अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे

Submitted by फलक से जुदा on 31 May, 2022 - 20:51

मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.

खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्नत (शाहरूखचाच ना?) आत जाऊन बघायचंय >>> +७८६, मलाही. मग वेगळ्या हज यात्रेची गरज नाही Happy

तसेही हजला जायला जर मुसलमान आणि अमेरीकन सैन्यालाच परवानगी असेल तर मला एकतर धर्मांतर करावे लागेल किंवा अमरीकेच्या सैन्यात भरती व्हावे लागेल. दोन्ही डेंजर आहे.

आप तो बच्चे की जान लेके ही राहोगे Happy

अहो नीट हारनेस बांधायला सांगितलंय ना त्यांनी ट्रेन मधून उडी मारायच्या आधी Happy

माझ्या परदेशी फिरण्याच्या लिस्टमध्ये - क्रोएशिआ , ग्रीस , बाली , युक्रेन , पोलंड , लाओस वगैरे आहेत .
एकदा नोर्दन लाईट्स बघायची आहे .

पण हारनेस कुठे बांधायचा? ट्रेनला? मी सकाळ पासून हाच विचार करतोय
>>>>
आणि मी विचार करतोय हारनेस म्हणजे काय? मायबोलीवर ईंग्लिश शब्द वापरता तर रोमनमध्ये लिहा रे. निदान गूगल तरी करता येते.

बाकी काही दोरी कमरपट्टा वगैरे सारखे असेल तर साखळी खेचून ट्रेन थांबवून हा प्रयोग करता येईल

रॉबर्ट डाऊनीच्या शेरलॉक होम्सच्या दुसऱ्या पिक्चरमधे (गेम ऑफ shadows) होम्स वॉटसनच्या बायकोला ट्रेन पुलावरून जात असताना बाहेर ढकलून देतो. (तिला वाचवण्यासाठी) नदीत लगेचच मायक्रॉफ्ट (शेरलॉकचा भाऊ) होडी वल्हवत येतो आणि तिला घेऊन जातो.
https://youtu.be/qy6Kh5dkTeo
असं प्लॅनिंग पाहिजे!
(हा पिक्चर अ आणि अ आहे)

मी लोकांना उंच उडी मारताना कायम हर्णेस(सॉरी पण मी मराठीतच लिहिणार Happy मला अजून गुगल इंडिक ने हा शब्द लिहिता येत नाहीये)
बांधून मग खाली जाताना पाहिलंय.ती कुठे बांधायची हा दुय्यम प्रश्न आहे.
आपण साखळी खेचून ट्रेन अंमळ थांबवू, हर्णेस बांधून उडी मारू(म्हणजे एखाद्याला मारताना बघू) आणि मग हर्णेस चा हुक काढून घेऊन ट्रेन ला मोकळं करू.

वावे, तो सीन पाहिला.प्रचंड विनोदी आहे.

>>> प्रि, का?
तु तर IT प्रोफेशन मधे आहेस. सहज उत्सुकता म्हणुन विचारते. तु पास देउ शकतेस.
>>>

कारण मला जन्माची भीती वाटते. अनेक वेळा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेला पळून आले. एकदा फिबी टॅटू करून आलेय Proud

हार्नेसची रस्सी दुसऱ्या बाजूने ट्रेनला बांधलेली असणारे म्हणजे ती वेळीच सोडली नाही माझ्याकडून तर फरफटत जाईन ना मग

मला एखाद्याला असं हारनेस बांधून नदीत उडी मारताना बघायचंय>>>>

म्हाळसा Happy Happy

विरार चर्चगेट लोकल चालाडुन पाहाची आहे.
पुण्यातल्या पेठांमधी ट्रक हाकलत फिराचं आहे.
'ए भंगारवाले..' म्हणत भंगार गोळा कराचं आहे.
टाईम मशीन मंधी बसुन वापस कॉलेजला जावुन तिला गुलाबाचं फुल द्यायाचं आहे...
बाकी उद्या लिवतो..

आशुचॅम्प, माझा अनुभव सांगतो. मी एकदा रेल्वे पुलावरून जात असताना लाईफ जॅकेट न घालता, हार्नेस वगैरे काही नसताना उडी मारली होती....
.
.
.
रेल्वेतल्या रेल्वेत.
.
.
अजून एकदा रेलगाडी पुलावरून जात असताना मी पाण्यात उडी मारली होती....
.
.
.
रेलगाडी पुलावरून चालली होती, पण मी तर खाली नदीच्या काठीच उभा होतो.

मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये स्वीट घेऊन राहायचे आहे.
पॅरिसमध्ये एक महिना घर घेऊन राहायचे व तिथले लाईफ अनुभवायचे आहे.
जपानला जायचे आहे.
टॅटूही करायचा आहे.

"पण हारनेस कुठे बांधायचा? ट्रेनला? मी सकाळ पासून हाच विचार करतोय " +११११
अगदी अगदी. हार्नेसचा प्रतिसाद वाचल्यापासून सतत हेच मनात येत होतं. लिहिलं नाही एवढंच .

- गोमुख ट्रेक करायचा आहे.
- बंजी जंपिंग पण. ऑलमोस्ट गेले होते पण एका कलीगने भिती घातली पाठीचं काय होईल म्हणून. आता भिती बसली Sad
- आल्प्सवर शिफॉन साडीत फोटोशुट (यश चोप्रा स्टाईल)

मला वाईनची द्राक्षं नीट चांगले स्वच्छ पाय धुवून नखं कापून तुडवायची आहेत. >>> @मी_अनू - मला पण आवडेल. ( ती वाईन मी पिणार नाही मात्र)

इथे जायचं आहे.......


.
आणि तिथे तसं बसता नाही आलं, तरी निदान असं पहायचं तरी आहे तिथून.... Biggrin

Pages