Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येस्स्स. एव्हरीथिंग
येस्स्स. एव्हरीथिंग एव्हरिव्हेअर.... अगदी धमाल आहे. आणि एकमेकांशी प्रेमाने आणि दयाळूपणे वागा हा साधासोपा पण महत्वाचा संदेश मला खूप भावला.
विक्रम चे सर्वांचे रिव्ह्यूज
विक्रम चे सर्वांचे रिव्ह्यूज छान आहेत. लल्लनटॉपचा पण. दुसर्या आठवड्यात जवळच्या थेटरात टिकला तर शुक्रवारी रात्री बघू (मुलांना शनिवारी सकाळी उद्योग नसतील तर).
Amruta अपार्टमेंट -कन्नड
Amruth अपार्टमेंट -कन्नड सिनेमा प्राईमवर.
एक कपल लग्नाच्या एक वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज करतात..दोघांच्या नोकर्या जातात..होम आणि कार लोन घेतलेले असते..एके दिवशी कर्ज वसुलीसाठी बँकवाला येतो..नायकाबरोबर हातापायी होते..त्याच्या दुसऱ्या दिवशी नायक नायिका वकिलाला भेटून घरी येतात आणि पाहतात बेडरूममध्ये त्या बँकवाल्याची डेडबॉडी पडलेली असते..बायको नवर्यावर डाऊट घेते तुझं भांडण झालं होतं तुच मारलंस का?पोलिसांना इनफर्म करू शकत नाहीत कारण संशयाची सुई नायकावर येणार कारण भांडण अपार्टमेंटमध्ये सगळ्यांनी पाहिलेले असते..तेवढ्यात लाईट जाते..आणि थोड्या वेळाने बॉडी घरातून गायब होते...आणि दुसऱ्या दिवशी अपार्टमेंटच्या आवारात सापडते..
डेडबॉडी तिथे कशी आली??गायब कशी झाली??पोलिसांचा ससेमिरा नायकाच्या मागे लागतो का??
चांगला आहे सिनेमा.
इंटरेस्टींग आहे. डब्ड आहे का
इंटरेस्टींग आहे. डब्ड आहे का ? किंवा सबटायटल्स ?
सबटायटल्स शांमा.
सबटायटल्स शांमा.
तमिळ कुत्रम कुत्रमे ची (क्राईम इज क्राईम) थोडी ओळख करून देते.
सुरूवातीला दोन शाळकरी मुली पुलावरून जात असतात त्यातली एक पाण्यात पडते आणि मरते हा एक सीन.
दुसरीकडे एक शाळकरी मुलगी सायकलवर जात असते एक कार धडकते आणि ती पडते हा एक सीन.
आता हे दोन सीन डायरेक्ट शेवटी येणार आहेत.
एका घरात एक विवाहित युवती झोपेच्या गोळ्या घेऊन सुसाईड करते..सकाळी पोलीस येतात..पहिला संशय नवर्यावर..नवर्याची भाची आणि बहिण सोबत राहत असतात..दुसरा संशय भाचीवर...
नक्की काय झालं..वरच्या दोन सीन्सचा काय संबंध हे सगळं पाहता येईल सिनेमात प्राईमवर वीथ सबटायटल्स.
सब टायटल्स ओके आहे. नाहीतरी
सब टायटल्स ओके आहे. नाहीतरी हिंदी मराठी असला तरी सबटायटल्स लावूनच बसतो. मला असे वाटायचे कि मला ऐकू कमी येतेय. पण लॅपटॉपचा आवाज पंख्याच्या आवाजात ऐकू येत नाही. एसीच्या आवाजात पण नाही. हेड्फोन लावले की झोप येते.
कुत्रम म्हणजे क्राईम
कुत्रम म्हणजे क्राईम
मांजरम म्हणजे पोलीस ?
हह पुवा.
हह पुवा.
