Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या देशाचं नाव ऐकलं होतं. पण तो इतका लहानसा आहे. मुंबई पुण्यातल्या एखाद्या गृहसं कुला इतकं क्षेत्रफळ असेल.

हो, मी दोनदा Wordle २ शोधले. मला वाटले की मी स्पेलिंग चुकवले.

Worldle #63 >>> आज माझे असे झाले. बाल्टिक समुद्रात तुकडे शोध शोध शोधले. समोरचा गोडडन-ट काही दिसेना. मग अल्बेनिया पासून २१०० आणि लॅट्विया पासून ५०० चा छेदनबिंदू शोधला. नकाशा झूम आऊट केला मग दिसला आकार. आता उद्या बेटे येतील बहुतेक पुन्हा.

अगदी अगदी !
अपेक्षेप्रमाणेच आज झुंजावे लागले आणि कधीही न ऐकलेल्या एका ठिकाणी जाउन पोचलो .

#Worldle #64 5/6 (100%)

सोपा पेपर आजचा.....कालची कसर भरून काढली

कुठल्या कुठल्या समुद्रात किती इटुकले पिटुकले तुकडे विखुरलेत.
याचे एक जिगसॉ पझल बनवायला हवे. सगळे जुळवून एकसंध जमीन बनवायचे.

68.png

आजच्या देशाचं नाव कधी ऐकलं नव्हतं. पण तरीही सहज शोधता आला. आफ्रिकेतल्या अनेक देशांच्या सीमा सरळरेषा आहेत.

सहमत !
#Worldle #68 3/6 (100%)

कालचे पहिल्या फटक्यात जमले होते.

हो, अफ्रिकेतील देश कळतात
आकाराची खास बाब लक्षात घ्यायची ( पाय उंचावलेला घोडा, नागाच फणा, खोड + फांद्या, कासव असे काही )
जगाचा साधा, कृष्ण-धवल नकाशा पहायचा ज्यात फक्त देशांच्या सीमारेषा असतात,
दिलेला आकार पटकन जाणवतो नजरेला... २-३ ठिकाणी आहे असे वाटते .... मग एकीकडून सुरूवात करायची, लौकर मिळतो
खूप दातेरी सीमारेषा म्हणजे पाण्याजवळचा पृष्ठभाग असायची शक्यता जास्त

जगाचा साधा, कृष्ण-धवल नकाशा पहायचा
>> चांगली सूचना. रंगीत नकाशात डोळे भिरभिरतात.
......
कालचा सहा अक्षरी शब्द soviet होता. हा मूळ रशियाचा शब्द इंग्लिशने सामान्य नाम म्हणून स्वीकारलेला आहे .

69.png
आज आणखी एक बेट. ज्या दोन बेटांच्या मध्ये आहे, ती ओळखता आली. त्यांची नावं अर्धवट ऐकली होती, मग एक झूम करता येईल असा नकाशा मिळाल्यावर हे शोधता आलं.

+1
न ऐकलेले बेट निघाले
#Worldle #69 3/6 (100%)

आजचा 6 अक्षरी शब्द बरेच लोक मराठी बोलतानासुद्धा वापरत असतात. परंतु त्याचे स्पेलिंग म्हणजे एक आव्हान आहे. बऱ्याच जणांना ते अचूक सांगता येत नाही.
स्वर आणि व्यंजन यांची काहीशी विचित्र रचना !

अगदी ! * * * * *
वैशिष्ट्यपूर्ण !!

छान
मलाही तिसऱ्या प्रयत्नात जमला

Pages