चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे.
हरीण काय अहो Biggrin बाकी त्या ड्युप्लिकेट बॅगा घेऊन जाणे बॉलिवूडला ही लाजवेल.

त्रागा करायचा नाही ? मग फँटस्टिक बिस्ट सारख्या टुकार मालिका बघून उपयोग काय ? Collective bitching हि सगळ्यात मजेशीर गोष्ट असते या सिनेमांबाबत, ट्राय करून बघा.

आमचा पॉटरहेड मित्रांचा गट हे बिस्ट सिनेमे बघायला आवर्जून जातो. रनिंग कॉमेंट्री करत तक्रार करत करत सिनेमा बघतो. चांगल्या सिनेमापेक्षा जास्त मजा येते!

गॉडफादर 1 आणि 2 अमेझॉन वर आलेत परत, इच्छुकांनी लाभ घ्यावा. कितीतरी वेळा बघितले आहेत हे दोन्ही. गॉडफादरचा बॅकग्राउंड स्कोअर अफलातून आणि अफाट आहे.

शेर शिवराज (अफझलखान वध) पाहिला आणि आवडला. पावनखिंडीपेक्षा आवडला.
पावनखिंडपेक्षा वेगवान पटकथा आहे. पावनखिंडीसारखी रक्ताची कारंजी फारशी नाहीत. ग्राफिक्स सामान्य दर्जाची आहेत. पण मराठी चित्रपटातल्या ग्राफिक्सच्या दर्जाबद्दल अपेक्षा मर्यादित असल्याने चालून गेले. चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे दिग्दर्शकाची महाराजांची गोष्ट सांगण्याची प्रामाणिक तळमळ. मुळात गोष्टच अद्भुत आहे. जगाच्या इतिहासातील एक महान लष्करी मोहीम कशी केली असेल, त्याची पूर्वतयारी कशी केली असेल, मनोवैज्ञानिक डावपेच कसे टाकले असतील हे बऱ्यापैकी दाखवले आहे. थोड्याफार मेलोड्रामाला कात्री लावून अर्धा तास कमी करता आला असता. ऐतिहासिक तथ्यांच्या बाबतीत बरेच स्वातंत्र्य घेतले आहे. उदाहरणार्थ अफझल खानाने शिवाजीच्या मोठ्या भावाला (संभाजीला) विश्वासघाताने मारले हे खरे. पण त्याने चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्ष तलवारीने मारले नाही. अफजलखानाने फक्त संभाजीला लढाईत पुढे (मरायला) पाठवले आणि मागून आपले सैन्य घेऊन गेलाच नाही. कस्तुरीरंगाचा अफझलखानाने दग्याने केलेला खून दाखवायला पाहिजे होता. त्याने exactly प्रतापगडासारखेच भेटीला बोलावून कर्नाटकातील कस्तुरी रंग ह्या उमरावाला ठार केले होते. मुकेश ऋषी अफझलखान म्हणून ठीकठाक आहे. तितकासा खुनशी वाटत नाही. चिन्मय मांडलेकर मुळातच शिवाजी महाराज वाटत नाही. पण त्याने अभिनय उत्कृष्ट केला आहे. बाकी सगळ्या कलाकारांनी चांगली कामे केली आहेत. क्लायमॅक्सचा प्रसंग किंचित कमी पडतो. खानाचा कोथळा बाहेर काढण्याची नाट्यमयता, तो शॉक अंगावर येत नाही. दोघांचाही कायिक अभिनय थोडा कमी पडतो. तर डिटेल्स मध्ये काही ठिकाणी कमी पडत असला तरी मुळात गोष्ट चांगली सांगितली आहे. त्यामुळे त्या flow मध्ये प्रेक्षक रंगून जातो. हा चित्रपट बघताना context महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे तारामतीला मिशा असूनसुद्धा लोक हरिश्चंद्राच्या नाटकातील करूण रसात न हसता रंगून जाऊ शकतात तसे काहीसे. Guns of Navarone वगैरे दर्जाचा चित्रपट व्हावा अशी गोष्ट आहे. पण त्या दर्जाचा प्रश्नच नाही. what it could have been वगैरे विचार केला की आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे तसा विचार करणे मी सोडून दिले आहे. पण सध्याच्या मराठी/हिंदी चित्रपटांच्या मानाने बराच चांगला आहे. overall verdict : Definitely worth watching.

पावनखिंड फारसा आवडला नसल्यामुळे हा बघायचा विचार केला नव्हता. बघायला पाहिजे.

गॉडफादर 1 आणि 2 अमेझॉन वर आलेत परत, इच्छुकांनी लाभ घ्यावा >>> थ्यांकू Happy (भारतात आलेत ना?)

मुकेश ऋषी अफझलखान म्हणून ठीकठाक आहे. तितकासा खुनशी वाटत नाही >>>>>> अगदी खरं. मला तर कादंबर्‍यांमधून जे अफझलखानाच वर्णन वाचलय त्यापेक्षा अगदीच लो वाटला तो. म्हणजे मुकेश ऋषीकडे बघितल्यावर हा माणूस तोफ वगैरे उचलत असेल असं नाही वाटत. खरा अफझलखाना त्याची तोफ एका हाताने उचलायचा अशी वर्णने आहेत.