कुत्रम म्हणजे क्राईम
कुत्रम म्हणजे क्राईम
मांजरम म्हणजे पोलीस ?
उंदरम म्हणजे राजकारणी
Hotstar वर कुणाल खेमूचा
Hotstar वर कुणाल खेमूचा लूटकेस पाहिला. भारी आहे. थ्रिलर, कॉमेडी, सस्पेन्स सगळे चांगले जमून आलेय.
हो
हो
त्याचा गुड्डू की गन मस्त आहे
त्याचा गुड्डू की गन मस्त आहे
कुणाल खेमू आणि अभय देओल यांचे
कुणाल खेमू आणि अभय देओल यांचे चित्रपट मस्त असतात...
शा मा कृपया आपण KGF १/२ वर
शा मा कृपया आपण KGF १/२ वर स्वतंत्र धागा काढा म्हणजे आम्हाला छान वाचायला मिळेल।
कुणाल खेमू आणि अभय देओल यांचे
कुणाल खेमू आणि अभय देओल यांचे चित्रपट मस्त असतात...
Submitted by च्रप्स on 8 June, 2022 - 08:27>>
कुणाल खेमू अभय मध्ये लिटररी अभयच वाटतो खूपच छान ऍक्टिंग केली आहे त्याने अभय १/२/३ मध्ये .
त्याचा ढुंढते रेह जाओगे पण
त्याचा ढुंढते रेह जाओगे पण फार भारी आहे. खुप विनोदी आहे. खुपच अंडररेटेड आहे पण तो.
हिरोपंती २ पाहायला सुरवात
हिरोपंती २ पाहायला सुरवात केली पण १५ मिनिटातच बोर होऊन बंद केला. कधीकधी नुसते छानछोकीचे सिनेमे लोकेशन्स व आयकॅण्डी हिरो हिरोईन साठी बघायलाही बरे वाटतात. पण हा अति आचरट वाटला. असे सिनेमे आजच्या काळात काढतात जेव्हा लोकांना जगातील उत्तम कन्टेन्ट सहज उपलब्ध आहे आणि मग असले हिंदी चित्रपट पडत आहेत यावर आश्चर्य का वाटावे?
शान्त माणूस यांची हिरोपंती वरची पोस्ट परत वाचली..अगदी मस्त पटली !
आता हे दोन सीन डायरेक्ट शेवटी
आता हे दोन सीन डायरेक्ट शेवटी येणार आहेत. >>> एकदम शेवट बघायला हवा.
कुत्रम म्हणजे क्राईम अर्थ लिहीलात म्हणून बरं झालं.
साऊथचे पुर्वीचे पिक्चर्स भारी असायचे, दुरदर्शनवर लागायचे ते. हल्लीच्या पिक्चर्सचा मी धसका घेतलाय विशेषत: क्राईमचा, गोल गोल घुमवतात, संपता संपत नाही. नवरा काही डबड साऊथ बघतो त्यावरुन लिहीलं.
हा मात्र प्राईमवर आहे, मग वेग असेल कदाचित.
शा मा कृपया आपण KGF १/२ वर
शा मा कृपया आपण KGF १/२ वर स्वतंत्र धागा काढा >>> तसा सिनेमा सापडला पाहीजे. फारएण्डचं सिलेक्शन जबरी असतं. केजीएफ सारख्या सिनेम्यांवर स्वतंत्र धागा काढला तर बोअर होईल वाचकांना. साऊथची अॅक्शन , त्यातलं लॉजिक इग्नोर करूनही कथेत दम असलेले सिनेमे आले होते ते आवडले.
विक्रम पाहिल्यावर आवडला तर वेगळा धागा काढीन.
कोणी अपरिचित वर धागा काढा
कोणी अपरिचित वर धागा काढा
त्यात आणि रोबोट मध्ये खूप चिरफाडिय क्षमता आहे.
