Submitted by फलक से जुदा on 31 May, 2022 - 20:51
मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंतरीक्ष प्रवास.
अंतरीक्ष प्रवास.
बंजी जम्पिंग.
बंजी जम्पिंग.
भरपूर आहेत
भरपूर आहेत
आत्ता पटकन आठवणारे म्हणजे बंजी जम्पिंग, स्काय डायविंग, टॅटू
मला खूप इच्छा आहे करायची पण मला कधीच करता येणार नाही.
करायची इच्छा आहे आणि कधी तरी करेन - बिझनेस क्लास ने विमानाने परदेशागमन
काही एकर मध्ये जागा विकत घेऊन
काही एकर मध्ये जागा विकत घेऊन त्यावर रमणीय असं जंगल बनवायचं आहे. अनेक प्रकारची फुलझाडे आणि प्रत्येक ऋतुत येणारी फळझाडे. ज्यामुळे अनेक पक्षी आणि प्राणी इथे सुखाने आणि मोकळेपणाने संचार करतील आणि मी त्यांच्या सान्निध्यात उरलेला आयुष्य जगू शकेन...
हजची यात्रा करायची आहे.
हजची यात्रा करायची आहे.
दहावीत असताना डोंगरावर अभ्यासाला जायचो. तिथे एक खास मित्र होता. मुसलमान होता. तेव्हा यारीदोस्ती फिल्मी पद्धतीने घ्यायच्या वयात दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवलेल्या. जसे एकमेकांच्या लग्नात फुल्ल ऑन नाचायचे. जे तो नाचला. मला काही कारणाने त्याच्या लग्नात जाताही आले नाही. जे त्याच्या गावाला होते. ते एक असो.
पण दुसरी गोष्ट म्हणजे तो माझ्यासोबत अष्टविनायक करणार आणि मी त्याच्यासोबत हजच्या यात्रेला जाणार.
पुढे जाऊन मी नास्तिक बनलो. मुद्दाम म्हणून कुठल्या देवाच्या यात्रेला गेलो नाही. आपल्याच नाही गेलो तर त्याच्या कुठे जाणार.
पण आजही तो नेहमी मला याची आठवण करून देत असतो. तो स्वतःही हजच्या यात्रेला आजवर गेला नाही. आणि मी सोबत आलो तरच जाणार असे म्हणतो. खरे की खोटे माहीत नाही. पण खरे असू शकते. आणि तसे असल्यास मला जायला हवे त्याच्यासोबत..
टकिला शॉट मद्यप्राशन करायचे
टकिला शॉट मद्यप्राशन करायचे आहे.
हे सुद्धा लहानपणीचे स्वप्न. तसे दारूचे आकर्षण नव्हते कधी. पण दिल तो पागल है मध्ये शाहरूख आणि करीष्मा यांना टकिला शॉट घेताना पाहिले तेव्हा ते फार मजेशीर वाटले होते. म्हणजे ते लिम्बू मीठ घेऊन वगैरे, एकाच दमात एक शॉट मारणे.. मोठे होऊन हे आपण करायचे असे ठरवले होते. पण मोठे होता होता निर्व्यसनी झालो. तरी बीअर, व्हिस्की आणि शँपेन या तीन मद्यप्रकारांची एकेकदा चव घेऊन झालीय. कधीतरी हा टकिला शॉटही एकदा घेऊन बघायचाय. एकदा एखादी दारू प्यायल्याने लगेच आपल्याला व्यसन लागणार नाही हा विश्वास आहे आता.
हजची यात्रा करायची आहे.---
हजची यात्रा करायची आहे.----हजची यात्रा नॉन-मुस्लिम करू शकतो का?
टॅटू
टॅटू
मला खूप इच्छा आहे करायची पण मला कधीच करता येणार नाही. >>> प्रि, का?
तु तर IT प्रोफेशन मधे आहेस. सहज उत्सुकता म्हणुन विचारते. तु पास देउ शकतेस.
हजची यात्रा करायची आहे.---
हजची यात्रा करायची आहे.----हजची यात्रा नॉन-मुस्लिम करू शकतो का?>> नाही आणि मुस्लिमांना सुद्धा हज व्हिसा लागतो किंवा सौदी रेसिडेंट व्हिसा. नुसत्या व्हिजिट व्हिसा वर मक्कामधे जाता येत नाही. मुस्लिम पासपोर्ट आणि व्हिजिट व्हिसा असेल तर असा रिमार्क लिहितात इमिग्रेशनला पासपोर्ट वर. मी आणि माझा एक मुस्लिम कलिग गेलो होतो जेद्दाला कामासाठी व्हिजिट व्हिसावर तेव्हाचा अनुभव. त्याला जायचे होते पण नाही जमले. हे काही वर्षापुर्वीचे आहे. आताचे नियम माहित नाहीत.
