अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे

Submitted by फलक से जुदा on 31 May, 2022 - 20:51

मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.

खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठलाही किस्सा असो, सर तिथं असतातच त्यांच्या लहानपणापासून
महागुरू नंतर इतके सर्वव्यापी बहुदा सर च
>>>

छे आशूचॅप,
आता तुमचेच ट्रेकिंगचे घ्या. मला त्याचा बिलकुल अनुभव नाही. मी कधीच कुठला डोंगर सर केला नाही. एक जाळला जरूर आहे. ते पुन्हा कधीतरी.
लोकांना बंजी जंपिंग न पॅराग्लायडींग न स्कूबा डायव्हिंग काय काय करायचे आहे. मला साधे आकाशपाळण्यात बसले की चक्कर येते. एस्सेलवर्ल्डला डेशिंग कार खेळून परत येतो. पण तेच प्रत्यक्षात चारचाकी काय सायकलही चालवता येत नाही.
तुम्ही लोकं कुत्रे मांजरी ससे मासे काय काय पाळत असता. मी आयुष्यात आजवर साधी मुंगी पाळली नाही.
ही पोस्ट अशीच लिहीत गेलो तर हनुमानाची शेपटी होईल. त्यामुळे मी ईत्र तित्र सर्वत्र असतोच हा एक भ्रम आहे. फक्त जिथे असतो ते अनुभव शेअर करायचा उत्साह दांडगा आहे त्यामुळे हे असे चित्र ऊभे राहते Happy

मनापासून धन्यवाद मीरा Happy >>> तो मुद्दा /पोस्ट मनापासुन पटली, म्हणुन माझी पोस्ट डिलीट केली. ती आशुचॅम्पला उद्देशुन होती, पण त्यांना मी सेपरेटली सांगेन.

"चला पुढे जाऊया." - सरांनी माघार घेतली!! Rofl

"पब्लिक बोअर होईल" - सरांनी मायबोलीकरांना वेठीस न धरता, त्यांच्याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार केल्यामुळे गहिवरून आलेलं आहे. Happy

शेर्पा व्हायचं होतं, कसले किरकोळीत पर्वत चढतात, गाणी म्हणत, पाठीवर सामानाचा डोंगर घेऊन
>>> मला खलाशी व्हायचे होते.. भा रा भागवत कथा वाचून..

मलाही एकेकाळी होती पण एकदा मी कधीतरी व्हिडीओ मध्ये एका मालवाहू बोटीवर एक प्रचंड लाट येऊन आदळते तो व्हीडिओ पहिला आणि खलाशी व्हायची इच्छा तिथेच संपुष्टात आली

जॉज, डीप ब्लू सी वगैरे सिनेमांनी पण समुद्राची भीती वाढवली

मला एकदा समुद्र किनारी एकांतात एकटाच २ दिवस एका बेसिक झोपडीत काढायची आहे.... बीयर पीत किनार्‍यावर तारे पहायचे आहेत आणि मागे जगजीत चे संगीत हवे आहे

ऋ,

//
मला जॉइंट, इतर नशिले पदार्थ, दारूचे प्रकार, सिगारेटचे प्रकार ह्यांची फक्त माहिती हवी आहे, ओढायची किंवा कधी तरी ट्राय करायची इच्छा नाही.

लोक इतकं commonly बोलतात, की मला out of syllabus वाटतं हे सगळ.

Submitted by फलक से जुदा on 8 June, 2022 - 09:55
फलक से जुदा,
हो. एकवेळ दारू सिगारेट एकदा ट्राय करून बघता येत असेल. पण या चरस गांजाचे व्यसन लागत असावे. एकदा घेता पुन्हा पुन्हा घ्यावेसे वाटत असेल. त्यामुळे ईथे गंमत म्हणून प्रतिसाद देणे ठिक आहे. कोणी कृपया खरेच असे करू नये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 June, 2022 - 14:49
//

>> मी स्पष्ट लिहिले आहे की फक्त माहिती हवी ते काय असतं, ई आणि प्लस add केलं होतं की ट्राय करायचं नाही.

तुम्ही 'कोणी कृपया खरेच असे करू नये' असं म्हणताय म्हणजे, ट्राय करा असा सल्ला देत आहात Lol

अहो शब्दखेळ कसले करत आहात.
तुमच्या त्या नाही साठी मी अनुमोदनाचा 'हो' लिहूनच माझ्या पोस्टची सुरुवात केली आहे ना.

