Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरच्या सगळ्या मंडळींनी
वरच्या सगळ्या मंडळींनी प्रामाणिकपणे सांगावे
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर
जर हे वाचून जर तुम्हाला नागाच्या मुर्त्या पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हेच वाटलं असेल तर सर्वांनी माझ्याकडून एक साष्टांग दंडवत स्वीकारावा
आम्ही स्वीकारावा का दंडवत?
आम्ही स्वीकारावा का दंडवत? खरेच असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले नाही. कारण आमच्या इथे असेच (सहज) बोलले जाते त्यामुळे सवय आहे. दुसरे चित्र अजिबात आले नाही डोळ्यांसमोर. कारण तशी सवय नाही.
मग खरेच दंडवत स्वीकारा
मग खरेच दंडवत स्वीकारा
नको असेल तर पिशवीतून सोडा
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
माबोवर कोणी चूक बरोबर नसते. ज्याचे त्याचे दृष्टीकोन आणि अनुभव असे समजून पुढे जावे. अट्टाहासाने आपण पाहिले तेच जग असे समजण्यात काय अर्थ आहे. अर्थात असा विचार कमी अधिक प्रमाणात आपण सारेच करतो म्हणून तर हे कल्चरल शॉक आहेत
बाकी मी तरी ऋन्मेशसोबत बरेचदा रिलेट करते. जेव्हा तो त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलतो ते बहुतेक वेळी मीसुद्धा अनुभवलेले असते.
>>>>>
हो, मायबोलीवरील ज्यांचे बालपण मुंबईत गेलेय त्यांना बरेच रिलेट होते हे अनुभवलेय.
मायबोलीवर अशी जनता कमी आहे. (ईथे नोकरीनिमित्त मुंबईत राहिलेले असणे हे पकडू नये)
मला इथे वाचे पर्यंत माहितच नव्हते नागाच्या मुर्ती आणून वगैरे पूजा करतात. >>> आमच्या चाळीत जवळपास पंधरावीस जणांकडे गणपती यायचा आणि एकत्र जायचा. पण नाग आणणारे (ऊप्स, नागाची मुर्ती आणणारे) आम्ही एकच होतो. ती मुर्ती सोडायला आजोबांसोबत मी आणि शेजारची दोनचार पोरंटोरं एवढेच जायचो. ती पोरंही एवढ्यासाठीच यायची की त्यानंतर आजोबा त्यांच्या मित्राच्या कोल्ड्रींक हाऊसमध्ये नेऊन आम्हाला सरबत पाजायचे. त्यातले सिकंदर सरबत माझे फार फेवरेट होते हे आता अंधुकसे आठवतेय.
मी तर नरकासुराचा वध सरांनीच केला ह्या समजुतीत होतो. Happy >>> हे आवडले. फिलींग रजनीसर
जर हे वाचून जर तुम्हाला
जर हे वाचून जर तुम्हाला नागाच्या मुर्त्या पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हेच वाटलं असेल तर सर्वांनी माझ्याकडून एक साष्टांग दंडवत स्वीकारावा >>
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ते वाक्य वाचले तेव्हा मुर्त्या च आले डोळ्यासमोर कारण माझ्या लहानपणी आमच्या गावात नागाच्या लहान मुर्त्या टोपलीत घेउन लोक मंडईजवळ बसायचे आणि भाजी आणायला गेलेली आई येताना त्या मुर्त्या आणायची तेव्हा त्या वर्तमानपत्रात गुंडाळुन पिशवीत टाकुनच आणायची.. विसर्जन नंतर झाडांपाशी करायचो...
पण...
पूर्ण प्रतिसाद वाचल्यावर तो कोणी लिहिलाय ते कळले तेव्हा खरे नाग च डोळ्यासमोर आले... रुनमेश यांचे आधीचे रेकॉर्ड पहाता ते आणत असतील बाबा खरे नाग कोणी सांगावं... ? नंतर परत वाघ आणला असं पण लिहिलंय... ते पण खरं वाटलं... नागावरचे लक्ष हटवुन वाघाकडे न्यायचे प्रयत्न झाले... ही आता त्यांची लोकांना उगीच उचकवायची खेळी हळुहळु लक्षात येते आहे...
