४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओके Happy
माझ्या ओळखीत, याच्या-त्याच्या ओळखीत अशा मर्यादित सर्कलपेक्षा लेटेस्ट सोशल मीडिया चर्चा वाचल्या तर जास्त व्यापक insight मिळेल असं मला वाटतं. विशेषतः जी नवीन पिढी आहे -अजून शिकतच आहेत किंवा नोकरीला लागले आहेत त्यांचे struggles वेगळे आहेत.
कवितांच्या कार्यक्रमातही आरक्षण असावं अशा
टाईपची चर्चा इथे नुकतीच झाली ना. disproportionately successful असलेल्या एखाद्या मायनोरीटीचं काय होऊ शकतं हे आपण विसाव्या शतकाच्या मध्याच्या अलीकडे युरोपात पाहिलं आहे.
उकळत्या पाण्यात टाकलेला बेडूक लगेच उडी मारतो. पण हळूहळू पाणी तापवत नेलं तर त्या बेडकाला समजत नाही.

मायबोलीवर सोशल मीडिया चर्चाच वाचत आहे असा माझा समज होता. फारएन्ड यांची कमेंट आणि त्याला मिळालेला दुजोरा सुद्धा सोशल मीडिया चर्चाच आहे.

बाकी युरोप आणि ज्यूंशी तुलना निव्वळ हास्यास्पद आहे.

> लेटेस्ट सोशल मीडिया चर्चा
वाचायला हरकत नाही पण तारतम्य हवे. कांगावा व सत्य हे वेगवेगळे करायला नीरक्षीरविवेक हवा.

जिज्ञासा +१.
शिवाय हा आरक्षणाचा बागुलबुवा तीसेक वर्षापूर्वी निदान थोडासा तरी समजण्यासारखा होता. तेव्हा सरकारी इंजि/ मेडि कॉलेज व सरकारी नोकरी हेच एक साधन होते. आज खाजगी मध्ये असंख्य संधी आहेत, तिथे आरक्षण नाही. सरकारी नोकरीचे वलय कमी कमी होत आहे. मध्यमवर्गीय ब्राह्मणांनी तर सरकारी शाळांकडे व सरकारी नोकरीकडे पाठच फिरवली आहे. ते योग्यही आहे. मी जेव्हा इंजि ला गेलो तेव्हा सर्व महाराष्ट्रात जेमतेम आठ कॉल्लेजेस होती, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर यांना फक्त कराड व सांगली, त्यातही काही जागा नागपूर ला ! माझ्या वर्गात साठ मुले होती, सहा कुलकर्णी !

वरच्या पाण्यातल्या बेडकाची उपमा खरे तर मुस्लिम व वंचितांना जास्त चपखल आहे.

> बाकी युरोप आणि ज्यूंशी तुलना निव्वळ हास्यास्पद आहे. हास्यास्पद नव्हे , क्रूर व कांगावाखोर !

>>वरच्या पाण्यातल्या बेडकाची उपमा खरे तर मुस्लिम व वंचितांना जास्त चपखल आहे.

सहमत.
या बाबत सुद्धा पुष्कळ "सोशल मीडिया चर्चा" उपलब्ध आहे. त्या बाबतीत मात्र anecdotes नको तर अधिकृत आकडेवारीचा आग्रह होत असावा.

Radicals आणि वामपंथी यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. हेट पोलिटिक्स आहे हे फारएन्ड यांनी acknowledge केलं.
मायबोलीचे नवाब मलिक उर्फ कुलकर्णी याना तेही मान्य नसेलच.
त्यामुळे चालू द्या. हॅपी फ्रायडे!

हेट पॉलिटिक्स आहेच, ब्राम्हणविरोधी आणि मुस्लिमविरोधी.

पण ब्राम्हणांची आणि नाझी जर्मनीतल्या ज्यूंची तुलना मूर्खपणाची आणि वास्तवाशी तिळमात्र संबंध नसलेलीच आहे.

बाकी बोलायला काही नसले कि वामपंथी, radical हे शब्द फेकणे चालू द्या.

