Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
असामी
असामी
(No subject)
असामी
असामी
पण "मजूर अ नि क्ष " हे सुद्धा एक लिबरल कारस्थान आहे असे म्हणू शकतात!
कदाचित मजूर (पक्षी :
कदाचित मजूर (पक्षी : काम्करणारा तो कामगार) असा शब्द वापरणे नि तमाम सगळ्या गणितांमधली सगळी कामे त्यानेच करणे हे कम्युनिस्ट गणिताचे लक्षण मानले जाईल
जमलेल्या १०० मजुरांनी
जमलेल्या १०० मजुरांनी धनाजीराव मुर्दाबाद, मालकशाही मुर्दाबाद अशा घोषणा १० मिनिटे प्रत्येकी ७० डेसिबल आवाजात ५० मीटर लांबुन दिल्या. त्या ऐकून धनाजीराज वाकड्यांचे कानाचे पडदे फाटायची प्रोबॅबिलिटी काढा.
धनि. असामी नि अमितव -
धनि. असामी नि अमितव - तुम्हाला कळले इथे कशा तर्हेने वादविवाद होतात.
एकूणच येशू ख्रिस्त नि त्याचे चमत्कार या पेक्षा शाळेत अधिक काहीच शिकवू नये असे काही लोकांचे मत आहे.
इंग्रज येण्यापूर्वी भारतात देखील फक्त धर्मच शिकवला जाइ. फार तर गणित.
फाउची साहेबांनी डिक्लेअर केले
फाउची साहेबांनी डिक्लेअर केले आहे की अमेरिका अधिकृतरीत्या पॅण्डेमिक मधून बाहेर आलेली आहे. रोज निघणार्या रोग्यांची संख्या वगैरे चा काहीतरी थ्रेशोल्ड आहे त्यावर हे दिसते.
पण 'फाउची साहेबां ना काय
पण 'फाउची साहेबां ना काय डोंबल कळते' ह्या धोरणानुसार आता काय करायचे ? परत सुप्रीम कोर्टात केस टाकणार का कि मास्क सक्ती हवीच , प्रत्येक हॉस्पिटलाईझ्ड केस ची कोव्हिड चाचणी होऊन त्यांना मार्क केलेच पाहिजे, सगळ्यांना जबरदस्ती बूस्टर दिलेच पाहिजेत वगैरे ?
बरोबर आहे, असामी.
बरोबर आहे, असामी.
फौची ला काय डोंबल कळते! सुप्रिम कोर्ट आपलेच आहे, सगळे कायदे सुप्रिम कोर्टातूनच करून घ्यावेत, हवे कशाला काँग्रेस नि प्रेसिडेंट?
निकष काय आहेत? पण सध्याचे
निकष काय आहेत? पण सध्याचे करोना केसेस आणि मृत्यू हे दोन्ही आकडे जून -जुलै २०२१ पेक्षा वाईट आहेत. दिवसाला ५० हजारांहून जास्त केसेस आणि साडेतीनशे मृत्यू होत असताना आता पँडेमिक मधून बाहेर आहोत आणि जून २०२१ मध्ये रोज दोनकेशे मृत्यू होता असताना पँडेमिक होतं. नक्की काय निकष लावून पँडेमिक संपल्याचे जाहीर केले?
दुवा
Lo and behold!
Lo and behold!
Supreme Court has voted to overturn abortion rights, draft opinion shows
"We hold that Roe and Casey must be overruled," Justice Alito writes in an initial majority draft circulated inside the court.
https://www.google.com/amp/s/www.politico.com/news/2022/05/02/supreme-co...
असो. आता सुप्रीम कोर्ट निर्णयावर (रो वि वेड) अवलंबून न राहता लेजिस्लेशनने गर्भपाताचा हक्क सुरक्षित करण्याची वेळ झालीये.
६०% अमेरिकन्स गर्भपात legal in all/most cases असावं या मताचे आहेत. ट्रम्पच्या एका टर्मचे परिणाम काय होऊ शकतात हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून दिसते आहे.
मिडटर्म मध्ये या गोष्टीचे पडसाद उमटतील.
https://youtu.be/_fpxCuorKjA
https://youtu.be/_fpxCuorKjA
ट्रेव्हर नोहा- करस्पॉंनण्डट्स डिनर
मस्त बोलला आहे.