काही दिवसांपुर्वी मी सुद्धा सर सर या प्रतिसादांना वैतागले होते... आशुचँप ना तसं कुठेतरी लिहिलं पण होतं पण आजकल खरच रुन्मेश या आयडी चे वरवर भोळसट दिसणारे पण मुद्दाम दुसराच काहितरी छुपा अजेंडा असलेले ( झगामगा मला बघा ) असे प्रतिसाद वाचुन चीड येते...
असो...सर सर प्रतिसादामागची चिडचिड समजु शकते...
हा धागा पण मुद्दा सोडुन रुन्मेश या विषयावर गेला यातच त्यांची जीत आहे... खुश व्हा रुन्मेश...
>> आमच्याकडे नाग पिशवीतून आणत
>> आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत
नागपंचमीला कल्चरल शॉक तेंव्हा बसेल जेंव्हा:
बत्तीस शिराळ्याच्या व्यक्तीने असे म्हणून जर मातीचा नाग पिशवीतून काढला तर किंवा
अन्य ठिकाणच्या व्यक्तीने असे म्हणून जर खरोखरीचा नाग पिशवीतून काढला तर
कोणीतरी पिशवीतून गणपती आणायचा
लोकहो,
कोणीतरी पिशवीतून गणपती आणायचा किस्सा लिहीला होता. त्यावर माझे तेव्हाचे पाठोपाठ आलेले दोन्ही प्रतिसाद सिक्वेन्समध्ये वाचाल तर लक्षात येईल ते लिहिताना माझ्या डोक्यातही मुर्तीच होते आणि लोकांनाही मुर्तीच वाटेल असे वाटले होते.
-------------------------------------------
कदाचित घरी आपण देव्हाऱ्यातली मुर्ती जशी आणतो काही गाजावाजा न करता, बॉक्समध्ये पॅक करून तसे आणत असावेत. मग प्रतिष्ठापणा करताना विधी करत असावेत..
Submitted by ऋन्मेऽऽष on 16 June, 2022 - 00:20
पिशवीत घालून गणपती???
अरे देवा Sad
Submitted by आशुचँप on 16 June, 2022 - 00:27
आमच्याकडे लहानपणी नागपंचमीला नाग आणायचे. बहुधा पिशवीतूनच आणायचे आणि पिशवीतूनच सोडायचे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 16 June, 2022 - 00:38
-----------------------------------------
नागाची मुर्ती आणताना/सोडताना गणपतीसारखा गाजावाजा नसायचा म्हणून तेव्हा आम्हीही पिशवीतूनच ने आण करायचो. तिथेही त्याचमुळे पिशवीतून गणपती आणले जात असावेत हा मुद्दा क्लीअर करायला ती पोस्ट होती.
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर
>>> 'तुमच्याकडे गणपती असतो का?' यातल्या गणपती या शब्दाच्या वापराप्रमाणेच 'नाग' हा वापर वाटला. वेगळं काहीही डोळ्यासमोर आलं नाही.
नको असेल तर पिशवीतून सोडा
नको असेल तर पिशवीतून सोडा

नको नको. हरयाणात कागदाच्या पिशवीत देतात सोड्याबरोबर जे दुसरे अपेयपानाची बाटली.
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर
म्हणजे अस बघा. पिशवीतुन चार-पाच नाग घेवुन चाललचा, एखादा मधेच बाहेर डोकावतो नाड्यांजवळुन डोकं बाहेर काढुन म्हणतो "फुस्स फुस्स दादा हळु चाला ना पोटात डुचमळतय, पब्लिकनी पार सकाळधरनं निस्तं दुधच पाजालां लावला"
आणी सोडत बाबतीत म्हणाल तर तर १०पैशाला सोडतीची चिठ्ठी मिळायची त्यात बक्षिस म्हणजे कोणत्या हिरो हिरोनिचा फोटु किंवा तत्सम
हीरा, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
हीरा, तुमचा मुद्दा बरोबर आहे. कर्तरि रचना करायची झाल्यास अहम् अपश्यम् किंवा अहम् दृष्टवान् होईल. तिथे कर्त्याची तृतीया होत नाही. पण मराठीमध्ये कर्तरी/कर्मणिमध्ये मला फार गोंधळ वाटतो. मी पाहिलं - ह्यात क्रियापद कर्त्याप्रमाणे चालत नसल्यामुळे ते कर्मणिच वाक्य आहे. मी म्हैस पाहिली, मी बिजागर्या पाहिल्या - इथे कर्मानुसार क्रियापद बदलत आहे. त्या/ति/त्यांच्या बाबतीत बोलताना ते वाक्य उघड उघड कर्मणि होऊन जातं आणि कर्ता तृतीयेत (त्याने/तिने/त्यांनी) जातो. त्यामुळे 'मी'चं तृतीया एकवचनी रूप 'मी'च केलं जातं हा अनेकांना कल्चरल शॉक असू शकतो.
