Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वो कौन थी मधे पण (साधनाच ना ?
वो कौन थी मधे पण (साधनाच ना ?) एक जिवंत असते दुसरी मेलेली असते.
खामोश मधे अमोल पालेकर खूनी असतो.
दो गज जमीन के नीचे मधे बायकोच खूनी असते. तिनेच नवर्याचा खून केलेला असतो. पण तो वाचल्याने भूताचं रूप घेतो.
अजून आठवले कि सांगतो.
वो कौन थी मध्ये दोघी जिवंत
वो कौन थी मध्ये दोघी जिवंत असतात
शेवटी एक मरते
शर्मिली मधे पण दोन राखी असतात
शर्मिली मधे पण दोन राखी असतात हे शशी कपूरला माहिती नसते. एक बॅड आणि एक ग्वाड असते.
आत्ताच रॉ - बिस्ट नावाचा
आत्ताच रॉ - बिस्ट नावाचा दाक्षिणात्य पण हिंदीत ध्वनीमुद्रित (डबडा) चित्रपट संपवला. विजयकुमार नावाचा सुपरस्टार आहे. ज्या कारणासाठी आपण सलमान खानच्या किकची टर उडवतो, तो खूप बरा म्हणावा लागेल ( तो ही साऊथचा डबडाच असणार ). हिरो रॉ मधे असला कि त्याला विमान उडवता येतं, मिसाईल डागता येतात, पाकिस्तानच्या हद्दीत जाता येतं असं मूल्याधारीत शिक्षण हा चित्रपट करतो.
एक मॉल अतिरेक्यांनी हायजॅक केलेला असतो (वेठीस धरलेला असतो). हिरोला समोरून एके ५६ मधून सहा जण गोळ्या मारत असतात. पण हिरो आळसावल्यासारख्या सूक्ष्म हालचाली करून त्या चुकवत असतो. त्याला खांबामागे लपण्याचीही गरज नाही. पण त्याच्या एकेका गोळीतच समोरच्याचा खात्मा होत असतो.
स्टारडमच्या नावाखाली काहीही दाखवले आहे. मॉल मधे दहशतवाद्यांनी २०० जणांना ओलीस ठेवलेले असताना हा एसीच्या डक्टमधून ४० जणांना दुसर्या खोलीत घेऊन जातो. तिथे दोन हिरॉईन्सची हिरोवरून कुरबूर सुरू होते. हे मस्ट असतं. हिरो मात्र दोघींनाही भाव देत नाही हे ओघाने आलंच.
सर्वात शेवटी हिरो रॉ चा राजीनामा दिलेला असतानाही सुखोई एमके ३० हे विमान घेऊन पाकिस्तानतल्या लडाख भागात उतरतो. तिथे दहशतवाद्यांचा तळ असतो. इथेही सटासट गोळ्या सुटत असतात पण एकालाही नेमबाजी येत नसते. असे दहशतवादी भरती केलेले असतात. हिरो आरामात चालत येतो आणि चाकूने बंदूकधार्यांना मजेत ठार करतो आणि दहशतवाद्यांच्या म्होरक्याला बांधून त्याची वळकटी करून विमानात घालतो. शाळेची कवायत असल्यासारखे दहशतवादी हिरोच्या सूचना गुरूजींच्या सूचना पाळल्याप्रमाणे पाळतात.
त्याच्या मागे एफ १६ विमाने लागतात. त्यांचे हीट सेन्सिंग मिसाईल्स (इफ्रारेड सीकर्स) हा वळणं घेऊन चुकवतो. भारताच्या प्राईम मिनिस्टरला विमानातून फोन करून राफेल पाठवायला सांगतो. हा लडाखमधे उडतच असतो. मागे एफ १६ असतात. बॉर्डरजवळ फोचताक्षणी राफेल पोहोचतात. यावरून राफेल लडाख मधे तैनातच ठेवलेली असणार. मिसाईल सोडायच्या आधी हा सांगतो मी ५ मोजले की सोडा. पाच मोजताना हा सुखोई भारतीय हद्दीत आणतो आणि एफ सोळाने सोडलेल्या मिसाईल्सचा अंदाज घेत लाँच असा आदेश देतो. त्याबरोबर एक सोळा मधून सुटलेले सर्व मिसाईल्स राफेल मधून सुटलेल्या मिसाईल्सला धडकतात. मिसाईलमधे मिसाईल शिरतानाचा शॉट तर चाकूने गोळीचे दोन भाग करण्याच्या सीनची पुढची आवृत्ती आहे.