असो विषयावर बोलूया,
मला एखादी ईन्स्टा रील बनवायची आहे. अजून ट्राय केले नाही. फार काही विशेष नसेलही त्यात. पण तरी मुहुर्त मिळत नाहीये.

Ok

मला डॉग हॉस्टेल सुरू करायचा आहे
भरपूर मोकळी जागा, लॉन, खेळायला खेळणी, स्विमिंग पूल, स्पा, कुलिंग बेडस असं सगळं

मला डॉग हॉस्टेल सुरू करायचा आहे
>>

खूप छान wish आशु
हॉबी आणि व्यवसाय दोन्ही उत्तम साधले जाईल.

ओड्याचा तर वेगळा fanclub आहेच मदतीला.

मुपुमु येण्या आधीपासून आहे.)>> मुपुमु काय आहे ?

Submitted by सीमा >>

मुंबई पुणे मुंबई ह्याची आद्याक्षरे.
ह्या चित्रपटाचे एकूण तीन भाग आलेत. पैकी सर्वात जुन्या (म्हणजे पहिल्या) चित्रपटात नायकाला जपानी मुलीवर प्रेम असते अशी गोष्ट तो नायिकेला सांगत असतो असा एक सीन आहे...त्याचा reference दिला मी.

मला डॉग हॉस्टेल सुरू करायचा आहे
भरपूर मोकळी जागा, लॉन, खेळायला खेळणी, स्विमिंग पूल, स्पा, कुलिंग बेडस असं सगळं >>>> मला या बिझिनेस/हॉबी मधे पार्टनर व्हायला आवडेल. आर्थिक रित्या आणि active.

(हा पूर्वी कधीही न केलेला व्यवसाय/हॉबी आता ट्राय करायला आवडेल)

ट्राय केली नाही कारण घरच्यांनी करू दिली नाही अशी एक गोष्ट कधी चान्स मिळाला तर करायची आहे ते म्हणजे मर्चंट नेव्ही जॉईन करणे,

१२वीत खूप इच्छा होती , स्वप्नच होते म्हणा ना, की बुआ बीएससी नॉटिकल सायन्स करावे (मरीन इंजिनिअरिंग नाही ते इंजिन साईड झाले) मस्त थर्ड मेट म्हणून सुरुवात करावी एखाद अजस्त्र कंटेनर कॅरियर किंवा चांगला मैलभर लांब क्रूड ऑइल टँकर हातातल्या छोट्या स्टेयरिंग ने पळवावा, एखाद्या स्वच्छ रात्री शांत समुद्रातून जाताना शिफ्ट संपली का एखाद मार्लबोरो लाईट्स पेटवून शांत झुरके घेत डेक वरून आकाशातील तारकांच्या सड्याचा आस्वाद घ्यावा, दूरदेशी फिरून यावे, पण हाय रे कर्मा,

भारतात अस्तित्वात असणारे "चार लोक काय म्हणतील" मधली एक दूरची आत्या येऊन आईच्या कानाशी पचकली, नको पाठवू पोरगं दारूडं होईल, बाहेरख्याली होईल हातचे जाईल, आणि आमचा तो मार्ग घरच्यांनी बंद केला, परोपरीने सांगितले की आजकाल शिप्सवर दारू अलौड नसते, बोर्ड करायच्या अगोदर ब्रेथलायजर चाचणी देऊन पास झालो तरच चढू देतात, कामातूनच वेळ मिळत नाही तर दारू कुठली पिणार पण एक नाही का दोन ते स्वप्न स्वप्नच राहिले,

आजही चान्स मिळाला तर नाव्हीगेटर म्हणून एखाद मोठाल्या गलबतावर काम करायला आवडेल मला.

Hi I am in for the dog hostel. Retiring in four months. If you have the place I can look after pets and manage on day to day basis

अरे वाह भरपूर like minded मंडळी आहेत की डॉग हॉस्टेल साठी

सिरियसली यावर विचार वीनिमय करूया

सिरियसली यावर विचार वीनिमय करूया>> नक्की . पुण्याला शिफ्ट व्हायला पण तयार आहे पण ते सर्व भेटून बोलु.

मी वीनी मय आहेच. माय फर्स्ट डाशुंड वीनी.

Pages