Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईथली चर्चा वाचून सीमा पहावा
ईथली चर्चा वाचून सीमा पहावा कोण हे बघायचा मोह आवरला नाही.
हा खूप जुना फोटो आहे. ८० च्या
हा खूप जुना फोटो आहे. ८० च्या दशकातला.
डोकं बाजूला ठेवून काहीतरी
डोकं बाजूला ठेवून काहीतरी पहायचं होतं. बच्चन पांडे पाहिला. डोकं बाजूला ठेवून सुद्धा अ आणि अ सिनेमा आहे
मध्ये अर्धा-पाऊण तास जरा करमणूक झाली. पण बेताचीच. अर्शद वारसी आणि पंकज त्रिपाठीला वाया घालावलंय.
चंद्रमुखी चित्रपटाच्या
चंद्रमुखी चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल लावणी बद्दल.
@ ललिता, हो. सौंदर्याची चर्चा
@ ललिता, हो. सौंदर्याची चर्चा चालू होती म्हणून तरुणपणातील शोधला
सर सर केल्याने वात आला
सर सर केल्याने वात आला ग्यांगच्या गळेकाढूपणाचा ढोंगीपणा सिद्ध करायला आणखी पुराव्यांची आवश्यकता आहे का ?
धागे भरकटणे चालू असताना सांगायचे सोडाच, ते एंजॉय केले जातात. आणि जे त्यावर बोट ठेवतात त्यांना "त्यांच्याकडून अपेक्षाच नाही पण तुम्ही ? " असे साळसूदपणे ऐकवले जाते. चालू द्या. फक्त वेळच्या वेळी दाखवून दिलेले बरे म्हणून हा प्रतिसाद.
नरसिम्हा तेलुगू पाहिला
नरसिम्हा तेलुगू पाहिला युट्युब वर. रजनीकांत, रम्या क्रिष्णा, सौंदर्या.
अ आणि अ सिनेमांची साऊथची परंपरा जुनी च आहे..त्यामानाने आजकालचे साऊथ सिनेमे जरा सौम्य वाटतात मला..या सिनेमात एका सिनमधे रजनीकांत फुंकर मारतो आणि व्हिलन दूर उडून पडतो ..आणि ही बरेच सीन्स आहेत..पण साऊथ लोकांना त्याचं काही वाटत नाही आणि असेच सिनेमे आवडतात.
एका पिक्चरमध्ये तर केळे
एका पिक्चरमध्ये तर केळे फेकून मारतात , तर ते चाकूसारखे घुसते
https://youtu.be/B4r_djM_Xeg
हा विडंबन सिनेमा आहे हो..हे
हा विडंबन सिनेमा आहे हो..हे खरं नसतं पण मोठे हिरो करतात ते खरं असतं
असेच एका सिनेमात तेलुगू विनोदी अभिनेता ब्रह्मानंद ने बाहुबली चे विडंबन केलंय..शोधून देईन.
साऊथ वाल्यांची हार्ट
साऊथ वाल्यांची हार्ट रिप्लेसमेंट सर्जरी तर एक नंबर आणि हाईट म्हणजे रिप्लेस करायचं हार्ट हिरो तळहातावर घेऊन चाललेला असतो.
असेच एका सिनेमात तेलुगू
असेच एका सिनेमात तेलुगू विनोदी अभिनेता ब्रह्मानंद ने बाहुबली चे विडंबन केलंय..शोधून देईन
लवकर दे . उत्सुकता आहे
त्या शिवाजी द बॉस मध्ये रजनी
त्या शिवाजी द बॉस मध्ये रजनी सरांनी शॉक लागून स्वतःला मरवून घेऊन मग पोलीस पंचनाम्यासाठी घेऊन जात असताना जीप मधून स्वतःला लक्झरी बस च्या डिकीत घालून मग डॉक्टर कडे नेऊन मग परत हार्ट चालू केलेय.ब्रेन डेथ, बाकी ऑर्गन डेथ इतका वेळ हृदय बंद राहिल्याने वगैरे ची ऐसी तैसी.
हे सगळं का, तर हिरॉईन च्या पत्रिकेत नवऱ्याला मृत्यूयोग असल्याने ती लग्नाला तयार नसते
आपल्या दोन मुलातले एक तुमचे
आपल्या दोन मुलातले एक तुमचे नाही हा सुप्रसिद्ध डायलॉग कुठल्या चित्रपटात आहे ?
मराठी - पडछाया
मराठी - पडछाया
https://m.imdb.com/title/tt0250639/
A man's wife confesses to him on her deathbed that one of their two children isn't his and this revelation shatters his world and his family life.
