चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच ना, 1917 दरम्यान ब्रिटिशांनी वेठीला धरून नेलेल्या आणि मरण पावलेल्या लाखभर भारतीय सैनिकाबद्दल कोणाला सिनेमा बनवावा वाटलं नाही अद्याप

एखाद्या मायबोलीकरावर बायोपिक बनवावा असे वाटतेय. इच्छुकांनी कृपया आवेदनपत्र आणि र. 10,000 नोंदणी शुल्क लिफाफ्यात घालून P. O. BOX 81454 वर पाठवावेत.

महाभारतावर एपिक स्केलमध्ये आणि लहानलहान उपकथांना सामावून घेणारी एक मालिका किंवा सिने सिरीज गरजेची आहे. जब्बर होईल.

राजामौली करू शकेल- थोडा बालिशपणा कमी आणि सटलपणा हवा.

1917 दरम्यान ब्रिटिशांनी वेठीला धरून नेलेल्या आणि मरण पावलेल्या लाखभर भारतीय सैनिकाबद्दल कोणाला सिनेमा बनवावा वाटलं नाही अद्याप>> संख्येने तितके उच्चवर्णीय नसतील हो त्या सैन्यांत Wink

आणि जर त्या सैन्यात चुकून जरी एखादा शेंडीवाला असता तर? लागलीच हॉलिवूडच्या तोडीस तोड चित्रपट बनवायच्या वल्गना झाल्या असत्या. आणि अजून पावेतो एखादा तरी पाणचट मूव्ही आलाच असता एव्हाना. नई का? Wink

१८ अक्षौहिणी सैन्य मेले, १८ कोटी सैनिक नाही.
१ अक्षौहिणी-
२१८७० रथ, २१८७० हत्ती, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ.

ते आहे, सामान्य सैनिकांची व्यथा कोणी दाखवली नाही
लिहिली सुद्धा नाहीये बहुदा

पर्व मध्ये थोडीफार

917 हा चित्रपट भारतातील Netflix वर उपलब्ध आहे का? मी शोधल पण सापडत नाहीये

>>> मला वाटतं हॉटस्टारवर आहे

"महाभारतात 18 कोटी मेले त्यावरही नाही बनला सिनेमा" - बी. आर. चोप्राच्या महाभारताला नाकं मुरडताना मी अनेकांना पाहिलंय (त्यातही गीतेवर प्रवचन करणार्यांची संख्या अधिक). पण १९८६ मधे तयार केलेली ती एक जबरदस्त टीव्ही सिरियल होती.

आज जर्सी बघितला.. शाहिदने पुन्हा एकदा मन जिंकलं.. ह्यातही मस्त काम केलंय.. बाकी मुव्ही थोडा स्लोच आहे.. एकदा बघायला बरा आहे

हायला पाहिला पण जर्सी..
मलाही बघायचा आहे..
कबीर सिंगच्या अर्धा असला तरी चालतंय

आज भुलभुलैया 2 रिलीज होईल

10 वर्षांपूर्वी थेटरात पाहिले तेंव्हा मेरे ढोलना सून , हे बागेश्रीत वाटले होते , मग मिश्र बागेश्रीत वाटले , एक दोन वर्षांनी ते रागेश्रीत वाटू लागले, पुन्हा दोन वर्षांनी ते खमाजमध्ये , मग जयजयवंतीत वाटू लागले, गेल्या वर्षीपासून मालगुंजीत वाटू लागले.

आता उद्या बघू

https://youtu.be/ZZl12CRfcgY

भुलभुलैया 2

जुडवा असतात , एक मरून भूत होते व दुसरी जगते
पण शेवटी कळते की मेलेली दुसरी असते व पहिली जिवंत असते

Proud

बिपाशा बसुचा अलोन
साऊथ मुव्ही चारूलता
अजून एक मोहन लाल मुव्ही गीतांजली

असे सेम प्लॉटवर भरपूर सिनेमे येऊन गेलेत. यु ट्यूबवर सगळे फ्री आहेत.

ह्यांनीही दोघींची नावे मंजुलिका अंजुलिका ठेवलीत

त्यापेक्षा एकीचे नाव भूल अन दुसरीचे भुलैय्या ठेवायचे होते.

Proud

मेरा साया
पाहिला नाही पण स्टोरी वाचलीए माबोवरच.

Pages