Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजमा चावल मस्त चित्रपट आहे>>
राजमा चावल मस्त चित्रपट आहे>>> हो.. चांगला आहे.. एकदम हलका फुलका
लव पर स्वेअर फूट पाहिला.
लव पर स्वेअर फूट पाहिला. टाईम्पास आहे. जेवताना बघायला. मस्त काम केलय सर्वांनी.
का पिक्चर मधे तो व कोणीतरी
का पिक्चर मधे तो व कोणीतरी व्हिलन एकमेकांच्या नडग्या एकमेकांवर आपटतील अशा लाथा घालत असताना दाखवले आहेत. सुमारे १५-२० वेळा शेक हॅण्ड केल्यासारखे एकमेकांच्या पायावर पाय आपटतात. पण नंतर दोघेही पाय धरून विव्हळताना दाखवले आहेत Happy
तो "हु अॅम आय" आहे. पुर्णच पिक्चर भारी आहे तो.
होय नारळाचे सलाईन लावतात
होय
नारळाचे सलाईन लावतात,
युट्युबवर मै कौन हु फुकट आहे
केजीएफ टोटल बकवास मूव्ही.
केजीएफ टोटल बकवास मूव्ही. पैसे आणि वेळ वाया गेल्याचा अनुभव घेण्यासाठी बेस्ट. साऊथच्या असल्या मूवीज मधे प्रेक्षक बिनडोक आहे हे धरूनच बनवायचा नियम आहे का तिकडे ?
केजीएफ टोटल बकवास मूव्ही.
केजीएफ टोटल बकवास मूव्ही. पैसे आणि वेळ वाया गेल्याचा अनुभव घेण्यासाठी बेस्ट. साऊथच्या असल्या मूवीज मधे प्रेक्षक बिनडोक आहे हे धरूनच बनवायचा नियम आहे का तिकडे ?
>>> + 1 अरे दाद्या हाच मुद्दा आहे त्या माझ्या धाग्याचा.. एक्साक्टली...
लोकांना या धाग्यावर विषयांतर
आज nanny cam बघितला...स्लो लेव्हल ने सुरु होतो पण शेवटी छान ट्विस्त आहे...
प्राईम वर गोंद्या मारतंय
प्राईम वर गोंद्या मारतंय तंगडं नावाचा चित्रपट आहे. हॉरर कॉमेडी असं म्हटलंय. रमेश भाटकरचं भूत गोंद्या म्हणजे भरत जाधवला भेटतं. त्याच्याबरोबर अजून दोन भूतं असतात. भरत जाधव हा भोळा म्हणजे वेडसर, मतीमंद असून त्याला आये (मधू कांबीकरा ) असते. गावच्या पाटलाच्या मुलीच्या मागे गावातली रिटे मुलं असतात. त्यातला एक गोंद्याला तिच्याकडे पत्र देऊन उत्तर आणायला सांगतो. गोंद्या त्यात मार खातो. पाटील, सरपंच आणि आमदार असा फुल्ल जामानिमा आहे. सरपंच पाटलाला घाबरतो. पाटील आमदाराला.
अशा मराठी पिक्चरमधे नेहमी असतं ते म्हणजे अंगात पावर येंण, भूत भेटणं, देव प्रसन्न होणं किंवा चमत्कारी पावडर, वाळू भेटणं. यात गोंद्याला स्मशानात तीन भूतं भेटतात.
साऊथचे हाणामारीचे पिक्चर्स पाहून टप्प्याटप्प्याने नॉर्मलला येताना हा मस्टच होता. आता एक मक्याचा पाहिला की पूर्ण नॉर्मलला येता येईल.
गाणी अवर्णनीय अशीच आहेत.
वैधानिक इशारा - इथे वाचून कुणी माबोवर मापं काढण्यासाठी बघावा या विचारात असाल तर अशा पिक्चर्सचं माप निघत नसतं. ते या पलिकडे गेलेले असतात.
रेटींग - गुंडा वर्गवारी
हुंडा चित्रपट वेगळ्याच
गुंडा चित्रपट वेगळ्याच दर्जाचा आहे, बरोबरी नाही होऊ शकत
गुंडा तुकड्या तुकड्यात
गुंडा तुकड्या तुकड्यात पाहिलाय.
गुंडा तुकड्या तुकड्यात
डपो.
एका दमात पूर्ण बघावा असा
एका दमात पूर्ण बघावा असा चित्रपट नाहीये तो
एकेक मास्टरपीस समजून उमजून मग पुढे जावं लागतं
खरंय. आपण सामान्य माणसं.
खरंय. आपण सामान्य माणसं. एव्हढा लोड झेपणारा नाहीच.