दोन चार बरे पिक्चर्स आले. दोन वर्षांनी चित्रपटगृहे चालू होत असल्याने लोकांनी अचाट सीन्स मनावर घेतले नाहीत. पण साऊथ वाले नाहीत सुधारणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
( वेगळ्या धाटणीचे काही चित्रपट असतात. त्यांची माफी मागून ).
रॉ बिस्ट मॉल फाईट सीनhttps:/
रॉ बिस्ट मॉल फाईट सीन
https://www.youtube.com/watch?v=4_AJe4-T-eg
मी मॉलच्या हायजॅकींग पर्यंत
मी मॉलच्या हायजॅकींग पर्यंत बघितला आणि विसरून गेले. नेटफ्लिक्स यासिनेमावर क्लिक केल्यावर जी क्लिप दाखवते, ती तर फारच वाह्यात आहे. मधेच एक ईजिप्शिअन गाणंही आहे. सुरवातीच्या एका सिनमधे दरवाज्याची कडी उपसून ढालीसारखी वापरून अतिरेक्यांना त्यांच्याच गोळ्या परतवून जागीच ठार केलंय. ह्याला मात्र कवचकुंडलं असल्यानी त्यांच्या तोफा व टँकरने सुद्धा दाढीच्या केसालाही धक्का लागत नाही.
काल आर आर आर पाहिला. इथे
काल आर आर आर पाहिला. इथे सांगतोय कारण फारसं कुणी ओळखत नाही. प्रत्यक्ष परिचयात कुणासमोर कबूल सुद्धा करणार नाही.
जर्सी पाहिला. स्लो वाटला आधी
जर्सी पाहिला. स्लो वाटला आधी जरा. पण शाहीदचा नैसर्गिक अभिनय खिळवून ठेवतो. जगलाय ती भुमिका शाहीद. पिक्चर संपला पण डोक्यातून जात नाहीये तो.
तसेच चित्रपट आवडीच्या क्रिकेट खेळावर होता आणि कथेत नेमके काय घडलेय याची उत्सुकताही पिक्चर बघायला भाग पाडते. पण नंतर मात्र चित्रपट हळूहळू वेग पकडतो. मोठा चित्रपट आहे. पण शेवटी एक पुर्ण कथा बघितल्याचे समाधान देतो. शेवटी फार फार वाईटही वाटते
गाणी तशीही मला गेले काही दिवस ऐकून आवडू लागली होती. चित्रपटात सगळीच पुन्हा ऐकायला चांगली वाटली
अस्मिता, >>> करेक्ट.
अस्मिता, >>> करेक्ट. कवचकुंडलं असल्यासारखाच वावर आहे.
फेफ
आत्ताच झोंबिवली बघितला..
आत्ताच झोंबिवली बघितला.. जबरदस्त टाईमपास पिच्चर आहे... सगळ्यांची कामं मस्त.. कॅमेरा वर्ड, डिरेक्शन मस्त.. मराठी पिच्चर कडून फार अपेक्षा नसतात पण मला हा फार आवडला
मूल्याधारीत शिक्षण >>> आख्खी
मूल्याधारीत शिक्षण >>> आख्खी पोस्ट भारी आहे.
फेफ -मी सुरू पण केला होता. पण पिक्चर बघण्याइतका वेळ नाही हे लक्षात आले. तोपर्यंत बराच वेळ टायटल्स सुरू होती. इतक्या वेळात हॉलीवूड पिक्चर मधे हीरो अॅडिक्ट असून, त्याला एक्स-बायको आहे, पोलिस फोर्स मधून एकदा बाहेर जाउन आलेला आहे इतकी माहिती आलेली असते व चाइल्ड कस्टडी बद्दल बायकोशी बोलताना ते एकत्र असतानाबद्दलचा एक जोक मारूनही झालेला असतो.
१९१७ पाहिला. सुंदर चित्रपट
१९१७ पाहिला. सुंदर चित्रपट आहे! मी केवळ पहिल्या अर्ध्या चित्रपटाला एक ऑस्कर दिला असता. त्यातले डिटेल्स, युद्धभूमीचा अनुभव, दाहक वास्तव हे जवळपास प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखं आहे. त्या पहिल्या ब्लॅक आऊट पर्यंत मीच मानसिक रित्या दमलो होतो.