गंमतीचा भाग म्हणजे, एका सीनमध्ये पहार वाकवताना आणि नंतर सरळ करताना दाखवली आहे. नीट लक्ष देऊन बघितलं तर लक्षात येतं ती चक्क रबरी आहे. Lol

चित्रपट निर्मिती हा वाटतो तितका सोपा भाग नाही, पण काही गोष्टी लक्षात येताताच.

सीनमध्ये पहार वाकवताना आणि नंतर सरळ करताना दाखवली आहे.

>>>शेरलॉक च्या गोष्टीत आहे ना, कि एक माणूस धमकी म्हणून सळी वाकवून जातो आणि शेरलॉक ती उचलून सरळ करतो.

कॉमी, तुम्ही बहुतेक कमेंट नीट वाचली नाहीत. अफझलखान सुध्दा त्या ताकदीचा होता, पण चित्रपटात पहार म्हणून जे दाखवलंय ती सरळसरळ रबरी नळी वापरलीय हे लक्षात येतंय.

शेर शिवराजची पब्लिसिटी केली गेली नाही का? पावन खिन्ड खुप पब्लिसाइज केला गेला, इथे अमेरिकेतही खुप पब्लिसिटी केली गेली होती, काहि
महाराश्ट्र मन्डळातली पब्लिक झेन्डे घेवुन, भगवा थिम कपडे घालुन मुव्हिला गेली होती नेमका पिक्चर अगदी बालनाट्य कॅटेगरी वाटला होता.

पितृऋण बघितला प्राइमवर , खूप दिवस बघायचा होता. कथानक अंदाज लगेच थोड्या वेळाने येतोच पण तनुजा काय जगलीय ती भूमिका, छान केलं तीने. मलातरी आवडलं तिचं काम.

गंगुबाई बघितला. मला तरी आवडला. आलियाचे एक्स्प्रेशन्स गंगुबाई झाल्यानंतर बर्‍याच ठिकाणी आवडले. वडिल गेल्याचे जेव्हा फोनवर कळते तो ३० सेकंदवाला डायलॉग, त्या टेलरच्या प्रेमात असताना रोशनीचा रिश्ता घेऊन घरी जाते तेव्हाचा, रझिया बरोबरचे १-२ डायलॉग्स.
लहानखुरी दिसत असली तरी तो रोल निभावायचा तिने नक्कीच चांगला प्रयत्न केलाय. हे मा वै म.

मी वसंतराव , चंद्रमुखी

रिपोर्ट काय ?
कलेक्शन किती ?

चंद्रमुखीचे रिपोर्ट चांगले नाहीत पेपरात

मी वसंतराव , चंद्रमुखी

रिपोर्ट काय ?
कलेक्शन किती ?

चंद्रमुखीचे रिपोर्ट चांगले नाहीत पेपरात

चंद्रमुखी SSS मी वसंतराव !
असं तरी लिहायचं होतं. Proud

काल संध्याकाळी प्राईम, नेफ्लि, हॉटस्टार इ सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म उलथेपाथले करून पाहिले. पण रामबाण मनोरंजनाची खात्री वाटेना. अशा वेळी स्वतःच स्वतःचे मनोरंजन करून घेणे हा एकमेव उपाय उरतो. त्यासाठी वेगळे सिनेमे बनवले जातात.
काल असा एक महान चित्रपट सापडला.
https://www.youtube.com/watch?v=TD3RWEF3Eu4

एक कादरखान सोडला तर कुणीच यात सिरीयस नाही. कॉमेडी प्रसंग कॉमेडी करत नाहीत. ते काम अ‍ॅक्शन सीन्स करतात. मिठुन घड्याळात बघून सहा वाजता मुख्यमंत्र्याच्या कानाखाली वाजवतो हा सीन जितका अविस्मरणीय झाला आहे त्याहीपेक्षा खतरनाक तो स्टाईल मधे वळून स्लो मोशन मधे जायला निघतो त्या वेळी " मर्द मर्द मर्द मर्द " असा कोरस आहे. तो ऐकताना गावभर कुत्री भुंकल्याचा भास होतो. हाच कोरस पुन्हा मिठुन कमिशनरला उद्धट उत्तरं देऊन त्याच स्लो मोशन मधे फिरतो तेव्हांही आहे.

फॅन्टास्टिक बीस्ट्स रटाळ आहे हे वाचुन बरं वाटलं. मला वाटलं की गोष्ट माहिती नसल्याने मला रटाळ वाटला असेल. हुश्य.
सध्या थेटरमधे काहीच पाहाण्यासारखे सिनेमे नाहीत.

ईट फॉलोजमधे त्या पांढर्‍या फ्रॉकमधल्या म्हातारीचा चालायचा प्रसंग खतरनाक आहे.