मी/ तू/ त्याने पाहिलं किंवा खाल्लं - ह्या अशा सामान्य भूतकालवाचक वाक्यांना मराठीत कर्तरी रूपच नाही (जे वर्तमानकाळात मात्र आहे - मी खातो, ती पाहते वगैरे) ह्या विचाराने मलाही कल्चरल शॉक बसला. (पाहत होता वगैरे रूपे सामान्य भूतकालवाचक नाहीत)
अवांतर -
अवांतर -
आम्हीपण पिशवीतून नाग (मूर्ती) आणतो. त्याच पिशवीत सोबत लाह्या, हार फुले, बत्ताशे आणि नागाची मूर्ती ज्यात स्थापन करतात तो ताना (कसलीतरी गोल गुंडाळलेली वेल असते, नाव विसरले आईला विचारावे लागेल. बरं त्या वेलीला फळ असणेही तेव्हढेच महत्वाचे)
तर हे सगळं नागपंचमीच्या आदल्या रात्री घेऊन घरी यायचं. वेल सोडून बाकीच्या गोष्टी घरात ठेवायच्या आणि वेल दाराबाहेर ठेवायची. पूर्वी गावी या वेली रानातून आणल्या जात आणि या वेलींवर साप असतात असे आई सांगायची. त्यामुळे रात्री अंधारात चुकून खराखुरा साप, नाग घरात आणला जाऊ नये म्हणून या वेली बाहेर अंगणात वैगरे ठेवत असत. पूर्वापार सुरू असल्यामुळे आम्ही अजूनही ताना दाराबाहेर लटकवतो.
धन्यवाद सर्वांचे >>
धन्यवाद सर्वांचे >> व्याकरणाची खूप चर्चा चाललीच आहे म्हणून: सर्वाँना धन्यवाद आणि सर्वांचे आभार.
ह्या नाग साप वरून एक मजेशीर किस्सा आहे (खररा खुर्रा , राणीच्या बागेतल्या वाघा सारखा नाही. )
आमचं घर आई बाबांनी विकत घेतलं तेव्हा तो 150 वर्ष जुना वाडा होता. शेजारी 1600 स्के फु च आवाड. पुढे ओसरी, पडवी, अंगण, विहीर, त्यापुढे एक खोली आणि पुन्हा मोकळी जागा वगैरे.
अंधारं माजघर, जाड जाड मातीच्या भिंती, भिंतीतले जिने वगैरे टिपिकल. त्यातून अंधारं घर, बाहेर असणारे टॉयलेट, जाणारे लाईटस... मला वाटतंय पुरेशी कल्पना आली असेल!
घर अनेक वर्ष बंद होत त्यामुळे नाग साप आणि इतर अनेक छोट्या प्राण्यांचा सुरुवातीला मुक्त वावर होता.
आम्ही लहान लहान, आई बाबा नोकरी करणारे, त्यांना काळजी वाटायची. सुरुवातीला काही मारले (आता फार वाईट वाटत! पण काही अनुभव डेंजर आहेत आणि आता सारखी मुबलक माहिती, अवेअरनेस नव्हता 3.५ दशकांपूर्वी)
अनेक साप नाग निघाल्यावर बाबांच्या मनात आल की आपण साप पकडायच शिकून घ्यावं.
..
त्यांनी एका गारुड्या ला बोलावले..
अखेर तो एके दिवशी आला!
त्याने एकदम जातिवंत जनावर आणलेले..
ते फुस्स फुस्स करत फुत्कार टाकत होते.
