
इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !
नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/
Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.
३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :
५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.
सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.
वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !
पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!
तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!!
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle
ओह.
ओह.
#Worldle #116 5/6 (100%)
#Worldle #116 5/6 (100%)
आजचे बेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बातम्यांमधून लहानपणापासून परिचित होते
#Worldle #118 3/6 (100%)
#Worldle #118 3/6 (100%)
आजचा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे
त्याचे सर्वात नवे नाव सर्व नकाशांमध्ये नसते
हो. हे नवं नाव कधी झालं ,
हो. हे नवं नाव कधी झालं , कानावर आलं नाही.
२०१६, विकीनुसार
२०१६, विकीनुसार
#Worldle #119 5/6 (100%)
#Worldle #119 5/6 (100%)
चला, कधीतरी आपल्या खंडातले जवळचेसुद्धा विचारू लागले आहेत
जवळचा असूनही , आकार
जवळचा असूनही , आकार परिचयाचा असूनही मला पटकन ओळखता आला नाही
युरोपातून शोधत तीन टप्प्यात पोचलो.
आजचे बेट शोधायला अवघड होते
आजचे बेट शोधायला अवघड होते
९०% पर्यंत येऊन पुढे सोडून दिले
अरे! मी बेटं म्हटल्यावर
अरे! मी बेटं म्हटल्यावर पहिलं अंदाजपंचे निवडलं.

मग त्याच्या आजूबाजूलाच शोधायचं होतं. गुगल मॅप वापरावं लागलं.
#Worldle #124 4/6 (100%)
#Worldle #124 4/6 (100%)
आजचा देश 'प्रामाणिक लोकांचा' आहे बुवा !
म्हणजे?
म्हणजे?
काही देशांची नावं फक्त मिस युनिव्हर्स, ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा अशावेळीच दिसतात. त्यातला एक वाटला.
त्याच्या राजधानीच्या नावाच्या इंग्लिश स्पेलिंगमध्ये ८ स्वर आणि ३ व्यंजने आहेत.
'प्रामाणिक लोकांचा' देश
'प्रामाणिक लोकांचा' देश
हा
त्या देशाच्या नावाचा शब्दशः अर्थ आहे !
(विकिपीडिया)
राजधानी >>भारी उच्चार असणार त्याचा
ओह. हे माहीत नव्हतं.
ओह. हे माहीत नव्हतं.
#Worldle #129 4/6 (100%)
#Worldle #129 4/6 (100%)
आजचा देश जरी 'प्रजासत्ताक' असला तरी तिथे घटनेनुसार फक्त एकपक्षीय सरकार असते.
वृत्तपत्र स्वातंत्र्यावर खूप मर्यादा असतात.
या देशाचं नाव ऐकलं नव्हतं.
या देशाचं नाव ऐकलं नव्हतं. लोकसत्तेत गेल्या वर्षी गेल्या शतकात जन्माला आलेल्या देशांबद्दल माहिती देणारं एक सदर असे. सुनील पोतनीस लिहीत.
आजचा देश म्हणजे बेटं आहेत असं
आजचा देश म्हणजे बेटं आहेत असं समजून किती वेळ शोधाशोध केली. तरी त्याच्या आजूबाजूलाच घोटाळत होतो. सहाव्या पायरीला ट्युब पेटली.
हो ना !
हो ना !
ते तुटक दाखवल्यामुळे गंडायला होतंय...
आजचा देश नकाशावर त्याच्या
आजचा देश नकाशावर त्याच्या अगदी जवळ पोहोचूनही दिसत नव्हता. मी आधी त्याच्या दक्षिणेला असलेल्या देशाशी पोचलो. तिथून जवळचा वाटला तो या देशाच्या ईशान्येला होता.त्या खंडातला तो सगळ्यात लहान देश आहे. अगदी चिंचोळा. त्यात मधून नदी वाहते. गंमत म्हणजे त्याच्या दक्षिणेकडच्या देशातही समुद्र असाच आतपर्यंत घुसलेला आहे. (की त्याही नद्याच आहेत?)
मला तो चौथ्या प्रयत्नात जमला
मला तो चौथ्या प्रयत्नात जमला
मग त्याच्या दोन भिन्न व्युत्पत्ती वाचून काढल्या.
एक नदीवरून आहे.
कालचा आणि आजचा दोन्ही देश
कालचा आणि आजचा दोन्ही देश पहिल्या फटक्यात ओळखता आले. कालच्या देशाचा आकार आपल्या देशाच्या आकाराशी जुळतो त्यामुळे लगेच लक्षात आला.
अ-ग-दी !
अ-ग-दी !
#Worldle #144 1/6 (100%)
...
कालचा म्हणजे ...
एकेकाळी आपण करायला गेलो एक... अन... !
कालच्या आणि आजच्या देशांचा
कालच्या आणि आजच्या देशांचा आकार अगदी शिस्तबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात ओळखता आले
#Worldle #149 1/6
कालच्या आणि आजच्या देशांचा
दु प्र.
#Worldle #151 3/6 (100%)
#Worldle #151 3/6 (100%)
आजच्या देशाचे नाव पर्वत, नदी किंवा संस्थापकावरून आलेले असावे अशी भिन्न मते आहेत.
#Worldle #153 4/6 (100%)
#Worldle #153 4/6 (100%)
आजचा जो देश आहे, त्यांची कथाकथन ही समृद्ध परंपरा आहे.
#Worldle #153 4/6 (100%)
दु प्र
आजच्या देशाने दुसर्या एका
आजच्या देशाने दुसर्या एका देशाला अक्षरशः गिळल्यासारखे दिसते.
अगदी बरोबर !
अगदी बरोबर !
आजच्या देशाचा आकार नकाशावर
आजच्या देशाचा आकार नकाशावर दिसत नाही. फक्त दिशा आणि अंतराच्या क्लु वरून ओळखला.
आजचा पटला नाही
आजचा पटला नाही
मुळात तो देश आहे ??
उलट तो .......
Pages