माझ्या ओळखीत, याच्या-त्याच्या ओळखीत अशा मर्यादित सर्कलपेक्षा लेटेस्ट सोशल मीडिया चर्चा वाचल्या तर जास्त व्यापक insight मिळेल असं मला वाटतं. >>> ते बरेच मीही वाचत असतो. कॉमी यांनी म्हंटल्याप्रमाणे माबोही त्यात आलेच. अगदी रिटर्न टू इण्डिया फोरम्स, कोरा व इतर अनेक वाचलेले आहे. लोक लिहीताना स्वतःची जनरल मते लिहीतात. अनेकदा निर्णय ऑलरेडी घेतलेले लोक जस्टिफाय करायला स्वतःच्या डोक्यातील fears/concerns लिहीतात. त्यात काही चूक नाही. पण प्रत्यक्ष लोकांशी बोलताना मला जे दिसले त्यात इकडे येण्याचे किंवा परत न जाण्याचे जे मुख्य driving reasons आहेत ते बहुतांश वैयक्तिक होते.

ी. पण प्रत्यक्ष लोकांशी बोलताना मला जे दिसले त्यात इकडे येण्याचे किंवा परत न जाण्याचे जे मुख्य driving reasons आहेत ते बहुतांश वैयक्तिक होते. >> फा ला अनुमोदन. व्किंवा, भारतात असलेल्या आई वडलांची काळजी किंवा मुलांना तिथे वाढवायचा निर्णय हेच मुख्यत्वे घटक बघितले आहेत. आरक्षणाचा त्रास हा एकदाही ऐकला नाहिये. ह्याचा अर्थ नसेल असे नाही पण इतक्या वर्षाम्मधे एखादा तरी बघण्यात आला असता असे वाटते.

अनेकदा निर्णय ऑलरेडी घेतलेले लोक जस्टिफाय करायला स्वतःच्या डोक्यातील fears/concerns लिहीतात. त्यात काही चूक नाही.//

ओके!लोक तसं लिहीत आहेत हे तर मान्य आहे ना! मग ठीक आहे. तुम्ही त्याला justification किंवा इतर काही लेबल लावणं हा तुमचा प्रश्न!
ब्राम्हण परदेशातून भारतात आले, त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असं नितीन राऊत म्हणाले होते. हे काँग्रेसचे मंत्री आहेत. हा देश तुमचा नाही , तुम्हि इथे belongकरत नाही आणि तुमची इथे कोणाला गरज नाही- हा मेसेज ब्राम्हणांना पुरेसा देऊन झाला आहे.

फा यांना अनुमोदन.
माझे एक मित्र इथे बरीच वर्षे राहिले नि मग भारतात कायमसाठी गेले. त्यांच्या मते, देश, समाज चांगला वाईट म्हणणे हे संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवांवरून लोक ठरवतात. बरेवाईट सर्वत्र असते - त्यातले तुम्हाला जिथे कमी त्रास तिथे रहा.
म्हणून काही लोक तिथे जाऊन परत आले, काही इथे राहून तिथे गेले.

व्हाइटहॅट - हा बीबी अमेरिकन संदर्भात आहे. इथे प्रश्न भारतात ब्राह्मणांविरूद्ध काय चालले आहे हा नाही. मी इतर ठिकाणी अनेकदा त्याबद्दल लिहीले आहे. इथे प्रश्न लोकांच्या इकडे येण्याच्या किंवा इथून न जाण्याच्या निर्णयात तो किती मोठा फॅक्टर आहे हा आहे. माझ्या ऑब्झर्वेशननुसार तो मोठा फॅक्टर नाही.

अस्माकं बदरी वृक्षं युष्माकं बदरी तरु
बादरायण संबंधो यूयं यूयं, वयं वयम्|
म्हणजे तुमच्या घरी बोराचे झाड आहे नि आमच्याहि घरी, म्हणजे आपण नातेवाईक!!!
ओढून ताणून कसेहि करून वाट्टेल त्या गोष्टीचा वाट्टेल त्या गोष्टीशी सबद्ध लावायचा.

