Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
https://www.takimag.com
https://www.takimag.com/article/drowning-dems-grab-a-pro-life-preserver/...
हा लेख आवडला. दोन्ही बाजूंना फटके मारले आहेत पण analysis रोचक आहे.
मैत्रेयी यांची मागच्या
मैत्रेयी यांची मागच्या पानावरची पोस्ट आवडली. गर्भपात करायला हवा/ नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर निर्णय घेण्याचा संपुर्ण अधिकार संबंधित महिलेला असायला हवा.
प्रत्येक धर्मांतल्या कर्मठांना आपली लोकसंख्या वाढवायची आहे... बाकी चर्चा शब्दांचे गुर्हाळ आहे.
मैत्रेयी नी मुद्दे मांडले
मैत्रेयी नी मुद्दे मांडले आहेत त्यात बरच काही कवर केलय, सो नवीन फार लिहायला तसं काही नाही पण मला एक दोन प्रश्न आणि काही क्लॅरिफिकेशन्स मांडायचे होते.
गर्भपात म्हणजे स्त्री ला आपण स्वतंत्र आहोत, आपले शरीर हे केवळ आपले आहे हे सिद्ध करण्याचा एक सर्वमान्य मार्ग अशीच मांडणी होत असेल तर गर्भपात ही अपवादात्मक आणि अपरिहार्य घटना राहील का? गर्भपाताचे उदात्तीकरण होत आहे आणि ते गैर आहे.>>>>>>>> शेन्डे, हे जे तुम्हाला ह्या विषयाबद्दल एकून, बघून एक फिलिंग येतय ते मी समजू शकतो. म्हणजे असं की बर्याच वेळा कुठल्याही देशात हे जे काही अत्यंत पोलराईजिंग असे मुद्दे असतात ते खुप चर्चिले जातात. ह्यात चर्चा करणे, प्लॅकार्ड्स घेऊन मोर्चे करणे, धरणे धरुन बसणे, सोशल मिडिया वर ह्या विषयी घमासान आरोप प्रत्यारोप करणे हे सगळं करणारी मंडळी एक बाजूला अन ह्या मुद्द्यांशी निगडित सरकारी नियमांमुळे अक्षरशः होरपळून निघणारे लोकं ही दुसरी पण सर्वात महत्वाची बाजू आहे. चर्चा करणारे अन त्या विषयी हिरिरीनी बोलणारे हे नेसेसेरिली अफ्केटेड नसतात (अर्थात काही खरच असतात) आणि त्यांच्या ह्या सगळ्या फाफटपसार्याकडे बघून अबॉर्शनचे उदात्तीकरण होत आहे असं आपल्याला फिलींग जरी आलं तरी ते बरोबर आहे असं नाही.
ह्या दुसर्या ट्रुली अफेक्टेड गृपची संख्या किती हे सांगणं तसं अवघड आहे पण हे मात्र नक्की की संख्या खुप मोठी आहे आणि त्याही पुढे जाऊन ह्या मुद्द्यावर निकाल कसा लागतो ह्यावर भविष्यात किती लोकं होरपळून निघतील हे अवलंबून आहे.
गर्भातल्या अन्वाएबल फीटसला वाएबल होण्याची मुदत्/संधीच द्यायची नाहि, आणि वर तो कसा वाएबल नाहि म्हणुन त्याला पाडण्याचं समर्थन करायचं. हि यांची थॉट प्रोसेस - वैचारीक दारिर्द्र्याचं यापेक्षा दुर्दैवी उदाहरण सापडणार नाहि. चालू द्या...>>>>>>>>>> गर्भाला वायॅबल व्हायची संधी द्यायची नाही किंवा संधी देणं ही लोकांची प्रायॉरिटी नाही हे खुपच ब्रॉड (व्यापक?) असं विधान आहे. वर मैत्रेयीनी लिहिलय तसं नेमकं कोण असं मुद्दाम करेल? Just like Shende, I think you too are falling for the rhetoric you are hearing but it shouldn't be that difficult to put yourself in a woman's shoe and understand the reasons why they may choose to abort. Also, the point of the fetus being viable is very logical and it has been put in there to protect something that you are referring to, life. The government (court) understands the importance of preservation of life and that's why they ruled that if the fetus is viable based on certain criteria, then you cannot abort. I don't think pro-choice people are debating that. I also understand that the definition of viable can feel like an arbitrary line that's drawn but to enforce a law, a line has to be drawn. A woman not having a choice to abort when the fetus is not viable yet is pretty much putting her life and the infant's future life in jeopardy for reasons we all know too well.