आणि एका क्षणी, त्यांनी टोपली ठेवली तर ते सळसळ करत पळून गेलं! माजघरात बऱ्यापैकी अंधार आणि इतर सामान, कुठे सापडेना!
सगळी पळापळ!
इथपर्यंत सगळं ठीक होत म्हणाव अशी परिस्थिती, कारण आईन त्याच दिवशी तिच्या मैत्रिणीला डोहाळजेवणाला बोलावलेलं!
ह्या सगळ्या प्रकारामुळे आईला आणि मग नंतर आई चिडल्यामुळे बाबांना चांगलाच shock बसला आणि ह्या shock च्या नादात बाबांचा शौक तसाच राहिला!
शौक बडी चीज है. सापावरून
शौक बडी चीज है. सापावरून आठवले, विंचवाचे वीष हे नशा करण्यासाठी वापरतात हे ऐकून मला शॉक बसला होता. राजस्थान मधून प्रवास करताना रस्त्याकडेला बऱ्याच स्थानिक स्त्रिया टोपल्यांमध्ये विंचू घेऊन बसलेल्या दिसतात. हे कशासाठी विचारल्यावर संध्याकाळनंतर तरुण मंडळीना ह्या दंशाने हाय (High) मिळते असे कळले.
महेश्वर सारख्या नर्मदातीरी संध्याकाळी दिवेलागणीनंतर अचानक तरुणाईची चहलपहल वाढली. तरुणाई अध्यात्माकडे वळाली हे पाहून थोड्या वेळ सुखावलो पण नंतर समजले की बऱ्याच साधू संतांकडून मिळणाऱ्या ग्रास साठी ही मंडळी इथे जमली आहे तेंव्हा चांगलाच शॉक बसला.
एक होमलेस माणूस माझ्यापुढे
एक होमलेस माणूस माझ्यापुढे (अमेरिकेत)state I’d/driver’s license च्या रांगेत उभा होता. पॅंट कमरेवरुन खाली. खुप कळकट कपडे. जुने, झिजलेले शुज. उभ्या उभ्या झोपत होता. हातात एकही कागद नाही. त्याचा नंबर आला. काचेमागच्या बाईने normal greet केले. त्याला state Id हवा होता. आणि त्याच्याकडे काहीही कागदपत्र नव्हती. मला वाटलं बाई याला जा म्हणणार. बाईने SSN आहे का विचारले. होते. होमलेस असल्याने घरचा पत्ता नव्हता. बाईंनी विचारले, Id कुठे collect करशील? माझा माझ्या कानावर विश्वास बसला नाही. तो म्हंटला पुर्वी चा पत्ता देतो. मालकाला सांगुन ठेवतो. २ मिनिटात फोटो काढुन temporary Id चा पेपर घेऊन तो माणुस निघुनही गेला.
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर>>>>> जीवंत नाग
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत
आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर>>>मूर्ती च आली डोळ्यासमोर कारण आमच्याकडे सुदधा पिशवीतूनच नागाची मूर्ती आणायचे आणि.. नाग आणला का ?,आमचा नाग मगाशीच आणला,पाऊस कमी आहे तर पटकन नाग घेऊन या..असं सहज म्हटलं जायचं
ऋन्मेष चे किस्से बरेचदा अ अ वाटतात(यासाठी तो स्वतः जबाबदार आहे)पण याचा अर्थ सगळेच फेकतो असं नाही वाटत,काही किस्से रिलेट सुद्धा होतात
तर हे सगळं नागपंचमीच्या
तर हे सगळं नागपंचमीच्या आदल्या रात्री घेऊन घरी यायचं. वेल सोडून बाकीच्या गोष्टी घरात ठेवायच्या आणि वेल दाराबाहेर ठेवायची. पूर्वी गावी या वेली रानातून आणल्या जात आणि या वेलींवर साप असतात असे आई सांगायची. त्यामुळे रात्री अंधारात चुकून खराखुरा साप, नाग घरात आणला जाऊ नये म्हणून या वेली बाहेर अंगणात वैगरे ठेवत असत. पूर्वापार सुरू असल्यामुळे आम्ही अजूनही ताना दाराबाहेर लटकवतो.>>>
हे इंटरेस्टिंग आहे.
