Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिनेमा हॉलमध्ये फोनवर शूट
सिनेमा हॉलमध्ये फोनवर शूट केलेला असेल का?
>>> मराठी चित्रपटासाठी इतकी मेहनत कोण घेईल इतर ठिकाणी आलाय ना- तोच HD डाउनलोड करून यु ट्यूब ला टाकतात लोक...
झोंबिवली युट्यूबवर काम करत
झोंबिवली युट्यूबवर काम करत करत पाहिला. नाही आवडला.
वेग ठेवलाय पण हॉरर आणि कॉमेडी दोन्ही जमले नाहीत.
“मेन” पाहिला. शेवट कळला असं
“मेन” पाहिला. शेवट कळला असं वाटलं तरी नक्की कळला नाही. नेहमीचा साधासरळ हॉरर सिनेमा असतो तसा नाहिये. वेगवेगळे सीन पाहिले तर विचार करता चांगले जमलेत. अभिनय छान केलेत दोन्ही पात्रांनी. अप्रतिम निसर्ग व त्यातलं काय म्हणतात ते ‘आयसोलेशन’ हे मिश्रण भितिदायक दाखवणे हे फार छान जमलंय पण सिनेमा एकसंध वाटला नाही. तुटक वाटला. त्यामुळे आवडला व नाही आवडला यामधे कुठेतरी फसले आहे.
संदूक कुठे पाहता येईल?
संदूक कुठे पाहता येईल?
प्राईमवर आहे संदूक.
प्राईमवर आहे संदूक.
मेन बघायचाय.
मेन बघायचाय.
आज भूलभुलैया २ बघितला.
आज भूलभुलैया २ बघितला. टाईमपास आहे.. माझ्यासारखी घाबरट मुलगीही व्यवस्थित बघू शकली म्हंजे भीतीच एलिमेंट किती कमी असेल ते बघा
कार्तिक आर्यन अक्षयकुमारची फुल कॉपी मारतो आणि मुख्य म्हणजे ती खपूनही जाते. कियारा अडवणीला सुंदर दिसण्याच्या व्यतिरिक्त दुसरे काम नाही. तब्बूने पण बरे काम केलेय पण राहून राहून विद्या बालन आठवतेच.. राजपाल यादव आणि मंडळी विनोद निर्मितीचे काम व्यवस्थित करतात. गाणी अजिबात लक्षात राहत नाही.
तर एकंदरीतच फुल एंटरटेनमेन्ट पॅकेज आहे. कंटाळा येत नाही. टाईमपास पिक्चर .
तुलसीदास ज्युनिअर पाहिला.
तुलसीदास ज्युनिअर पाहिला.
स्नूकर खेळावर पहिलाच चित्रपट आणि आवडला.
संजूबाबाच्या एंट्रीपर्यंत तसा ठिकठाक वाटला. त्यानंतर मात्र मस्त वाटला. ते शेवटपर्यंत.
दोन भावांचे रिलेशनसुद्धा मस्त दाखवले होते.
आभार चंपाजी.
मस्तं आहे संदूक. परफेक्ट सटायर.
चंपा, राभु धन्यवाद.
चंपा, राभु धन्यवाद.
संदूक पहायला सुरूवात केली. उपहास / सटायर च्या अंगाने जाणारा आहे. पण चिमटे न काढता गुदगुल्या करणारी शैली आहे. दिवास्वप्ने पाहणारा, नुसत्या बातम्यांनी छाती फुलून येणारा पण प्रत्यक्षात काही न करणारा अष्टपुत्रे सुमित रामघवने जबरदस्त उभा केला आहे. त्याचा हा पहिला चित्रपट आहे हे वाचून धक्का बसला. एव्हढा गुणी अभिनेता ! फाफे टीव्ही सिरीयल होती का मग ?
घराण्याचा, साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या तलवारीचा अभिमान हे सुद्धा सुमितच्या अभिनयाने धमाल झाले आहे. खळखळवून हसवणारा विनोद नाही, पण ओठावर जे स्मित उमटते ते मावळतच नाही. पूर्ण बघायचा होता पण नाईलाजाने बंद करावा लागला. आज पुढचा अर्धा भाग पाहीन. मायबोलीवर वेगळा धागा आहे का या चित्रपटासाठी ?
मध्यंतरी चित्रपटांना पाठ फिरवलेली त्यात असे चांगले पण मिसले गेले.