मिसम्मा- तेलुगू सिनेमा एन टि
मिसम्मा- तेलुगू सिनेमा एन टि रामाराव आणि महानटी सावित्री अभिनीत.प्राईमवर पाहिला.चांगला आहे कॉमेडी हलकाफुलका.
गुंडा हॉस्टेल मध्ये बघायचा
गुंडा हॉस्टेल मध्ये बघायचा चित्रपट आहे.. नंतर त्याची इतकी पब्लिसिटी झालीय कि फोमो मध्ये लोक बघतात.. आवडत नसला तरी आवडला म्हणतात... इतर लोकांनाबघायला सांगतात..
फोमो ????
फोमो ????
Fear of Missing out - fomo
Fear of Missing out - fomo
लिंक स्पॅम किंवा फिशिंग आहे
लिंक स्पॅम किंवा फिशिंग आहे का?
इन्फोरमेशन दादा लै भारी
इन्फोरमेशन दादा लै भारी जनहीताचं काम करु रायले बगा तुमी.
King Richard हा व्हिनस आणि
King Richard हा व्हिनस आणि सेरेना विल्यमच्या जीवनपटावर आधारित प्रेरणादायी चित्रपट आहे. मस्त आहे Hotsar वर बघितला.
खरंय. आपण सामान्य माणसं.
खरंय. आपण सामान्य माणसं. एव्हढा लोड झेपणारा नाहीच.
>>>>
याच चित्रपटासाठीच विल स्मिथला
याच चित्रपटासाठीच विल स्मिथला ऑस्कर मिळालं आणि पुढचा ड्रामा घडला.
द बाबाडूक हा ऑस्ट्रेलियन
द बाबाडूक हा ऑस्ट्रेलियन सिनेमा पाहिला.
एकटी आई आणि तिचा लहान मुलगा - बाबाडूक नावाच्या भूत/राक्षसाची गोष्ट वाचतात. हळूहळू त्यातल्या गोष्टी त्यांच्या घरात जाणवू लागतात...
If it's in a word, or if it's in a book
you can't get rid of the Babadook.
A rumbling sound and three sharp knocks
ba Ba ba... Dook Dook Dook
That's when you'll know that he's around.
सिनेमा भयपट असला तरी काही मस्त रूपकं आहेत. पूर्ण सिनेमा बाबाडूकच्या ऐवजी वाईट दडपलेल्या आठवणींवर आहे असे म्हणता येऊ शकते.
I'll wager with you. I'll make you a bet.
The more you deny the stronger I get.
You start to change when I get in,
the Babadook growing right under your skin
सिनेमा आवडला- नेटफ्लिक्स वर आहे.
आज आर या पार परत बघितला...
आज आर या पार परत बघितला... काळाच्या पुढचा चित्रपट...
मस्त वाटतो चित्रपट.. जॅकी श्रॉफ चे कॅरॅक्टर एकदम रियल कॅरॅक्टर आहे.. असे लोकी असतात...
त्यातली गाणी मस्त आहेत
त्यातली गाणी मस्त आहेत
काल शेर शिवराज बघितला,
काल शेर शिवराज बघितला, पावनखिंड ने थोडी निराशा झाली होती ती काल भरून निघाली. दिगपाल लांजेकरचा बहिर्जी नाईक नाही आवडला, हरिशच हवा होता. चीमाचे शिवाजी महाराज पहिल्या चित्रपटापासून नाही आवडले. इथे कुणाला आवडले असतील तर हरकत नाही पण मला का आवडला नाही असा प्रश्न विचारू नका.
पण मला का आवडला नाही असा
पण मला का आवडला नाही असा प्रश्न विचारू नका >>
'गर्ल्स' नावाचा एक भयाण
प्राईमवर 'गर्ल्स' नावाचा एक भयाण मराठी चित्रपट बघतेय. चित्रपटात काही म्हणजे काहीही चांगले किंवा कळणारे नाहीये.
'आखीर केहना क्या चाहते हो भाई' याचं उत्तर शोधायला तुकड्या तुकड्यात सहन करून संपवतेय चित्रपट.
इतका भंपक, इतका अ आणि अ आहे की सांगता सोय नाही.
मराठीत बॉईज मूवी सुद्धा होता
मराठीत बॉईज मूवी सुद्धा होता ना.. त्याच्यावरून प्रेरीत होऊन महिलांची बाजू दाखवायला काढला आहे का
मराठीत बॉईज मूवी सुद्धा होता
मराठीत बॉईज मूवी सुद्धा होता ना
लहान मुलांच्या तोंडी डबल मिनींग वाक्ये असणारे असे चित्रपट डोक्यात जातात.
Pages