त्या लिंकमधे अमेरिकेतल्या ब्राह्मण बाईचा उल्लेख आहे, म्हणून त्याचा संबंध सर्वसाधारणपणे सगळेच ब्राह्मण, हिंदू, भारतातील जातीयवाद, वगैरे सगळ्याशीच आहे.
तरी अजून गांधी सावरकर, मोदी राहुल, वगैरे यात आले नाहीत. तेहि येतील!!
किंवा बोरे, आंबा, फणस यांच्याबद्दलहि इथे "चर्चा" होईल - म्हणजे वैयक्तिक शिव्यागाळी वगैरे.
असेच असते मायबोलीवर

तिथल्या एकालाही ही सिच्युएशन ग्रेसफुली बदलता येइल अशी काही आयडिया सुचली नाही? प्रेसिडेण्ट हा पार्टी स्टार असायची गरज नाही पण जेथे कोठे प्रेसिडेण्ट उपस्थित असतो तेथे तोच (किमान अमेरिकेत) मुख्य असायला हवा. कालच्या इतरही क्लिप पाहताना ओबामालाही ते लक्षात आलेले दिसत नाही.>>>>> एकदम प्रेसिडेन्टलाच लेफ्टआउट केल?? विचित्र वाटली सगळी सिच्युएशन, एडीटेड क्लिप असली तरी बायडन च्या चेहर्‍यावर खेळात न घेतलेल्या मुलाचे भाव होते.
ओबामा भयकर पॉप्युलर एक्स प्रेसिडेण्ड आहे, पिपल जस्ट लव्ह हिम अनकन्डिशनली !! त्याला सत्तेवर असताना मिळाल त्याच्यापेक्षा जास्त कवतिक अजुनहि मिळतय हेच सिद्ध होतय.

ओबामा हा एक अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्रित मनुष्य आहे. त्याची शंभर एक आत्मचरित्रे लिहून झालेली आहेत! त्याच्या प्रत्येक भाषणात सर्वात जास्त आढळणारे शब्द I, me, my!
प्रचंड लोकप्रियता असल्यामुळे ती जरा जास्तच डोक्यात गेली आहे
त्याच्या कारकीर्दीत पुतिन ने क्रायमिया पादाक्रांत केले होते आणि ओबामा सरकारने काही काही केले नाही. तरी तो आत्ता जेव्हा व्हाईट हाऊस मधे पायधूळ झाडायला आला (आणि बायडनला पायपुसण्यासारखे वागवयला) तेव्हा त्याने खोट्या फुशारक्या मारल्या की त्याने पुतीनला कसे नियंत्रणात ठेवले होते!
बाय डन हा एक खोट्या नाण्यासारखा झालेला आहे. अगदी cnn, MSNBC ही डेमॉक्रॅटिक पक्षाच्या ताटाखालची मांजरेही आता म्हातारबावर गुरगुरत आहेत!
पुन्हा एकदा ती म्हण आठवते दादला मेला तरी चालेल पण सवत रंडकी* झाली पाहिजे ह्या अट्टाहासा पायी अमेरिकेची माती होत आहे.

(* मराठी कच्चे असणाऱ्या लोकांसाठी रंडकी म्हणजे "तसे" काही नाही. विधवा ह्या अर्थाचा ग्रामीण शब्द आहे. उगाच डोक्यात राख घालून घेऊ नये!)

बायडन आपल्या भ्रमिष्ट, वेडसर पणाचे नवनवे नमुने सादर करत असतो. दोन तीन दिवसांपूर्वी नॉर्थ कॅरोलिना मधे असंबद्ध भाषण केल्यावर मागे वळून शेक hand करायचा प्रयत्न केला. पण मागे कुणीच नव्हते! कदाचित Ghost सिनेमात होते तसा कुणी पॅट्रिक स्वेझी सारखे भूत त्याला दिसले असावे. डावीकडे शेक हॅण्ड झाल्यावर उजवीकडच्या भुताशी शेक हॅण्ड केला आणि धांदरट पणाने तिसरीकडे कुठेतरी जाऊ लागला.
प्रकरण वाढत चालले आहे. जर हा प्राणी सर्वात वरच्या पदावर नसता तर त्याची दया आली असती. पण आता संताप येतो. म्हातारा भ्रमिष्ट पणाचा झटका येऊन छान लाल, हिरवी, निळी बटणे दिसत आहेत म्हणून ती दाबून काही उत्पात सुरू करणार नाही अशी आशा करू!