फुटके कंडोम वगैरे केसेस ह्या
फुटके कंडोम वगैरे केसेस ह्या अपवादात्मक असाव्यात आणि तिथेही पुरेसा लवकर गर्भपात झाला तर बहुतेक लोकांना ते खटकत नाही. परंतु कुठे तरी असे काही तरी अपवादात्मक घडले आहे ह्याची जबाबदारी जोडप्यावर असली पाहिजे (burden of proof). एक खून केला जात आहे तो अपरिहार्य आहे असे कायद्याला कायदेशीर पद्धतीने पटवून दिले गेले पाहिजे. (इथे धर्माचा काही संबंध नाही). नाहीतर त्या मारल्या जाणार्या जिवाला कायद्याचे संरक्षण कोण देणार? आणि कुणी आई असे करूच कसे शकेल वगैरे भावनाप्रधान मुद्दे कायद्याच्या दृष्टीने निरर्थक आहेत. (भारतात तीन तलाकच्या वेळेस धार्मिक मुस्लिम असेच म्हणत की कुणी नवरा उगीच तीन वेळा तलाक असे म्हणूच कसे शकेल. पण जर त्याने तसे म्हटले तर मात्र तो धर्मसिद्ध घटस्फोट होणार ह्याची आठवण होते)
आजच्या वोक युगात लहान बालकाचा लिंगबदल, गर्भपात, समलैंगिकता ह्याचे निव्वळ समर्थनच नव्हे तर उदात्तीकरण चालू आहे. ट्रान्स, लेस्बियन, गे, क्विअर वगैरे म्हणजे कुणी आभाळातून पडलेले महात्मे आहेत असे भासवणे चालू आहे. त्यामुळे निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन कुणी माऊली आपल्या बालकाच्या नरडीला नख लावूच कशी शकेल, असा विचार तुम्ही करूच कसा शकता वगैरे मुद्दे बाष्कळ आहेत.
असो. सध्या बेबी फॉर्म्युलाचा अफाट तुटवडा आहे असे समजते. त्याचे निवारण करायला गर्भपात हा एक उपाय असल्याचा विनोद बायडन सरकारमधल्या कुणीतरी केला आहे म्हणे! कदाचित ह्याच्याही पुढे जाऊन कुणी स्त्री स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता असेही म्हणेल की फॉर्म्युला परवडत नसेल वा मिळत नसेल तर बेबीला खास सरकारी गर्भपात केंद्रात सोडा, त्या बालकाचा "व्हेरी व्हेरी लेट टर्म अबॉर्शन"च्या नावाखाली निकाल लावू , कमीत कमी वेदनादायक पद्धतीने! ना रहेगा बास, न बजेगी बासुरी!
हा मुद्दा ऐरणीवर यायचे कारण
हा मुद्दा ऐरणीवर यायचे कारण कुठल्यातरी आगाऊ पुरोगाम्याने सर्वोच्च न्यायाधीशांच्या ह्या विषयावर विचाराधीन असणार्या कुठल्यातरी निर्णयाचा अनधिकृत बोभाटा केला. जॉन रॉबर्ट नामक स्युडो कॉन्सर्व्हेटिव्ह न्यायाधीशाने हा मसुदा अधिकृत आहे पण निर्णय झाला नाही म्हणून वज्रलेप केला आणि त्यामुळे आता तमाम पुरोगामी जमात न्यायाधीशांच्या मागे लागली आहे. न्यायाधीशांचे पत्ते शोधून त्यांच्या घरासमोर आंदोलने चालू आहेत. कधीतरी हे मोस्टली पीसफुल प्रोटेस्ट काहीतरी आगलावेपणा करतील आणि प्रकरण अधिकच चिघळेल. आणि त्या आगीवर डेमोक्रॅटिक पार्टीला थोडी उब मिळेल असे हे गणित असावे. त्यात एखाद दोन न्यायाधीश बळी गेले तरी हरकत नाही (कॉन्जर्वेटिव असले म्हणजे झाले!) अन्यथा हा विषय इतका मोठा बनायचे काही कारण नव्हते.
