Submitted by फलक से जुदा on 31 May, 2022 - 20:51
मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा बहुतेक माझा जुळा भाऊ असावा
हा बहुतेक माझा जुळा भाऊ असावा.मी एका मोठया डोंगरावरून खाली झिप लाईन ला असेच काहीसे केले होते.पण पटकन नको म्हणून डोंगरावरून पायाने उतरून आल्याने बाकी लोकांना खूप मोठे नाटक बघावे लागले नाही.
जॉईंट काय असतं मला ते ओढून
जॉईंट काय असतं मला ते ओढून बघायचं आहे
सिगरेट असते पण कडक असावी कारण बराच बेव सिरीज किंवा युट्युब ला जॉईंट मार के आया है क्या वगैरे असतात
मारताना पण दाखवलेत
अफूची सिगरेट असावी
जॉईंट = गांजा
जॉईंट = गांजा
मला जॉइंट, इतर नशिले पदार्थ,
मला जॉइंट, इतर नशिले पदार्थ, दारूचे प्रकार, सिगारेटचे प्रकार ह्यांची फक्त माहिती हवी आहे, ओढायची किंवा कधी तरी ट्राय करायची इच्छा नाही.
लोक इतकं commonly बोलतात, की मला out of syllabus वाटतं हे सगळ.
फलक से जुदा,
फलक से जुदा,
हो. एकवेळ दारू सिगारेट एकदा ट्राय करून बघता येत असेल. पण या चरस गांजाचे व्यसन लागत असावे. एकदा घेता पुन्हा पुन्हा घ्यावेसे वाटत असेल. त्यामुळे ईथे गंमत म्हणून प्रतिसाद देणे ठिक आहे. कोणी कृपया खरेच असे करू नये.
पण मला खरेच ओढून बघायची आहे
पण मला खरेच ओढून बघायची आहे
गांजावर आपल्याकडे बंदी आहे ना मग हे इतक्या उघडपणे कसे घेतात का तो काही वेगळा असतो
गांजावर आपल्याकडे बंदी आहे ना
गांजावर आपल्याकडे बंदी आहे ना >> सरांचा वाण नाही पण गुण लागला म्हणायचं
तुम्ही असा लगेच पतंग काटला तर
तुम्ही असा लगेच पतंग काटला तर कसे होणार आम्ही सर्
"गांजावर आपल्याकडे बंदी आहे
"गांजावर आपल्याकडे बंदी आहे ना" - मग काय झालं आशुचँप? तसं तर इतरांच्या घरात ते नसताना (त्यांच्या परवानगी शिवाय) शिरायला सुद्धा बंदी आहे. म्हणून विशलिस्ट ठेवायची नाही असं थोडीच आहे?
मला नई शिरायचं कोणाच्या घरात
मला नई शिरायचं कोणाच्या घरात किंवा कोणाच्या अंगात
ती विशालिस्ट सरांची
"ती विशालिस्ट सरांची" -
"ती विशालिस्ट सरांची" -
तसं तर इतरांच्या घरात ते
तसं तर इतरांच्या घरात ते नसताना (त्यांच्या परवानगी शिवाय) शिरायला सुद्धा बंदी आहे
>>>
परवानगीशिवाय हे तुम्हीच गृहीत धरलेय.
मी कुठे तसे लिहिलेय.
परवानगी घेतल्याशिवाय शाहरूख घरात असताना तरी तुम्ही शिरू शकता का? ते ही बेकायदेशीरच ना
बाकी गांजा घेणे हे बेकायदेशीर आहे तसे शाहरूखच्या बंगल्यात जाणे हे सुद्धा बेकायदेशीर आहे हे दाखवायसाठी ओढून ताणून ते परवानगीशिवाय आहे असे दाखवत आहात का
परवानगीशिवाय हे तुम्हीच गृहीत
परवानगीशिवाय हे तुम्हीच गृहीत धरलेय.
मी कुठे तसे लिहिलेय.>>>
मग ते तीन वर्षे कैद झाली तरी चालेल हे काय होतं??
मेमरी शॉर्ट असावी पण इतकीही नसावी
आता गिरे तो भी टांग उपर प्रतिसाद येऊ दे
पुन्हा वाचा ते प्रतिसाद
पुन्हा वाचा ते प्रतिसाद
मी मन्नत आतून बघायचाय पण शाहरूख घरी नसताना ईतकेच लिहिले आहे.
त्यावर शांत माणूस म्हणाले की ३ महिने कैद आहे त्यासाठी..
म्हणजे तिथेही मी परवानगीशिवाय जाणार हे शाण्त माणूस यांनी गृहीत धरले होते.
त्यावर मग मी डायलॉग मारला की शाहरूखसाठी ३ वर्षे कैद सुद्धा कबूल आहे
मग परवानगी घेऊनच जाणार होता
मग परवानगी घेऊनच जाणार होता तरी तीन वर्षे कैद चालेल म्हणत होतात का?
लो कल्लो बात..
लो कल्लो बात..