संदुक बघायचा प्रयत्न केला
संदुक बघायचा प्रयत्न केला होता पण नीट मजा येईना मग बंद केला.
पण हे खरं की सुमित राघवन पिक्चर किंवा मालिका कितीही टुकार असेल तरी चांगलाच अभिनय करतो.
सुमित राघवन कुठेही असला तरी
सुमित राघवन कुठेही असला तरी तो मला साहिलच वाटतो इतके ते कॅरॅक्टर फिट आहे...
एक डाव धोबीपछाड कुठे पाहता
एक डाव धोबीपछाड कुठे पाहता येईल?
YouTube . पण प्रिंट फारशी
YouTube . पण प्रिंट फारशी चांगली नाही.
संदूक - केवळ सु.रा.मुळे
संदूक - केवळ सु.रा.मुळे सुसह्य !!
संदूक पूर्णच छान आहे.
संदूक आत्ताच संपवला. छानच आहे. सिनेम्याच्या मूडशी कनेक्ट झाला कि. . !
थोडासा मुन्नाभाई प्रमाणे. पण केमिकल लोचा नाही. थोडा जो जो रॅबिट प्रमाणे वाटला. सुमित राघवनचे कॅरेक्टर लिहीलेय पण छान आणि त्याने पेललेय पण उत्तम.
सरसेनापती हंबीरराव बघितला .
सरसेनापती हंबीरराव बघितला .
टिव्ही सिरीयल पाहिल्यासारखं वाटतं !
पडके बुरुज , फक्त शे दोनशे मावळे मोगल मिळून लढलेल्या लढाया पाहून विषण्णता येते .
औरंगजेबाच्या दरबारातील सगळे ३०/३५ सरदार उभेच राहिलेले दाखवलेत , त्यांना बसायला शानदार खुर्च्या नाहीत .
अभिनयात तरडे आणि गाष्मिर बरे वाटले , पण विफेक्स आणि सेट ची कमतरता खूप जाणवते .
किमान ऐतिहासिक मूव्हीत तरी मराठी उद्योजकांनी पैसे गुंतवायला हवेत .
बाहुबली सारखे पाचशे कोटी नको , पण शे दोनशे कोटी गुंतवून देखील उत्तम व्ही एफ एक्स युक्त आणि थोडे चांगले सेट असलेले मूव्ही महाराजांच्या आयुष्यावर बनू शकतील .
पण राजांच्या आयुष्यावरील सिनेमे पाहताना मराठी फिल्म इंडस्ट्री मधील दरिद्रीपण पावलोपावली जाणवते .
तेही राजांच्या नावाने आजही हजारो कोटींची माया जमवीनारी घराणी असताना .
सध्या खूप जास्त ऐतिहासिक
सध्या खूप जास्त ऐतिहासिक मराठी चित्रपट एकदम येत आहेत.थोडी गॅप ठेवून एक एक quarter मध्ये एक एक करायला हवे होते असं वाटलं.
हंबीरराव तरडे च्या अभिनयासाठी नक्की बघणार.
सध्या खूप जास्त ऐतिहासिक
सध्या खूप जास्त ऐतिहासिक मराठी चित्रपट एकदम येत आहेत.थोडी गॅप ठेवून एक एक quarter मध्ये एक एक करायला हवे होते असं वाटलं.>>>> +१
पुरोगामीना अनुमोदन, पावनखिन्ड तर एकदम बालनाट्या प्रकार होता परत हन्बिरराव मधे पण तेच असेल तर घोर निराशा होइल, बाहुबली एका इमॅजनरी कथेवर असुनही त्याच्या भव्यतेने त्याला जिवत केल होत, अगदी तस नसल तरी अगदी जोड-तोड प्रकार करुन का निर्मिती करतायत सगळे?
कारण ते पिक्चर 5 , 6 भाषेत
कारण ते पिक्चर 5 , 6 भाषेत बनतात
मराठी मुवि एकाच भाषेत
भुलभुलैय्या मध्ये तब्बूला
भुलभुलैय्या मध्ये तब्बूला इतके तरुण दाखवले आहे जितकी ती तिच्या खऱ्या आयुष्यात तरुणपणी न्हवती। खूपच भयानक दिसते
ऐतिहासिक चित्रपट बघण्याऐवजी
ऐतिहासिक चित्रपट बघण्याऐवजी जुरासिक पार्क बघावे
नाहीतरी त्यातही तेच असते
राजघराणी डायनासुरसारखी झुंजत असतात आणि सामान्य कोल्हेकुत्रे पळतात , कधी चिरडून मरतात, हा डायनासुर आला की तिकडे पळायचे , तो आला की इकडे पळायचे.