ट्रंपने ६ जानेवारीला शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे असे स्पष्ट म्हटले असताना तो अराजकाला फूस देणारा लोकशाहीविरोधी राक्षस आहे असे समस्त माध्यमे आक्रोशत होती. इथे न्यायाधीशांच्या घरासमोर आंदोलने चालू आहेत. ती शांततापूर्ण पद्धतीने चालू असतील तर काहीच हरकत नाही अशी बायडन सरकारची भूमिका आहे. ती मात्र लोकशाहीला सुरूंग लावणारी वगैरे आजिबात नाही बरं का!
आणि फुटलेल्या मसुद्यात गर्भपातावर बंदी असे न म्हणता तो निर्णय राज्यांकडे सोपवला जावा अशी शिफारस आहे अशी माझी माहिती आहे.
वाट्टेल ते लिहिले आहे. नुसतं
वाट्टेल ते लिहिले आहे. नुसतं स्ट्रॉमॅन.
बाई बाई! अमेरिकेचं काही कळतंच
बाई बाई! अमेरिकेचं काही कळतंच नाही! तो कोणी जॉर्ज फ्लॉयड नावाचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस पोलिसांशी झटापटीत मेला तर किती गहजब केला. दंगेबिंगे केले. त्या बिचार्या पोलिसाला उगाच शिक्षा केली. जगभरातल्या लोकांनी गुढगे टेकवायची नाटकं केली. भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा
आणि हेच लोक आता लाखो निष्पाप निरागस गर्भ खुडायला निघालेत.
<< ट्रंपने ६ जानेवारीला
<< ट्रंपने ६ जानेवारीला शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे असे स्पष्ट म्हटले असताना तो अराजकाला फूस देणारा लोकशाहीविरोधी राक्षस आहे असे समस्त माध्यमे आक्रोशत होती. >>
------ किती खोटे लिहीणार....
फुटके कंडोम वगैरे केसेस ह्या
फुटके कंडोम वगैरे केसेस ह्या अपवादात्मक असाव्यात आणि तिथेही पुरेसा लवकर गर्भपात झाला तर बहुतेक लोकांना ते खटकत नाही. परंतु कुठे तरी असे काही तरी अपवादात्मक घडले आहे ह्याची जबाबदारी जोडप्यावर असली पाहिजे (burden of proof). एक खून केला जात आहे तो अपरिहार्य आहे असे कायद्याला कायदेशीर पद्धतीने पटवून दिले गेले पाहिजे. (इथे धर्माचा काही संबंध नाही). नाहीतर त्या मारल्या जाणार्या जिवाला कायद्याचे संरक्षण कोण देणार? आणि कुणी आई असे करूच कसे शकेल वगैरे भावनाप्रधान मुद्दे कायद्याच्या दृष्टीने निरर्थक आहेत. >>>>>>>> निर्रथक नाही म्हणता येणार. तुम्ही लिहिलय तसे प्रेग्नन्सी म्हणजे आपण एक जीव तयार करतोय आणि ही अत्यंत गंभीर आणि खुप मोठ्या जबाबदारीची बाब आहे हे काही जोडप्यांना समजत नाही. बहुतांश खुप तरुण असलेली जोडपी आणि त्यात ज्यांना ह्या विषयाबाबत जास्त जागृकता नाही ते ह्यात पुढे आहेत. ही मंडळी खुप इम्मचुअर असल्यामुळे शक्य आहे की "फार घाबरायची गरज नाही, राहिलो प्रेग्नंट तर घेऊ करुन अबॉर्शन" असा विचार करु शकतात. पण हाच एक गृप असा नाहीये ना, ज्याला ह्या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे. तुम्ही सगळे लोकं असेच बेजबाबदार आहेत असं गृहित धरुन विधानं करत आहात. नुसती विधानं नाही तर ती पुढे एक्स्टेंड करत तुम्ही खुप कल्पनाविस्तार करता बॉ!