उत्तरार्धात सिनेमा थोडा अ आणि अ वळणावर जातोय की काय अशी शंका येते. त्या माणसाला इतक्या जखमा होऊन, रक्तस्राव होऊनही तो चालू पळू शकतो, पोहू शकतो हे जरा अ वाटलं. कदाचित दुर्दम्य इच्छाशक्ती अशा वेळी शारीरिक मर्यादांवर मात करत असावी.
पण काही असलं तरी नक्की बघावा असाच आहे. तो नक्की कसा शूट केला असेल ह्या विचाराने मी जो आ वासला आहे, तो अजूनही मिटलेला नाही. तो लाँग शॉट इतका लाँग खरंच असेल असं वाटत नाही. काहीतरी ट्रिक असली पाहिजे. तसं काही नसेल तर मी इथूनच दिग्दर्शकाला मनातल्या मनात साष्टांग नमस्कार घालतो.
फेफ, rrr इतका खटकला?
फेफ, rrr इतका खटकला?
आम्ही 2 वेळा पाहिला
एकदा थिएटरमध्ये एकदा नेटफ्लिक्स वर आल्यावर.
अशक्य अतर्क्य घटना भरपूर आहेत, पण त्यातल्या दोन्ही हिरो आणि सेंटिमेंट साठी आवडला.
झोंबिवली आणि आराअराअर दोन्ही
झोंबिवली आणि आराअराअर दोन्ही लिस्टवर आहेत.
१९१७ चर्चा ऐकून आता बघावासा वाटतोय.
जर्सी डोक्यातून उतरायला आज आधी झोंबिवली बघावे म्हणतो
“ शाळेची कवायत असल्यासारखे
“ शाळेची कवायत असल्यासारखे दहशतवादी हिरोच्या सूचना गुरूजींच्या सूचना पाळल्याप्रमाणे पाळतात.” - सही लिहिलंय शांमा.
“ अशक्य अतर्क्य घटना भरपूर आहेत” - हे अंडरस्टेटमेंट आहे. अ आणि अ घटना लिहून झाल्यावर त्याला संवादांनी जोडून स्क्रिप्ट केलंय. बाहूबली मधे पण फँटसी होती but it was genuine.
आज सरतशेवटी बऱ्याच दिवसांनंतर
आज सरतशेवटी बऱ्याच दिवसांनंतर Everything Everywhere All At Once पाहायचा मुहूर्त लागला आहे. आज पाहणार.
(अजुनी स्ट्रीमिंग साठी उपलब्ध नाही. मी पायरेटेड कॉपीवर पाहणार आहे. अमेरिकेत राहणारे थेटरात पाहू शकतात.)
The Reader (Netflix)
The Reader (Netflix)
हा सिनेमा खूप दिवसांपासून पाहण्याच्या यादीत होता.
स्टोरी खूपच आवडली. सिनेमाचे तीन भाग होतात - त्यांची भेट आणि नातं, नातं संपणे आणि मग खटला.
खटल्याच्या भागात कथा एकदम वेग घेते. कदाचित त्यासाठीच आधीचा सिनेमा धीम्या गतीचा आहे. बॅकग्राऊंड म्युझिक विशेष लक्षात राहिलं. कामं सगळ्यांचीच छान आहेत. आर्ट डिरेक्शनही आवडलं.
खटल्याचे पडसाद म्हणून जे दाखवलंय तो खरा सिनेमाचा गाभा आहे. तिथेपर्यंतचं बिल्ड-अप खूप मस्त.
फक्त म्हातार्या हॅनाचा आवाजही थोडा वयस्कर स्त्रीचा वाटेल इतका तरी बदलायला हवा होता, असं वाटलं.
(फ्रंटल न्यूडिटी सीन्स न दाखवताही कथानकाच्या त्या भागाचा खटल्याच्या कथानकाशी कॉन्ट्रास्ट चांगला साधता आला असता, असं मला वाटलं. कारण फ्रं.न्यू.मुळे सिनेमाची त्याबद्दलच जास्त चर्चा झाली. मी सुद्धा त्याच संदर्भात सिनेमाचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं. पण पुढचं कथानक फार सुंदर आहे. ते जरा झाकोळलं गेलं. अर्थात पुस्तकावर आधारित सिनेमा आहे, ही त्यातली पळवाट.)
