चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे दोष दिसूनही मला 'शेर शिवराज' आवडला, पावनखिंडने निरपेक्ष केले होते म्हणून कदाचित! पण चिमा, मृकु, आस्ताद काळे, एकुणच ह्या गँगचा कंटाळा आलाय. कुणाचाच वावर /आवेश /विनोद अजिबात ऑरगॅनिक नाहीये .
फेरफटका +१
हर्पा Lol

पूर्वी तमाशापटात लेंगा/धोतर, शर्ट, जाकीट, टोपी घालून सरपंचाच्या खलनायकी भुमिकेत निळू फुले असायचे. तसंच ह्या ऐतिहासिक सिनेमांचं झालंय. नुसतं ‘चला’ म्हटलं की पैठणी नेसून मृणाल कुलकर्णी, जिरेटोप वगैरे घालून चिन्मय मांडलेकर आणि धोतर नेसून अजय पूरकर सेटवर येत असावेत.

थोडसं अवांतरः एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटिंगमधे एकाच सहकलाकाराबरोबर बलात्काराचा सिन केल्यावर दिवसाखेर ‘अहो, निदान बाई तरी बदला‘ असं गमतीनं म्हटल्याची आठवण निळू फुल्यांनी सांगितली होती.

फेफ आणि हर्पा,
अजून एक नोटिस केलंय ... हे सगळे कलाकार स्वतःच in awe of the respective character वागतात. That keeps them apart from the character they are playing. म्हणजे मृकु जिजाऊ बद्दलचा अतोनात आदर दाखवते, चिमा शिवबा राजांच्या बाबत , बाकीचे कलाकार आपापल्या व्यक्तिरेखांच्याबाबत , हे एक महाराष्ट्रीय म्हणून होणे स्वाभाविक आहे (मलाही यांनी वाईट अभिनय केला तरी या थोर व्यक्तिंना आठवून पिरिऑडिकली गूसबम्प्स येतातच) पण त्यांच्या व्यक्तिरेखांना न्याय देणारं नाही, मगं हालचालीत, देहबोलीत एकुणच अभिनयात कृत्रिमता येते.

पावनखिंड खरोखरच इतका वाईट आहे का
ट्रेलर बघूनच मी त्याच्या वाट्याला न जायचं ठरवलं होतं

रादर इतक्यात आलेला कुठलाच ऐतिहासिक सिनेमा बघण्याचे धाडस केले नाहीये
ना हिंदी ना मराठी

त्यापेक्षा मग अमोल कोल्हे ची राजा शिवछत्रपती खूप चांगली होती
नंतर ते वाहवत गेले ही गोष्ट वेगळी

एक दूजे के लिए कधीच पूर्ण पाहिला नाही. आत्ता दोन गाण्यांपर्यंत सलग पाहिला. सुंदर आहे.

रादर इतक्यात आलेला कुठलाच ऐतिहासिक सिनेमा बघण्याचे धाडस केले नाहीये
>>>>

+७८६
मी तर त्या चित्रपटांची चर्चाही स्किप करतो.

मुळातच मला ईतिहास या विषयात रस कमी आहे. तरी फॅमिली हट्टापायी तानाजी बघायला गेलो होतो. ट्रेलर बघूनच चित्रपट गंडलाय हे वाटत असूनही गेलो. माझ्या त्या अपेक्षांना जागला पिक्चर. मग त्यानंतर मी एकटा घरची खिंड राखतो म्हणत पावनखिंडला फॅमिलीलाच धाडले.

ऐतिहासिक चित्रपट बनवणारे भक्तीभावाने बनवत असतील तर ठीक. पण अजेण्डे घेऊन, राजकारणासाठी बनवत असतील तर अशा चित्रपटांबद्दल सुद्धा काही बोलणे हे राजकारणासाठी निमित्त ठरू शकते. इतिहासाच्या एखाद्या कालखंडाकडे दुभती गाय म्हणून पाहिले जाऊ नये एव्हढीच माफक अपेक्षा. यापेक्षा जास्त न बोलणे इष्ट.

उद्देश कुठलाही असो पण सगळ्याच अ‍ॅव्हरेज जिलब्या पाडण्यापेक्षा सगळा रेव्हेन्यु निट जमा करुन, अभ्यास करुन, वेळ घेवुन जरा बरा मालपुवा घडवा, दर दोन महिन्यानी एक मुव्हि आणण्यापेक्षा वर्शाला एखादा आणा, घाई काय आहे?? इतिहास बदलणार आहे की मराठी माणूस पळून चाललय? खरतर राजाचा इतिहास सगळ्याना मराठी माणसाना पाठ आहेच गरज आहे ती उत्तम चित्रिकरण करुन तो इतर प्रदेशातल्या लोकाना सुद्धा समजेल,भावेल्,पटेल असा उच्च अभिरुचिचा बनवायची.

इतिहास बदलणार आहे की मराठी माणूस पळून चाललय?
>>>>
मार्केट तेजीत आहे तोपर्यंत फटाफट माल खपवायचा आहे.
और अगर आज मै नही बनायेगा तो कल कोई और बनायेगा. फिर मेरा परसो बना के फायदा क्या..