“बायडन फक्त फारतर
“बायडन फक्त फारतर एक्झ्युक्युटिव्ह ऑर्डर्स काढु शकतो ज्याला काडीचीही किंमत नसते किंवा त्याद्वारे तो कुठलेही महत्वाचे लेजिस्लेशन करु शकत नाही.
म्हणजे एक ठोकळा प्रेसिडेंट म्हणुन तो पुढची ४ वर्षे राहु शकतो. त्या चार वर्षात मॅकॉनलच वॉशिंग्टनमधली सगळी सुत्र हलवु शकतो. व ६-३ कंझरव्हेटिव्ह सुप्रिम कोर्ट मेजॉरीटी असल्यामुळे ...रो विरुद्ध वेड व ओबामा केअर .. या दोन्ही गोष्टींचा निकाल लागु शकतो व त्याविरुद्ध.. डेमॉक्रॅटिक पार्टी.. त्यांचा प्रेसिडेंट असुनही.. काहीही करु शकणार नाही.
म्हणजे बायडनला नुसती नावाकरता प्रेसिडेंसी मिळणार आहे.
Submitted by मुकुंद on 5 November, 2020 - 00:55”
कॉमी, हे माझे भाकीत, ५ नोव्हेंबर, २०२० ला केलेले.
रो विरुद्ध वेड निर्णय या सुप्रिम कोर्टाने निकालात काढल्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. एमी कोनी बॅरेट ची नेमणुक या सुप्रिम कोर्टात, ट्रंप व रिपब्लिकन पार्टीने त्याचसाठी घाइघाइत केली होती.
एमी कोनी बॅरेट ची नेमणुक या
एमी कोनी बॅरेट ची नेमणुक या सुप्रिम कोर्टात, ट्रंप व रिपब्लिकन पार्टीने त्याचसाठी घाइघाइत केली होती. >>> अहो शेण्डेंना राग येईल बर्का. ते पुन्हा (सर्वात क्वालिफाइड असली म्हणून काय झालं) काळ्या बाईला कसे बायडन ने घेतले याबद्दल (विनोदी) रॅन्ट लिहितील.
मुकुंद, तुमचे भाकीत बरोबर
मुकुंद, तुमचे भाकीत बरोबर ठरले
पण इलेक्टॉरली रिपब्लिकन्सना ह्याचा तोटा होईल असे वाटते. बऱ्याच सेंटर राईट लोकांना गर्भपात हक्क मान्य असतात आणि रिपब्लिकन पक्षाचा अँटी-गर्भपात स्टॅन्ड फक्त आपल्या बेसला खुश ठेवण्यासाठी आहे असे वाटत असते. आज त्यांना रिऍलिटी चेक मिळाला असे म्हणता येईल.
मुकुंड, तुमचे भाकित खरे ठरले
मुकुंड, तुमचे भाकित खरे ठरले ! अभिनंदन तरी कसे म्हणू ?
https://reader-ramble.tumblr.com/post/184945012501/the-only-moral-aborti...
पुढचा नंबर
पुढचा नंबर कॉन्ट्रासेप्टिव्हचाच आहे.
पुढचा नंबर
पुढचा नंबर कॉन्ट्रासेप्टिव्हचाच आहे. >> नाही त्या आधी दुसर्या स्टेट मधे जाऊन अॅबॉर्शन करायचे नाही ह्यावर बॅन येईल. पर्सनल लिबर्टी वगैरे च्या मोठ्या बाता फक्त !
खरोखर किती लोकांना गर्भपात
खरोखर किती लोकांना गर्भपात ह्या प्रकाराशी संबंध आलेला आहे? विशेषत: जी पराकोटीची व्याकूळ झाली आहेत त्यांना प्रत्यक्ष कुणी माहीत आहे का की जी व्यक्ती गर्भपात करता आला नाही म्हणून आयुष्याचे नुकसान करून बसली?