ट्रंपने ६ जानेवारीला शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे असे स्पष्ट म्हटले असताना तो अराजकाला फूस देणारा लोकशाहीविरोधी राक्षस आहे असे समस्त माध्यमे आक्रोशत होती.>>>>>> विस्ताराची सुरवात झाली म्हणावं का?
जस्टिसेच बळी काय, ट्रंप
जस्टिसेच बळी काय, ट्रंप शांततापूर्ण काय... कल्पनाविस्तार शब्द चपखल लिहिलात बुवा!
राज नी वापरला आधी. त्यामुळे
राज नी वापरला आधी. त्यामुळे लक्षात राहिला आणि इथे चपखल बसत होता म्हणून रिपर्पज केला अमित.
बाकी तुमचे काही मुद्दे समजतात शेन्डे पण हे पुढची शेपटं टू मच्च रेहनेका रे बाबा.
आणि फुटलेल्या मसुद्यात
आणि फुटलेल्या मसुद्यात गर्भपातावर बंदी असे न म्हणता तो निर्णय राज्यांकडे सोपवला जावा अशी शिफारस आहे अशी माझी माहिती आहे. >> आता त्या महितीच्या दोन पावले पुढे जाऊन काही नतद्रष्टे स्टेट्स तिथल्या रहिवाशांनी स्टेट बाहेर जाऊनही गर्भपात करू नये ह्यासाठी मोर्चे बांधले आहेत हे बघा. "निव्वळ त्या त्या स्टेट नेच ठरवावे" हाच केवळ मुद्दा असता तर "आमच्या स्टेट मधे करू शकत नाही" वर थांबता आले असते. आता ह्यावर कल्पना विस्तार होउ द्या.
ट्रंपने ६ जानेवारीला
ट्रंपने ६ जानेवारीला शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे असे स्पष्ट म्हटले असताना >> हो तर ! ६ जाने. चे "शांततापूर्ण" आंदोलन मोठ्या स्क्रीन वर बघत ट्रम्प फॅमिली ग्लासे उंचावत प्रसन्न चित्ताने पार्टी करत असल्याचा व्हिडिओ बघितल्याने हे पटलेच अगदी. तसेच असणार.
शेंडेचे बरंय राव, नुसतेच शेंड्या लावून पळून जातात पुढे बाकी काही वाचायच्या फंदात पडत नाहीत. तापच नै डोक्याला.
ते आपल्याला आपली पौष्टिक
ते आपल्याला आपली पौष्टिक खुमखुमी जिरवायची संधी देतात. He is doing god's work.
व्यासंगिक तलवारी !
व्यासंगिक तलवारी !
मैत्रियीची पोस्ट आवडली.
मैत्रियीची पोस्ट आवडली.