इट कम्स ऍट नाईट (२०१७)
A24 सिनेमा.
प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स
ICAN_dog_poster_web.jpg
मुख्य संकल्पना आहे-
एक लहानसे कुटुंब- नवरा बायको आणि त्यांचा टिनेज मुलगा- त्यांच्या आजोबांना रोग झाला म्हणून जड मनाने मारून टाकतात. बाहेर पॅन्डेमिक चालू असतो. नक्की काय रोग आहे आणि बाहेरच्या जगाची काय परिस्थिती आहे हे कळत नाही. केवळ रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग वाढू दिला तर माणूस मरतो, का झोंबी होतो- आपल्याला काही कळत नाही. पण रुग्णाला जगू द्यायचे नाही आणि ताबडतोब संपवायचे अशी पॉलिसी या कुटुंबाची तरी असते. आणि ते सुद्धा बाहेरच्या जगाबद्दल भीती बाळगून राहत असतात. कारण बाहेर जरी इतर लोक असले, तरी कुटुंबाकडे असलेल्या अन्न आणि पाण्याच्या साठ्यासाठी ते हल्ला करतील अशी भीती असते.
जेव्हा कधी कुटुंबातले लोक बाहेर जातात तेव्हा दिसते की सगळी जागा जंगला सारखी असते- यावरून समजते कि हा रोग सुरु होऊन काही वर्षे तरी झालीयेत.

पण काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक कुटुंब येते- आणि त्यांच्यासोबत रहायला लागते. दोन कुटुंबांमधला एकमेकांवरचा विश्वास अगदी पातळ दोऱ्याने बांधला असतो. एकेमकांचे रिसोर्स वापरणे हा एकच कॉमन उद्देश असतो. त्यांच्या नात्यामधले वाढत जाणारे टेन्शन आणि त्याची परिणीती- असा सिनेमाचा प्रवास आहे.
सिनेमा चांगला आहे. एका प्रकारे प्रेडिक्टेबल असला तरी प्रभावकारक मांडणी असल्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही. शेवट अगदी ओपन एंडेड आहे- बऱ्याच प्रकारे झालेल्या घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते. काही स्पष्टीकरणांमध्ये सिनेमाच्या नावाचे सुद्धा महत्व आहे.
सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणता येईल.

जॉर्डन पिलचा (गेट आउटचा दिगदर्शक) Us म्हणून सिनेमा सुद्धा पहिला, इतका खास वाटला नाही. पिलचा नोप म्हणून सिनेमा येत आहे- थेटर मध्ये पाहायचे ठरवले आहे. पिलचा गेट आउट भारी सिनेमा आहे.

एक रात्र प्राईम व्हिडीओवर सापडला. सुरूवात बोअर आहे. संतोष जुवेकरचा आवाज आणि संवादफेक दोन्ही असह्य आहे. आदिती शारंगधर मिसफिट आहे. सुबोध भावेला कशासाठी घेतलंय हे कळलं नाही. प्रसाद ओकचे पात्र भारी घेतले. भुलभुलैय्या सारखा आहे का अशी शंका आली होती. बर्‍यापैकी उत्कंठा कायम ठेवली होती. मात्र शेवटच्या रहस्यभेदात माती खाल्ली. एखाद्या तज्ञाला विचारून कथा पटकथा लिहीणे गरजेचे होते. ज्यांना तपशीलात जाणे गरजेचे वाटत नाही त्यांना एक चांगला रहस्यपट पहायला मिळेल.

वजह तुम हो पाहिला. सस्पेन्स आहे. पण वेगाच्या नादात डिटेलिंगकडे दुर्लक्ष केले आहे. एकदम वाईट म्हणणे जमत नाही Lol
सना खान माहिती आहे. बाकीचे चेहरे हॉरर मूवीज मधे पाहिलेत. जुन्या गाण्याच्या रीमिक्सचा व्हिडिओ अल्बम काढायचा विचार असेल, बजेट मध्ये फारसा परिणाम होणार नाही असे समजल्यावर त्याचा मूव्ही बनवला असेल असेच वाटते गाणी बघताना. अभिनय त्याच छापाचा आहे.

पितृऋण पाहिला. आवडला.
'त्या' दोघांसाठी वाईट पण वाटलं.
सुरुवातीपासूनच प्रेडिक्टेबल आहेच अर्थात.

प्लीज राग मानू नका पण हल्ली 'मृणाल देशपांडे' यांचा प्रेझेंस अगदी नको वाटावा इतका अभिनयाचा दर्जा घसरला आहे. या सिनेमात तसेही त्यांना फार वाव नव्हता. पण आहे त्या भूमिकेला त्यांनीही सिरियसली घेतलंय असं वाटतच नाही.

मध्यंतरी त्या डेली सोप मध्ये काम करायला लागल्या तेव्हापासून झालं असावं का असं कोण जाणे.

ता. क. हेमावैम आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व.

कॉमी किती मस्त डिटेल मध्ये लिहिता तुम्ही... वाचूनच चित्रपट अर्धा पाहिल्या सारखे होते...

मृणाल देशपांडे कोण?कुलकर्णी माहीत आहे
आणि ती हा हा हा हा कुंकू वाली मृण्मयी देशपांडे माहीत आहे.अजून कोणी आहे का?(मी गुगल केलं तर सगळीकडे मृण्मयीच आली)

Pages