
इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !
नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/
Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.
३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :
५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.
सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.
वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !
पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!
तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!!
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle
आजचा दुर्दैवी देश पहिल्याच
आजचा दुर्दैवी देश पहिल्याच प्रयत्नात ओळखता आला. काल की परवा आपला शेजारी असूनही चटकन लक्षात आलं नाही.
+१ मला तिसऱ्यात जमला.
+१
मला तिसऱ्यात जमला.
#Worldle #78 3/6 (100%)
#Worldle #78 3/6 (100%)
आजचे बेट इतके सूक्ष्म आहे कि काही विचारू नका....
पण पटकन शोधता आलं. त्या
पण पटकन शोधता आलं. त्या भागाचा नकाशा शोधून १५०% झूम केला.
ते ठिपके बघून मला वाटलेच होते
Worldle मध्येच झूम करून पहावे लागले, काय आकार शोधायचा ते
आपण तिघेच खेळतो बहुतेक हे भूगोल कोडे....
आपण तिघेच खेळतो बहुतेक हे
आपण तिघेच खेळतो बहुतेक हे भूगोल कोडे. >>> +१
जालावरील एखाद्या नकाशातील ठराविक भागच झूम करायचा असेल तर काय तंत्र वापरतात ?
का असे काही ठराविक नकाशे आहेत ?
मागच्या पानावर मी एक लिंक
मागच्या पानावर मी एक लिंक दिली आहे.
दुसरं, खंड निश्चित झालं की मी त्या खंडाचा नकाशा Geology.com वर पाहतो.
ब्राउसरवरही झूम करायची सोय असते. ( डेस्कटॉपवरून)
धन्यवाद. बघतो
धन्यवाद. बघतो
माझ्याकडे फक्त लॅपटॉप आहे
(No subject)
आजही बेट आहे. पण सोपं आहे.
+१ जम्याच....
+१ जम्याच....
#Worldle #79 2/6 (100%)
आज गुगल मॅप्स वापरलं. त्यात
आज गुगल मॅप्स वापरलं. त्यात व्यवस्थित झूम करता येतं आणि आजूबाजूलाही जाता येतं
छान !
छान !

जमले
#Worldle #80 3/6 (100%)
हा ते कधीतरी विचारतील याची मी वाटच पाहत होतो
(No subject)
#Worldle #81 2/6 (100%)
#Worldle #81 2/6 (100%)
आजचा देश दुसऱ्यांदा विचारला गेला आहे
आपल्या खंडातले देश फारसे
आपल्या खंडातले देश फारसे विचारत नाहीत.
खरंय.
खरंय.
आजचा पहिला फटक्यात आल्याने मजा आली नाही
#Worldle #82 1/6 (100%)
(No subject)
होय, अपेक्षित देश ! २/६
होय, अपेक्षित देश !
२/६
हे खेळ आता पुरेसे जुने
हे खेळ आता पुरेसे जुने झाल्यामुळे त्यांची दैनंदिन नोंद मी माझ्याकडून थांबवत आहे.
नव्या-जुन्या सर्व खेळाडूंना त्यातून आनंद मिळत रहावा ही सदिच्छा !
आजचा देश दुसर्यांदा
आजचा देश दुसर्यांदा विचारला गेलाय. मागच्या वेळी मिळाला होता पण आज ओळखता आला नाही.
+१ #Worldle #92 4/6 (100%)
+१
पिटुकला लेकाचा !
#Worldle #92 4/6 (100%)
आजच्या Dordle मध्ये कधीच न
आजच्या Dordle मध्ये कधीच न ऐकलेला एक अफगाण खाद्य पदार्थ पहिला शब्द आहे.
आजचा देश मुंबईच्या पाव भाग
आजचा देश मुंबईच्या पाव भाग क्षेत्रफळाचा. त्याच्या आसपासचे देश कळल्यावर तिसर्या फेरीत मिळालेल्या देशाचे शेजारी कोण हे शोधलं . मग हा ओळखता आला.
खरंय.
खरंय.
त्रास झाला शोधायला. विचित्र नाव ....
मोनॅको सारखा होता. नाव दिसले
मोनॅको सारखा होता. नाव दिसले तरी भरपूर झूम केल्याशिवाय आकार नजरेला दिसत नाही
माझा पहिला अंदाज आजच्या
माझा पहिला अंदाज आजच्या देशाच्या जिवावर उठलेला दुसरा देश होता.
#Worldle #111 2/6 (100%)
#Worldle #111 2/6 (100%)
आजचा दुसऱ्यांदा विचारलाय. काय करणार, देशच तसा हाय !!
#Worldle #112 4/6 (100%)
#Worldle #112 4/6 (100%)
आजचा न ऐकलेला देश शोधल्यानंतर मला हिंदी चित्रसृष्टीतील एका बहुचर्चित अभिनेत्रीची आठवण झाली !
देशाचं नाव कधीतरी कानावरून
देशाचं नाव कधीतरी कानावरून गेलं आहे. संदर्भ आठवत नाही.
तुम्ही लिहिल्यावर अभिनेत्री आठवली.
देशाचं नाव >>> विशिष्ट
देशाचं नाव >>> विशिष्ट पर्वतराजीवरुन पडलेलं ते नाव आहे
Pages