लै एटरेक्शन आहे पब्लिकला स्वतःला कोल्ह्याकुत्र्यागत फिरताना बघायचं
पुढच्या महिन्यात आहे डायनासुर मुव्ही नवीन
काल खूप गाजावाजा झालेलं
काल खूप गाजावाजा झालेलं चंद्रमुखी च टायटल साँग पाहिलं... मला कोरिओग्राफी तल फार काही कळत नाही...पण ती लावणी मात्र वाटली नाही...अगदीच काहीतरी आहे डान्स...हे माझं पर्सनल मत... गाणं मात्र खूप सुंदर गायलं आहे श्रेया घोषाल ने...संगीतही सुंदर...
(No subject)
>>लै एटरेक्शन आहे पब्लिकला स्वतःला कोल्ह्याकुत्र्यागत फिरताना बघायला>>>>>
सततच्या प्रमोशन्समुळे अमृता
सततच्या प्रमोशन्समुळे अमृता हॉस्पिटलच्या बेडवर!
https://www.houdeviral.in/amruta-khanvilkar-dakhanyat/
भुलभुलैय्या मध्ये तब्बूला
भुलभुलैय्या मध्ये तब्बूला इतके तरुण दाखवले आहे जितकी ती तिच्या खऱ्या आयुष्यात तरुणपणी न्हवती। खूपच भयानक दिसते
>>
थोडी गॅप ठेवून एक एक quarter
थोडी गॅप ठेवून एक एक quarter मध्ये एक एक करायला हवे होते असं वाटलं.
>>>+1
सोन्याचा अंडे देणारी कोंबडी वाटते त्यांना...
लांजेकरने पावनखिंड थिएटर मधून
लांजेकरने पावनखिंड थिएटर मधून उतरला नव्हता तरी लगेच शेर शिवराज रिलीज केला .
शिवाय दर्जा तोच !
त्यामुळे मल्टी स्क्रीन मध्ये प्रेक्षक अभावी एखादी स्क्रीन चालू असायची .
तर लांजेकर ने 'मराठी इंडस्ट्री अन्याय ' चे विक्टिम कार्ड वापरून प्रेस मध्ये मल्टी स्क्रीन वाल्यांवर स्क्रीन देत नसल्याचा आरोप केला .
हा लांजेकर टांकसाळ प्रमाणे दर्जाहीन सिनेमे काढत सुटल्यावर प्रेक्षकांनी तरी किती वेळा संयम ठेवावा ?
महाराजांवरील प्रेमापोटी पब्लिक त्याचे सिनेमे सहन करील असा त्याचा गैरसमज शेर शिवराज च्या वेळी दूर झाला .
लांजेकर विरुद्ध जनहित याचिका दाखल करून त्याच्यावर महाराजांवरिल ऐतिहासिक सिनेमे बनविण्यास बंदी कोणी का आणत नाही ?
प्रवीण तरडे ने ही काही वेगळे दिवे लावलेले नाहीत .
यांच्या तुलनेत जुन्या काळातील चंद्रकांत / सूर्यकांत या अभिनेत्यांचे ऐतिहासिक मराठी चित्रपट भारी वाटतात .
शेर शिवराज दहा करोड बिझिनेस
शेर शिवराज दहा करोड बिझिनेस केलाय... पावनखिंड बहुतेक चाळीस... आकडे मस्त आहेत...
लांजेकर ने शेर शिवराज तीन महिन्यांनी रिलीज केला असता आकडे वेगळे असते...
तरडे चा चित्रपट या सिरीज मधला नाहीय...
सरसेनापती हंबीरराव या सिनेमात
सरसेनापती हंबीरराव या सिनेमात उल्लेखलेल्या पेडगाव / बहादुर गड बद्दल माहिती चाळली असता
किल्ल्याचे फोटो ऐवजी मंदिराचे फोटो का दिसत असावेत ?
बहादुर खान ने बहादुर गड बांधल्याचे इतिहासात उल्लेख आहेत , किल्ल्याच्या बांधकामातील खांबावर हिंदू शैली मधील मुर्त्या का दिसत आहेत ?
कोणी जाणकार प्रकाश पाडील का ?
Pages