<< पण आता संताप येतो. म्हातारा भ्रमिष्ट पणाचा झटका येऊन छान लाल, हिरवी, निळी बटणे दिसत आहेत म्हणून ती दाबून काही उत्पात सुरू करणार नाही अशी आशा करू! >>

------- संतापाला आवर घालणे हेच तुमच्या आवाक्यातले आहे, आणि आरिग्यासाठी उत्तम. घुस्सा अकल को खा जाता है. Happy

बायडन प्रगल्भ आहेत, ते कुठलेही ( Nooooclear ) बटन दाबणार नाही जेणेकरुन उत्पात सुरु होईल (आणि म्हणून आज युक्रेनला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. )

<<पुन्हा एकदा ती म्हण आठवते दादला मेला तरी चालेल पण सवत रंडकी* झाली पाहिजे ह्या अट्टाहासा पायी अमेरिकेची माती होत आहे.>>
अनुमोदन.
एकदा ट्रम्पला दिली ती टेस्ट बायडेनला दिली पाहिजे. बघू काय निकाल लागतो.
७० वर्षावरील कोणत्याहि राजकारण्याला ती टेस्ट दिली पाहिजे.
इथे साध्या साध्या गोष्टीत लेखी नि प्रॅक्ल्टिकल परीक्षा असते, लायसेन्स मिळते नि मग काम मिळते.
या राजकारण्यांवर देशाची सुरक्षा, अर्थव्यवस्था, काय्दे इ. सर्व सोपवण्यापूर्वी अशी काहीतरी परीक्षा असलीच पाहिजे.
एखादे बिल्ल पास किंवा नापास करणारे किती कॉन्ग्रेसमन एखादे बिल पूर्ण वाचतात, नि मुख्य म्हणजे त्यांना समजते याची जबरदस्त शंका येते.

>>>>>>>दादला मेला तरी चालेल पण सवत रंडकी* झाली पाहिजे ह्या अट्टाहासा
अशीच एक विनोदी म्हण आहे - आपले नाक कापून दुसर्‍याला अपशकुन करणे.
--------
बाकी राजकारणावर कोणतेही मत नाही कारण दोन्ही पार्टीजच्या आपापल्या स्ट्रेन्थ्स (बल स्थाने) आहेत. चालू द्या.

<<<पण आता संताप येतो. म्हातारा भ्रमिष्ट पणाचा झटका येऊन छान लाल, हिरवी, निळी बटणे दिसत आहेत म्हणून ती दाबून काही उत्पात सुरू करणार नाही अशी आशा करू!>>>
निरनिराळ्या कारणांनी ट्रंपबद्दलहि असेच वाटायचे कित्येकांना. सुदैवाने त्याल मिलर, कुश्नर, इव्हांका, हॅनिटी सारखे विद्वान, कर्तबगार, सल्लागार मिळाले होते. बायडेनकडे कोण आहे माहित नाही.

ट्रंपने केले नाही म्हणून बायडन करणार नाही हे फारच विचित्र लॉजिक आहे. राज्य कारभार हातात घेतल्यापासून बायडन ने ट्रम्पने केले त्याच्या उलटे करण्याचा सपाटा सुरू केला आहे. पेट्रोल उत्खनन बंद, बेकायदा घुसखोरी चालू, अतिरेकी पर्यावरण धोरणे चालू, LGBTQABCDXYZ+*~•%÷√,> वगैरे लोकांना डोक्यावर बसवणे चालू, पोलिसांना फंड करणे बंद वगैरे.
शिवाय असंबद्ध बरळणे, वाक्यातील करता, कर्म, क्रियापद, विशेषण ह्यांचा मेळ नसणे, निरर्थक काहीतरी बोलणे, अदृश्य व्यक्तींशी शेक हॅण्ड, अकारण डोके भडकणे असले प्रकार ह्या वयोवृध्द माणसाकडून वरचेवर घडत आहेत.