हे सगळे कलाकार स्वतःच in awe of the respective character वागतात. >>अस्मिता, परफेक्ट निरीक्षण आहे. मी शेर शिवराज बघितला नाहीये आणि आता वरचे प्रतिसाद वाचून बघणारही नाही, पण पावनखिंड बघताना तू हे जे लिहिलं आहेस तेच जाणवलं होतं.

नुसतं ‘चला’ म्हटलं की पैठणी नेसून मृणाल कुलकर्णी, जिरेटोप वगैरे घालून चिन्मय मांडलेकर आणि धोतर नेसून अजय पूरकर सेटवर येत असावेत. >> Lol

अमोल कोल्हे ची राजा शिवछत्रपती खूप चांगली होती याला +१

फत्तेशीकस्त, पावनखिंड इ चा निर्माता अजय आरेकर (आरेकर बंधू) चिंचवडचा आहे, अजय माझ्या शाळेचा आणि माझ्या बॅचचा आहे. आमच्या 10 वीच्या कायप्पा ग्रुपवर ह्या सगळ्या पिक्चरचे जोरदार प्रमोशन असते Happy

खरं तर एकंदरीत भारतीय समाजमानसात रूजलेली व्यक्तिपूजा आणि हल्ली मॅगीपेक्षा अधिक वेगानं दुखावणार्या भावना (उच्चारी: भाव्ना) पहाता, भारतीय फिल्ममेकर्सनी बायोपिक्स आणि ऐतिहासिक सिनेमे बनवू नयेत असं मला वाटतं. अ‍ॅटनबरो चा ‘गांधी’ हा भारतीय इतिहासावरचा ऑब्जेक्टीव्ह आणि प्रामाणिक सिनेमा होता. बाकी केवळ लाट आहे म्हणून सिनेमे छापणार्यांविषयी काय बोलणार?

(रणबीर सोडला तर) जयेशभाई महाबोर आहे. डोकं दुखायला लागलं.
माती केली आहे सगळी. शेवट बघून तर डोकच फिरलं.
मरो!

हे सगळे कलाकार स्वतःच in awe of the respective character वागतात >> भले शाब्बास! (हा जिजाऊंचा तकिया कलाम असल्याचं आता त्यांनी माझ्या मनावर बिंबवलं आहे. प्रत्येक सिनेमात मृ कु एकदा तरी हे म्हणतेच.)

थँक्स हर्पा Happy
वावे, बघं तू 'शेर शिवराय' , कदाचित झिम्मा सारखं होईल मगं गट पडलेच तर माझ्यासारख्या मधल्या लोकांना कुणाच्या मागे जायचे कळेल. Biggrin

व्ही एफ एक्स दाढी, 'चला' म्हटलं की नेहमीचे यशस्वी कलाकार तयार >>> याला खूप हसले Rofl

Forensic मल्याळम.
सस्पेन्स, थ्रीलर सिनेमा.. चांगला आहे.
हिंदी रिमेक येतोय..राधिका आपटे मुख्य भुमिकेत.
https://youtu.be/CZ_VAKOkI3s

नुसतं ‘चला’ म्हटलं की पैठणी नेसून मृणाल कुलकर्णी, जिरेटोप वगैरे घालून चिन्मय मांडलेकर आणि धोतर नेसून अजय पूरकर सेटवर येत असावेत. <<< Rofl Lol

मवरचे सगळे वाचुन मी अद्याप एकही ऐतिहासिक चित्रपट पाहिला नसल्याबद्दल माझे स्वतःचेच अभिनन्दन करुन घेतले. भालजी पेन्ढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट पाहिलेत, त्यानन्तर जोधा अकबर, नंतर काही नाहीच.

मवरचे सगळे वाचुन मी अद्याप एकही ऐतिहासिक चित्रपट पाहिला नसल्याबद्दल माझे स्वतःचेच अभिनन्दन करुन घेतले. >>> सेम पिंच.

धमाल धागा आहे हा.

खरं तर एकंदरीत भारतीय समाजमानसात रूजलेली व्यक्तिपूजा आणि हल्ली मॅगीपेक्षा अधिक वेगानं दुखावणार्या भावना (उच्चारी: भाव्ना) पहाता, भारतीय फिल्ममेकर्सनी बायोपिक्स आणि ऐतिहासिक सिनेमे बनवू नयेत असं मला वाटतं. >> +१

हे सगळे कलाकार स्वतःच in awe of the respective character वागतात. >> +१

जयेशभाई जोरदार पाहिला..
घीसापीटा विषय आहे..रणवीर सिंग वगळता सिनेमा काही खास नाही वाटला.

कुठलाच ऐतिहासिक मुव्ही अलिकडचा बघितला नाही. पण ब्लॅक अँड व्हाईट शिवाजी महाराजांचा एक चित्रपट पाहिलेला. मोहित्याची मंजुळा बहुदा. आणि गनिमी कावा. साधे असुन ते कितीतरी चांगले होते.
सर्जा पण आवडलेला गाण्यांमुळे.

अरे हो ब्लॅक अँड व्हाईट, भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट टीव्हीवर बघितलेत लहानपणी. सर्जापण बघितलेला, अजिंक्य देवसाठी टीव्हीवरच.

Pages