हजची यात्रा नॉन-मुस्लिम करू
हजची यात्रा नॉन-मुस्लिम करू शकतो का?
>>>>
हा प्रश्न मलाही नेहमी पडतो. अगदी हि पोस्ट लिहितानाही पडलेला. कधी त्या मित्राला तशी शंका बोलून दाखवली नाही. अन्यथा तो माझा होकार गृहीत धरेल. आणि तशी परवानगी नसल्यास काही जुगाड करू म्हटले की मग मला फिरून नाही म्हणता येणार नाही.
माउंट एव्हरेस्ट चढणे.
माउंट एव्हरेस्ट चढणे.
ममव ( मराठी मध्यम वर्गीय /
ममव ( मराठी मध्यम वर्गीय / मध्यम वयीन )लोकांचा 90% इच्छा या सदरात मोडत असतील.
अगदी अंतरिक्ष प्रवास वगैरे " हर ख्वाईश पे दम निकले" वाल्या इच्छा सोडून द्या, पण
1) बाटा / रिबोक च्या दुकानात जाऊन काय राव किंमत लावता , जरा कमी करा, शेजारी नाईके वाला 200 कमी करायला तयार आहे, म्हणून भाव करणे
2) बॉस ला, तेल लावत जा, मी अमुक अमुक दिवशी येणार नाही म्हणजे नाही
3) बायको ला मी हे 3 दिवस मित्रांबरोबर उनाडायला चाललोय, पोरींचे काय करायचे ते तुझे तू बघ
वगैरे सांगणे अश्या छोट्या छोट्या इच्छा बऱ्याच आहेत
हजची यात्रा करायची आहे.---
हजची यात्रा करायची आहे.----हजची यात्रा नॉन-मुस्लिम करू शकतो का?///सर काहीही करू शकतात
टॅटु. अनुगच्छतु प्रवाहं!
टॅटु. अनुगच्छतु प्रवाहं!
टॅरो रीडर व्हायचे आहे. It’s an amazing tool that taps your intuitive energy.
सिंबा बॉसशी पंगा घ्या.
सिंबा बॉसशी पंगा घ्या. बायकोशी नको.
बॉस कंपनीसह बदलता येतो.
बायको सासुरवाडीसह तीच झेलावी लागते
पाण्यात कसलाही आधार न घेता
पाण्यात कसलाही आधार न घेता तरंगणे पक्षी स्विमिंग करणे अनुभवायचे आहे.
तसेच उतारावरून वाऱ्याशी स्पर्धा करत सुसाट सायकल चालवायची आहे.
पण दोन्ही गोष्टीत शिकायचा आळस नडतोय.
कधी आयुष्यात ईतर काही करायला राहणार नाही तेव्हा कदाचित हे जमेल.
प्रत्येकाला १५ लाख रूपये
प्रत्येकाला १५ लाख रूपये देण्याइतकं श्रीमंत व्हायचं आहे.
अभिषेक, स्टार पोझ मध्ये
अभिषेक, स्टार पोझ मध्ये पाण्यावर झोपा. आरामात तरंगता येईल
अमेरिकन सैनिक सोडुन इतर कोणा
अमेरिकन सैनिक सोडुन इतर कोणा गैर मुस्लिम व्यक्तीला हज यात्रा जिथे भरते त्या भागात पाय ठेवायचीही बंदी आहे. आता कदाचित अमेरिकन सैनिकांनाही बंदी असेल, त्यांची गरज उरली नसेल तर...
अशा खुप गोष्टी आहेत ज्या करायचे भाग्य आजवर लाभलेले नाही पण इच्छा आहे. बघुया, जर करायला मिळाले तर बोलण्यात अर्थ आहे, नाहीतर उगीच बोलाचा भात आणि त्यावर बोलाची कढि....
भांग प्यायची आहे
भांग प्यायची आहे
हुक्का ओढून बघायचा आहे
देशी दारू प्यायची आहे ते संत्रा मोसंबी वगैरे असतं ते, खुप वेळा खूप लोकांना पिताना पाहिले आहे पण अद्याप प्यायचे डेरिंग नाही झालं
धावत्या रेल्वेत बसून नदीवरील ब्रिज येताच खाली उडी मारायची आहे (ही कदाचित शेवटची इच्छा असू शकते )
मला कायम दारात उभे राहून खाली वाहणारी नदी बघताना उडी मारायचे भयंकर टेम्पटेशन होते
-- एक आळशी दिवस व्यतित करायचा
-- एक आळशी दिवस व्यतित करायचा आहे . काहीही करायच नाही . नुसतं लोळायच . नाश्ता , स्वयंपाक , मुल , घर , ऑफिसमधल्या डेडलाईन्स कसलाही डोक्याला भुंगा नको .