उलट प्रचंड वाढणारी गुन्हेगारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याकरिता नेमलेली एक हिंस्र चेटकीण ह्या गोष्टी आपल्यावर थेट परिणाम करू शकतात. मी पाहुण्यांना कौतुकाने सान फ्रान्सिस्को दाखवायला नेले आणि फिशर मन व्हार्फ जवळ माझी कर फोडून चोरट्यांनी पाहुण्याची पर्स चोरली. पोलिसांनी काखा वर केल्या. सगळ्या ट्रिप चा विचका होऊन आम्ही घरी आलो असे सहज घडू शकते.
मुळात हा गर्भपाताचा निर्णय अधिकृत रित्या जाहीर झालेला नाही कदाचित ही एक राजकीय खेळी असेल जी वापरून डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पाठीराखे थोडे उत्साहाने मतदान करू लागतील असे काही उद्देश असतील. काळच सांगेल.
प्रतेक्ष ओळखित कुणाचीही कार
प्रतेक्ष ओळखित कुणाचीही कार पीअर -३९ पार्किंग मध्ये फोडलेली नाही. त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी हे थोतांड आहे. काहीही कुठेही गुन्हेगारी वाढलेली नाही.
प्रतेक्ष ओळखित मानेवर गुडघा ठेवून कुणीही मेलेली व्यक्ती नाही. त्याअर्थी असं काही घडू शकतं यावर माझा विश्वास नाही.
मी जातो त्या मॉल/ दुकानापैकी एकही दुकान कोणी फोडललं नाही. आगी लावलेल्या नाहीत. त्याअर्थी..
प्रतेक्ष ओळखित मी कुणाला तुम्ही गर्भपात केलाय का? हा प्रश्न विचारलेला नाही, की मला कोणी सॉम टॉक मध्ये काल जाउन गर्भपात करुन आले असं सांगितलेलं नाही... अर्थातच त्या सँपल सेट वरुन गर्भपाताची गरजच नाही याची मला पुरेपूर खात्री आहे.
अमित पर्फेक्ट!
अमित पर्फेक्ट!
परफेक्ट!!
परफेक्ट!!
आज मिपावर एकांना प्रतिसाद देताना एक दुःखद factoid नजरेस आले.
Since May 2021, people living in counties that voted heavily for Donald Trump during the last presidential election have been nearly three times as likely to die from COVID-19 as those who live in areas that went for now-President Biden.
https://www.npr.org/sections/health-shots/2021/12/05/1059828993/data-vac...
वॅक्सिन हेसिस्टन्सी वाढवण्याचे पाप GOP ने केले आहे आणि त्यांच्याच समर्थकांना फटका बसला.
कॅलिफोर्निया मध्ये अजून
कॅलिफोर्निया मध्ये अजून गाड्या फोडणे अशा पारंपारिक मार्गांनी चोरी केली जाते हे वाचून धक्का बसला. 950 डॉलर पर्यंतचा ऐवज फेलोनी चार्ज ची भीती न बाळगता उघडपणे उचलून नेण्याची मुभा मायबाप सरकारने दिली असता कोणी इतके श्रम घेऊन या व्यवसायाची प्रतिष्ठा राखत आहेत हे पाहून सद्गदित झालो. खरं तर गाडी लॉक करून चोरांना काच फोडताना दुखापत वगैरे होण्याचा धोका निर्माण केला म्हणून तुमच्यावरच गुन्हा दाखल करायला हवा.
गर्भपाताचे खंदे समर्थक
गर्भपाताचे खंदे समर्थक डोक्यात राख घालून घेणार ह्याची खात्री होतीच!
पण उर्वरित लोकांना हा प्रश्न .
पीडित, बलात्कारित वा अन्य अत्याचाराची बळी असणारी स्त्री व मुलगी हिला गर्भपाताचे स्वातंत्र्य असावे. पण ते किती मुदतीपर्यंत? निर्माण झालेला जीव त्याला काहीच स्वातंत्र्य नाही का? हा प्रश्न इतका सरळ सोपा आहे का?
केवळ पीडितच नव्हे, कुठल्याही
केवळ पीडितच नव्हे, कुठल्याही कारणाने अपत्याची जबाबदारी घेऊ इच्छित/शकत नसलेल्या स्त्रीला ते स्वातंत्र्य हवं. स्त्री म्हणजे फक्त तिचं गर्भाशय नव्हे. तिला मेंदूसारखे इतर अवयवही आहेत.