गंमत म्हणजे एका नवीन हॉलिवूड मुवीतपण हे बघितले , फक्त हा थोडा हॉरर टाईप आहे.
https://youtu.be/LPr5lhOqT0w
द गिफ्ट
हा प्लॉट बराचसा पडछाया सारखा वाटला. पण त्यात कन्फ्युजन दूर होऊन हॅपी एन्ड होतो, हिरोईन आधीच गचकते, इतके सोडले तर आलमोस्ट सेम
अच्छा. धन्यवाद.
अच्छा. धन्यवाद.
का सिनमधे रजनीकांत फुंकर
का सिनमधे रजनीकांत फुंकर मारतो आणि व्हिलन दूर उडून पडतो >>>> सिरिअसली
पन मला रजनीकांत आवडतो
हे सगळं का, तर हिरॉईन च्या
हे सगळं का, तर हिरॉईन च्या पत्रिकेत नवऱ्याला मृत्यूयोग असल्याने ती लग्नाला तयार नसते Happy
>>>>>>
आमच्याच भटजींना भेटले असते. वडापिंपळाच्या झाडासोबत लग्न लाऊन प्रश्न मिटवला असता पंचवीस हजारात..
ऐश्वर्या रायांचे केले होते
ऐश्वर्या रायांचे केले होते
https://www.news18.com/news/india/case-filed-against-ashs-tree-wedding-2...
सीमा पहावा = उत्तर भारतीय
सीमा पहावा = उत्तर भारतीय सिनेमे.
दुसरी ती चाढा का काय ती सुद्धा. त्याच त्याच प्रकारच्या सिनेमात. अभिनय चांगलाच असतो पण बोर होतेय ती.
ऐश्वर्या रायांचे केले होते >>
ऐश्वर्या रायांचे केले होते >>> हो ना, त्यामुळे रेट वाढले
महाभारतात गांधारीचे
महाभारतात गांधारीचे बकर्याबरोबर लगीन केले होते.
बरे झाले आठवण केली
तो फुरोगामी तिकडे नाचतोय
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या दत्ताचे कुत्र्यासोबत लग्न दाखवलेले आहे. त्या चित्रपटात श्रेयस तळपदे पण आहे वाटते.
मराठी - पडछाया >> चित्रपटाचं
मराठी - पडछाया >> चित्रपटाचं नाव 'पाठलाग' होतं ना? का हा वेगळा आहे? आपल्या दोन मुलांपैकी एक - हे पाठलाग मध्ये होतं असं आठवतंय. सेम कास्ट होती. बापाला मुलगी लाडकी असते. पण मुलगा नेमका त्यांचा असतो. कुणी पाहिला नसेल तर रहस्यभेदोत्तरपश्चात्तापविदग्ध दिलगिरी व्यक्त करतो.
ता क. *** सॉरी, पाठलाग वेगळा होता. पडछाया बरोबर आहे.
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या दत्ताचे कुत्र्यासोबत>>>
वेलकम टू सज्जनपूर बहुतेक.
छान होता सिनेमा.
दोन मुले , हे पडछाया मध्ये
दोन मुले, एक वेगळ्या माणसाचा , हे पडछाया मध्ये होते , डॉ घाणेकर , रमेश देव
पाठलाग म्हणजे मेरा सायाचा ओरिजिनल मराठी मुवि , त्यातही डॉ घाणेकर आहेत
बरोबर. माझा आधी गोंधळ झाला.
बरोबर. माझा आधी गोंधळ झाला. म्हणून मग ता क लिहिला.
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या दत्ताचे कुत्र्यासोबत लग्न दाखवलेले आहे. >>> रोसेशचं लग्न कोंबडीबरोबर लावतात ते आठवलं
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या
कुठल्याश्या चित्रपटात दिव्या दत्ताचे कुत्र्यासोबत लग्न दाखवलेले>>>
वेलकम टू सज्जनपूर
भन्नाट मुव्ही होता तो
श्रेयस तळपदे ने सही काम केलं आहे
खूप दिवस झाले पाहिलेला.
खूप दिवस झाले पाहिलेला. दिव्या दत्ता होती कि नाही आठवत नाही.
अमृता राव आणि श्रेयस तळपदे चांगले आठवतात.
>>> बापाला मुलगी लाडकी असते.
>>> बापाला मुलगी लाडकी असते. पण मुलगा नेमका त्यांचा असतो
नाही, दोन्ही मुलं नवर्याचीच असतात.
आता मी रहस्यभेदोत्तरपश्चात्तापविदग्ध दिलगिरी व्यक्त करू की काय!
Pages