विवाहबाह्य अवांछित गर्भधारणेच्या च्या बाबतीत स्त्री गरोदर आहे कळल्यावर गर्भ पाडून टाकण्यासाठी बरेचदा दबाव हा तिच्या जोडीदाराकडून असतो. अशी कशी प्रेग्नंट राहीलीस, प्रोटेक्शन वापरुनही प्रेग्नंसी म्हणजे मूल माझे नाहीच वगैरे आर्ग्युमेंट्स असतात. जे सुरवातीचे आठवडे असतात ते 'आपले बाळ' म्हणून जोडीदाराला समजावण्यात जातात. पॅटर्निटीचे समन्स आले की मंडळी नाईलाजाने सँपल देतात. गर्भपात हा बरेचदा नाईलाज म्हणून घेतलेला निर्णय असतो. दत्तक देणे किंवा सेफ हेवन लॉ खाली सुपूर्त करणे हे पर्याय आहेत पण त्यातला सेफ हेवन लॉ हा बाळ ३० दिवस किंवा कमी वयाच्या बाळासाठी वापरता येतो. बाळ झाल्यावर त्या पहिल्या महिन्यात हा असा निर्णय घेणे हे बर्याच स्त्रीयांना शक्य होत नाही. दत्तक द्यायचे म्हटले तरी ती प्रोसेसही नेहमी वर्क होतेच असे नाही. स्त्रीने बाळ वाढवायचे ठरवले तर कोर्टाने टरवून दिलेला चाईल्ड स्पोर्ट मिळवणे हे एक दिव्यच असते. अनेक अवांछित बाळांचे बाप हे त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारे नसतात. ९ महिने बाळ पोटात वाढवणे आणि पुढे ते जन्माला आल्यावर स्वतः वाढवणे किंवा इतर पर्याय शोधणे यात स्रीचे मात्र आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे अवांछित गर्भधारणेबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो स्त्रीला घेता यावा. गर्भपाताचा पर्याय उपलब्ध असणे म्हणजे स्त्री तोच एक पर्याय स्वातंत्र्य उपभोगायचे म्हणून वापरते असा होत नाही. अनप्लॅन्ड प्रेग्नंसीच्या बाबतीत आजही बाळ जन्माला घालणे हा पर्याय निवडण्याचे प्रमाण ६०% आहे.
अनप्लॅन्ड प्रेग्नंसी ही नेहमी बेजबाबदार वर्तनातूनच होते असे नाही . birth control failure rate या तक्त्यात गर्भनिरोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती, फसण्याची शक्यता आणि वापराचे संभाव्य साईड इफेक्ट दिले आहेत. Abstinence वगळता ज्या साधनांची फसण्याची शक्यता फार कमी आहे त्या साधनांचे स्त्रीवर होणारे साईड इफेक्ट्स ही लक्षात घ्यायला हवेत. या साईड इफेक्ट्सचा त्रास म्हणून पर्याय बदलला आणि अवांछित गर्भाधारणा अशाही केसेस होतात. काही वेळा आजारी पडणे- औषधे त्यामुळे गर्भनिरोधन फसणे असेही होते.
<<शेंडेचे बरंय राव, नुसतेच
<<शेंडेचे बरंय राव, नुसतेच शेंड्या लावून पळून जातात Happy पुढे बाकी काही वाचायच्या फंदात पडत नाहीत. तापच नै डोक्याला.<<<
अगदी बरोब्बर!!
भरतहि त्यातलेच. फ्लॉइड कुठे, गर्भपात कुठे? कशाचाहि कशाशीहि संबंध!
जोरजोरात बोंबलत रहायचे.
मज्जा!
ट्रम्पने शांततापूर्ण आंदोलन
ट्रम्पने शांततापूर्ण आंदोलन करा वाचल्यावर भारतात दूरदर्शनवर हेवर्ड-५००० वगैरे "सोडा" जाहिराती लागत ते आठवले. हे खरे अल्कोहोल ब्रॅण्ड्स. पण दूरदर्शनवर अल्कोहोल जाहिराती चालत नसत. मग सगळे ब्रॅण्ड्स त्यांच्या नॉन-अल्कोहोलिक प्रॉडक्ट्सच्या जाहिराती करत. पण ब्रॅण्डवाल्यांना आणि पब्लिकला बरोबर माहीत असे ही नक्की कसली जाहिरात आहे
>>The government (court)
>>The government (court) understands the importance of preservation of life and that's why they ruled that if the fetus is viable based on certain criteria, then you cannot abort. I don't think pro-choice people are debating that<<
तसं नाहि, वैद्यबुवा. प्रो-चॉइस फोक्स आर शूटिंग फॉर अन्कंडीशनल अॅबॉर्शन - एकेए इंन्फंटिसाय्ड.
बाय्दवे, जॉर्ज्याच्या हार्टबीट बिल नुसार रेप्/इंसेस्ट केसमधे गर्भपाताला मान्यता आहे; मात्र त्याकरता पुलिस रिपोर्ट लागतो. तसंच प्रेग्नंसी वाएबल नसेल (काँप्लिकेशन्स, अॅबनॉरमल फीटस इ.), आणि त्यामुळे गर्भवतीच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर गर्भपाताला संमती आहे.