-- जुजबी ड्रायविंग येतं . एकदा शहराबाहेर भन्नाट पण सुरक्षित गाडी चालवायची आहे . हायवेवर लॉन्ग ड्राईव .
-- घरच्या कुंड्यामध्ये भाज्या उगवून स्वयंपाक करायच्या आहेत.
-- वाईन , बीअर , टकीला कधीच ट्राय केलं नाही . एकदा एखाद्या जाणकारा बरोबर बसून प्याचची आहे . निदान वाईन तरी .
आशुचॅम्प, शेवटची नसेल.
आशुचॅम्प, शेवटची नसेल.
नीट हारनेस बांधून लाईफ जॅकेट घालून जरा उथळ नदी बघून करा
(मला इथे बसून सांगायला काय जातंय)
मला वाईनची द्राक्षं नीट चांगले स्वच्छ पाय धुवून नखं कापून तुडवायची आहेत.
क्युबा ला जायचं आहे(एन्काऊंटर के ड्रॅमा चा परिणाम)
स्कॉटलंड ला जायचं आहे
पापुआ न्यू गिनी चा व्हिसा मिळत असल्यास टुरिस्ट म्हणून जायचं आहे.
आईस्क्रिम अजिबात आवडत नाही पण
आईस्क्रिम अजिबात आवडत नाही पण बेकन फार फार आवडतं म्हणून एकदा तरी आईस्क्रिम विथ बेकन खायचंय
मन्नत आत जाऊन बघायचंय
ए आर रेहमानचा शो बघायचाय
एकदा तरी मस्त डिझायनर ड्रेस घालून रॅम्प वॅाक करायचाय
बाकी बियर, टकीला, व्हॅाडका, हुक्का कॅालेज जीवनातच ट्राय करून झालंय, तेवढी सिगरेट न खोकता ट्राय करायची होती.. गेल्या महिन्यात भारतात होते तेव्हा तीही मैत्रिणींबरोबर ट्राय करून झाली.. एक आयटम लिस्टमधून कमी झाला
माउंट एव्हरेस्ट चढणे.
माउंट एव्हरेस्ट चढणे.
Submitted by भांडखोर on 1 June, 2022 - 02:11
>>>एकदा माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जायचंय
एक देश विकत घेऊन
एक देश विकत घेऊन पाघोगेंडापालन करायचे आहे.
जब मिल बैठेंगे तीन यार
मै, गेंडा और हसिनाओंका दरबार
एव्हरेस्ट बेस कॅम्प
एव्हरेस्ट बेस कॅम्प
मलाही, कदाचित पुढच्या वर्षी जाईन मी
प्लनिंग सुरू आहे
अनु
भीती पाण्यात न पडता कुठंतरी ब्रिजवरच आपटू याची आहे
आणि उथळ असेल नदी तर मेलोच
तसेच लाईफ जॅकेट घालूनही वर उंचावरून उडी मारली पाण्यात तर पाणी लागेल चांगलंच
एव्हरेस्ट बेस कॅम्प
एव्हरेस्ट बेस कॅम्प
मलाही, कदाचित पुढच्या वर्षी जाईन मी
प्लनिंग सुरू आहे >> अरे वा.. माझ्याबरोबर येणाऱयांनी टांग दिलीए.. फेब्रूवारी,मार्च,एप्रिल पैकी एखाद्या महिन्यात जाणार आहात का?
आशूचाम्प, पालघर(उमरोळी) किंवा
आशूचाम्प, पालघर(उमरोळी) किंवा वैतरणा पुलावरून मारा उडी.जास्त उंच नाहीयेत.
फेब्रूवारी,मार्च,एप्रिल पैकी
फेब्रूवारी,मार्च,एप्रिल पैकी एखाद्या महिन्यात जाणार आहात का?>>>
फिक्स नाही अद्याप
काही ठरल्यास संपर्कातून कळवतो, तुमचेही काही ठरल्यास मला कळवा
अनु
आप तो बच्चे की जान लेके ही राहोगे
*डेस्टिनेशन ∞*
*डेस्टिनेशन ∞*
अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे
चांदणचुर्याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
तहानभूक हरपणार पण
रसद टकाटक तयार आहे
प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे
दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे
मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे
आता फक्त यान कुठचे
इंधन साठवायला कॅन कुठचे
उकडले तर फॅन कुठचे
ह्या प्रश्नांशी लढतो आहे
अनंताच्या यात्रेसाठी
फक्त निघायचं बाकी आहे
Pages