीत नसेल याची नवऱ्याला कल्पना नव्हती.
दादाला जेव्हा मिठाई दिली तेव्हा त्याचा चेहरा बघून गंभीर वातावरणातपण हसू फुटलं सगळ्यांना.
गुरुवार - दत्त
गुरुवार - दत्त
शुक्रवार - पुन्हा देवी
>>>>>
आमच्याकडे गुरुवार दत्त आणि देवीचा पकडतात (बहुधा)
शुक्रवार जुम्मा - त्या दिवशी नॉनवेज खातात. रविवार-बुधवार-शुक्रवार हे प्रामुख्याने नॉनवेज खायचे वार.
गुरुवार - दत्त
उडवला
गुरुवार - दत्त
हा पण उडवला
हा पण उडवला
हा पण उडवला
पण का उडवला?
पण का उडवला?
माझा डबल टिबल पोस्ट झाल्याने उडवला
खुप पतंग झालेत का ?
खुप पतंग झालेत का ?
रविवार - जोतिबा
रविवार - जोतिबा
कुलदैवत जोतिबा असलेले, ओळखितले बरेचं जण रविवारी नॉन व्हेज खात नाहीत.
मंगळवार - हनुमान शनिवार- शनी
मंगळवार - हनुमान
शनिवार- शनी
मंगळवार - हनुमान >>> हे
मंगळवार - हनुमान >>> हे ईंटरेस्टींग आहे. ईकडे तर शनिवारीच गर्दी असते. आमच्याईथले एक मारुतीचे मंदिर तर शनिवारीच उघडे असायचे. अन्यथा बंदच असायचे. याचे कारण कदाचित पुजार्याचा पगार एकच दिवस द्यावा हे असावे. तरी ग्रिलच्या दरवाज्यामागून कोणाला पाया पडायचे असेल तर पडू शकायचे. रस्त्याकडेचे छोटेसे मंदिर होते.
आपण जो देव मानतो त्या देवाच्या वाराला नॉनवेज का खात नाही हा अजून एक पडणारा प्रश्न. म्हणजे नॉनवेजचा संबंध देवाशी जोडून ते अपवित्र समजायचे आणि त्या वाराला ते टाळायची पद्धत कधीपासून सुरू झाली याचा शोध घ्यायला हवे. ते सुद्धा काही देव मांसाहार करायचे हे मान्य करून देखील लोकं वार पाळतात. अर्थात धार्मिक श्रद्धांना लॉजिक असावेच हे गरजेचे नसते म्हणा. पीके चित्रपटात हे छान दाखवलेले. विविध धर्मीयांमध्ये कसे एकच गोष्ट कशी एकात्र पवित्र तर तर दुसर्यात निषिद्ध ठरते आणि त्यामुळे परग्रहावरून आलेल्या आमीर खानचा गोंधळ उडतो. तो बिचारा तर दर क्षणाला एक नवीन कल्चरल शॉक झेलताना दाखवला आहे
मंगळवार - हनुमान>>हे उत्तर
मंगळवार - हनुमान>>हे उत्तर भारतात
ओके
ओके
एक अवांतर प्रश्न - हनुमान हे
एक अवांतर प्रश्न - हनुमान हे नाव भारताच्या कुठल्या भागात ठेवले जाते का? आपल्याकडे हनुमंतराव, मारुती ऐकलेय. पण हनुमान माझ्या ऐकण्यात तरी आले नाही.
मारुतीचा जन्मवार मंगळवार,
मारुतीचा जन्मवार मंगळवार, म्हणून तोही दिवस मारुतीचा मानतात.
मंगलको जन्मे,
मंगलही करने,
मंगलमय भगवान.
मारुतीचा जन्मवार मंगळवार,
मारुतीचा जन्मवार मंगळवार, म्हणून तोही दिवस मारुतीचा मानतात. >>> सोमवार मंगळवार असे वार कालगणनेत तेव्हाही असायचे का? कि तिथीनुसार बॅक कॅल्क्युलेट केले आहे? जन्मवार मंगळवार असेल तर शनिवारमागे काय लॉजिक आहे.
ईतरही देवांचे जे वार ठरवले गेले आहेत ते जन्मवारावरून आहेत का? ईतर काही कारण..
उत्तरे कोणीही दिलीत तरी चालेल. न दिलीत तरी चालेल. या निमित्ताने काही रोचक माहिती येत असेल तर वाचायला आवडेल.
>>आपल्याकडे हनुमंतराव, मारुती
>>आपल्याकडे हनुमंतराव, मारुती ऐकलेय
देवाचं हनुमंतराव ? काय राव काही पण....
माणसाचं असतं
ईतके प्रश्ण असतांना ऋन्मेशने
ईतके प्रश्ण असतांना ऋन्मेशने नवीन धागा न उघडता जुन्याच धाग्यावर विचारणे, हा मायबोली क . शॉ.
सनी मारुतीभक्त आहे म्हणून
सनी मारुतीभक्त आहे म्हणून सनीचा वार म्हणजेच शनिवार मानतात ...
हणमंतराव
हणमंतराव
चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे
चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे हनुमंत हे हनुमान शब्दाचं बहुवचनी रूप आहे संस्कृतात. हनुमान् (एक) हनुमन्तौ (द्वि) हनुमन्त: (बहु). मराठीत भगवान् शब्दाचंही बहुवचन भगवंत - हे एकवचनी म्हणून वापरतात.
देवाचं हनुमंतराव ? काय राव
देवाचं हनुमंतराव ? काय राव काही पण.... Uhoh
माणसाचं असतं
>>>>>>
अरे देवाsss ये मेरे साथ ही क्यू होता है हमेशा
अहो माणसांचेच नाव विचारलेय. पोस्ट पुन्हा कॉपीपेस्ट करतो माझी.
एक अवांतर प्रश्न - हनुमान हे नाव भारताच्या कुठल्या भागात ठेवले जाते का? आपल्याकडे हनुमंतराव, मारुती ऐकलेय. पण हनुमान माझ्या ऐकण्यात तरी आले नाही.
आशुचॅंप यांच्या वतीने आता मीच विचारतो,
लोकहो तुम्हाला वरील पोस्ट वाचून मी देवाच्या नावांबद्दल विचारलेय की माणसांच्या विचारलेय यापैकी काय वाटते?
माणसांच्या विचारलेय असं
माणसांच्या विचारलेय असं वाटतंय खरं
साऊथ च्या लोकांना
साऊथ च्या लोकांना महाराष्ट्रात आल्यावर आडनावावरून बोलवतात याचा कल्चरल शॉक बसतो.
साऊथ मधे कुणीही आडनाव विचारत नाही.. नावानेच बोलवतात..
Pages