पण झालंय काय, हा मुद्दा एथिक्सच्या ऐवजी पोलिटिक्सच्या भिंगाखाली आल्याने सरळ दोन तट पडलेले आहेत. त्याचंंच प्रतिबिंब इथेहि जाणवतंय...
अन्कंडिशनल अबॉर्शनबाबत मी
अन्कंडिशनल अबॉर्शनबाबत मी इतकं वाचलेलं नाही अजून. Will read up more.
Agree on ever politicizing of this issue. Both parties are pandering to their bases by using selective interpretation of the law. It’s unavoidable though.
https://twitter.com
https://twitter.com/RealJamesWoods/status/1521902472490459137?t=KJpigk73...
ही एक गंमतशीर ट्विट पाहा. थोडी जुनी आहे. पण गर्भपात ह्या विषयाकडे किती गंभीरपणे पाहिले जाते ह्यांचे एक उत्तम उदाहरण
मतीभ्रष्ट म्हातारबुवा बरळणे
मतीभ्रष्ट म्हातारबुवा बरळणे थांबवत नाहीत.
रमजान ईदच्या वेळी त्यांनी असा दावा केला की डेलावेर हे इतके छोटे राज्य आहे की तिथून फारसे सिनेटर येत नाहीत! आता हा विनोद होता का आणखी काही ते आपणच ठरवा.
अमेरिकेत प्रत्येक राज्याचे दोन सिनेटर असतात जे केंद्रीय सिनेट मधे त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात हे शाळकरी मुलालाही माहीत असले पाहिजे. म्हातारबांचा मेंदू हळूहळू मरत चालला आहे त्यामुळे असले सामान्य ज्ञान टिकवून ठेवता येईल इतकी जागाच उरलेली नाही! असले पात्र अन्य देशांशी क्लिष्ट आर्थिक, राजकीय विषयावर वाटाघाटी कशा करत असेल ते देवालाच ठाऊक!
शेंडेनक्षत्र, तुम्ही दिलेले
शेंडेनक्षत्र, तुम्ही दिलेले ट्वीट crass आहे. पण ते प्रातिनिधीक उदाहरण नाही. इथेही प्रो चॉइस लिहिणर्या किती लोकांना ते ट्वीट आवडेल्/मान्य होईल ?
प्रो लाईफ वाल्यांकडूनही असेच काहिसे टोकाचे ट्वीट मी हुडकू शकेन व प्रो लाईफ वाले पहा किती हलकट आहेत असा युक्तिवाद करू शकेन, करणार नाही.
रिपब्लिकन लोकांकडून पुन्हा पुन्हा उगाळले जाणारे दोन पांचट मुद्दे
१ स्त्रीया गर्भपात हा बर्थ कन्ट्रोल सारखा वापरतील. का ही ही. एखाद्या तरुणी व तरुणाला काही करावेसे वाटले तर ते कंडोम किंवा अन्य उपाय वापरतील, जिला थोडी फार अक्कल आहे अशी तरुणी असे म्हणेल का की जे काय होईल ते पाहू आणी चारेक महिन्याने गर्भपात करून घेऊ ? गर्भपात म्हणजे कान टोचण्यासारखे आहे का ?
२ प्रो चॉइस वाले गर्भपाताचे उदात्तीकरण करतात : गर्भपात ही एक नाईलाजाने केली जाणारी गोष्ट आहे. तिचे उदात्तीकरण वगैरे कोणीही करत नाही. आम्हालाही गर्भपात बंद झाले तर आनंदच होईल.
https://twitter.com
https://twitter.com/RealMacReport/status/1523700258852655104?s=20&t=9R8v...
हे ट्विट पहा. एक बाई म्हणत आहे की ज्याने ही न्यायाधीशांच्या मसु द्याची बातमी फोडली तो अगदी रिपब्लिकन असला तरी मी त्याच्याशी गोडसा सेक्स करायला तयार आहे. जर त्या संबंधामुळे मी गर्भवती झाले तर मी अगदी आनंदाने त्या गर्भाचा गर्भपात करून संबंधित व्यक्तीला तसे केल्याची माहितीही देईन.