(((आमचं घर आई बाबांनी विकत
(((आमचं घर आई बाबांनी विकत घेतलं तेव्हा तो 150 वर्ष जुना वाडा होता. शेजारी 1600 स्के फु च आवाड. पुढे ओसरी, पडवी, अंगण, विहीर, त्यापुढे एक खोली आणि पुन्हा मोकळी जागा वगैरे.)))
नानबा याबद्दल अजून लिहा ना प्लिज... मला अशा जुन्या वाड्याबद्दल खूप कुतूहल आहे.
((त्याने एकदम जातिवंत जनावर आणलेले..))
हे कशासाठी ? बाबांना साप पकडण्याच्या सरावासाठी का ?
भारतात - The Union Law
भारतात - The Union Law Minister presents the CJI's final recommendation to the Prime Minister, who then advises the President of India in appointing the Supreme Court judges >>>>
भरत - धन्यवाद.
इथे ट्रम्पच्या प्रमुख आश्वासनांपैकी एक हे होते - कॉन्झर्वेटिव्ह व्हॅल्यूज वाला न्यायाधीश नियुक्त करेन म्हणून. आणि त्याने ते केले. इतके थेट असे भारतात होऊ शकते का कल्पना नाही.
जुन्या वाड्याबद्दल खूप कुतूहल
जुन्या वाड्याबद्दल खूप कुतूहल आहे.>> जबरा होत घर आमचं.. आतचाही मस्त आहे, बंगला बांधलाय..
गावात भरपूर मोठे मोठे वाडे होते आ धी, आता कशाही बिल्डिंग झाल्यात अनेक ठिकाणी! अजूनही काही वाडे आहेत गावात.
आमच्या पूर्वजांच्या घरात तर भित्तीचित्रे होती ( जे त्याच गावात, दुसरीकडे आहे. आता ते माझ्या चुलत भावाकडे आहे, त्यांनी रिनोवेशन केलंय) , त्याला काडी लावली तरी काजळी धरायची नाही, एक खोली होती त्यातल्या कपाटात सब - कपाट असल्यासारखी होती, त्यात एके ठिकाणी कपाट, तर दुसरीकडे उडी मारून खालच्या मजल्यावरच्या एका खोलीत पोहोचता यायचं (गुप्त सोय).
बाबासाहेब पुरंदरे येऊन गेलेले तेव्हा त्यांना अब्दागीरी आणि तत्सम गोष्टी दिलेल्या घरातल्या.
( अनेक कागदपत्रे होती खूप जुनी जी मोडीत असल्याने लोकांनी मोडीत घातली.. (फा.को.) हा मला बसलेला शॉक होता :P)
((त्याने एकदम जातिवंत जनावर आणलेले..))
हे कशासाठी ? बाबांना साप पकडण्याच्या सरावासाठी का ?>> गारुद्यांकडे असतात जनावर.. आता हे मलाही भयानक वाटतंय जाणीव आल्यावर (they are not pets!) , PaN पस्तीस एक वर्षापूर्वी लोकांमध्ये एवढा अवेअरनेस नव्हता.
मला ऋन्मेषचा प्रतिसाद वाचून
मला ऋन्मेषचा प्रतिसाद वाचून नागाची मुर्तीच वाटली.
ओके म्हणजे माझंच बेसिक गंडलं
ओके म्हणजे माझंच बेसिक गंडलं आहे
मी आजवर कुठल्याही माणसाला पिशवीतून देव किंवा देवाची मूर्ती 'सोडताना' नाही पाहिलं
आणि अनेक नाग, धामण, घोणस पिशवीत पकडताना आणि लांब नेऊन पिशवीतून 'सोडताना' पाहिलेत
सो तुमचं बरोबर आहे, माझी चूक झाली
सर तुम्हाला जो मानसिक शारीरिक आणि आर्थिक मनस्ताप झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे
आशूचॅम्प केले माफ
आशूचॅम्प केले माफ
उद्या माहेरी जातोय
राणीच्या मागे
काही नवीन अनुभव घेऊन उद्या रात्रीच प्रकटतो.
शुभरात्री !