अहो तो एका शाहरूखच्या चाहत्याचा डायलॉग होता. शांत माणूस ३ महिने म्हणाले मी डायलॉग चिपकवला ३ महिने काय ३ वर्षेही कैद शाहरूखसाठी चालेल
जर तीन जन्माची कैदही चालली असती असा डायलॉग मारला असता तर तुम्ही त्याचा संदर्भ घेऊन माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे असे आणखी तिसऱ्याच धाग्यावर म्हणाला असता
खात्रीच होती गिरे तो टांग उपर
खात्रीच होती गिरे तो टांग उपर वाला प्रतिसाद येणार
अंगाशी आल्यावर तो डायलॉग म्हणालो होतो असली भंपकगिरी
चालू द्या, नैतर तुमचं भजनी मंडळ येईल तक्रार करत
सर नामाचा महिमा
“परवानगी घेतल्याशिवाय शाहरूख
“परवानगी घेतल्याशिवाय शाहरूख घरात असताना तरी तुम्ही शिरू शकता का?” - ‘सर’ मोड ऑनः शाहरूख चा किंवा तू त्याच्या घरात शिरण्याचा उल्लेख मी तरी कुठे केलाय?
शाहरूखचा उल्लेख करायची काय
शाहरूखचा उल्लेख करायची काय गरज आहे. अजून आहे कोण
आशूचॅम्पही समजले विषय शाहरूखचा चालू आहे
मी इतर कुणाविषयी काय बोलणार?
मी इतर कुणाविषयी काय बोलणार? पण मी शाहरूख खानचा उल्लेख केला नाही ब्वा!
सर काहुन जेलात जाईल? सरने
सर काहुन जेलात जाईल? सरने आधीच क्लीयर केले की त्याले गौरीभाभीचे रुप घेवाचे आहे. आता मले सांगा सर गौरीभाभी बनुन गेला ते त्याले जेलात टाकतील का?
हाहा गूड वन बंडल !
हाहा गूड वन बंडल !
चला पुढे जाऊया. पब्लिक बोअर होईल
मुंबई चालत्या लोकल ट्रैन ची
मुंबई चालत्या लोकल ट्रैन ची चैन ओढायाचिये
मुंबई चालत्या लोकल ट्रैन ची
मुंबई चालत्या लोकल ट्रैन ची चैन ओढायाचिये
>>>
हे एकदा करून झालेय शाळेत असताना. पण फार टाईट असते ओढलीच गेली नाही. जास्त चेकाळून जोर लावायला गेलो तसे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले. आणि जाम शिव्या पडल्या. नशीब आम्ही उलट्या दिशेने प्रवास करायचो. गर्दी नसायची ट्रेनमध्ये. त्यात फर्स्टक्लासचा डबा. (शाळेतल्या पोरांना सेकंडच्या पासवर फर्स्टक्लास प्रवास अलाऊड होता) त्यामुळे तुलनेत सोफेस्टीकेटेड पब्लिक. नाहीतर मारही पडला असता.
जॉईंट काय असतं मला ते ओढून
ऋन्मेष काकूंच्या सल्ल्याचा आदर ठेवून पोस्ट उडवत आहे.
मी असे ऐकलेले की चरस गांजा
मी असे ऐकलेले की चरस गांजा ड्रग्स यामध्ये काही असे असते की त्याची चटक लागते. एकदा घेतल्यावर पुन्हा ते घ्यावेसे वाटते. तरुणांना फसवून आमिष दाखवून स्वस्तात देऊन याची चटक लावली जाते. मग हे मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील अशी स्थिती आली की मग त्यांना महाग विकून लुबाडले जाते.
माझी माहिती चुकीचीही असेल.
पण तरी ज्यांना कन्फर्म माहीती आहे की एकदा घेतल्याने लगेच काही पुन्हा घ्यायची चटक लागत नाही त्यांनीही असे सोशलसाईटवर लिहायचे टाळलेले उत्तम.
कारण एखादी व्यक्ती किती कमकुवत मनाची आहे हे कोणाला ठाऊक. वा एखाद्याला एकदा घेऊन मजाच आली आणि पुन्हा उपभोगावेसे वाटले तर...
व्यसनाचा धोका आहेच..
माझे विचार या बाबतीत फार काकूबाईंसारखे वाटतील. कारण ते तसेच आहेत
मला इथि ओ पिअन मॅरेथॉन रनर
मला इथि ओ पिअन मॅरेथॉन रनर सारखी बॉडी बनवायची आहे. आमच्या बिल्डिन्ग मध्ये एक जण आहे. काटकोळा म्हणू शकतो. लांब लचक ं माणूस व रोज रनिन्ग करतो. फॅट एक कण नाही शरीरावर. कौतुकास्पद आहे. माझा फूड इन टेक जास्त करून स्टार्ची असल्याने तो कमी करून शास्त्रशुद्ध डाइट करून रनिन्ग मध्ये प्रोफिशि अन्सी मिळवायची आहे.
हे एकदा करून झालेय शाळेत
हे एकदा करून झालेय शाळेत असताना>>>
सरांनी केली नाही किंवा सरांच्या माहितीत नाहीत अशा फार गोष्टी नसतील जगात
कुठलाही किस्सा असो, सर तिथं असतातच त्यांच्या लहानपणापासून
महागुरू नंतर इतके सर्वव्यापी बहुदा सर च
मला इथि ओ पिअन मॅरेथॉन रनर
मला इथि ओ पिअन मॅरेथॉन रनर सारखी बॉडी बनवायची आहे.>>>
मला तसे शेर्पा व्हायचं होतं, कसले किरकोळीत पर्वत चढतात, गाणी म्हणत, पाठीवर सामानाचा डोंगर घेऊन
इथं आपण सुटे चढत फाफलत असतो आणि ते बागेत फिरल्यागत
पण तरी ज्यांना कन्फर्म माहीती
पण तरी ज्यांना कन्फर्म माहीती आहे की एकदा घेतल्याने लगेच काही पुन्हा घ्यायची चटक लागत नाही त्यांनीही असे सोशलसाईटवर लिहायचे टाळलेले उत्तम.
+१११
Pages