हे तारे त्या बाईने एका प्रसिद्ध न्यूज चॅनेल वर तोडले आहेत. ह्या गर्भपातावर आधारित विकृत विनोद ऐकून उपस्थित मंडळी खो खो हसू लागली असे दिसते. तेव्हा मी दिलेले उदाहरण हे एकमेव आणि कमालीच्या विकृत बाईचे आहे असे नाही. अनेक प्रो choice विचारवंत आपला मुद्दा अधोरेखित करायला कुठल्याही विकृत थराला जाताना दिसतात. गर्भपात हा नखे कापणे, केसाला असलेला रंग बदलून दुसरा फासणे, शरीरावर काही गोंदवणे किंवा गोंदवलेले खोडणे इतका साधा सोपा प्रकरणे असे ब्रेन वाशिंग करत आहेत. कारण तोच पुरोगामी दृष्टिकोन आहे.
"तुमचा दृष्टिकोन काय ते
"तुमचा दृष्टिकोन काय ते तुम्हाला काय माहित ? हि बघा हि रँडम कॉमेडियन टीव्हीवर काय बोलली ते ! हाच तुमचा दृष्टिकोन आहे !"
समजा कुणी random बाई असे
समजा कुणी random बाई असे भयानक विनोदी बोलली तर संचालकांनी तिला झापले का की अशा गंभीर विषयावर बोलताना थिल्लरपणा टाळावा? नाही. कारण अशा प्रकारे गर्भपात हा एक सहज सोपी, कुठलाही विचार न करता करण्याची मामुली प्रोसिजर आहे हे लोकांच्या मनावर ठसवले जावे. त्यात एक खून, हत्या समाविष्ट आहे हे अशा "हलक्या फुलक्या" विनोदाच्या शिडकाव्याने झाकले जावे.
ह्यालाच पुरोगामी विचार म्हटले जाते. स्त्री स्वातंत्र्य समजले जाते. निसर्गाने आपली प्राणिजात टिकावी म्हणून जीवाला जे जे instincts दिलेले आहेत ते तुच्छ मानून, पायदळी तुडवून पुरोगामी असल्याचे ढोल बडवणे हे ह्या गटाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
ठीक, आमची मतं काय हे सुद्धा
ठीक, आमची मतं काय हे सुद्धा आता शेंडेबुवा सांगणार.
>>
>>
आमची मतं काय हे सुद्धा आता शेंडेबुवा सांगणार
<<
तथाकथित thought leaders कुठला विचार समाजात रुजवू पाहत आहेत ह्याचे एक उदाहरण मी दिले. आज असे मत बनले नसेल तर कणभर त्या दिशेने ते झुकवणे. मग आणखी एक कण मग आणखी एक.
हे ब्रेन वाशिंग आहे. प्रस्थापित माध्यमे हे काम करत आहेत आणि सामान्य लोक कमी अधिक प्रमाणात ते स्वीकारत आहेत.
अच्छा, मग सकल
अच्छा, मग सकल कॉन्सर्व्हेटिव्ह लोकांचा विश्वास क्यूएनॉन, लिझर्ड पीपल, डीप स्टेट, ग्रेट रिप्लेसमेंट, ज्यूईश कन्स्पायरसींवर विश्वास असतो असं म्हणलं तर चालेल, नाही?
फक्त विश्वास असतो असे नाही -
फक्त विश्वास असतो असे नाही - तर या लॉजिक ने तो "कॉन्झर्वेटिव्ह विचार असतो", ते थॉट लीडर्स असतात. कारण ते जेव्हा जे काय बकतात तेव्हा उपस्थित पब्लिक सपोर्ट करते त्यांना. यालाच फॅमिली व्हॅल्यूज समजले जाते. फेथ वगैरे ते हेच डेमोक्रॅट्स लहान मुले खातात व ज्युइश लेजर्स काहीतरी करतात हा विचार सामान्य माणसे कमी-अधिक प्रमाणात स्वीकारत आहेत
अफाट लॉजिक लावायचे तर दोन्हीकडे लावा.
Pages