नानबा यांच्या वाड्या संदर्भात
नानबा यांच्या वाड्या संदर्भात पोस्ट एक नंबर
लकी आहात एकदम असल्या वाड्यात राहायला मिळालं लहानपणी
“आमच्याकडे नाग पिशवीतून आणत
“आमच्याकडे नाग पिशवीतून आणत आणि पिशवीतून सोडत हे वाचून काय चित्र येते डोळ्यासमोर” - खराखूरा नाग. तो सर्पोद्यानात रहातो तो, कवा कवा जंगलमदी बी असतो
गणपती असा कुठेही ‘सोडत’ नाहीत. त्याचं रीतसर विसर्जन होतं.
देवाची मूर्ती 'सोडताना' नाही
देवाची मूर्ती 'सोडताना' नाही पाहिलं >>> तो शब्द बरोबर नाही वाटला, तरीही समहाऊ खरा नाग नाही वाटला.
“ तरीही समहाऊ खरा नाग नाही
“ तरीही समहाऊ खरा नाग नाही वाटला.” ह्यात त्या बिचार्या नागाची काही चूक नाहीये. प्रतिसादकर्त्याचं रेप्युटेशन Preceding आहे
विसर्जनासाठी अनेक शब्द आहेत
विसर्जनासाठी अनेक शब्द आहेत वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या समूहात. त्यापैकी शिळवणे हा शब्द बराच प्रचलित आहे. त्याखालोखाल पोचवणे हादेखील वापरला जातो.( क शॉ बसेल कित्येकांना.) सोडणेसुद्धा आहेच.
माझ्या वैयक्तिक मते, क शॉक बसण्याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांचा वावर हा एक ठराविक किंवा मर्यादित वर्तुळात असतो. भिन्न बोलीभाषा बोलणारे आणि भिन्न प्रदेशातले लोक जरी मित्रवर्तुळात असले तरी दैनंदिन व्यवहारात आवश्यक अशाच, तितक्याच शब्दांची देवघेव होते. उगाच काही कारण नसताना ' तुमच्यात गणपती विसर्जनाला काय म्हणतात?' असा प्रश्न आपण आपल्या मित्राला विचारू का? नाही विचारणार. कारण रोजच्या भाषिक व्यवहारात त्याची गरज नसते. दुसरे थोडे आपोआप जाणिवेत रुजलेले कारण असे की ' विसर्जन ' हाच शब्द आहे, दुसरा कोणताच असू शकत नाही( कारण आमच्या कानांवर तो आलेला नाही,) आणि तोच बरोबर आहे अशी आमची नकळत धारणा बनलेली असते.
अर्थात ह्याला इलाज नाही. कारण भौगोलिक, भाषिक, जातीय, धार्मिक विलगता ही इतक्या लवकर सांधता येण्यासारखी गोष्ट नाही. ते आपल्या हातात नाही.
त्या नवीन शब्दाकडे खुलेपणाने पाहावे, इतके मात्र आणि इतकेच आपल्या हातांत आहे.
किती छान पोस्ट हिरा
किती छान पोस्ट हिरा
अगदी कल्चरल शॉक नाही म्हणता
अगदी कल्चरल शॉक नाही म्हणता येणार पण हिरा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण लहानपणापासून जे शब्द ऐकत आलेलो असतो त्यापेक्षा वेगळं काही कानावर पडलं की बिचकायला होतं.
आमच्या बिल्डिंगच्या मध्ये एक नवीनच लग्न झालेलं जोडपं रहायला आलं होतं, ते मूळचे नागपूरचे. एक दिवस आम्ही गप्पा मारत बसलो होतो तेव्हा ती म्हणाली की, मी आत्ता गंज भरून पाणी ठेवलंय तापवायला, ते तापलं की जाईन अंघोळीला. इकडे मी हँग, च्यायला गंजभर पाण्यात ही अंघोळ कशी काय करणार?
पण म्हटलं जौदे. मग नंतर अनेक वेळा तिच्या बोलण्यात हा शब्द आला तेव्हा प्रत्येक वेळी मी हँग झाले. एक दिवस तिच्या घरी गेले असताना तिने मला तिचा पाणी तापवण्याचा गंज दाखवला तर माझे डोळे बाहेर, तिचा गंज म्हणजे अँल्युमिनियमच मोठं पातेलं. असे बरेच नवीन शब्द कळले तिच्याकडून.
Pages