अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे

Submitted by फलक से जुदा on 31 May, 2022 - 20:51

मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.

खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तशा इच्छा तर लै आहेत

जर्मनीत जाऊन बुंदेसलिगा ची मॅच बघायची आहे
बायर्न म्युनिक ला सपोर्ट करत

तसेच वर्ल्ड कप फुटबॉल ची match जर्मनीची जर्सी घालून चिअर करत बघायची आहे खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये
(माझ्याकडे तब्बल 6 जर्सी आहेत जर्मनीच्या, झेंडे आहेत, स्कार्फ आहे,मग आहे पण हे सगळं घालून मी टीव्हीसमोर चिअर करतो, हे मला एकदा तरी आयुष्यात स्टेडियम ला करायचं आहे आणि नंतर जर्मन चाहत्यांच्या सोबत रात्रभर धिंगाणा करत गाणी म्हणत फिरायचं आहे )

पीसीटी अर्थात पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल करायचा आहे एकट्याने
शेरील स्ट्रेड सारखा, मीही तिच्या इतकाच अनुनभवी आहे Happy

आयवो जिममा आणि पेलेलीयु बेटांना भेट देऊन आता ती कशी आहेत ते बघायचं आहे

हॉट बलून राईड करायची आहे (हे आता गुहागर लाही झालं आहे म्हणे, सो जमू शकताय)
पॅरा ग्लायडिंग, पॅरा सेलिंग, बांजी जम्प, व्हाइट वॉटर रिव्हर राफ्टिंग, स्कुबा दाईव्ह हे सगळे प्रकार किमान एकदा करायचे आहेत

एक तरी हिमालायतले शिखर चढायचे आहे
आता माझ्या आवाक्यत बहुदा फक्त स्टोक कांगरी च राहिले आहे

पारनेरा (गुजराथ बॉर्डर) ते पारगड (दक्षिण महाराष्ट्र) अशी सलग ट्रेकिंग करायचं आहे, वर्षभर लागेल माझ्या चालीने
वाटेत किमान दीड दोनशे किल्ले आहेत

नर्मदा परिक्रमा करायची आहे

टूर दि फ्रांस चे रिपोर्टिंग करायला मीडिया पर्सन म्हणून जायचं आहे
किंवा मग एखाद्या टीमचा मीडिया हँडलर असा

अजून खच होईल इच्छाच

त्यामुळे एक जिनी भेटावा आणि सात आठ जन्म मागून घ्यावेत लागोपाठ Happy

चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ची फायनल कोर्टवर पहिल्या रांगेत बसून बघायची आहे . बिझनेस क्लास ने परदेश प्रवास करायचा आहे .

@मी_अनु:

तुम्ही 'a walk in the clouds' सिनेमा पाहिला आहे का?
नसल्यास अवश्य पहा. त्यात तो द्राक्षे तुडवण्याचा आनंद खूप छान टिपला आहे.
माझीही इच्छा आहे.

मी फॅशन पाहिलाय
त्यात सौ जोनास आणि श्री अरबाझ खान द्राक्षं तुडवत असतात ना बहुतेक?

वॉक इन द क्लाउड ग्रेप सीन गुगल केला.अबब.काय ते.थेट द्राक्षं हौदात गरबा काय, संत्री मोसंबी पैशापैशाला सारखं हाताखालून जाणं काय, गौरीच्या जागरणात खेळासारखं घुमणं काय, द्राक्षात लोळलं काय.देवा देवा देवा.किमान केसांवर कॅप घालायला हव्या होत्या.ती वाइन नंतर ज्यांनी विकत घेऊन प्यायली त्यांचा सत्कार करायला हवा.
हिरो क्युट आहे.

मला पांढऱ्या (पाळीव) वाघाला कडकडून मिठी मारायची आहे (:D कदाचित शेवटची इच्छा ठरू शकेल...but you never know... शक्यही होईल)

जैसलमेर ला hot air baloon ride करायची आहे.

6 flags adventure पार्क मध्ये जायचं आहे.

Santorini चा sun set बघण्यासाठी सकाळपासून लोक जागा पटकावून बसलेले असतात..खचाखच भरलेले असते सगळे आवार...आम्ही दीड वाजता गेलो तर जागाच नव्हती..उभारून च पाहिलं...तिथे जाण्याचा रस्ता पण इतका सुंदर आहे की बास...Drone सोडतात sun set च्या आधी.....एकदा तरी जरूर अनुभव घ्यावा..

मी फॅशन पाहिलाय
त्यात सौ जोनास आणि श्री अरबाझ खान द्राक्षं तुडवत असतात ना बहुतेक? >> आठवत नाही.

पण A walk... सिनेमा म्हणूनही खूप छान आहे.