विक्रम बघण्या आधी कैथी बघावा
विक्रम बघण्या आधी कैथी बघावा म्हणे
https://www.youtube.com/watch?v=kaZFBTthNZM
रोबोट मध्ये दोन रजनी सर
रोबोट मध्ये दोन रजनी सर असताना केवळ रोबोट ला अद्वितीय पॉवर्स आहेत हा एकविक्रम आहे
जेव्हा रजनी सर असतात तेव्हा ते नॉर्मल माणसासारखे वागतात, बोलतात, गुंडापासून पळून जातात इ.
त्यासाठी का होईना त्यांना 100 गोष्टी माफ कराव्यात
सर कोणते का असेनात...
सर कोणते का असेनात... त्यांना पावर असतात आणि बाकिच्यांनी माफ केले पाहीजे हे स्वाभाविक आहे.
वेगळ्या रुपात पवार आपलं पॉवर
वेगळ्या रुपात पवार आपलं पॉवर घेऊन आले तरीसुद्धा
आजारपणात हळूहळू दोन पिक्चर
आजारपणात हळूहळू दोन पिक्चर पाहिले
आधी चान्स पे डान्स पाहिला. पळवत पळवत. एका स्ट्रगलरची घीसीपिटी कहाणी होती. काही सीन अति बोअर तर काही ठिकठाक. जेनेलिया देशमुख अभिनय काही भारी करत नाही पण मला माझ्या बहिणीसारखी वाटते म्हणून बघतो तिचे चित्रपट. शाहीद मात्र त्याच्या आधीच्या शाहरूख कॉपी मोडमध्येच ॲक्टींग करतो. ते नाही आवडत फारसे. ओवरऑल कोणी नाही बघितला तरी चालेल. तरी यावर ऊतारा म्हणून पुन्हा एकदा कबीर सिंग वा जर्सी बघावा लागेल. गेला बाजार मीटर चालू बत्ती गुल तरी...
त्यानंतर मग द झोया फॅक्टर पाहिला. सोनम कपूर मला खूबसुरत पासून आवडते. हिरो कळला नाही कोण होता. भारतीय क्रिकेट संघाला सोनम कपूरचे लक जिंकवून देते ही स्टोरीलाईन. चित्रपटाच्या सुरुवातीलाच शाहरूखचा आवाज. कानात बदाम बदाम बदाम. त्यामुळे बघायला घेतला. क्रिकेटसंबंधित होता हे अजून एक बघायला घ्यायचे कारण. पण अर्ध्यातासाने बंद करावा असे वाटत असताना हळूहळू मजेशीर वाटू लागला. नशीब बंद केला नाही. कारण नंतर आवडला. शेवटी पुन्हा शाहरूखचा आवाज. पुन्हा कानात बदाम बदाम बदाम.
कानात बदाम घालून झोपू नये,
कानात बदाम घालून झोपू नये, उगाच अवघड जागी अडकला तर वांदे होतील
त्यातून तुम्ही तीन बदाम घातलेत, बघा बुवा
हा हा.. गूडवन आशूचॅंम्प
हा हा.. गूडवन आशूचॅंम्प
आता तलाश बघतोय. ईंटरेस्टींग दिसतोय. आमीरचा पिक्चर असून आजवर बघितला नव्हता हे आश्चर्यच. सस्पेन्सही आहे. कोणी फोडू नका. आज उद्यामध्ये बघून संपवेन. मग बोलूया. शुभरात्री
ती भूत असते
ती भूत असते
हा असे ट्रॅप टाकतो आणि
हा असे ट्रॅप टाकतो आणि मुरलेले लोकही फसतात
मग द झोया फॅक्टर पाहिला. सोनम
मग द झोया फॅक्टर पाहिला. सोनम कपूर मला खूबसुरत पासून आवडते. हिरो कळला नाही कोण होता. >>> डुलकर सलमान.. मामुट्टीचा मुलगा
ओके kanmani बघा त्याचा.
Pages