शेंडे - बायडेन ने कधी फंडिंग बंद केले पोलिसांचे?

आणि तुम्ही जी आद्याक्षरे लिहीली आहेत त्यांना डोक्यावर बसवणे म्हणजे काय?

डोक्यावर बसवणे= त्यांचे हक्क मान्य करणे (ते सुद्धा बायडनने केले असे म्हणता येणार नाही. जे आधीपासून आहेत तेच हक्क आहेत.)

<< अणुबॉम्बचे एक सिंगल बटन आहे आणि प्रेसिडेंटने ते दाबले कि मिसाईल उडू लागतात हे खरे आहे का ? >>
------- nuclear button असे काही नाही आहे. अध्यक्षाच्या सोबत एक सुटकेस असते असे वाचले आहे. त्यामधे मॅन्युअल, पासवर्ड, आणि प्रक्रिया या बद्दल माहिती असते. अमेरिकन अध्यक्ष हल्ला करण्याचे आदेश देतो. तो एक बटन दाबतो आणि मिसाईल उडायला लागतात यात काही तथ्य नाही.

तेच तर, असे कसे असेल ? उद्या एखादी फिट आली तर एक सिंगल माणूस जागतिक विनाश ओढवेल.

Dr. Strangelove हा सिनेमा या विषयावर आहे, जब्बर सिनेमा आहे.

https://www.bloomberg.com/politics/graphics/2016-nuclear-weapon-launch/
अध्यक्ष केवळ आदेश देतो, पुढच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेचा अंदाज येथे वाचायला मिळेल.

क्ल्रिंटन महाशय अध्यक्ष पदावर असतांना ते अनेक महिने biscuit ( हल्ल्याचा आदेश अमेरिकन अध्यक्षांनीच दिलेला आहे याची खातरजमा करायला वापरला जाणारा personal identification code) विसरले होते वा हरवले होते असे निवृत्त लष्करी अधिकारी जनरल शेलटन म्हणतात.

https://www.theatlantic.com/politics/archive/2010/10/why-clintons-losing...

डोक्यावर बसवणे= त्यांचे हक्क मान्य करणे (ते

ट्रान्स लोकांच्या बाबतीत हे खरं आहे. मुलगे आणि मुली स्पोर्ट्समध्ये शारीरिक क्षमतेत फरक असल्याने त्यांच्या वेगळ्या categories असतात. एक मुलगा आता ट्रान्स बनून मुलींच्या swimming मध्ये सर्व रेसेस जिंकतो आहे. नॉर्मल मुलींनी कितीही प्रयत्न, मेहनत केली तरी त्या त्याला हरवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी आता विजेतेपदाचं स्वप्न विसरून जावं. तो मुलगा पुरुषांच्या ranking मध्ये ५५४ क्रमांकावर होता. मुलगी असल्याचा क्लेम करून आता मुलींच्या ranking मध्ये पाचवा क्रमांक आहे. डेमोक्रॅटना हे सर्व अत्यंत नॉर्मल, fair आणि आनंददायी वाटत आहे.
रिपब्लिकन सत्ता असलेल्या स्टेट्समध्ये कायदे आणले जात आहेत जेणेकरुन ट्रान्स लोक मुलींच्या स्पर्धांत भाग घेऊ शकणार नाहीत. पण बायडन यातही काहीतरी sweeping EO आणेल अशी शक्यता वाटते. Inclusion is more important than equality असं एक लिबरल विचारमौक्तिक नुकतंच वाचलं.

मला वाटतं सिस स्त्रियांसाठी स्पर्धांची प्रोटेक्टेड कॅटेगरी असणं हे फेअर आहे. हा विषय सोडून द्यावा, ट्रान्स स्पोर्ट्स हा अत्यंत कमी परिणाम असणारा विषय आहे, so not a hill to die on.
बायडन त्याबाबत काही करेल असे मला वाटत नाही.

या अतिशय कमी लोकांना रस असणाऱ्या आणि खूप कमी लोकांवर परिणाम असणाऱ्या विषयाचा वापर करून ट्रान्स हक्क मागे खेचायला प्रयत्न चालूच आहेत.

Pages