जन्माला येऊन मग दुर्लक्षित राहण्याचं स्वातंत्र्य हवं आहे का गर्भासाठी? का? मग ती अनिच्छेने जन्माला घातलेली व्यक्ती योग्य संगोपनाअभावी कुपोषित राहिली / आजारी झाली / गुन्हेगारीकडे वळली, गाड्या फोडू लागली की त्याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं?
> केवळ पीडितच नव्हे,
> केवळ पीडितच नव्हे, कुठल्याही कारणाने अपत्याची जबाबदारी घेऊ इच्छित/शकत नसलेल्या स्त्रीला ते स्वातंत्र्य हवं. स्त्री म्हणजे फक्त तिचं गर्भाशय नव्हे. तिला मेंदूसारखे इतर अवयवही आहेत.
+१
+१ स्वाती
+१ स्वाती
गर्भपात बंदी घातल्यावर गर्भपात कमी होतील हे खरंय. पण बऱ्याच वेळेस अनसेफ प्रकारे गर्भपात करणे वाढते- अश्याने काही स्त्रियांचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. असे रेड स्टेट्स मध्ये होऊ शकते.
गर्भपाताचे खंदे समर्थक
गर्भपाताचे खंदे समर्थक डोक्यात राख घालून घेणार ह्याची खात्री होतीच! > वाळू त डोके खुपसून बसलेल्या लोकांपेक्षा हे नक्की च बरे आहे. गर्भपाताचे खंदे समर्थक पेक्षा स्त्रीच्या पुनरोत्पादनाच्या हकाच्या स्वातंत्र्याचे खंदे समर्थक असे वाचून बघा. कदाचित समजू शकेल. " निर्माण झालेला जीव त्याला काहीच स्वातंत्र्य नाही का" असे प्रश्न विचारण्या आधी त्या स्त्रीबद्दल विचार करून बघा. कदाचित समजू शकेल. फारसी आशा नाही अर्थातच .
जन्माला येऊन मग दुर्लक्षित राहण्याचं स्वातंत्र्य हवं आहे का गर्भासाठी? का? मग ती अनिच्छेने जन्माला घातलेली व्यक्ती योग्य संगोपनाअभावी कुपोषित राहिली / आजारी झाली / गुन्हेगारीकडे वळली, गाड्या फोडू लागली की त्याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं? >> बंदी घालणार्यांनी जबाबदारी घ्यावी असे सुचवले तर लगेच सगळे खंदे समर्थक होतील.
>>खरं तर गाडी लॉक करून
>>खरं तर गाडी लॉक करून चोरांना काच फोडताना दुखापत वगैरे होण्याचा धोका निर्माण केला म्हणून तुमच्यावरच गुन्हा दाखल करायला हवा.<< +१
हाहा. रॅडिकल लेफ्टिस्टंना हा प्रश्न अजुन कसा पडला नाहि, हा प्रश्न आहे...
>>पण ते किती मुदतीपर्यंत? <<
शेंडेनक्षत्र - असे सिलॅबस बाहेरचे प्रश्न विचारायचे नसतात, हे तुम्हाला अजुन ठाउक नाहि?..
तुम्ही किंवा तुमच्या परिचयात
तुम्ही किंवा तुमच्या परिचयात कोणी असेल तर बोला. उगा रेड स्टेट्स आणि स्टॅटिस्टिक्स नको.
बाकी गर्भपात करावा लागला हे कोण व्यक्ती मुद्दाम सोशल फोरमवर सांगत सुटेल? असले लॉजिकल प्रश्न पडलेले नकोच. पिंडी ते ब्रह्मांडी.
गर्भपाताचे स्वातंत्र्य मुल जन्माला येईतोवर (फुल टर्म - ४० आठवडे) कुठलेही कारण न देता स्त्रियांना असावे आणि ते पब्लिकली फंडेड इंन्शुरंस मध्ये कवर व्हावे. गर्भपात न करण्याचे स्वातंत्र्य डॉक्टरांना ही असावे. पण अशी सुविधा रिझनेबल अंतरात उपलब्ध असण्याची जबाबदारी सरकारची असावी.
Pages