द्राक्षे तुडवण्याचा प्रकार मी एका वाईन फेस्टिव्हल ला पहिला होता

म्हणजे कितिही मान्य केलं की रमणीय ललना नाजूक पायांनी ते करतात
पण ते फक्त बघायला रोमँटिक वाटतं
प्यायची इच्छा नाही होत

एक बंजी जम्प झाली आहे. Across the world करायची आहे.
नाव त्यावरूनच प्रेरित...

जमीं से बेगाना, फलक से जुदा।

BYUQE7554.jpg

स्वगत:विचार करतोय.रमणीय ललनांनी नीट पाय धुवून नवे कोरे स्वच्छ डिसपोझेबल सॉक्स घालून द्राक्षं तुडवली तर आपल्याला आवडेल का ती वाइन प्यायला?(अर्थात पायाने कणिक तुडवलेले पाव अनेक वेळा नकळत खाल्लेही असतील आतापर्यंत बरेच वेळा.)

वरचे सर्वच प्रतिसाद वाचून जिंदगी ना मिलेगी दोबारा आठवला.

भारतातले लोकं ॲडवेंचर्स आयटम फार कमी ट्राय करतात. कुटुंबात रमलेले असतात. लग्नाआधी धावती ट्रेन पकडणारे संसारी झाल्यावर सावकाश थांबल्यावर पकडतात हे अनुभवले आहे.

जिथे रमणीय ललनेचे पाद प्रेमाने विकत घेणारे लोक आहेत या जगात, तिथे त्या ललनेच्या पादकमलाने तुडवलेल्या द्राक्षाची वाइन घेणे म्हणजे प्लॅटॉनिक लव्हच म्हणायचे Proud

बाय द वे, धाग्याच्या संदर्भात...
पहिलाच प्रतिसाद "अंतरिक्ष प्रवास" +१११

ऋषिकेशचा बंजी जंपिंगचा व्हिडीओ आहे एक युट्यूबवर. डोंगरावरून खाली उथळ पाण्यात जंप करताना मध्येच दोर तुटला.

भारतातले लोकं ॲडवेंचर्स आयटम फार कमी ट्राय करतात. >>> तुमचे टाका व्हिडीओ.

मलाबुर्जखलिफाच्यागच्चीवर उभे राहूनसुसुकरायचीइच्छाआहे.. कितीमजायेईलना... >>> उभ्याने ???

बाप रे!!! बंजी जंपिंग करताना पोटात गोळा येतो का? नंतर डोकं दुखतं का?

Submitted by सामो on 3 June, 2022 - 23:47 >>

थोडीशी फाटते पण मजा वाटते.

जम्प नंतर खाली ५-१० मिनिटे बसवतात. नॉर्मल झालो की परत 83m चा छोटू ट्रेक करून बेस लोकेशन वर

शिवाय रेल्वेच्या डिझेल इंजिनला जे बाजूला रेलिंग असतात तिथे उभे राहून प्रवास . . . .
गणपतीच्या वेळी कोकण रेल्वे पाहिली का? पण आता पेणपर्यंत किंवा पुढे इलेक्ट्रिक एंजिनच असतं. पूर्वी छोटं डिझेल असे.

एखाद्या स्लो चालणार्‍या मिनी ट्रेनचा टपावर छैय्या छैय्या नाचत प्रवास करायलाही मजा येईल. फक्त मित्रांचा ग्रूप हवा आणि आजूबाजूला माहौल हवा, माथेरानसारखा. कुठे हे शक्य होत असल्यास नक्की ट्राय करायला आवडेल.

ऋषिकेशचा बंजी जंपिंगचा व्हिडीओ आहे एक युट्यूबवर. डोंगरावरून खाली उथळ पाण्यात जंप करताना मध्येच दोर तुटला.

Submitted by शान्त माणूस on 4 June, 2022 - 08:03 >>

हा misleading (फसवा) व्हिडिओ आहे.
दोर तुटला नाही.
ज्याला तुटल्याचा दावा केला जातोय तो एक्स्ट्रा रोप आहे जो base जवळ पोचल्यावर वरून खाली सोडतात (release). उडी मारणारा अपेक्षेप्रमाणे सेफ असून त्याला खरचटले देखील नाही की एक थेंब पाणी त्याच्या अंगावर उडाले नाही.

बंजी जंपिंग मध्ये पाठीच्या मणक्याला झटका बसून त्याला दुखापत होण्याची शक्यता असते असे म्हणतात ते कितपत खरे आहे? इथे कुणी बंजी जंपिंग करून आलेले आहे का?

>> अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे
होय, वरची शंका खोटी असेल तर बंजी जंपिंग सुद्धा ट्राय करायचे आहे.

शिवाय parasailing paragliding skydiving हे तिन्ही सुद्धा ट्राय करायचे आहे.

बाय द वे, paragliding कधीही नाही केली म्हणून एकदा तरी ट्राय करायला गेलेला हा व्हिडीओ एपिक आहे. या धाग्यावरील सर्वाना समर्पित Lol Biggrin

Pages