पण चुकवू नये असा सिनेमा.
फारएण्ड धन्यवाद. सिनेमा
फारएण्ड धन्यवाद. सिनेमा पाहताना आठवण झाली होती. हा टप्प्यातला सिनेमा आहे.
कंगणाचा मुवि पडला म्हणे
कंगणाचा मुवि पडला म्हणे
धाकड की धोतर काहीतरी नाव आहे
एकदाचा गंगुबाई पहिला,
एकदाचा गंगुबाई पहिला,
अंगावर येणारे वास्तव कचकड्याचे दाखवून त्यातला जीव घालवण्याचे काम भन्साळी उत्तमरीत्या करतो.
कथा सुद्धा उड्या मारत पुढे जाते,
मध्यंतरानंतर चित्रपट किंचित ग्रीप घेतो.
पण ओव्हरऑल अगदीच सपक वाटतो
Kartik aryan rockssssss!!
Kartik aryan rockssssss!! Khup handsome dislay.... Tabbu bhayan disli ahe... Abhinaya chya navane shankh...makeup paaaar gandla ahe ya movie madhe... heroin chi bahin ani bhabhi bhuta sarkhya ch dislya ahet... total timepass movie.
मला तब्बूचा अभिनय आवडला...
मला तब्बूचा अभिनय आवडला...
Naslela....
Naslela....
आत्ताच झोंबिवली बघितला..
ऊडवला
आत्ताच झोंबिवली बघितला..
आत्ताच झोंबिवली बघितला.. जबरदस्त टाईमपास पिच्चर आहे... सगळ्यांची कामं मस्त.. कॅमेरा वर्ड, डिरेक्शन मस्त.. मराठी पिच्चर कडून फार अपेक्षा नसतात पण मला हा फार आवडला
Submitted by म्हाळसा on 22 May, 2022 - 06:18
>>>>>
या पोस्टने माझ्या अपेक्षा मात्र वाढवल्या होत्या.
आणि त्या पुर्ण देखील झाल्या.
ललित प्रभाकर (हेच नाव ना त्याचे) मला पहिल्यांदा आवडला. जसे तो सैफ आधी गुळमुळीत दिसायचा मग डॅशिंग लूकमध्ये छाप पाडू लागला तसे तो यात छान वाटला.
अमेय वाघ आवडतोच. त्याची बायको झालेली हिरोईन सुद्धा आवडली. कोण आहे ती?
बाकी सगळे झोंबी मस्त. कथा वेगवान. शेवटपर्यंत उत्सुकता कायम. हॉरर कॉमेडी ईमोशन्स फुल पॅकेज. आणि फारसे बजेट नसलेला मराठी चित्रपट असूनही तांत्रिक बाजू उत्तम. मराठीत चांगले पिक्चर बनत असतील तर सर्वांनी नक्की बघायला हवेत. ज्यांना झिम्मा आवडला त्यांना हा सुद्धा आवडायला हरकत नाही.
त्याची बायको झालेली हिरोईन
त्याची बायको झालेली हिरोईन सुद्धा आवडली. कोण आहे ती? >> ती सिम्बामधे आहे.. छान काम केलंय तीने पण
वैदेही परशुरामी
वैदेही परशुरामी
कॅटरीना कैफची चुलत मावस
कॅटरीना कैफची चुलत मावस सर्वत्र बहीण आहे ती.
हो. मेणाच्या एका खंब्यातून एक
हो. मेणाच्या एका खंब्यातून एक आणि दुस-यातून दुसरी बनवलीये.
झोंबिवली कशा वर पाहिलात
झोंबिवली कशा वर पाहिलात लोकांनो?
इथले वाचून काल मॉडर्न लव जिंदगी पहायला घेतली..बरी आहे, मला असे स्मॉल इम्पॅक्ट्फुल स्टोरीज ३/४ एकत्र गुंफलेल्या असे पॅटर्न आवडतात. पण मागे ती के के मेनन, मनोज वाजपायी वाली इतकी भारी होती तशी मॉडर्न लव नाही वाटली..
फातिमा (दंगल मधली) जिव तोडून अॅक्टींग करते पण मर्यादा आहेत अभिनयाला..
Pages